या धागा लेखाचे आधीची शीर्षके 'पुणेकरांनो, आतातरी भानावर या' दैनिक सकाळच्या हेडलाईन वरून घेतले. प्रतिसादातून वीषाणूशूर बेफिकीर प्रतिसाद बघीतल्या नंतर शीर्षक बदलण्याचा निर्णय घेतला. व शीर्षक तुमची बेफिकीरी इतर काहींच्या मृत्युस प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कारणीभूत ठरू शकते केले तरीही 'एवढ्यात संवेदनाच बोथट झाल्याचे दिसते' तेव्हा शीर्षक अजून एकदा बदलवून घेत आहे.
........दाट लोकवस्तीच्या भागात मात्र कोरोना रुग्णांची लक्षणीय घट झाल्याचे दिसून येत असले तरी सोसायटीबहूल परिसरात मात्र रुग्ण संख्येत वाढ झाल्याचे दिसून येत आहे...........
.......ग्रीन झोनमध्ये असलेल्या या क्षेत्रिय कार्यालयांतर्गत परिसरातील रुग्ण संख्या झपाट्याने वाढून आकडा हजारांच्या पार गेल्याने परिसरातील नागरिकांनी नियमांचे पालन करत खबरदारीने वागण्याची आवश्यकता आहे. अनावश्यक गर्दी टाळून मास्क, सॅनिटाइजर व सुरक्षित अंतर ठेवून यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सहकार्य करण्याची गरज आहे......
मजकुर आणि लेख शीर्षक सौजन्य दैनिक इ-सकाळ वृत्त दिनांक २० जुलै २०२०. मजकुर
* (नुसत्या आकडेवारीचे काही वाटेनासे होते, म्हणून मुद्दाम टाळली)
एक बातमी आहे पिंपरी चिंचवडची एक विनालक्षण स्त्री ११ जुलैला करोना पॉझीटीव्ह आढळते, होम क्वारंटाईनला न जुमानता १७ जुलैला थेट दुबई गाठते आणि तिथून करोना निगेटीव्ह आल्याचा संदेश पाठवते. (संदर्भ) अशी बातमी वाचून टेस्टींगची पिंपरी चिंचवडची यंत्रे बिघडली की दुबईची असा प्रश्न कुणाच्या डोक्यात येईल पण दोन्ही टेस्टींग बरोबर असू शकते. पिंपरीतील टेस्टींग आजाराच्या नंतरच्या स्टेजला केले तर पॉझीटीव्ह येईल आणि लौकर बरा होईलही पण तुमची पॉझीटीव्ह आल्या नंतरची आजाराची स्टेज किती दिवसात बरी होण्याची आहे हे नेमके सांगणे कठीण. असे बेफिकीर वागणे करणे इतरांना वीषाणू वाटण्यास आणि त्यातील काहींना गंभीर आजार देण्यास कारणीभूत होऊ शकते हे माहित असूनही शिक्षीत मंडळी अशी बेजबाबदार कशी वागू शकतात ?
आमेरीकेत काही अतीशहाण्या बहाद्दरांनी जाणीवपुर्वक कोविड झालेल्यांसोबत आपोआप इम्युनिटी येईल समजून पार्ट्या केल्या आणि त्यातील काही हकनाक जीव गमावून बसले. लोक असे बेजबाबदार कसे वागू शकतात ?
दुसर्या मिपा धाग्यावर सायली राजाध्यक्षांच्या ब्लॉगचा उल्लेख झाला आहे . त्या वृत्त्तांताचा काही भाग त्यांच्याच शब्दात क्वोट करणे श्रेयस्कर असावे.
बुधवारी दुपारी टेस्ट रिझल्ट आले. .........आम्ही दोघे पॉझिटिव्ह होतो. .......आम्ही दोघे घरातच आयसोलेट झालो. खरं सांगायचं तर घरातच होतो त्याआधीही कित्येक दिवस. फक्त भाजी आणायला बाहेर पडायचो ते सोडलं तर.
याचा अर्थ भाजीच्या ठिकाणी सुरक्षीत अंतर पाळण्याच्या गरजेचे उल्लंघन झाले.
मुळात मला कोविडची साथ सुरू झाली तेव्हापासूनच हे आपल्यालाही कधी ना कधी होणार आहे याची जाणीव होतीच. कारण येत्या काही महिन्यांमध्ये सगळ्यांनाच यातून जावं लागणार आहे. त्यामुळे मला भीती अजिबातच नव्हती. झाल्यावरही मला क्षणभरही काळजी वाटली नाही.
ब्लॉग वाचताना सहज लक्षात येत नाही पण टेक्निकली हा बेजबादारपणा आणि अती आत्मविश्वास आहे.
....मला वाटलं होतं की मला संसर्ग होईल तेव्हा लक्षणं नसतील इतका माझा स्वतःच्या इम्युनिटीवर विश्वास होता. पण तसं झालं नाही मला त्यानं चांगला दणका दिला. उलट निरंजनला नेहमी ताप येतो तर त्याला फक्त दोन दिवस आणि तोही १०० ताप आला. आमच्या कॉलनीत १३ लोक पॉझिटिव्ह आहेत. त्यातल्या फक्त ६ जणांना लक्षणं आहेत बाकीच्यांना लक्षणं नाहीत. आता कॉलनीत कुणीतरी सुपरस्प्रेडर असणार....
हा असा अती आत्मविश्वास घेऊन वागणारेच लोक बेफिकीर वागले तर सुपरस्प्रेडर ला आधी बळी पडतात आणि त्यातील काही बेफिकीरी चालू ठेऊन स्वतः सुपरस्प्रेडर बनतात.
......सोशल डिस्टंसिंग पाळाच, सॅनिटायझरचा वापर करा, सतत साबणानं हात धुवत राहा, गरज नसताना गर्दीत जाऊ नका. मास्क वापरा. इतकं करूनही संसर्ग झालाच तर मात्र घाबरू नका. आणि कृपया ज्यांना संसर्ग झालाय त्यांना वाळीत टाकण्याचे फालतू प्रकार करू नका. ही वेळ उद्या आपल्यावरही येणार आहे हे पक्कं ध्यानात असू द्या...... - सायली राजाध्यक्ष (संदर्भ)
* How Pune became India's biggest coronavirus hotspot
* अनुसषंगिका व्यतरीक्त अवांतरे, व्यक्तिगत टिका आणि शुद्ध लेखन चर्चा टाळण्यासाठी अनेक आभार.
प्रतिक्रिया
21 Jul 2020 - 5:43 pm | कपिलमुनी
21 Jul 2020 - 10:13 pm | माहितगार
करोनापेक्षा कान उघाडणीची जिलेबी गोड :))
22 Jul 2020 - 8:27 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अति जिल्ब्या झाल्या आता.
-दिलीप बिरुटे
22 Jul 2020 - 8:41 pm | माहितगार
येत्या दिड महीन्यात किती जवळच्या परिचीतांपर्यंत पोहोचतो त्या कडे लक्ष ठेवावे, सप्टेंबर १५ ला धाग्याला भेट देऊन सांगावे
21 Jul 2020 - 10:54 pm | अत्रुप्त आत्मा
संस्थळ को?रोना? मुक्ती साठी काय करावे ब्रे!?
.
.
.
.
.
.
.
पांडू ला बोलावले पाहिजे. ;)
21 Jul 2020 - 11:15 pm | Rajesh188
साथीच्या रोगांवर नियंत्रण मिळवायचे असेल आणि भविष्यात येणाऱ्या संकटाला यशस्वी तोंड द्यायचे असेल तर लोकसंख्या विकेंद्रीकरण करणे अावशक्या आहे.
सर्व शहरांची लोकसंख्या अर्धी तरी कमी झाली पाहिजे.
दर वर्ग किलोमीटर ल अर्धा किलोमीटर जागा मोकळी हवी.
सोशल distance ठेवा असे ऐकून कंटाळा आलाय 20 ते 25 हजार वर्ग किलोमीटर लोकसंख्या असलेल्या भारतातील शहरात सोशल distance ठेवणे शक्य आहे का.
2003 पासून 2020 पर्यंत एचआयव्ही,sarse 1,sarse 2 ,स्वाईन फ्ल्यू,बर्ड फ्ल्यू आणि बाकी किती साथीच्या रोगांनी त्यांचे अस्तित्व दाखवला तरी.
साथीच्या रोगाचे नियंत्रण करण्यासाठी लोकसंख्या विरळ असावी हे समजून पण त्या वर काहीच विचार कोणी करत नाही.
माणसांनी विचार नाही केला तर निसर्ग विचार करणार आणि ते तो साध्य करणार हे कटू असले तरी सत्य आहे.
21 Jul 2020 - 11:24 pm | गणेशा
http://misalpav.com/node/45411
असेच मत येथे मांडले होते मी.
पण तेंव्हा आरे आणि शेती आणि निवडणूक यात हा धागा बाजूला पडला.
21 Jul 2020 - 11:48 pm | Rajesh188
जुलै संपत आला तरी मान्सून सक्रिय नाही.
Covid 19 मध्येच सर्व अडकलेत.
Covid19 पेक्षा भयंकर संकट उभे राहू शकत.
मान्सून सक्रिय झाला नाही तर
पाणी टंचाई,वीज कपात,अन्न धान्य टंचाई अटळ
नोकऱ्या नाहीत,कारखाने बंद,सरकार भिकारी आणि त्या मध्ये दुष्काळ पडला तर.
आता covid चे लाड पुरे झाले.
बाकी संकट दारावर यायचा अगोदर सावध व्हा.
22 Jul 2020 - 6:11 am | माहितगार
इतरांपासून अधिकतम सुरक्षीत अंतरासाठी अलर्टनेस (सतर्कपणा) हवा तेही शक्यच नसेल त्या क्षणांच्या वेळी घरीदारी मास्क हवा. माणसाला एका वेळी ज्या अनेक जबाबदार्या पार पाडाव्या लागतात त्यात आरोग्य आणि अर्थशास्त्र दोन्हीचा समावेश होतो किंवा कसे? आरोग्य आणि अर्थशास्त्र दोन्ही एकमेकांना पर्यायी नाहीत किंवा कसे? कुटूंबाचे आरोग्य कोसळले तर कुटुंबाचे अर्थशास्त्र कोसळते या बद्दल नव्याने बोलण्याची गरज पडणे कॉमनसेन्स मध्ये मोडते किंवा कसे?
22 Jul 2020 - 11:08 am | Rajesh188
आज काही ही झाले तरी सोशल distance
पाळायचे च हे ठरवून खाली उतरलो.
असंख्य लोक मास्क लावून रस्त्यावर होती,मध्येच एकादे वाहन पण येत जात होते.
पुढून तीन लोक समांतर रेषेत आलीत माझ्या पुढे दोघे चालत होती.
आता ती समोर ची तीन लोक आणि आम्ही तीन एकमेकांना पास होण्याची जेव्हा वेळ येईल तेव्हा कसे distance ठेवावे ह्याचा विचार डोक्यात आला म्हणून मी माझे स्पीड कमी केले.
आता समोरची तीन हे दोन पास झाले पण तरी सुद्धा सोशल distance mi rahu shakhlo nahi
Fakt ardha foot अंतरावरून आम्ही एकमेकांना cross kele.
त्याच वेळी कोणाला शिंक आली असती तर बेजबाबदार कोणाला ठरवले असते.
इच्छा असून सुद्धा नियम मोडला गेला.
आता सांगा .
कसे पाळणार सोशल distance.
22 Jul 2020 - 1:21 pm | माहितगार
खालच्या प्रतिसादात घसरगुंडीची तर्कदुष्टता दाखवून दिली आहेच. एखादी गोष्ट मनावर घेऊन प्रामाणिक पणे प्रत्येकाने केली तर सबंध शहर, गाव आणि देशाचे आरोग्य पुढे जाते. इतर लोक पाय काढता घेतात म्हणून मी काढता घेतो, अडचणी येणार म्हणून मार्ग न काढता उद्दीष्टापासून मागे फिरतोच इतरांनाही परावृत्त करतो हे समाजात प्रयत्नांची नव्हे तर पराभूत मनोवृत्ती पेरणे झाले.
आज मांजर आडवे आले तर आपण मागे फिरत नाहीत (मांजर अंधश्रद्धापाळूही नये) पण अंधश्रद्धेच्या काळात काय करत? आज बायका विटाळ पाळत नाहीत (विटाळाची अंधश्र्द्धा पाळूही नये) पण अंधश्रद्धापाळली जात असताना कोणती एक्सक्युजेस दिली जात ? कोणतीच नाही. मग आज एखाद्या तर्क-विज्ञान सिद्ध गोष्टीचे पालनासाठी मार्ग न काढता एक्सक्युजेस का देतो.
तज्ञांचे म्हणणे लक्षात घेऊन, भारताच्या पंतप्रधानांनी दो गज दूरी आणि मास्कचे पालन चुकले तर पंतप्रधानालाही शिक्षा करा म्हटले. कालच्या बातमीतले CSIR च्या संशोधकांचे म्हणणेही आम्ही लक्षात घेत नाही आणि देशाच्या नेतृत्वालाही आम्ही मनावर घेत नाही ?
रस्ता चालताना दूरवरूनच कुठे घोळका कुठे गर्दी आहे हे लक्षात येते, रस्त्याच्या एका बाजूला गर्दी असेल तर रस्त्याच्या दुसर्या बाजूने चाला. तीन माणसे समोरून आली - तीन माणसे मागून आली ? प्रत्येकाने आपापली रस्त्याची डावी बाजू सांभाळून सहा फुटांचे अंतर राखून चालले तर प्रश्नच येत नाही.
तुम्हाला नको असलेली मिरवणूक वाटेत आडवी येत असल्याचे दूरून दिसले तर काय करता ? रस्त्यावरील त्यातल्या त्यात सेफ जागी जाऊन मिरवणूकीची गर्दी निघून जाऊ देता आणि मग चालता कि अजून वेगळे काही करतात ?
तसे हवा खेळती असेल आणि लोक कमी असतील तर रस्त्यावर जोखीम तेवढी नाही, जिथे गर्दी होते अशा किराणा, भाजी, दूध, दारू, बस स्टॉप, ऑफीस, वाहने अशा सर्व ठिकाणी प्रत्येकाने काळजी घ्यावयास हवी आणि कुणि घेत नसेल तर भारताचे पंतप्रधान म्हणतात तसे कलून सवरून निष्काळजीपणा करणार्यांना कितीही वरीष्ठ पदावरील असेल तरी दंड द्यावयास हवा.
22 Jul 2020 - 12:25 pm | मराठी_माणूस
जी काटेकोरता सांगीतली जातिय , ती १००% पाळणे अशक्य आहे.
22 Jul 2020 - 12:53 pm | माहितगार
वरील वाक्य स्लिपरी स्लोप फॉलसी म्हणजे घसरगुंडीची तर्कदुष्टता आहे. घसरगुंडीवरून माणूस घसरतो म्हणजे म्हणून घसरगुंडीच्या वरच्या बाजूला रहाण्याची गरज असूनही घसरून जाण्याचे समर्थन आहे. तानाजी मालुसर्यांच्या मावळ्यांनी सगळे मावळे गडावर चढवणे अशक्य आहे म्हणून सगळे जण गडाखालीच राहू , सिंहगड लढवू नका म्हटले असते तर सिंहगडाचा इतिहास वेगळा राहीला असता.
काल पर्यंत सुरक्षीत अंतर आणि मास्कला वेड्यात काढणार्या ट्रम्पने कालच कोलांट उडी मारत सगळ्यांना सुरक्षीत अंतर आणि मास्क वापरण्याचे आवाहन केले. भारताच्या पंतप्रधानाने तज्ञांचे ऐकुन किमान स्पष्टता ठेवत दो गज दूरी आणि मास्कच्या बाबत पंतप्रधान सुद्धा चुकला तरी शिक्षा करा म्हटले या पेक्षा देशाच्या नेत्याने अधिक काय स्पष्ट बोलावयास हवे की जनता गांभीर्याने घेत नाही आणि अधिकतम पालन न करता एक्सक्युजेस सांगत फिरते. चार म्हातारे मेल्याचे दुख्ख नाही, देशाच्या सकल उत्पन्नात भर घालण्याची क्षमता असलेल्या तरुणवर्गालाही कमी का असेना काही प्रमाणात गिळत रहाणारा आजार सोकावतो हे लक्षात घेतले पाहीजे.
22 Jul 2020 - 4:17 pm | मराठी_माणूस
थेरोटेकलि बरोबर आहे, पण प्रत्यक्षात विचार करा. आणि सर्व प्रकारचे काम करणारे लोक लक्षात घ्या. ट्रेन्स बंद आहेत , ओफिसेस मधे जाण्याची सक्ती आहेत , मर्यादीत बसेस आहेत, तासनतास रांगेत उभे रहायचे आहे.
22 Jul 2020 - 8:37 pm | माहितगार
माझ्या मी /(तुम्ही) / (आपण).. .. .. डॅश डॅश असतो तर कोविड-१९ संक्रमण कसे हाताळले असते ? या मुद्द्यावर धागा लेखात मी माझी मते सविस्तर लिहिली आहेत त्यातले न पटणारे कोणते ते सांगा.
23 Jul 2020 - 12:17 pm | मराठी_माणूस
ह्यांना सांगता येइल का स्लिपरी स्लोप फॉलसी
https://www.loksatta.com/thane-news/passengers-protest-at-nalasopara-rai...
23 Jul 2020 - 12:37 pm | अभ्या..
नको, त्यांना सांगायला सांगू नका.
किती टक्के लोकांना पंच तिकिटे घेतल्याने कोरोणा व्हायचे किती चानस आहेत आणि किती लोकांना किती किमी प्रवास केल्याने किती लोकांना भेटल्यावर किती विषाणू स्वयंपाक घरातील सिंकवर येतील ह्याचे आकडे देतील ते.
लोक म्हणतील कोरोना परवडला माहिती विषाणूने गार होऊ आम्ही.
22 Jul 2020 - 1:06 pm | Rajesh188
जीव कोणाला नकोसा आहे.मास्क तर 99 % लोक वापरात आहेत.
आता मास्क 50 % च सुरक्षा देत असेल तर?
हात धुण्याची सवय लागलीच आहे पण प्रतेक वस्तू ला स्पर्श केला की हात धुणे शक्य आहे का.
सोशल distance palne keval अशक्य आहे.
5 ते 10% लोक जरी बाहेर रस्त्यावर आली तर रस्ते एवढे मोठे नाहीत की 7 फूट अंतर राखल जाईल.
22 Jul 2020 - 1:25 pm | माहितगार
वरील प्रतिसादास उत्तर दिले आहे. पुर्वीच्या काळापेक्षा आधुनिक काळातील रस्ते मोठेच आहेत, जिथे मोठे नाहीत तेथे मास्क वापरावयास हवे . दिवसातून ५ पेक्षा जास्त लोकांना भेटणार असाल तर सर्जिकल मास्क वापरावा फेसशिल्ड आणि चष्म्याचा पर्याय आहे. किमान अंतर पाळण्यासाठी केरळातील एका गावतील प्रत्येक माणूस सगळीकडे स्वतःची पारंपारीक मोठी छत्री वापरू लागला आहे. इच्छा ठेवा मार्ग मिळतात.
22 Jul 2020 - 11:01 pm | Prajakta२१
हात धुण्याची सवय लागलीच आहे पण प्रतेक वस्तू ला स्पर्श केला की हात धुणे शक्य आहे का.
हात नुसत्या पाण्याने धुणे शक्य आहे पण प्रत्येक वेळी साबण लावून १ मिन धुणे शक्य नाही
sanitizer वापराने त्वचेच्या नवीनच समस्या ...
सोशल distance palne keval अशक्य आहे.>>>>>>>>>>>सहमत
मी किराणा आणायला जाते तेव्हा कधीही आजपर्यंत ६ फुटाचे अंतर कुठेच आणि कोणीही पाळले नाहीये फारतर २ पायऱ्या किंवा २ फूट (ह्यात बऱ्यापैकी सर्व स्तरातील भागांचा समावेश आहे) एवढेच कशाला सकाळी कचरा टाकून येताना बाजूचा सफाई कर्मचारी बाजूला थुंकताना पण पहिले आहे किंवा कधी सामान्य नागरिक पण
आपण लाख दक्षता घेऊ पण इथे कोणीच पळत नसतील तर काय करणार ?इथे सगळे पाळायला लागतील तेव्हा थोडे आटोक्यात येईल
22 Jul 2020 - 1:23 pm | अत्रुप्त आत्मा
नामांतराची घ्या हो एक.. करा त्वांड गोड!
22 Jul 2020 - 1:30 pm | माहितगार
मी मी म्हणणार्यांना करोनाने गाठले आहे, आता पर्यंत २५ टक्केच्या आसपास शहरी जनतेला करोनाने गाठले आहे, १५ दिवसात दुप्पटचा वेगाने महिन्याभरात हा करोना सगळ्यांना जिलेबीचा प्रसाद देऊन जाईल, आपल्यावाट्याला गोड जिलेबी येणार की कडू हे कुणि सांगू शकत नाही.
22 Jul 2020 - 11:10 pm | Rajesh188
तुम्ही म्हणता ते योग्य च आहे.
पण सर्व प्रकारची काळजी काहीच चूक न होता घेणे practically Shakya nahi.
Train,bus,madhye social distance अशक्य आहे.
मास्क ला मर्यादा आहेत .
जास्त वेळ वापरला तर श्वसनासाठी अडथळा निर्माण होतो भले covid19 पासून काही टक्के
स्वसंरक्षण मिळेल पण श्वसन स अडथळा निर्माण झाल्या मुळे विपरीत परिणाम होवू शकतो
माणूस जास्त दिवस घरात राहू शकत नाही मानसिक स्वास्थ बिघडू शकते.
अन्न,पैसा,औषध,बाकीचे आजार,घरगुती अडचणी,जवळच्या व्यक्ती चे आजारपण,लग्न हे प्रसंग टाळता येणार नाही.
बाहेर पडावे लागेल च.
20 Aug 2020 - 11:20 am | माहितगार
ईंडीयन एक्सप्रेस वार्ताहर Anuradha Mascarenhas | पुणे | प्रकाशन : August 20, 2020 5:53:28 am
A new modelling study बाय Tata Consultancy Services Research (TRDCC), Pune, in collaboration with Prayas (health group) has predicted that with the current level of relaxation, the peak load on critical healthcare (people requiring oxygen support, ICU, ventilators etc) will be sustained until October-end in Pune.
Pune Municipal Corporation (PMC) areas. As the city enters a crucial stage of the pandemic, additional preparation will be needed as the critical case load coming in from outside PMC areas rises during these months. a fine grained model and their analysis indicates that a significant number of people from Pune are still susceptible to the infection.
Researchers said that by mid-August, in some wards with crowded dense localities, around 35-40 per cent people were likely to have had the infection already. In some wards (eg Kothrud, Warje, Aundh), this proportion is likely to be as low as 15 per cent. Majority of the infections are seen to occur through household contacts. Along with that, longer interactions in enclosed and crowded places is likely to increase transmission risk (places such as banks, offices, factories, eateries among others).
Among the public health measures, universal use of masks and testing and isolation effectively slow down the epidemic. If 80 per cent people used masks, there was reduction in hospital load by upto 25 per cent during peak months. This proportion was 10 per cent if current testing rates were doubled, according to the study.
if appropriate preventive care is not taken, there is a risk of rapid rise in infections .... which will further add burden on health care. Gradual opening up and continued efforts to ensure compliance with preventive behaviours will be crucial.
Public health measures such as universal use of masks and testing are key interventions.......Advising quarantine of all suspected cases would be a prudent strategy in this situation, and this would require high levels of awareness and trust among communities, researchers said.
20 Aug 2020 - 4:09 pm | माहितगार
माणसांच्या सामाजिक व्यवहारातील बेफिकीरीपुढे बिचारे प्रशासनही हतबल होते आणि दोष नसेल त्याचेही आरोप झेलते!!
20 Aug 2020 - 5:22 pm | माहितगार
असंही होत तर
Germany's highest daily toll since April, when the pandemic was considered to be at its peak.
Like across much of Europe, Germany's number of infections has jumped significantly over the summer holidays. Returning holidaymakers as well as parties and family gatherings have been driving new cases.
संदर्भ