बल "सागर" भारत

विकास's picture
विकास in जनातलं, मनातलं
21 Nov 2008 - 5:48 am

आत्ताच "बलसागर भारत होवो" हे यशोधरा यांचे छानसे संपादकीय आले होते. त्याचा संदर्भ या चर्चेशी अप्रत्यक्ष आहे. पण या चर्चेचे शिर्षक जे आहे त्यात "भारताचे बल आंतर्राष्ट्रीय सागरात" वाढत आहे ह्या बातमी कडे वेधण्यासाठी आहे!

निमित्त आहे हिंदी महासागरात विविध ठिकाणी सागरीचाचेगिरी चालते. त्यावर देखरेख करायचे काम प्रामुख्याने (या भागाकरता) भारतावर येते. हाँककाँगच्या "डिलाईट" नामक जहाजाला सोमालीयाच्या सागरीचाच्यांनी वेठीस धरले. त्यात बहुसंख्य भारतीय असल्याने भारतीय नौदलाने नेहमीप्रमाणे ज्या देशाचे जहाज त्या देशाची औपचारीक विनंती वगैरे येण्याची वाट पाहीली नाही आणि प्रतिक्रीयात्मक असले तरी सक्रीय हल्ला या चाच्यांच्या जहाजावर चढवून ते जहाज बुडवले. आता भारतीय नौदल आपल्या क्षेपणास्त्रधारी नौका या भागात वाढवणार आहेत. महाराष्ट्र टाईम्सचा हा अग्रलेख माहीतीपूर्ण वाटला. पाश्चात्य माध्यमांनी अर्थातच या बातमीला चंद्रयानाप्रमाणेच विशेष प्रसिद्धी दिली नाही...म्हणले तर तशी लहान घटना, पण तरी देखील एक भारतीय म्हणून त्यात नौदलाने केलेले काम पहाताना आनंद झाला.

कोणे एके काळी ब्रिटीश आणि युरोपातून इतर आपल्यावर असेच नावेतून व्यापार करायला आले आणि बघता बघता या सातासमुद्रापलीकडील देशावर सत्ता गाजवू लागले. आज आपण सत्ता गाजवायला हे करत नसलो तरी त्यातून स्वसामर्थ्याचे सार्थ प्रदर्शन झाले असे वाटले.

राजकारणबातमीमाध्यमवेध

प्रतिक्रिया

सर्किट's picture

21 Nov 2008 - 6:29 am | सर्किट (not verified)

कालच एन पी आर वर ही बातमी ऐकली.

अनिवासी भारतीयांच्या रक्षणासाठी भारतीय नौदलाने चाच्यांचे जहाज बुडवल्याबद्दल नौदलाचे कौतुक करावे तितके कमीच.

-- सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

नंदन's picture

21 Nov 2008 - 6:43 am | नंदन

बातमी. काल याहू आणि सीएनएनच्या मुखपृष्ठावर वाचली होती, तेव्हा अगदीच दुर्लक्षिली गेली असे म्हणता येणार नाही.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

कपिल काळे's picture

21 Nov 2008 - 7:03 am | कपिल काळे

सी बी एस न्यूज वर सकाळी बघितली.

अनिवासी भारतीयांना भारत हाच एकमेव आधार आहे हे ह्यावरुन सिद्ध झाले

http://kalekapil.blogspot.com/

पिवळा डांबिस's picture

21 Nov 2008 - 7:08 am | पिवळा डांबिस

आज सकाळी मी ही फॉक्स वर बघितली....

कपिल काळे's picture

21 Nov 2008 - 7:15 am | कपिल काळे

मनमोहन सिंगांच्या ओमान बरोबर झालेल्या कराराने भारतीय नौदलास विषेश बळ मिळाले आहे. त्यामुळे हिन्द महासागरातून अरबी समुद्रातून, एडनच्या आखातमार्गे सुवेझ कालव्याचा वापर करणारया जहाजांचे रक्षण करण्यासाठी भारतीय नौदलास संधी आहे. ह्यातून आपली दादागिरी तिथे सिद्ध होइल.

अमेरिकन अनिवासी भारतीयच काय, अमेरिकन जहाजावरचे भारतीय खलाशी,अमेरिकन जहाजावरचे इतर खलाशी ह्यांची जबाबदारी भारतीय नौदलावर आहे.
शेवटी भारत ही एक जागतिक शक्ती म्हणून उदयास येत आहे.,कचरा, धूळ, पानाच्या पिंका, प्रदूषण , खड्डेमय रस्ते ह्यांच्यावर मात करुन

http://kalekapil.blogspot.com/

पिवळा डांबिस's picture

21 Nov 2008 - 7:24 am | पिवळा डांबिस

शेवटी भारत ही एक जागतिक शक्ती म्हणून उदयास येत आहे
निसंशय! आणि ही अतिशय अभिमानास्प्द गोष्ट आहे.

अमेरिकन अनिवासी भारतीयच काय, अमेरिकन जहाजावरचे भारतीय खलाशी,अमेरिकन जहाजावरचे इतर खलाशी ह्यांची जबाबदारी भारतीय नौदलावर आहे.
केवळ तपशीलात सुधारणा: मला वाटतं ते जहाज अमेरिकन नव्हतं. चू. भू. द्या घ्या!

कपिल काळे's picture

21 Nov 2008 - 7:33 am | कपिल काळे

हो हो अमेरिकन नव्हतच.

http://kalekapil.blogspot.com/

सर्किट's picture

21 Nov 2008 - 12:45 pm | सर्किट (not verified)

मला वाटतं ते जहाज अमेरिकन नव्हतं.

चालायचंच डांबीस काका. भारतीयांनी वाचवलेलं कुठलंही जहाज आजकाल अमेरिकनच समजतात. एकंदरीत येथील भारतीयांची विधाने बघता, जगात फक्त दोन देश आहेत. भारत आणि अमेरिका, नाही का ? (नाही बाकीही देश आहेत, पण तेथे सुंदर हिमगुंफा असतात, तिथले भारतीय अनिवासी नसतात काही ! आपलेच असतात. कारण तिथल्या नोटा हिरव्या नसतात, निळ्या असतात.)

उदाहरणार्थ, दुसर्‍या महायुद्धात चिन्यांवर अत्याचार करणारे अमेरिकनच (जपान कुठे असतं हो ?)

सहा मिलियन ज्यूज चा संहार अमेरिकनांनीच केला असेल ना ? (कारण आम्हाला जर्मनी कुठे माहिती आहे ? महिती असलाच तरी सुभाषबाबूंसारख्या नेत्याने जवळ केलेला हा देश अशी घृणास्पद कामे कसा करेल ?)

-- सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

लिखाळ's picture

21 Nov 2008 - 4:23 pm | लिखाळ

विकासराव,
भारतीय नौदलाची कामगीरी सकाळ मध्ये वाचलीच होती. त्यांनी केली कृती ही अभिमानाचीच गोष्ट आहे.

सर्किटराव,
>> नाही बाकीही देश आहेत, पण तेथे सुंदर हिमगुंफा असतात, तिथले भारतीय अनिवासी नसतात काही ! आपलेच असतात. <<<
हा हा हा...
खरंतर 'बाकीही देश असतात' हे मान्य होणं हेच एक पुढ्चं पाऊल म्हणायला हवं. अहो मुलगा-मुलगी परदेशात आहे असे सांगीतले की ऐकणारा लगेच म्हणतो की हो हो.. अमेरिकेत माझे खूप ओळखीचे आहेत. तुम्हाला हवे तर पत्ते देतो :) . लोक परदेशात म्हणजे कोणत्या देशात हे सुद्धा विचारत नाहीत. दुकानदारांचे सुद्धा तसेच. थर्मल-वेअर वगैरे घ्यायला गेले की विक्रेता हे समजूनच असतो की हा मनुष्य अमेरिकेत चालला आहे... बाकीचे देश आहेत हे त्यांच्या गावीसुद्धा नसते. तसंच भारतात सकाळ असली की परदेशात रात्र असते...असा एक समज.. तो सुद्धा परदेश = अमेरिका असे गृहित धरल्याने झालेला असतो...
अश्या या स्थितीत 'बाकिच्या देशातले' लोक भारतीय निवासी लोकांच्या रागाचे-लोभाचे-मत्सराचे धनी कसे होणार?
प्रतिसाद अवांतर असल्याने हलक्या रंगात लिहिला आहे. हा प्रतिसाद कुणा एकाला उद्देशून नसल्याने त्याकडे कुणीच लक्ष दिले नाही तरी चालेल.
बाकी हिमगुंफा खूप छान आणि स्वच्छ होती. कुठेही गुटख्याचे पाकिट दिसले नाही ;)

-- लिखाळ.

पिवळा डांबिस's picture

21 Nov 2008 - 11:35 pm | पिवळा डांबिस

इथे विषयांतर होईल म्हणून प्रतिसाद तुमच्या खव मध्ये देत आहे....
जिज्ञासू तिथे जाऊन तो वाचतीलच...
:)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

21 Nov 2008 - 9:52 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

मनमोहन सिंगांच्या ओमान बरोबर झालेल्या कराराने भारतीय नौदलास विषेश बळ मिळाले आहे. त्यामुळे हिन्द महासागरातून अरबी समुद्रातून, एडनच्या आखातमार्गे सुवेझ कालव्याचा वापर करणारया जहाजांचे रक्षण करण्यासाठी भारतीय नौदलास संधी आहे
ही माझ्यासाठी बातमीच आहे, पण त्याबरोबर सुखद धक्काही आहे.

शेवटी भारत ही एक जागतिक शक्ती म्हणून उदयास येत आहे.
+१

आणि बीबीसीच्या वेबसाईटच्या आंतरराष्ट्रीय व्हर्जन (मराठी शब्द?) वर ही बातमी दिवसभर पहिलीच होती. आणि त्यात भारतीय नौदलाबद्दल कौतुकपर शब्द होते.

नंदन's picture

21 Nov 2008 - 11:44 am | नंदन

चालेल, व्हर्जनला प्रतिशब्द म्हणून.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

भास्कर केन्डे's picture

22 Nov 2008 - 3:27 am | भास्कर केन्डे

बीबीसीच्या वेबसाईटच्या आंतरराष्ट्रीय व्हर्जन (मराठी शब्द?) वर ही बातमी दिवसभर पहिलीच होती

हीच का ती बातमी?

भास्कर केन्डे's picture

22 Nov 2008 - 3:25 am | भास्कर केन्डे

.,कचरा, धूळ, पानाच्या पिंका, प्रदूषण , खड्डेमय रस्ते ह्यांच्यावर मात करुन
=)) =))

चांगल्या अभिमानास्पद चर्चेत सुद्धा मसाला टाकल्याबद्दल आभार! ;)

आपला,
(वाचक) भास्कर
आम्ही येथे वसतो.

मदनबाण's picture

21 Nov 2008 - 7:31 am | मदनबाण

अमेरिकेला जाणारे सौदीचे एक मोठे तेल वाहु जहाज मर्कट चाच्यांनी परत पळवले आहे.
बाकी आपल्या नौदला च्या पराक्रमाचे कौतुक करावे तितके कमीच आहेत..बरं झाल जहाज बुडवले ते,,अजुन एक दोन जहाजे समुद्र तळाशी गेली की या चाच्यांची मस्ती उतरेल!!

मदनबाण.....

हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व,धर्मांतर म्हणजेच राष्ट्रांतर.
बॅ.वि.दा.सावरकर

विकास's picture

21 Nov 2008 - 8:16 am | विकास

सर्वप्रथम माध्यमात आलेले संदर्भ सांगितल्याबद्दल धन्यवाद! मला माहीत नव्हते ही माझी चूक कारण मी नेहमीपेक्षा सध्या कमी पहात आहे...

आधी म्हणल्याप्रमाणे ही घटना म्हणले तर किरकोळ आहे. ए के ४७ ने उंदीर मारल्यासारखे पण वाटू शकेल. तरी मग यात विशेष किमान मला काय वाटले?
आज पर्यंत आपण अशी आंतर्राष्ट्रीय (चांगल्याअर्थे किमान स्वसंरक्षणार्थ) दादागिरी करत नसायचो. गेल्या दशकातील गोष्ट आहे, फिजी मधे बंड होऊन अनेक भारतीय वंशाच्या माणसांचे हाल झाले. पण त्यांना सरकार पटकन मदत करायला तयार होत नव्हते. तेच बर्‍याचदा विविध ठिकाणी युद्धात अडकलेल्या लोकांचे पण होत असे.

या वेळेस मात्र वेळ न घालवता हाँककाँगच्या म्हणजे पर्यायाने चीनच्या जहाजाला वाचवायला आपण मदत केली आणि आशा आहे, आपली माणसे / एकंदरीतच त्यावरील सर्व वाचतील...पण त्यातून काही चांगल्या गोष्टी घडू शकतात/घडत आहेतः

आपला सरकारी/नौदलीय आत्मविश्वास वाढला आहे. (असे करणे गैर नाही, उगाच आंतर्राष्ट्रीय सीमांचा अतिरेकी बाऊ करायचा नसतो).
पर्यायाने नौदल आता अजून गस्तीच्या नावाखाली आपली नौदलीय युद्धनौकांची रहदारी त्या भागात वाढवणार आहे. हा भाग स्ट्रॅटेजीक आहे. त्यामुळे त्यावर आपले सामर्थ्य दिसणे यातून संपूर्ण प्रगत-अप्रगत जगाला एक संदेश जातो आणि ते महत्वाचे आहे.

अर्थात हा मोठ्या कोड्यामधील निव्वळ एक छोटासा तुकडा आहे. स्वतःला प्रगत आणि प्रबळ म्हणण्यासाठी असे बर्‍याच तुकड्यांचे कोडे एकसंघ करून जोडायचे आहे. फक्त हा तुकडा योग्य ठिकाणी बसण्याने आपण कोडे सोडवण्याच्या योग्य मार्गावर आहोत असा स्वतःलाच त्यातून विश्वास मिळाला इतकेच.

मनिष's picture

21 Nov 2008 - 10:23 am | मनिष

आपला सरकारी/नौदलीय आत्मविश्वास वाढला आहे. (असे करणे गैर नाही, उगाच आंतर्राष्ट्रीय सीमांचा अतिरेकी बाऊ करायचा नसतो).
पर्यायाने नौदल आता अजून गस्तीच्या नावाखाली आपली नौदलीय युद्धनौकांची रहदारी त्या भागात वाढवणार आहे. हा भाग स्ट्रॅटेजीक आहे. त्यामुळे त्यावर आपले सामर्थ्य दिसणे यातून संपूर्ण प्रगत-अप्रगत जगाला एक संदेश जातो आणि ते महत्वाचे आहे.

अर्थात हा मोठ्या कोड्यामधील निव्वळ एक छोटासा तुकडा आहे. स्वतःला प्रगत आणि प्रबळ म्हणण्यासाठी असे बर्‍याच तुकड्यांचे कोडे एकसंघ करून जोडायचे आहे. फक्त हा तुकडा योग्य ठिकाणी बसण्याने आपण कोडे सोडवण्याच्या योग्य मार्गावर आहोत असा स्वतःलाच त्यातून विश्वास मिळाला इतकेच.

सहमत!!!
माझ्यासाठीही ही बातमी म्हणजे सुखद धक्काच आहे! :)

- मनिष
(खुद के साथ बातां - लेका पेपरात वाचतोस तरी काय मग सकाळी? काहीच माहित नसतं...)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

21 Nov 2008 - 10:32 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

अर्थात हा मोठ्या कोड्यामधील निव्वळ एक छोटासा तुकडा आहे. स्वतःला प्रगत आणि प्रबळ म्हणण्यासाठी असे बर्‍याच तुकड्यांचे कोडे एकसंघ करून जोडायचे आहे.

चांद्रयान, सूर्यावर स्वारी हे ही त्याचा एक भाग आहेत, असं वैयक्तिक मत. विशेषतः चीनने स्वतःचा एक जुना उपग्रह हवेत उडवल्यानंतर आपण चंद्र आणि सूर्याकडे झेपावणं अंमळ आनंददायक आहे.

सुनील's picture

21 Nov 2008 - 1:57 pm | सुनील

सहमत

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

विसोबा खेचर's picture

21 Nov 2008 - 9:45 am | विसोबा खेचर

भारतीय नौदलाचा विजय असो.. भारतीय सैन्याचा विजय असो...
भारताचा विजय असो... भारतीयांचा विजय असो....

'सारे जहा से अच्छा..' असाच आहे भारत...!

जयहिंद...

आपला,
(भारतीय) तात्या.

अवलिया's picture

21 Nov 2008 - 1:58 pm | अवलिया

संपुर्ण सहमत.

'सारे जहा से अच्छा..' असाच आहे भारत...!

नाना

यशोधरा's picture

21 Nov 2008 - 10:23 am | यशोधरा

भारतीय नौदलाचा अतिशय अभिमान वाटला!

मुक्तसुनीत's picture

21 Nov 2008 - 10:26 am | मुक्तसुनीत

हेच म्हणतो. "विश्वात शोभुनि राहो!"