हि कार!

केसुरंगा's picture
केसुरंगा in जे न देखे रवी...
25 Nov 2008 - 3:41 am

प्रदीप कुलकर्णींची 'शिकार!' बघून आमची कार आम्हाला आठवली नसती तरच नवल! ;)
.......................................
हि कार!
...............................................

उन्हात या कोवळ्या सकाळीच धार येते
नि संपता संपता बघा ही दुपार येते!

कधी तरी भेटती जुने मित्र सांजवेळी...
नशेत होतात छान गप्पा... बहार येते!

सदैव हा तर्र प्यायलेलाच राहतो मी...
नि शुद्ध येथे कधी तरी एक बार येते!

कधी कधी आग आग होते मला परंतू...
कधी कधी हीवही मला फार फार येते!

कुणी कशी ही शिवी मला घातली तरीही...
कशी कळेना मलाच ऐकू सतार येते!

फिरून मी पाहतो स्वतःचाच हा खटारा ...
कसे कळेना मलाच कोठून दार येते!

धरून तू नीट बैस़; ध्यानात ठेव हेही...
तशी मला पण हकावयासी हि कार येते!!

-केसुरंगा

कवितागझलविडंबन

प्रतिक्रिया

शितल's picture

25 Nov 2008 - 5:51 am | शितल

हि कार चांगली हकावली आहे. :)