कविता : भेट मित्रांची…

Primary tabs

bhagwatblog's picture
bhagwatblog in जे न देखे रवी...
5 Nov 2019 - 3:11 pm

आठवणींना उजाळा
भावनांचा उमाळा
शब्दात जिव्हाळा
दोस्तीचा सोहळा…. भेट मित्रांची…

मित्रांची सतत मस्ती
कधी मस्तीची सक्ती
सख्याची जीवापाड दोस्ती
कधी दोस्तीत कुस्ती…. भेट मित्रांची…

मित्र कमी बोलणारा
परी डोळ्यात जपणारा
दोस्त शब्दात खेळणारा
पण शब्दासाठी धावणारा…. भेट मित्रांची…

कविता माझीफ्री स्टाइलशांतरसकवितामुक्तक

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 Nov 2019 - 7:29 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लिहिते राहा.

-दिलीप बिरुटे

bhagwatblog's picture

6 Nov 2019 - 10:49 am | bhagwatblog

धन्यवाद दिलीप!!! लिहीते राहण्याचानक्कीच प्रयत्न राहील...