ज्यावर तुम्ही प्रेम करता तेच करावं.

श्रीकृष्ण सामंत's picture
श्रीकृष्ण सामंत in जनातलं, मनातलं
25 Nov 2008 - 9:33 am

मी एकदा प्राईव्हेट टॅक्सीने मुंबईहून कोल्हापूरला जायला निघालो होतो.टॅक्सीचा मालक मला म्हणाला,
"साहेब तुमच्या बरोबर एक गृहस्थ थेट कोल्हापूरला जाणार आहेत.तुम्ही त्यांना घेऊन गेलात तर तुम्हाला प्रवासात कंपनी मिळेल आणि ते तुमच्याशी जातं भाडं पण शेअर करतील."
मी म्हटलं ठीक आहे.जायच्या वेळी ते गृहस्थ आले.पिळदार अंगाचा, डोक्यावर अगदी मुद्दाम तुरळक केस ठेवलेला,अंगात सफेद झब्बा,आणि खाली शुभ्र मसराईझ्ड धोतर, गळ्यात एक भरजरी सोन्याची सांखळी,झब्ब्याचं वरचं बटण बळेच न लावलेलं,पण छाती तुळतुळीत एक ही केस नसलेली,पायात कोल्हापूरी चप्प्ल,निमगोरा, असा असामी खड्याआवाजात मला "जय महारष्ट्र" म्हणत टॅक्सी जवळ येऊन उभा ठाकला.

त्याचं ते भारदस्त शरिर बघून मीच त्याला म्हणालो तुम्ही मागेच बसा मी ड्राईव्हरच्या बाजूला पुढच्या सीटवर बसतो.त्याला ती माझी सुचना आवडली.इतका लांबचा प्रवास असल्याने अंमळसं सगळ्यांनाच ऐसपैस बसायला आवडेलच.

प्रवासात जेव्हा गप्पाना रंग चढला तेव्हा ते गृहस्थ मला म्हणाले,
"मला वाटतं जे लोक जे काही करतात त्याबद्दल त्याना आत्मसन्मान वाटला पाहिजे. जरी इतर कुणीही त्याबद्दल गैरसमज करून घेतला किंवा तिरस्कार केला तरीही.
मी व्यवसाईक कुस्तीगार आहे.गेली जवळ जवळ दहा वर्षे.ह्या माझ्या व्यवसायातून माझी गुजराण व्हायची. पण माझ्या कुस्ती खेळण्याच्या व्यवसायाला लेबल चिकटवलं जायचं. फाल्तू खेळ,खतरनाक शौक,बिनडोकी शारिरीक प्रदर्शन अशा पद्धतीची उपनावं लावली जायची.

मी ज्यावेळी शाळेत जायचो,त्यावेळी एकदा माझ्या गुरूजीनी मला सर्वांसमोर तंबी दिली होती की मी जर का अभ्यासात जास्त लक्ष न देता कुस्ती खेळण्यात वेळ घालवला तर,मला पुढे चांगलं उपजीविकेचं काम मिळणार नाही.माझं भवितव्य निराशाजनक होणार.
त्या निराशाजनक काळात मी कुस्ती खेळायचं अजिबात सोडलं नाही.आणि त्यात उत्तरोत्तर प्रगती करीत राहिलो.

तरीपण बरेच वेळा माझे प्रयत्न विफल व्हायचे.पण माझ्या लक्षात आलं की एखाद्दा गोष्टीत निपूण व्हायचं असेल तर प्रयत्न करीत राहायचं.मग जरी खरचटणं झालं,थोडा मार बसला,एखादा हात पाय मुरगळला,लोकांनी टिंगल केली तरी.
देशात अलीकडे कुस्तीच्या खेळाला समाजातल्या मुख्यधारेत चांगलीच मान्यता मिळाली आहे.पण अजूनही काही प्रतिकूल रुढिबद्द लोक आहेत.कुस्तीला अनुकूल असलेले जे लोक मला माहित आहेत ते सामाजाचे उत्तरदायी नागरीक आहेत.त्यातले बरेच लोक वडील,घरंदाज,जगप्रवास केलेले,आणि सफल ठेकेदार आहेत.त्यांचा पेहराव आणि राहाण्याची स्टाईल ही आमच्या विश्वातली संस्कृती असावी.

तर असा मी चाळीसीतला,पती आणि तीन मुलांचा बाप,एक मोठी जबाबदारीची आणि दायीत्वाची लांबलचक यादी घेऊन असलेला आहे.आणि मला जरी खूप उपाधी असल्या जश्या-सि.ई.ओ. एक्झीक्युटीव्ह प्रोडयुसर,सिनीयर कनस्लटंट,फॉऊन्डेशन चेअरमन, फाल्तु अभिनेता तरी सुद्धा मला ज्याचा खास अभिमान आहे तो म्हणजे "व्यवसायीक कुस्तीगार" म्हणून. ही उपाधी मी जरूरीच्या कागदपत्रावर लिहीतो.जरी मला कुठल्यातरी सुरक्षा नाक्यावर,कस्टम ऑफिसात तपासणीला जावं लागलं तरी.

हे खरं आहे की,कुस्ती खेळणं ही काही लोकांच्या दृष्टीने ग्रेट गोष्ट नसेलही पण मी जे काय करतो त्याचा मला अभिमान आहे.माझ्या आईवडीलानी माझ्या ह्या वेडाबद्दल त्याची कधीही उपयुक्तता विचारली नाही.
माझं हे उदाहरण मी एक दिवस माझ्या मुलांकडे पासऑन करणार आहे.माझा मोठा मुलगा उत्साही कुस्तीगार आहे.तो मजा म्हणून कुस्ती खेळतो आणि ते मला पुरेसं आहे.
कदाचीत तुम्ही श्रेष्टतमस्थानावर पोहचूं शकणार नसाल.पण ज्यावर तुम्ही प्रेम करता ते तुम्ही करीत असाल तर त्यात जे सुख आणि आनंद आहे ते तुम्ही धनवान आणि विख्यात जरी असला तरी त्यात नाही."

आणखी बर्‍याच गप्पा प्रवासात झाल्या.पण त्या कधीतरी पुढच्या वेळी.

श्रीकृष्ण सामंत

कथालेख

प्रतिक्रिया

सर्किट's picture

25 Nov 2008 - 9:56 am | सर्किट (not verified)

कदाचीत तुम्ही श्रेष्टतमस्थानावर पोहचूं शकणार नसाल.पण ज्यावर तुम्ही प्रेम करता ते तुम्ही करीत असाल तर त्यात जे सुख आणि आनंद आहे ते तुम्ही धनवान आणि विख्यात जरी असला तरी त्यात नाही."

सामंत काका,

आम्ही तर म्हणतो, की एकदा एखाद्या क्षेत्रात श्रेष्टतमस्थानावर पोहोचले, की मग त्या क्षेत्रात काहीही सुख आणि आनंद राहात नाही. त्यामुळे सुख आणि आनंदच श्रेष्ठतम आहे.

-- सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

विनायक प्रभू's picture

25 Nov 2008 - 11:47 am | विनायक प्रभू

असेच म्हणतो.

श्रीकृष्ण सामंत's picture

26 Nov 2008 - 9:54 am | श्रीकृष्ण सामंत

सर्किट,विनायक प्रभू,
आपल्या म्हणण्य़ाशी मी सहमत आहे.
आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

जैनाचं कार्ट's picture

25 Nov 2008 - 9:49 am | जैनाचं कार्ट (not verified)

>>>कदाचीत तुम्ही श्रेष्टतमस्थानावर पोहचूं शकणार नसाल.पण ज्यावर तुम्ही प्रेम करता ते तुम्ही करीत असाल तर त्यात जे सुख आणि आनंद आहे ते तुम्ही धनवान आणि विख्यात जरी असला तरी त्यात नाही."

कधीकाळी गांधी म्हणाले होते... जे उपयोगी आहे ते जरुर घ्यावे !
तुमच्या लेखातुन आम्हाला अनेक .... विचार भेटतात.. पुढे देखीलदहा एक वर्षा नंतर मी देखील असेच विचार लिहीन !

जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आपले संकेतस्थळ

श्रीकृष्ण सामंत's picture

26 Nov 2008 - 9:59 am | श्रीकृष्ण सामंत

जैनाचं कार्ट,
कदाचीत नव्हे तर खचीत आपण लिहाल.मी मात्र वाचायला जीवंत असलो पाहिजे.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

जैनाचं कार्ट's picture

26 Nov 2008 - 10:02 am | जैनाचं कार्ट (not verified)

असे म्हणू नका साहेब !
तुम्हाला आमचे ही आयुष्य लाभो हीच प्रार्थना त्या प्रभु चरणी !

जैनाचं कार्ट
देहि शिवा वर मोहि इहै...
शुभ करमन ते कबहूं न टरूं...
न डरूं अरि सौं जब जाई लरूं...
निसचै कर अपनी जीत करूं...

आपले संकेतस्थळ

सहज's picture

25 Nov 2008 - 9:53 am | सहज

"व्यवसायीक कुस्तीगार"
शिवाय आता तर डब्ल्यु डब्ल्यु एफ / इ / व इतर मधे "व्यवसायीक कुस्तीगार" हे फल्तु अभिनेत्यांसारखाच पैसा, फॅन क्लब मिळवतात. आनंद आहे.

ज्यावर तुम्ही प्रेम करता ते तुम्ही करीत असाल तर त्यात जे सुख आणि आनंद
प्रा. देसाई यांच्या मते हे वाक्य सापेक्ष आहे की नाही ?

आणखी बर्‍याच गप्पा प्रवासात झाल्या.पण त्या कधीतरी पुढच्या वेळी.
बाकी प्रवासात जास्त तीव्र मतभेद, गंभीर चर्चा झाल्या नसतीलच बहुतेक.

तुमच्या जीवनप्रवासात इतकी हिरे मंडळी भेटली याचा आम्हाला किंचीत हेवा वाटतो. कार पुलींग [Carpooling], फ्लाईंग कमर्शियल केलेच पाहीजे.

श्रीकृष्ण सामंत's picture

26 Nov 2008 - 10:09 am | श्रीकृष्ण सामंत

सहज,
प्रो.देसायाना मी विचारून नक्कीच सांगीन.
"बाकी प्रवासात जास्त तीव्र मतभेद, गंभीर चर्चा झाल्या नसतीलच बहुतेक."
त्याचं असं आहे,
"मऊ मेणाहूनी आम्ही विष्णूदास । कठीण वज्रासी भेदू ऐसे।।"
Carpooling ची कल्पना चांगली आहे.
आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार

www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

आनंदयात्री's picture

25 Nov 2008 - 9:56 am | आनंदयात्री

हे खरं आहे की,कुस्ती खेळणं ही काही लोकांच्या दृष्टीने ग्रेट गोष्ट नसेलही पण मी जे काय करतो त्याचा मला अभिमान आहे.माझ्या आईवडीलानी माझ्या ह्या वेडाबद्दल त्याची कधीही उपयुक्तता विचारली नाही.

वाह वाह ... हे वाक्य जिंकणारे !!

अभिजीत's picture

25 Nov 2008 - 10:02 am | अभिजीत

".. कदाचीत तुम्ही श्रेष्टतमस्थानावर पोहचूं शकणार नसाल.पण ज्यावर तुम्ही प्रेम करता ते तुम्ही करीत असाल तर त्यात जे सुख आणि आनंद आहे ते तुम्ही धनवान आणि विख्यात जरी असला तरी त्यात नाही .. "

बढीया ...

सुखी माणसाचा एक सदरा मिळाला की!!!

सामंतकाका, आपली बोधकथा आवडली.
धन्यवाद.

- अभिजीत

श्रीकृष्ण सामंत's picture

26 Nov 2008 - 10:17 am | श्रीकृष्ण सामंत

आनंदयात्री,अभिजीत,
आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार.

www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

चित्रा's picture

25 Nov 2008 - 10:13 am | चित्रा

लेख, आवडला.
ज्यावर तुम्ही प्रेम करता ते तुम्ही करीत असाल तर त्यात जे सुख आणि आनंद आहे ते तुम्ही धनवान आणि विख्यात जरी असला तरी त्यात नाही.

हे अगदी पटण्यासारखे आहे. आनंद ही मनाची एक स्थिती आहे असे म्हणतात (हॅपीनेस इज ए स्टेट ऑफ माईंड). हवे ते काम करण्यात मिळणारा आनंद कधीही श्रेष्ठच. आणि असे काम जर पुरेसे पैसे मिळवून देत असले तर अधिकच चांगले.

लेखाच्या विषयाशी काहीसे अवांतर होईल, पण एक लेख वाचनात आला. यात आनंद आणि आवडत्या कामाचा कसलाही संबंध लावलेला नाही, अंतिमतः आनंद आणि पैसा यांचे एकमेकांशी नाते काय तेवढेच काय ते तपासले आहे, पैसा नक्की आनंददायक गोष्टी करण्याने आला का नाही याचा कसलाही संबंध लावलेला नाही.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

25 Nov 2008 - 10:26 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

हे खरं आहे की,कुस्ती खेळणं ही काही लोकांच्या दृष्टीने ग्रेट गोष्ट नसेलही पण मी जे काय करतो त्याचा मला अभिमान आहे.माझ्या आईवडीलानी माझ्या ह्या वेडाबद्दल त्याची कधीही उपयुक्तता विचारली नाही.
अगदी! कोणीही समुपदेशकसुद्धा या विचारांचा पुरस्कर्ता असेल.

कदाचीत तुम्ही श्रेष्टतमस्थानावर पोहचूं शकणार नसाल.पण ज्यावर तुम्ही प्रेम करता ते तुम्ही करीत असाल तर त्यात जे सुख आणि आनंद आहे ते तुम्ही धनवान आणि विख्यात जरी असला तरी त्यात नाही.
माणसाला एक महत्त्वाकांक्षा असली पाहिजे, आणि एकदा ती गोष्ट मिळाली आणि दुसरं काहीच ध्येय नसेल तर जगण्याला काय अर्थ रहाणार? त्यामुळे या मुद्द्यावर सर्किटकाकांशी सहमत.

तुमच्या जीवनप्रवासात इतकी हिरे मंडळी भेटली याचा आम्हाला किंचीत हेवा वाटतो. कार पुलींग [Car-pooling], फ्लाईंग कमर्शियल केलेच पाहीजे.
सहजरावांशी डब्बल सहमत. मलाही तुमचा हेवा वाटतो आम्हालाच सगळी कस्पटंच बरी भेटतात. (क्रूपया कोणीही हे वाक्य स्वतःवर ओढवून घेऊ नये.) आणि हो हो, आपली पृथ्वी वाचवण्यासाठी कार पुलिंग केलंच पाहिजे.

श्रीकृष्ण सामंत's picture

26 Nov 2008 - 10:23 am | श्रीकृष्ण सामंत

चित्रा,अदिती,
आपल्या म्हणण्याशी मी सहमत आहे.
आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार.

www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

श्रीकृष्ण सामंत's picture

26 Nov 2008 - 10:23 am | श्रीकृष्ण सामंत

चित्रा,अदिती,
आपल्या म्हणण्याशी मी सहमत आहे.
आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार.

www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

विजुभाऊ's picture

25 Nov 2008 - 11:46 am | विजुभाऊ

सामन्तकाका तुमचे लेख बरेचदा बोधप्रद असतात. अर्थात प्रत्येक लेख बोधप्रद असलाच पाहिजे हा आग्रह कशाला
"शेख करता है मस्जीद मे सजदे
उनका असर हो ये जरुरी तो नही"
बाकी यमुतैंशी सहमत.
अवांतरः कोणाच्याच पत्रिकेत पृथ्वी हा ग्रह का नसतो. जातकावर जर प्लुटो च्याही गुरुत्वाकर्षणाचा परिणाम होत असेल तर पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाचाही होत असलाच पाहिजे

मुम्बैच्या उकाड्यातही अंगावर शिरशिरी आणणार्‍या थंडीची आठवण येऊन तुमचे गाल आरक्त होत असतील तर याचे आश्चर्य बाळगु नका. त्या उकाड्यातही अंगावर शिरशिरी आणणारी आठवण तुम्ही जवळ बाळगताय. त्या आठवणीला लाख सलाम

श्रीकृष्ण सामंत's picture

26 Nov 2008 - 10:28 am | श्रीकृष्ण सामंत

विजुभाऊ,
पटतं आपलं म्हणणं.
आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

कपिल काळे's picture

26 Nov 2008 - 12:13 am | कपिल काळे

श्रम मेहनत ह्याला महत्व आहे. आपण काय करतोय ह्यापेक्षा आपण ते कसे करतोय ह्याला महत्व आहे. त्यातून आपल्याला मिळणारे समाधान हीच आपली कमाई असते.

http://kalekapil.blogspot.com/

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

26 Nov 2008 - 9:37 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

श्रम मेहनत ह्याला महत्व आहे. आपण काय करतोय ह्यापेक्षा आपण ते कसे करतोय ह्याला महत्व आहे. त्यातून आपल्याला मिळणारे समाधान हीच आपली कमाई असते.
वाह! काय बोललात कपिल काका!! "आपण काय करतोय ह्यापेक्षा आपण ते कसे करतोय ह्याला महत्व आहे." अगदी १००% सहमत.

(आयडिअलिस्टीक)अदिती

छोटा डॉन's picture

26 Nov 2008 - 1:55 am | छोटा डॉन

तुम्ही श्रेष्टतमस्थानावर पोहचूं शकणार नसाल.पण ज्यावर तुम्ही प्रेम करता ते तुम्ही करीत असाल तर त्यात जे सुख आणि आनंद आहे ते तुम्ही धनवान आणि विख्यात जरी असला तरी त्यात नाही

+१,
आजच्या पिढीतल्या ( नव्हे सर्वच काळातल्या ) करियरीस्टीक ( मराठी शब्द ? ) पिढीच्या डोळ्यात झणझणीत अंजण घालणारे बोधपर वाक्य.
सहमत आहे ह्याच्याशी ...
ह्या "श्रेष्ठतमस्थानावर" पोहचण्याच्या शर्यतीत कित्येक जणांनी आपले जीवलग नकळतपणे आपल्यापासुन तोडले, आज ते कदाचित असतीलही टॉपवर पण तो आनंद वाटुन घ्यायला बरोबर कोणी असण्याची शक्यता कमी होत चाललेली आहे.
उत्तम लेख ...

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

विजुभाऊ's picture

26 Nov 2008 - 9:32 am | विजुभाऊ

डॉन्याशी १०००% सहमत

आपण एखादा विचार ;एखादी गोष्ट करतो किंवा करायचे टाळतो ते आनन्द मिळवणे किंवा वेदना टाळणे या दोन्ही साठीच

वेताळ's picture

26 Nov 2008 - 9:56 am | वेताळ

आजकाल एकमेकाच्या पुढे जाण्याच्या शर्यतीत आपण जीवनातल्या खुप मौल्यवान गोष्टी हरवुन जातो. मात्र ज्यावेळी थोडी उसंत विचार करण्यास मिळते त्यावेळी समाधाना एवजी मन उदास होते. तुम्ही साधी पण खुप आशयपुर्ण गोष्ट सांगितली आहे,त्याबद्दल धन्यवाद.
वेताळ

सर्किट's picture

26 Nov 2008 - 1:31 pm | सर्किट (not verified)

+१ !!

-- सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

सखाराम_गटणे™'s picture

26 Nov 2008 - 1:36 pm | सखाराम_गटणे™

,कुस्ती खेळणं
हे खरच महत्वाचे आहे
जिवनात बर्‍याच कुस्त्या खेळाव्या लागतात.