सध्या उत्सवाचे दिवस चालू आहेत कोकणात या उत्सवाला खूप महत्व त्यानिमीत्त मनात आलेला एक विषय. दत्तदासबुवा घाग हे एक अलौकिक, प्रतिभावंत, जाणकार व्यक्तीमत्व, आहे. ते मुळचे नृसिंहवाडीचे. आज बुवांची पासष्टी उलटली तरी बुवा तितक्याच उत्साहाने किर्तनाला उभे राहतात. पण हल्ली बुवांनी किर्तने कमी केली. मी अलीकडच्याच काळात त्यांच किर्तन पहिल्यांदा ऐकलं तेव्हा माझ्या ओळखितील जाणकारांच्या मते बुवांचा आवाज पुर्वीच्या तुलनेत 30% पण राहीला नाही पण तो आवाजही आज अत्युच्च आनंद देउन जातो. पण आता वयोपरत्वे बुवांना तब्येतही साथ देत नाही. तेव्हा बुवांना तब्येतीची साथ आणि किर्तनाचा उत्साह लाभो हिच ईश्वरचरणी प्रार्थना.
आजही कुठे किर्तन असलं कि आसपासच्या पंचक्रोशीतुन तसेच दुरच्या गावातुन माणसे हजेरी लावतात.
प्रतिक्रिया
11 Nov 2008 - 1:17 pm | विसोबा खेचर
तेव्हा बुवांना तब्येतीची साथ आणि किर्तनाचा उत्साह लाभो हिच ईश्वरचरणी प्रार्थना.
हेच म्हणतो..
घागबुवांना माझाही दंडवत..!
अभिनय, ज्ञान, गाणं, उत्तम रसाळ वाणी, प्रसन्न मुद्रा, प्रासादिकता इत्यादी अनेक गोष्टी आवश्यक असणारी कीर्तनकला खरंच खूप अवघड आहे...
तात्या.
11 Nov 2008 - 10:54 pm | दिनेश५७
आमच्या साखरप्याच्या देवळात दत्तजयंती उत्सवात घागबुवांचे कीर्तन असायचे. खरंच, त्यांच्या किर्तनाला पंचक्रोशीतली माणसं आवर्जून हजेरि लावायची. आम्हा मुलांना किर्तनाची एव्हढी आवड नव्हती. घागबुवांच्या किर्तनामुळे ती रूजली. घागबुवांना उत्तम आरोग्य लाभो, ही शुभेच्छा!