लघुकथा – नजर

bhagwatblog's picture
bhagwatblog in जनातलं, मनातलं
17 Dec 2019 - 3:21 pm

उमा आज आपल्या मैत्रिणीच्या घरी(पद्मिनी) कामानिमित्त कडे आली होती. पद्मिनीची आई शांता काकू उमाच्या सख्या नसल्या तरी जुन्या भावकीतील नातेवाईक होत्या. पद्मिनी वर्ग मैत्रिण असल्यामुळे उमेचे तिच्या घरी जाणे येणे होत असे. पद्मिनी सोबत तिच्या खोलीत बोलत असताना सहजच निरागस पणे सांगीतले की, तिला स्थळ बघायला घरच्यांनी सुरुवात केली आहे. पुढील आठवड्यात तिला बघायला पाहुणे येणार आहेत असे सुद्धा सांगीतले. चहा-पाणी केल्यानंतर उमा घरी गेली.

उमाला पाहुणे बघायला येण्याचा दिवस जसा जवळ येत होता तसा उमेच्या मनात उत्सुकता, भीती आणि डोळ्यात नवीन संसाराची स्वप्न तरळत होती. पहिल्यांदाच स्थळ बघायला पाहुणे येणार असल्यामुळे उमेचे मन स्वप्ना सारखे सैरावैरा धावत होते. पण तीच उमा पाहुणे येण्याच्या एक दिवस अगोदर आजारी पडली. एका दिवसात उमेची तब्येत बिघडली. त्यामुळे पाहुणे यायचे एक आठवडा लांबले गेले. उमेसाठी सगळेच काळजीत पडले. तिच्या आईने देवाला नवस केला पण काही फरक पडला नाही.

एका संध्याकाळी पद्मिनी आईला म्हणजे शांताला सांगत होती की ती उमाला भेटायला गेली होती आणि उमाची तब्येत फारच खराब झाली आहे. डॉक्टरला दाखवून पण उमेची तब्येत सुधारली नाही. पद्मिनीला उमेची अवस्था बघून वाईट वाटले. त्यामुळे पाहुणे येण्याची तारीख लांब जात होती. त्यामुळे एक चांगले स्थळ हातातून जाण्याची परिस्थिती होती. उमा अवेळी आजारी पडली होती असे पद्मिनी सांगत होती. आईने पद्मिनीला काही प्रतिक्रिया दिली नाही किंवा चेहर्‍यावर काहीच भाव दाखवले नाहीत. पद्मिनीला नवल वाटले कारण आईची तिच्या मैत्रिणी पैकी उमा जास्त आवडती होती. पण पद्मिनीने तिकडे दुर्लक्ष केले आणि आपल्या कामाला लागली.

शांताने पद्मिनी समोर चेहर्‍यावर काही भाव दाखवले नाहीत पण उमा बद्दल ऐकून तिला आनंद झाला होता. पण तिला उमा बद्दल ऐकून मानसिक समाधान होत नव्हते. तिला कळत नव्हते की तिला आनंद का झाला आहे? उमा ज्या दिवशी आली होती त्या दिवशी शांताने तिचे बोलणे नकळत ऐकले होते. उमाला स्थळ बघायला येणार आहेत असे शांताला समजले त्यावेळेस पासून शांताच्या मनात एक सुप्त असूया निर्माण झाली होती. कारण उमा दिसायला पद्मिनी पेक्षा सुंदर आणि स्वभावाला चांगली होती. शांताला वाटले की उमा पद्मिनी पुढे निघून जाईल. भलेही त्या दोघींत स्पर्धा नसेल ही पण शांताच्या मनात आपोआप संघर्ष होऊन उमा बद्दल आकस निर्माण झाला होता. उमाने शांता काकू किंवा पद्मिनीचे काही वाईट केले नव्हते. शांताचा आनंद दीर्घकाळ टिकला नाही. कारण तिला मागच्या काही दिवसा खालील घटना आठवल्या. काही महिन्यापूर्वी पद्मिनी गाडी वरून पडली होती आणि उमाने तिला काळजीपूर्वक घरी आणून सोडले होते. उमा दररोज पद्मिनीची विचारपूस करण्यासाठी घरी येत होती. आणि पडल्या मुळे पद्मिनी साठी स्थळ बघायचे लांबले होते. पद्मिनीच्या लग्ना साठी आणखी वेळ लागणार होता. पूर्वीचे लक्षात आल्यावर तिला स्वत: बद्दलच तिरस्कार वाटला. कारण उमा एक गुणी मुलगी होती. तिला आत्ता या गोष्टीचा पश्चाताप होत होता. आणि शांताला पक्की खात्री झाली की आकस, मत्सर, आणि द्वेष निर्माण झाल्यामुळे उमाला आपलीच(शांता) नजर लागली असेल. म्हणून नजर लागल्यामुळे उमाची प्रकृती नाजूक झाली होती असे शांताला वाटले.

दुसर्‍या दिवशी सकाळी पद्मिनीला आई कुठे तरी बाहेर जाताना दिसली. पद्मिनीला या गोष्टीचे नवल वाटले की काही विचारायच्या आत आई घाईने बाहेर पडली. तातडीने शांता उमा च्या घरी पोहोचल्या. उमाला आणि तिच्या घरातील व्यक्तीला सकाळी-सकाळी शांता बाईला बघून आश्चर्य वाटले. घरात येताच शांता बाईने उमेच्या आईची विचारपूस केली. शांता बाईला सांगीतले की सहजच भेटायला आले. मग योग्य वेळ मिळताच शांता बाई आणि उमेचे संभाषण झाले.

शांता बाई “उमा मला तुझी माफी मागायची आहे”

उमा “कशा बद्दल आणि का?”

शांता बाई “मी तुझे आणि पद्मिनीचे संभाषण चोरून ऐकले होते. त्याबद्दल माफी असावी. उमा तू आमच्या घरी आल्यापासून आजारी पडलीस. त्याला कारण बहुतेक मीच आहे. तुला स्थळ बघायला सुरुवात केलेली बघून मा‍झ्या मनात तुझ्या विषयी विनाकारण आकस, द्वेष कसा निर्माण झाला. त्यामुळे तुला माझी वाईट नजर लागून तुझ्या प्रकृती विषयी आपणच कश्या जिम्मेदार आहोत हे सुद्धा सांगीतले. सर्व काही सांगीतल्या नंतर शांता बाईने तिची मना पासून माफी मागीतली.”

पहिल्यांदा उमेचा या गोष्टी वर विश्वास बसलाच नाही. पण जेव्हा शांता मनापासून सांगत होती त्या वेळेस तिला कुठे थोडा विश्वास वाटला. उमेचा स्वभाव चांगला असल्यामुळे या गोष्टीला तिने वाढवू दिले नाही.

उमा “काकू तुम्ही मला सविस्तर असे सांगीतले यातच सर्व काही आले. तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. मला तुमच्या विषयी काहीही तक्रार नाही. मी तुम्हाला माफ केले. तुम्ही निर्मळ मनाने घरी परत जा.”

शांता बाई “तू माफ केले या बद्दल धन्यवाद. शांता बाईने सांगीतले की उमे साठी देवाकडे प्रार्थना करणारा आहेत. तू जरी माफ केले असेल तरी मी प्रायश्चित म्हणून सामाजिक कार्यक्रमात योगदान देण्याचे ठरवले आहे असे सांगून शांता बाई तेथून निघाल्या.”

उमे साठी हा विषय तिथेच संपला होता. पण शांता बाईच्या मनात उमेचे कसे भले होईल असेच विचार येत होते. २ आठवड्या नंतर पद्मिनीने तिच्या आईला सांगीतले की उमेचे लग्न जमले आहे. एका आठवड्या खाली पाहुणे उमेचे स्थळ बघायला आले होते आणि त्या वेळेस उमेची प्रकृती चांगली होती. स्थळ बघायला सुरुवात केली आणि पहिल्याच पाहुण्यांना उमा पसंत पडली आणि नवरा मुलगा चांगला असल्यामुळे लग्न लवकर ठरले गेल. पण शांता पद्मिनीचे ऐकून न ऐकल्या सारखे करून तेथून घराच्या आत गेली. पद्मिनीला काही आठवड्या पासून आईचे वागणे समजतच नव्हते. पण तिने आईचे वागणे न कळल्यामुळे तिने दुर्लक्ष केले. उमेचं लग्न ठरलेले बघून शांता बाईच्या डोळ्यात आनंदाश्रुच्या धारा लागल्या होत्या.

कथालेखप्रतिभा

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

17 Dec 2019 - 7:28 pm | मुक्त विहारि

कथा वाचली. ..

शित्रेउमेश's picture

18 Dec 2019 - 9:23 am | शित्रेउमेश

लेखकाला नक्की काय सांगायचय???
मला कळल नाही....

bhagwatblog's picture

18 Dec 2019 - 2:54 pm | bhagwatblog

प्रतिसादा साठी धन्यवाद मुक्त विहारि आणि शित्रेउमेश!!!
लेखकाला नक्की काय सांगायचय??? मला कळल नाही.... ??? >> "मला या कथेत आकसापोटी निर्माण झालेल्या भावनांचा दुसऱ्यावर कसा परिणाम होतो. आणि प्रायश्चित घेतल्यानंतर स्वतःवर आणि दुसऱ्यावर कसा परिणाम होतो. या दोन्हीचे कथे स्वरुपात चित्रण करायचा प्रयत्न केला आहे.
थोडक्यात नजर लागणे आणि नजर काढणे यावर कथा लिहिण्याचा छोटाशा प्रयत्न...

Rohini Mansukh's picture

18 Dec 2019 - 4:17 pm | Rohini Mansukh

कथा नकारात्मक भावनेकडून सकारात्मक भावनेकडे नेणारी आहे. तसेच कोणाही बाबतीत घडू शकणारी आहे त्यामुळे जास्त भावली.