नाहीत तुला पाय तरी
देशोदेशी जाशील
गावागावा-वस्त्यांमधून
द्वाडासारखा फिरशील
तुझी असंख्य भावंडे
माजवतील हाहाकार
पण घे लक्षात, आमच्यात
आहे शिल्लक प्रतिकार
जितका झपाट्याने तू
पोखरत जाशील आत
तितकीच उसळून उठेल
अशी माणसाची जात
माणूस मारणं कदाचित
असेल सोपं काम रे
पण दाखव जिंकून त्याला
म्हणशील मनात 'राम रे!'
माहिती नसेलच तुला
जगणं-जगवणं कोरोना
बघ बापाला, मास्कमधून
पापी पोराला देताना
संदीप भानुदास चांदणे (२२/०३/२०२०)
प्रतिक्रिया
22 Mar 2020 - 6:49 am | प्रचेतस
जबरदस्त.
23 Mar 2020 - 2:21 pm | ज्ञानोबाचे पैजार
सुरेख आणि समयोचित
ही लढाई आपण जिंकणारच
पैजारबुवा,
23 Mar 2020 - 2:39 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आवडलीय कविता.
-दिलीप बिरुटे
23 Mar 2020 - 8:31 pm | चौथा कोनाडा
वा, खुप सुंदर !
माहिती नसेलच तुला
जगणं-जगवणं कोरोना
बघ बापाला, मास्कमधून
पापी पोराला देताना
हे क्लासच !
26 Mar 2020 - 6:38 am | समीर वैद्य
झालीये कविता...