सार्स कोविड- २ २०१९ मध्ये मानव प्रजातित उतरुन सहा महिने उलटून गेले. महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचे झाले तर पहिल्या १०८ दिवसात १०,००० मृत्यू झाले. त्या नंतर मागच्या ३७ दिवसात १०,००० जीव गेले त्यातील ५००० मागच्या १६ दिवसात गेलेत. संदर्भ
पहिल्या १०८ दिवसात जे १०,००० गेले त्यातले ५२% मुंबईतले होते, नंतरच्या १०,००० मुंबईचा टक्का घसरून १९% म्हणजे गेल्या ३७ दिवसातील १०,००० मृत्यू पैकी ८१ % उर्वरीत महाराष्ट्रातून आलेत. पुणे जिल्ह्याचा अॅक्टीव्ह केसलोड मुंबई जिल्ह्याच्याच्या अॅक्टीव्ह केसलोडच्या चक्क दुप्पट झाला आहे.
( दैनिक सकाळच्या बातमीवर आधारीत 'आता तरी भानावर या' या शीर्षकाचा मी धागा काढला. काही मिपाकरांनी त्याची 'जिलबी' म्हणून संभावना केली - कमाल म्हणजे मिपा संपादक कि मालकांनी त्यांची बाजू घेत माझी संपादन सुविधा कमी केली!)
माहित नसलेल्यांची खिसगणती नाही. सध्या प्रत्येक दहा बिल्डींग मध्ये एखादी अधिकृत अॅक्टीव्ह केस असल्यास नवल नसावे. कुणि एक सुशांतसिंग गेला तर हल्लकल्लोळ केला जातो, कोविडने गिळलेल्या १०-२० हजारांचे जीव कमी मोलाचे आहेत ? मास्क, सॅनिटाइजर व सुरक्षित अंतर ही साधीशी तीन सामाजिक पथ्ये, हि पथ्ये पाळण्यात कुणाचाच हलगर्जीपणा न होता २०,००० गेले कसे?
सामाजिक पथ्य पाळण्यात कुचराई व सामाजिक पथ्ये पाळणार्यांची संभावना करणार्यांचे 'राजि'नामे का मागू नयेत ?
सध्या गाठलेला महिन्याकाठी १०००० महाराष्ट्रीयांचा मृत्यूदर न वाढता अजून सहा महिने कायमजरी राहीला तर किती मराठी लोकांना महाराष्ट्राने गमावले असेल हे गणित अवघड नसावे किंवा कसे.
* अनुषंगिक नसलेली अवांतरे, व्यक्तिगत टिका आणि शुद्धलेखन चर्चा टाळण्यासाठी अनेक आभार.
प्रतिक्रिया
12 Sep 2020 - 10:22 am | माहितगार
बातमीत सुखकारक भाग दिसला नाही की घाबरवताय म्हणायचे, सुखकारक भाग ऐकला की निष्काळजीपणाने जगायचे भोगायचे आणि खापरपुन्हा आरोग्य यंत्रणेच्या माथी फोडायचे.
बातमीचा सुखकारक नंतर देतो पण अती आत्मविश्वास किंवा कोरोनाची धास्ती पोकळ म्हणण्याच्या खालील दोन परिणामांचे नेमके काय करायचे ?
सुखकारक भाग वाचा पण सुखावून निष्काळजी होऊ नका अनेक दुसर्या मानवी जीवांचा प्रश्न आहे, केवळ तुमच्या स्वतःच्या नव्हे.
संदर्भ
https://timesofindia.indiatimes.com/city/pune/september-surge-active-cas...
https://indianexpress.com/article/cities/pune/pune-more-deaths-of-patien...
सुरक्षीत अंतर, मास्क, प्रत्येक स्पर्षजन्याचे स्पर्षा आधी आणि नंतर निर्जुंतुकीकरण सोप्पच आहे, न पाळून अवघड करू नका
12 Sep 2020 - 11:23 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आपल्या धाग्यास ज्या मिपाकरांनी 'जिल्बी' म्हणून संभावना केली असेल, त्या मिपाकरांमधे मीही एक होतो, मिपाकरांनी असे म्हणायला नको. 'इथं परस्थिती काये' भान असायला पाहिजे. धाग्याला जिल्बी खरं म्हणायची वेळ येऊ नये. पण, संयमाचा बांध कधीतरी फुटतोच. बाकी,त्याबद्दल आजही कोणता पश्चाताप नाही.
-दिलीप बिरुटे
(स्पष्ट)
12 Sep 2020 - 1:07 pm | माहितगार
पुण्याची आजची स्थिती पहाता त्यावेळचा सकाळचा लेख आणि माझा धागा दोन्ही समयोचितच होते. सुयोग्य दक्षता न घेणार्यांबद्दल बांध कुणाचा फुटावयास हवा ? संयमाने दक्षता बाळगून इतरांना दक्षतेचा सल्ला दिल्या नंतरही पाळली जात नाही हे पहाण्याची वेळ येणार्यांचा की दक्षता न पाळणार्या निष्काळजी लोकांचा आणि त्यांची पाठराखण करणार्यांचा?
12 Sep 2020 - 1:49 pm | माहितगार
हृदयाने द्रवावे की द्रवू नये ? वृत्त उदाहरण १
13 Sep 2020 - 9:20 am | माहितगार
मे २०२० मध्ये कोविडने मुंबईत कळस गाठला असताना मे २०१९ पेक्षा जवळपास दुप्प्ट मृत्यू झाले. गेल्या दहा वर्षातीलतरी मृत्युंचा उच्चांक केला. मे महिन्या पर्यंत पॉझीटीव्ह म्हणून रिपोर्ट न झालेल्या पण मृत घोषीत करण्यासाठी हॉस्पीटल कडे आलेल्या मृतांचा मृत्यू कोविड ने झाला नाही ना याची अंशतः खात्री केली जात होती, आकडेवारी हाता बाहेर जाते आहे पाहून प्रशासनाने ही चाचणी बंद केली. (ट्रेस आणि ट्रॅकला हरताळ या निर्णयामुळे फासला गेला तो तुर्तास बाजूस ठेऊ)
मार्च ते जुलै ३१ या २०२०च्या पाच महिन्यात मुंबईतील कोविड मृत्यूच्या अधिकृत प्रशासकीय आकडा फक्त 6,395 मात्र होता, पण एकुण मृत्यू 49,040 झाले, वर्ष २०१९ च्या याच ५ महिन्याच्या कालावधीतील मृत्यू 35,982 होते म्हणजे गत वर्षापेक्षा 13,058 अधिक मृत्यू म्हणजे टक्केवारीने मुंबईत ३७ टक्क्याच्या आसपास मृत्यूदर १ मार्च ते ३१ जुलै या पाच महिन्याच्या काळात वाढला.
मार्च ते जुलै ३१ या २०२०च्या पाच महिन्यात मुंबईतील कोविड मृत्यूच्या तांडवाचा हिशेब मांडताना अपघाती मृत्यू २०१९ च्या या कालावधीतील जवळपास २/३ ने कमी झाले ते वगळावे लागतात. तर कोविड साथीचे मार्च ते जुलै पाच महिन्यातील ९०० च्या आसपासही मृत्यू कोविड कालीन वाढीचा भाग मानावा लागतो . हे दोन टक्के मृत्यू जोडले तर इटलीतही साथ टोकावर असताना सर्वसाधारणपणे मृत्यूदर गतवर्षापेक्षा ३९ टक्क्याने वाढला होता - आम्ही युरोमेरीकेपेक्षा काही बरे करतो आहोत या फुशारकीत बहुधा तथ्य नसावे. बाहेरगावचे लोक उपचारासाठी येतात त्यांचे मृत्यूही ह्यात पकडले जातात ज्या कोविडेतर रुग्णांना उपचार न मिळाल्याने मृत्यू झाले असतील त्याचे ही आकडे यात असतील अशी सारवा सारव प्रशासन करताना दिसते - जर बहुतांश वाढीव मृत्यू हॉस्पीटलला न पोहोचता झाले असतील तर प्रशासनाचा हा बचाव पटणारा वाटत नाही, सर्व मृतांचे पॉझीटीव्ह असणे तपासले असते तर मुंबई सोडून पळून उर्वरीत राज्य आणि भारतात जाणार्यांना अंशतः तरी क्वारंटाईन करून प्रसार टाळता आला असता. त्या शिवाय मुंबईत टेस्टींग आंणि उपचार सुविधा उपलब्ध असून मृत्यूदर ३९ टक्क्याने वाढलेला ज्या भागात टेस्टींग आंणि उपचार सुविधांचा अभाव असलेल्या उर्वरीत महाराष्ट्राचे काय?
पुण्यातली गेल्या वर्षा सोबतची तुलना आलेली नाही पण आयसीयु बेडची उपलब्धता अगदी काठावर आहे, अँब्युलन्स उपलब्धता आणि स्मशानभूमीवरील सुविधा आणि कर्मचार्यांची स्थिती गंभीर तणावात आहे.
संदर्भ
https://indianexpress.com/article/cities/mumbai/covid-outbreak-64349-dea...
https://indianexpress.com/article/cities/mumbai/maharashtra-coronavirus-...
https://indianexpress.com/article/cities/mumbai/maharashtra-mumbai-pune-...
https://www.hindustantimes.com/pune-news/chase-the-virus-pune-dist-admin...
https://www.mid-day.com/articles/why-should-pune-with-a-population-of-ju...
13 Sep 2020 - 9:30 am | Rajesh188
Corona नियंत्रीत करण्यात पाकिस्तान नी उत्तम कार्य केले आहे.
साधीचे रोग कसे नियंत्रित करावेत हे पाकिस्तान कडून शिकून घ्या असे who नी म्हंटले आहे.
बहुमत नी सत्तेवर बसलेल्या bjp सरकार नी तबोडतोप सत्ता सोडली पाहिजे.
13 Sep 2020 - 10:15 pm | सुबोध खरे
https://www.google.com/amp/s/amp.scroll.in/article/972694/coronavirus-wh...
हे पूर्णपणे वाचून पहा
14 Sep 2020 - 11:10 am | माहितगार
पाकीस्तान बाबत लेखातील मुद्दे महत्वाचेच आहेत. सर्वसाधारण मृत्यूदरच अधिक असेल तर वाढीव मृत्यूदर कमी भरेल अर्थात भारतीय उपमहाद्विपात सांख्यिकीची वानवा आहेच. मुंबईच्या मागच्या वर्षाच्या मृतूदराच्या तुलनेत या वर्षाचा मृत्यूदर पाहील्या नंतर कोविड कालिन मृत्यूदर ३७ टक्क्यांनी वाढल्याचे लक्षात आले. पाकीस्तानचीही अशी आकडेवारी समोर येईल तेव्हा नेमका परिणाम सांगता येईल.