एक नवविवाहित एका जुनंविवाहिताशी गप्पा मारतोय.
नवं वि:-आता मी खूप आंनदात आहे.
जुनं वि:- अजून काही दिवस तू 'असाच' आंनदात असणार
नवं वि:- 'असाच' मंजे?
जुनं वि:- 'असाच!'
नवं वि:- मग नन्तर काय होईल?
जुनं वि:- तू 'पाश्चात्तापदग्धवियोग' प्राप्त करवून घेशील
नवं वि:- हा कोणता नवा योग
जुनं वि:- छे रे छे! अरे बाळा,हा काळा बरोबर फुलत फुलत गेलेला योग आहे.
नवं वि:- मंजे?
जुनं वि:- अरे मुला,माझ्या गुलाबाच्या फुला, एक सांग ब्रे मला. तुला विवाहाच्या नवंमांडवा खालून पुढे सरून किती महिने झाले?
नवं वि:-दोन!
जुनं वि:- हां..म्हणूनच तुला येत नाही(अजून) फोन ...
नवं वि:- काका, तुम्ही काव्यात का बोलता
जुनं वि:- बाळा,नन्तर त्याशिवाय 'काहीच' हाती रहात नाही!
नवं वि:- म्हणजे??? लग्न झाल्यावर कविता "शिकावी" लागते!!!?
जुनं वि:- शिकावी नाही,शिंकावी लागते?
नवं वि:- क्कायययय????
जुनं वि:- अरे शिंक कशी नाकात काहीतरी शिरल्यावर येते,आणि आपण ती देऊन मंजे शिंकून टाकतो?
नवं वि:- हम्मम..
जुनं वि:- तशीच कविता ही नन्तर आपोआप-येते..आली(च) तर ती लगेच काढून टाकावी. आत ठेऊ नये.
नवं वि:- हहा हहा हहा हा!
जुनं वि:- हसलास का रे मुला?
नवं वि:- मला एक वेगळंच आठवलं!
जुनं वि:- काय काय?
नवं वि:- असं बरंच काही बाहेर येतं.आत न ठेऊन देता येण्यासारखं!
जुनं वि:- याची सुरवात 'सकाळ'पासून होते का रे? ;)
नवं वि:- शीईईईईईई!
जुनं वि:- अरे ते नव्हे!
नवं वि:- (चिडून) मगगगग?????
जुनं वि:- अरे स्वप्न रे मुला स्वप्न. सकाळी झोप संपताना स्वप्न पडलं तर ते पूर्ण (बाहेर) पडत,आत न रहाता.
नवं वि:- हो हो हो,खरं आहे.
जुनं वि:- म्हणूनच पहाटे पडलेल्या स्वप्नांचे अर्थ लोक विचारत असतात. कारण तेच. ती पूर्ण पडलेली असतात. (किंवा, पूर्ण-पडलेली असतात! ;) )
नवं वि:- हम्मम.. पण ते कवितेचं ऱ्हायलच. ते सांगा ना!?
जुनं वि:- हहा हा हा , बहुतेक तू मला सोडणार नाही आज कविता घेतल्याशिवाय
नवं वि:- ....
जुनं वि:- अरे लग्नाच्या गाठीनन्तर पहाटे स्वप्नांची गाठ, मग सकाळच्या नवरा बायकोतल्या भांडणांची गाठ, मग नित्य कामाची गाठ मग सांयकाळच्या घरगुती सुखदुःख्खांची गाठ , आणि रात्री अखेर आपली टेकणारी पाठ.. हीच ती कविता, हिच्यात काव्य, यमक, ताल, वृत्त हे सर्व असतंही आणि नसतंही! (सुटलो बुवा एकदाचा! हुश्शश्श!!! ;) )
नवं वि:- मग ते मिळणार कसं?
जुनं वि:- सहज मिळतं,फक्त शोधायला जायचं नाही!
नवं वि:- हम्मम!
जुनं वि:- कळेल हळू हळू तुला , ही कविता आहे कविता..
ओळींनी , छंद, वृत्तांन्नी सापडत जाते हळू हळू
तिचा वेग तिची लय तिची रचना
हे तिच्यातच दडून बसलेलं असतं, कधी डोकावून पाहिल्यावर तर कधी सहजच अचानक दिसतं.. कळेल तुला हळूहळू, जस कळतंय अजूनही मला.. बरं का रे माझ्या नवंविवाहित मुला.. कळेल हळू हळू तुला.. कळेल हळू हळू तुला..
======०======०======०======०======०======
अतृप्त..
प्रतिक्रिया
15 Apr 2020 - 4:51 pm | सौंदाळा
चला, चावट कुठले
15 Apr 2020 - 5:12 pm | अत्रुप्त आत्मा
=))
15 Apr 2020 - 7:08 pm | कंजूस
म्हणजे भांडणं नऊनंतर नसतात?
15 Apr 2020 - 7:09 pm | कंजूस
स्माइली?
17 Apr 2020 - 7:33 pm | प्रचेतस
=))
आमचे एक मित्रही असेच कायम यमकात बोलत असतात.
18 Apr 2020 - 3:44 am | अत्रुप्त आत्मा
लउल्लूल्लू :-/