उल्लेखनीय प्रथा

Nitin Palkar's picture
Nitin Palkar in जनातलं, मनातलं
16 Mar 2020 - 8:54 pm

गेल्या आठवड्यात एका मित्राच्या मुलाच्या विवाह समारंभात गेलो होतो. नेहमी सारखाच मराठमोळा समारंभ. दोन उल्लेखनीय बाबी आढळल्या.
हॉल मध्ये शिरताना, प्रवेशद्वारापाशी सर्व पाहुण्यांना एक कागदी पिशवी दिली जात होती. ज्या मध्ये बीज गोळ्या (seed balls) होत्या. सीड बॉल म्हणजे उपयुक्त झाडांच्या बिया शेणखत, अथवा तत्सम खातात लपेटून त्याचा तिळगुळा एवढा, थोडासा मोठा केलेला लाडू. आशा प्रकारे त्या बिया सहज रुजू शकतात. यजमान सर्व पाहुण्यांना या बिया शक्य तिथे लावण्याची विनंती करत होते.
दुसरी बाब म्हणजे लग्न लागताना बोहल्यावरील नातेवाईकांव्यतिरिक्त इतरांना मंगलाक्षता दिल्या नव्हत्या ज्या योगे तांदळाची होणारी नासाडी टाळली होती. मंगलाष्टके संपल्यावर सर्व उपस्थितांनी टाळ्या वाजवून वधू वरांचे अभिष्टचिंतन केले.
दोन्ही बाबी उल्लेखनीय वाटल्याने मुद्दाम लिहिले आहे.

समाजप्रकटनविचार

प्रतिक्रिया

कुमार१'s picture

16 Mar 2020 - 9:26 pm | कुमार१

छान उपक्रम.

रमेश आठवले's picture

16 Mar 2020 - 11:34 pm | रमेश आठवले

स्तुत्य

चौकस२१२'s picture

17 Mar 2020 - 8:05 am | चौकस२१२

छान .. गेली कित्येक वेळा मी पण हे केले आहे मित्र / नातेवाईकांना ड्युटी फ्री चॉकलेट देण्या ऐवजी फळ फुलांचं बिया देतो ,,, फ्लॅट मध्ये राहणारे असतील तर फुलांच्या आणि ज्यांच्याकडे जागा आहे त्यांना फळांच्या सुद्धा .. शिवाय भटकंतीत नेहमी ना मिळणाऱ्या बिया पण मिळतात ..त्यामुळे काहीतरी वेगळे मिळाल्याचा आनंद आणि कुतूहल .. चॉकलेटे काय आज काळ सगळीकडे मिळतात पैसे फेकू तशी
दुसरे असे कि जमेल तेवहा भेट म्हणून नाटकाच्या प्रवेश पत्रिका देतो ...मिठाई १५०० रुपये किलो देण्यापेक्षा तेवढाच कलेला हात भार
मागे एकदा (जेव्हा परदेशातून इलेकट्रोनिक गोष्टी आणणे स्वस्त आणि आकर्षक होते तेव्हा ) एका मामाला ( आई चा भाऊ पोलीस मामा नाही ) छोटी हवा भरण्याची रबर डिंगी आणली होती , जाम खुश झाला होता मामा कारण तो महिन्यातून एक तरी गड्भ्रमन्ती करायचा आणि त्याकाळी अशी बोट वैगरे किंवा कॅम्पिंग फिशिंग चे सामान मिळणे भारतात खूप अवघड आणि महाग होते ...

Nitin Palkar's picture

17 Mar 2020 - 12:46 pm | Nitin Palkar

चौकस२१२,
खूपच छान उपक्रम!
_/\_