तुझ्या डोळ्यांचा थांग घेताना
मीच अथांग होऊन जातो...
तुझ्या हसण्याचा आनंद घेताना
मीच आनंदून जातो ...
तुझ्या गुंतण्याचा आवेग पाहताना
मीच गुंतून जातो ...
तुला स्वप्नांमध्ये हरवलेलं पाहताना
मीच हरवून जातो ...
तुझ्या हाताला स्पर्श करताना
मलाच तुझा स्पर्श होतो ...
तुझ्या डोळ्यांतील अश्रू टिपताना
मीच त्यांत विरघळून जातो...
- सागर
प्रतिक्रिया
21 Dec 2007 - 8:47 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सागर,
कविता आवडली.
तुझ्या डोळ्यांतील अश्रू टिपताना
मीच त्यांत विरघळून जातो...
लै भारी....!
तुझ्या हाताला स्पर्श करताना
मलाच तुझा स्पर्श होतो ...
तिच्या हाताला स्पर्श केल्यावर तिचाच स्पर्श होणार ना !!!
हे काही कळले नाही, पण, कविच्या भावना वाचकाला जशाच तशा कळल्या पाहिजे असेही काही, नाही. !
सुंदर कविता. येऊ दे अशाच तिच्या आणि तुझ्या कहाणीच्या कविता ! :)
कोणाच्या तरी अश्रूत विरघळून गेलेला.
प्रा.डॊ.दिलीप बिरुटे.
21 Dec 2007 - 10:10 pm | धनंजय
सागरच उत्तर देऊ शकेल पण मला कळलेला अर्थ असा :
कवी "तू"ला शारिरिक स्पर्श करायला जातो, तेव्हा "तू" कवीच्या अंतर्मनाला स्पर्श करते.
21 Dec 2007 - 10:40 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कवितेच्या पुर्वार्धात तसा दुसरा कोणताच अर्थ इथे कवीला अभिप्रेत असेल,असे मला तरी दिसत नाही.जसे, की........ डोळ्याचा थांग घेतांना कवीचे अथांग होऊन जाणे. तिच्या हसण्याने कवीस आनंद होणे. तिच्या गुंतण्याने कवीने गुंतून जाणे. तिच्या स्वप्नात कवीचे हरवणे. तिच्या स्पर्शात कवीला स्पर्श होणे (हे जरा जमले नाही असे वाटते.) किंवा आपण म्हणता तसे कवीला दुसरे काही सुचवायचे तरी असेल. तिच्या अश्रुत कवीचे विरघळणे.
या सर्व भावना तिच्याशी एकरुप होण्यासाठी कवी व्यक्त करतो असे वाटते. अर्थात कवीला काय वाटते, त्याची उत्सुकता आम्हालाही लागली आहे.
24 Dec 2007 - 4:51 pm | सागर
दिलीपराव आणि धनंजय,
सर्वप्रथम तुम्हा दोघांच्या प्रतिसादाबद्दल आणि प्रयत्नाबद्दल धन्यवाद.
दिलीपरावांना वेगळेपणा वाटलेला अपेक्षितच आहे. पण धनंजय यांनी जो अर्थ लावलेला आहे तो बरोबर आहे.
हे वाक्य इतर कल्पनांप्रमाणे नव्हते आणि वेगळे असल्यामुळेच आणि प्रेमाच्या बाबतीत अधिक अर्थपूर्ण असल्याने त्याला अधोरेखित केले होते. ज्यामुळे प्रेयसीच्या अंतरात्म्याचा स्पर्श प्रियकरास जाणवावा आणि ती मनाने सर्वस्वी त्याची होण्याची अनुभूति प्रियकरास मिळावी
याच अपेक्षेने हे वाक्य इतरांपेक्षा वेगळे लिहिले होते...
बाकी दिलीपराव : तुम्ही कोणाच्या तरी अश्रूंत विरघळून गेलात हे वाचून आश्चर्य नाही वाटले... आनंद झाला...
ये तो दुनिया का दस्तूंर है |
एक दिल लेना है और एक देना है |
लाखोंमें एक ही दिलको सजना है |
बाकीयोंको तो कट जाना है |
(प्रतिसादांनी सुखावलेला ) सागर
30 Dec 2008 - 6:19 pm | राघव
माझ्या मते - तिने स्पर्श करावा अशी इच्छा आहे. ती पूर्ण होते पण निराळ्या मार्गाने!! :B
मुमुक्षु
30 Dec 2008 - 7:18 pm | सागर
मुमुक्षुराव
कोणता मार्ग? ते पण स्पष्ट करा...
आमची दृष्टीपण चांगली होईन तुमच्यामुळे :)
सागर
30 Dec 2008 - 7:32 pm | राघव
कवी तिला स्पर्श करायला जातो. ती स्वतःहून येत नाही. पण तिचा स्पर्श झाल्यावर आपली ईच्छा पूर्ण झाल्यासारखे वाटते.
हाच तो तथाकथित मार्ग!! :)
मुमुक्षु
30 Dec 2008 - 7:49 pm | सागर
आयडिया लई भारी आहे मुमुक्षुराव...
कल्पनेच्या भरार्या मारुन इच्छा पूर्ण करायच्या.... लई झाक आयडीया ...
धन्यवाद
सागर
21 Dec 2007 - 10:56 pm | छोटा डॉन
आपल्याला कवितेतील जास्त काही कळत नाही हे अगोदरच जाहीर करतो .....
पण यानिमित्ताने आठवलेला एक "शेर" सांगतो ..............
"जी करता है की तेरी आँखो मे डूब जाऊ .....
जी करता है की तेरी आँखो मे डूब जाऊ .....
पर बाद मे खयाल आया साला अपून को तैरना कहा आता है !!!"
24 Dec 2007 - 4:47 pm | सागर
शायरी हा एक मस्त विषय आहे... कधी काळी मी पण करायचो...
असो... कविता वाचायला सुरुवात केली की कधी ना कधी कळायला नक्कीच लागते
24 Dec 2007 - 8:44 pm | छोटा डॉन
आपण नुसता आनंद घ्यायचा ....
[ तानसेन नसून कानसेन असलेला ] छोटा डॉन
ता. क. सुरुवात करो (छोटा) डॉन ...
हे म्हणजे "जिनेके ऊपरसे धपकन पड्या " टाईपचे हिंदी झाले बरं का !!!!
24 Dec 2007 - 4:48 pm | विसोबा खेचर
तुझ्या हसण्याचा आनंद घेताना
मीच आनंदून जातो ...
तुझ्या गुंतण्याचा आवेग पाहताना
मीच गुंतून जातो ...
सुंदर कविता...
तात्या.
24 Dec 2007 - 5:13 pm | सागर
धन्यवाद तात्या...
माझी कविता वाचून तुमच्या जुन्या आठवणी चाळवल्या असतील अशी अपेक्षा करतो :)
होऊन जाऊ दे २ पेग अजून जास्त ...
तेरी आंखोंमें जो इश्क नजर आता है |
वो जामें हुस्न पिलाता है |
ये जाम तो सुबह किनारा कर लेती है |
पर तुम्हारी आंखे हमें जिंदगी भर नशेमें डुबोती है |
(जुन्या आठवणींनी प्रफुल्लित झालेला ...) सागर
24 Dec 2007 - 4:52 pm | मनोज
तुझ्या डोळ्यांतील अश्रू टिपताना
मीच त्यांत विरघळून जातो...
खुप छान आहेत या ओळी :)
आपलाच,
मन्या
24 Dec 2007 - 5:14 pm | सागर
मनोज,
प्रतिसादाबद्दल धन्यवाद....
लवकरच अजून लिहिन...
सागर
27 Dec 2007 - 6:53 pm | सुधीर कांदळकर
मिसळपाववर दारूबंदी न लदल्याबद्दल प्रशासनाला धन्यवाद. अन्यथा चोरून प्यावी लागली असती.
30 Dec 2007 - 8:33 am | प्राजु
तुझ्या डोळ्यांतील अश्रू टिपताना
मीच त्यांत विरघळून जातो...
खूप छान आहे ओळ..
पु.ले.शु.
- प्राजु
30 Dec 2008 - 5:34 pm | शर्मीला
तुझ्या हसण्याचा आनंद घेताना
मीच आनंदून जातो ...
छान आहे कविता...........अन् भावना
30 Dec 2008 - 6:04 pm | सागर
सुधीरकाका, प्राजु व शर्मिला
प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद
सागर