साक्षर, सुशिक्षित कि फक्त उदासीन!

मालविका's picture
मालविका in जनातलं, मनातलं
19 Oct 2019 - 9:43 am

साक्षर, सुशिक्षित कि फक्त उदासीन
आपल्या भारत देशात तरुणांची संख्या खूप आहे . त्यातही मतदान करणारा टक्का तर अधिकच . मतदार हा निवडणुकीपुरता का होईना राजा असतो . पण सध्या माझ्या पाहण्यात काही असे राजे/ राण्या आल्यात जे फक्त साक्षर आहेत, सुशिक्षित नाहीत . दुर्दैवाने हे खरे आहे . तिकडे मोदी ओरडून सांगतायत कि आजच्या युवा पिढीमध्ये भारत बदलायची ताकद आहे. पण मोदी, फडणवीस यांच्यासारखे नेतृत्व देशाला पुढे नेण्यासाठी प्रयत्न करीत असताना आपण त्यातला मतदानाचा खारीचा वाटसुद्धा उचलू शकत नाही हि मोठी खंत आहे. दुर्दैवाने त्यांना हे कळत असूनही त्या दृष्टीने पावलं उचलणं त्यांना जमत नाही . जमत नाही म्हणण्यापेक्षा इच्छा नाही. अन्यथा इच्छा तेथे मार्ग असतोच. आणि सध्या हे मार्ग बऱ्यापैकी सोपे केलेले आहेत. तरीही हि अशी माणसे या बाबतीत उदासीनच. फार वाईट वाटत हे बघून.
माझ्या जवळच्या पाहण्यातली काही उदाहरणं -
एक जण आहे ज्याचं गावाला घर बांधून १३/१४ वर्ष झाली, लग्न होऊन १२ वर्ष झाली ,२ पोर झाली पण अजून बायकोच्या नावाचं वोटिंग कार्ड आलेलं नाही. का याला उत्तर नाही. मागच्या लोकसभेला देखील तिने मतदान केलं नाही, याही वेळी नाही. आणि हि लोकं फेसबुकवर प्रचाराच्या पोस्ट टाकत असतात. अर्थात माझ्या दृष्टीने मी समजावण्याचा प्रयत्न केला. पण याआधी आणि याही वेळी तीच एक मत फुकट जाणारच.
दुसरे एक गृहस्थ. मतदारयादीत आजीचं नाव मूळ गावाला, हे गृहस्थ पुण्यात नोकरीला असल्याने यांचं नाव पुण्यात तर बायकोच नाव माहेरी. आता तीन ठिकाणी कोण कस फिरणार? म्हणून यांच्या घरातली किमान दोन मतं फुकट. खरं तर आता नाव बदला, पत्ता बदला या बर्याचश्या गोष्टी ऑनलाईन होतात. पण एरवी स्मार्टफोन मधल्या लेटेस्ट ऍप् मधलं सगळं माहित असलेली हि लोक हे साधं काम करायला निरुत्साही दिसतात. कदाचित यातून काही निष्पन्न होत नाही असा त्यांचा समाज असावा.
आणखी एक आजी. वय वर्ष ७३. मतदान करायची इच्छा. घरातल्या घरात चालतात, आपली काम आपण करतात. याना फक्त मतदान केंद्रापर्यंत नेण्याची गरज आहे. पण घरातल्याना त्यांचं एक मत फुकट गेल्याने काहीच फरक पडत नाही. त्यामुळे त्यांचही एक मत फुकट. आमच्या शेजारी आलेले एक काका. गावाला घर बांधलय म्हणून अधूनमधून खेप घालतात. आताही तसेच आलेत. मतदान कुठे आहे तुमचं विचारल्यावर मुंबई हे उत्तर आलं. पण मग जाणार का परत मतदानाला तर नाही, गेलं यावेळी मतदान म्हणून शांत बसले. किती चुकीचं आहे हे यांना कळत का नाही?
लोकसभा निवडणुकीला बंगलोर सारख्या शहरात जिथे जास्तीत जास्त आयटी इंडस्ट्री आहे , म्हणजेच साक्षर लोक खूप मोठ्या प्रमाणावर आहेत पण ते सुशिक्षित नसल्याने फार कमी मतदान झालं . कारण उदासीनता एवढंच .
नोटाच बटन दाबणारे पण माझ्यासाठी याच प्रकारातले. नोटा दाबून काय मिळतं याना? काहीच नाही. यांनी नोटा दाबलं तरी कोणता ना कोणता पक्ष निवडून येणारच. मग निदान त्यातल्या त्यात बऱ्या पक्षाला तरी निवडून द्या ना. नाहीतर आगीतून फुफाट्यात पडल्यासारखं होईल. आपण काही करू शकत नाही तर निदान जो चांगलं करतोय त्याला तरी पाठिंबा द्या ना. हे नारो वा कुंजरो वा कशाला? म्हणजे मत न देणारे जेव्हढे दोषी तेव्हढेच हे नोटा दाबून सुद्धा दोषी. कारण काही उपयोगाचं नाही. माझ्या लेखी हे देखील सुशिक्षित नसून केवळ साक्षर याच प्रकारात मोडतात.
कधी कधी वाटतं मतदान हा अधिकार म्हणजे फुकट मिळत त्याची किंमत नाही अश्यासारखं आहे. कोण विचारत नाही, कुठे दंड लागत नाही त्यामुळे जाऊ दे. सरकारने सगळ्या सुविधा द्यायला हव्यात, नाही काम झाली तर शिव्या देणार, मतदानाची सुट्टी घेणार, या देशाचं कस काहीच होऊ शकत नाही यावर चर्चा करणार, कुठे कोणी भारतीय जागतिक स्तरावर झळकला तर तेव्हढ्यापुर्ती कॉलर ताठ करणार पण साधं मतदान नाही करणार. माझ्या एका मताने काय फरक पडणार हाच कदाचित त्यामागचा विचार असावा. आतातर काय रविवार सोमवार लागून सुट्टी आलेय. मग मज्जाच. कितीतरी लोकांचं प्लांनिंग होऊन ते फिरयाला बाहेर पडलेही असतील पण मतदानाला मात्र बाहेर पडणं, लाईनमध्ये उभं राहणं जीवावर येत.
पेज ३ पिक्चर मध्ये एक वाक्य आहे, you have to be in the system, to change the system. राजकारण हा बऱ्याच जणांना न आवडणारा किंवा अगदी न कळणारा देखील विषय आहे. मीही त्यातलीच एक आहे. सिस्टिम चेंज करण्यासाठी राजकारणात जा असं माझं म्हणणं नाही पण त्यात बदल घडवायला निदान मतदान करा एवढंच माझं म्हणणं आहे.
आता तुम्हीच ठरवा तुम्ही साक्षर कि सुशिक्षित ते.

समाजविचार

प्रतिक्रिया

Rajesh188's picture

19 Oct 2019 - 11:01 am | Rajesh188

भारतीय लोकांना लोकशाही राजवटीची सवय नाही.
फक्त ७० वर्ष च झालेत.
जगातील सर्वात मोठी लोकशाही ह्याचा अर्थ सर्वात जास्त लोकसंख्या असलेला लोकशाही देश .
पण दर्जाचं काय?
किती लोकं स्वतः चांगलं वाईट ह्याचा विचार करून मतदान करतात.
जात,धर्म,भाषा,आणि वैयक्तिक फायद्याचा विचार करूनच मतदान करतात.
म्हणूनच राजकीय पक्ष फक्त ह्याच pointvar निवडणूक लढवताना.
पैसे देवून मत विकत घेता येतात.
भावनिक प्रश्नावर मत विकत घेता येतात .
म्हणजे ज्यांना आपण लोकप्रतिनिधी म्हणतो ते लोकांचे प्रतिनिधित्व करत च नाहीत.
लोक अशी बेफिकीर का झाली त्याला कारण आहे?
सरकार बदलली,राजकीय पक्ष बदललं तरी राज्यकारभार चा दर्जा बदलत नाही .
रोजच्या जीवनात कोणताच बदल लोकांना अनुभवत येत नाही.
त्या मुळे कोण्ही या निवडून सर्व सारखेच.
असा लोक विचार करतात.

जॉनविक्क's picture

19 Oct 2019 - 1:25 pm | जॉनविक्क

हजारो वर्षांपासून मुरलेली राजेशाहीची सवय एका पिढीत नाहीशी होईल ही अपेक्षा ही चूकच पण आपण आपला खारीचा वाटा उचलायला हवाच

जालिम लोशन's picture

19 Oct 2019 - 2:59 pm | जालिम लोशन

तळमळीचा एक टक्काही ऊपयोग झाला तर मिळवली.

कधी कधी वाटतं मतदान हा अधिकार म्हणजे फुकट मिळत त्याची किंमत नाही अश्यासारखं आहे. कोण विचारत नाही, कुठे दंड लागत नाही त्यामुळे जाऊ दे. सरकारने सगळ्या सुविधा द्यायला हव्यात, नाही काम झाली तर शिव्या देणार, मतदानाची सुट्टी घेणार, या देशाचं कस काहीच होऊ शकत नाही यावर चर्चा करणार, कुठे कोणी भारतीय जागतिक स्तरावर झळकला तर तेव्हढ्यापुर्ती कॉलर ताठ करणार पण साधं मतदान नाही करणार.

मतदान सक्ती असली पाहिजे मग तुम्ही नोटा जरी दाबले तरी हरकत नाही. थेंबे थेंबे तळे साचे म्हणतात ते उगाच नाही...

...परंतू सुशिक्षीत माणूस हे जाणून आहे की तो असंघटित अल्पसंख्याक आहे. त्याच्या मताने मतदान फिरतच नाही अन्यथा राजकारण्यांनी त्याला असे का बेवारस सोडल्यासारखे वागवले असते ? त्यामुळे...

आदर्शवादाचा नॉन हॉलिस्टिक अप्रोच ते पध्द्तशीर मोडीत काढते.
उदा. एफ सी रोड वरील भिकाऱ्यांच्या पुनर्वसनाला एक NGO पुढे आली त्यातील एका महिलेची तेथून सुटका करून तिला मुंबईत नोकरी दिली. धुणीभांडी कष्ट करून सन्मानाचे आयुष्य जगायची संधी दिली तिने काय केले ? काम धाम सोडून परत भीकच मागायला इकडे परत आली.

आदर्शवादाचा नॉन हॉलिस्टिक अप्रोच असणारे ओरडायला मोकळे की सवयच खराब, आळशी लोक असेच असतात, यांची लायकीच ही असते वगैरे...

परंतु ती बाई तिकडे सन्मानाने धुणी भांडी करून काय 2 bhk flat घेणार होती काय ? नाही तिच्या आयुष्याच्या दर्जात पैसे मिळवायचा मार्ग सोडून कसलाच फरक पडला नाही झाला असेल तर कष्ट जास्त अन मोबदला कमी इतकेच तिला समजले असेल मग एकदा लाज सोडून रस्त्यावर भीक मागायला सरावलेली वयक्ती कष्टाच्या नादि का बरे लागेल ? तुम्ही अथवा मी सुद्धा हे करू शकणार नाही पण आदर्शवादाचे आंधळे समर्थक वस्तूस्थितीचे आकलन न करता भावनेच्या भरात कीतीही बुध्दीमत्तेचे भासले तरी अपुऱ्या अभ्यासामुळे शेवटी भावनिकच ठरणारे वस्तुस्थितीकडे पाठ फिरवणारे गरळ ओकणे कधी थांबवणार ?

Rajesh188's picture

19 Oct 2019 - 5:24 pm | Rajesh188

मतदानाची सक्ती करणे म्हणजे अजुन एक कुराण (भरपूर गवत असलेलं शेत_ नाही तर गैर समाज होयचा)
चरण्यासाठी तयार करण्यासारखे होईल.
लोक आजारी असतात,कामात उद्योगात असतात,कामानिमित्त बाहेर गेलेली असतात अशा लोकांना सरकारी यंत्रणा त्रास देईल .
सक्ती करण्या पेक्षा लोकांनी योग्य दिशेने विचार करावा ,त्यांची काही तरी ठाम मत असावीत त्या साठी जनजागृती करणे गरजेचं आहे .
आता बहुसंख्य लोकांची मत ठाम नाहीत त्यांनी मत देवून सुद्धा योग्य उमेदवार निवडून येण्याची शक्यता कमीच आहे

जॉनविक्क's picture

19 Oct 2019 - 7:02 pm | जॉनविक्क

लोक आजारी असतात,

हे एकमेव कारण रास्त आहे ज्याला मार्ग उपलब्ध आहेत एक्सेपशनचे बाकी सगळी कारणे. दुसऱ्या गावात जरी असाल तरी तेथील मतदान केंद्रावर आधार स्वाईप मारून, रेटिना व ठसे स्कॅन करून सप्रमाण सिद्ध करता येईलच की दुसऱ्या गावी होतो ते

जॉनविक्क's picture

19 Oct 2019 - 7:12 pm | जॉनविक्क

चित्रपट सुरू होण्यापूर्वी राष्ट्रगीत, सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान निषेध, बुद्धिमान साहित्य संपादक आणि ठरलेल्या तारखेला प्रत्येकाला मतदान हे कंपल्सरी केल्याशिवाय पर्यायच नाही.

शिक्षित लोकांना हि सुशिक्षित करण्याची गरज लागणे खरेच वाईट आहे .
पण मतदान , रस्त्यावरील नियम , सार्वजनिक स्वच्छता आणि अश्या बऱ्याच गोष्टीत आपण मागासलेलो आहोत .

फक्त १ तास सार्वजनिक ठिकाणी उभ राहून लोकांचे
निरीक्षण भारतातील कोणत्या ही शहरात केले तर एक लक्षात येईल .
जवळ जवळ सर्वच लोक कोणता कोणता कायदा मोडत असतात.
काही लोक चॉकलेट,vapours,खावून आणि बिसलेरी पिवून कचरा रस्त्यावर टाकत असतात.
काही तंबाखू , पान,गुटखा ग्रहण करून रस्त्यावर थुकात असतात .
५००० पासून २ करोड गाडीची किंमत असलेले lane तोडत असतात .
कॉलेज कुमार तरुण पिठी बाईक वर एक्स्त्रा weight घेवून सुसाट धावत असतात.
काही महाभाग रस्त्यावर लघवी करतात.
किती तरी नियमभंग करणारी देशप्रेमी भारतीय जनतेचे दर्शन तुम्हाला होईल .
ह्या देशात आदर्श शासन व्यवस्था कशाच्या जोरावर येईल असे लोकांना वाटत.
त्या पेक्षा जसी परिस्थिती आहे त्यात आनंद घ्या

त्या पेक्षा जसी परिस्थिती आहे त्यात आनंद घ्या

हे वाक्य त्या महाभागी राजकारण्याच्या तुमचा बलात्कार रोखता येत नसेल तर त्याची मज्या घ्या या वाक्या इतकेच हीन व बीभत्स वाटत नाही का ?

मत न देणारे जेव्हढे दोषी तेव्हढेच हे नोटा दाबून सुद्धा दोषी.

हो मी दोषी आहे. मी बरेचदा 'नोटा' चा पर्याय स्वीकारतो.
निदान त्यातल्या त्यात बऱ्या पक्षाला तरी निवडून द्या म्हणजे काय ? ही जबरदस्ती का ? दरवेळेस मतदारानेच का समजुतदारपणा दाखवायचा ? पक्षाने त्यातल्या त्यात बरा उमेदवार द्यावा ना.

मतदाराच्या मनातील रोष व्यक्त करण्याचा 'नोटा' हा उत्तम पर्याय आहे. नोटाच्या मतांची संख्या जसजशी वाढत जाईल तसतशा विविध पक्षांच्या 'थिंक टँक्स' ची काळजी वाढत जाईल हे नक्की. सध्याच एका थिंक टँक च्या मोठ्या माणसाने नोटा ला मत देऊ नका अशी विनवणी केली आहे.

माझा कल असलेल्या पक्षाने मला तितकासा आवडत नसलेल्या पक्षाबरोबर एकत्र निवडणूक लढवायचे ठरवले आहे. मागच्यावेळेस लोकसभेला त्यांना मत दिले होते. पण तेव्हा उमेदवार चांगला होता. मात्र आता त्यांच्यातर्फे जे उमेदवार उभे आहेत ते सगळ्या पक्षांच्या गोठ्यात रात्र घालवून आलेले आहेत. त्यामुळे ते माझ्या लिस्ट मधून कटाप आहेत.

दुसरे महाशय ते व्यक्तीशः चांगले आहेत. अगदी शांतताप्रिय धर्माचे असून देखील हिंदू मंदिरांना देणग्या देतात, तिथल्या उत्सवांना हजेरी लावतात, पण त्यांचा पक्ष आता मृतप्राय झालेला आहे. शिवाय त्यांचा पक्ष हिंदू हित की बात न करणारा आहे. त्यामुळे त्यांना मत देण्याचा प्रश्नच नाही.
मात्र ते जर नगरसेवकाच्या निवडणूकीला उभे राहिले तर मी त्यांना १००% मत देईन.

बाकी एमआयएम, वंचित यांना मत देण्यात मला स्वारस्य नाही. त्यांच्या आणि माझा अजेंड्यात काहीही कॉमन नाही. ह्या जन्मात तरी त्यांना मत देण्याचा प्रश्नच नाही. अपक्ष उमेदवार देखील कोणी लायक दिसत नाही. अगदी माझ्या ओळखीचा असता तर त्याला बरे वाटावे म्हणून त्याला मत दिले असते मात्र ओळखीतला कोणीही निवडणूकीला उभा नाही. आणि मतदानाचा कल गुप्त राखण्यात मला कोणतेही स्वारस्य नाही.

त्यामुळे मतदान तर करणारच, त्यासाठी वेळ आणि पैसा पण खर्च करणार पण "नोटा"लाच मत देणार.

लोनली प्लॅनेट's picture

20 Oct 2019 - 10:49 am | लोनली प्लॅनेट

सहमत !
माझाही मत नोटा लाच आहे
विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचा विध्वंस करणाऱ्या पक्षाला मतदान नाही एकीकडे मोदी म्हणतात प्राणी जंगले वाचली पाहिजेत पण दुसरीकडे नवीन वनरक्षकांची भरती केली जात नाही सध्या अनेक वनरक्षक 50 वयाच्या पुढचे आहेत अनेक निवृत्त झाले आहेत, यासाठी चे बजेट ही या सरकाने खूप कमी केले आहे
हे असेही म्हणतात की प्रदूषण रोखले पाहिजे पण किती धूर ओकणार्या वाहनांवर कारवाही झाली, प्लास्टिक बंदीचे काय झाले ? आरे तील झाडांची ज्या प्रकारे हत्या केली गेली तेंव्हाच ठरवले आता मत फक्त नोटा लाच, त्या झाडांवर डोकं ठेऊन मुला मुलींना रडताना पाहून माझ्याही डोळ्यात पाणी आलं, आजपर्यंत कोणत्या पक्षाने निवडणुकीत जंगले जपली जातील प्राणी वाचवले जातील अशी अर्थपूर्ण आस्वासने दिली आहेत का ? यांना फालतू बडबड करण्यात आणि स्वतःचे खिसे भरण्यात च इंटरेस्ट आहे, कारण निसर्गाची लोकांना तरी कुठे पर्वा आहे

कुमार१'s picture

20 Oct 2019 - 11:18 am | कुमार१

मतदान करावे>>> + १
इच्छेनुसार नोटा वापरावा.

'नोटा' आणि इतर देश : माहिती इथे आहे .

जसा मतदान करण्याचा अधिकार आहे तसा न करण्याचाही आहे त्यामुळे मतदानाची सक्ती नको.मतदान करणे हे fundamental duties मधे येत नाही. मतदान न करणार्याला सरकारवर टीका करण्याचाही अधिकार आहे.प्रत्येक व्यक्ती ही देशाची asset असते. तो प्रत्यक्श वा अप्रत्यक्षरित्या देशाला काहीतरी contribute करतच असतो.

सुबोध खरे's picture

21 Oct 2019 - 9:36 am | सुबोध खरे

नोटा हा सशक्त पर्याय केंव्हा होईल? जेंव्हा नोटा ला सर्व उमेद्वारांपेक्षा जास्त मते मिळाली तर सर्वच्यासर्व उमेदवार बाद होऊन फेर निवडणूक घेणे सक्तिचे होईल आणि फेर निवडणुकीत अगोदरच्या सर्व उमेदवारांना बाद ठरवले जाईल तेंव्हाच.
सध्या तरी राजकीय पक्ष याला तयार नाहीत आणि न्यायालयांनी हा पर्याय सध्या तरी रद्दबातल ठरवला आहे
the Supreme Court responded to these PILs by stating that such a solution is 'unworkable' and stating that "holding an election in our country is a very serious and expensive business"

Sanjay Parikh, a Supreme Court advocate who argued

"Some people argue that the implementation of NOTA will drive up election expenses. But a tainted candidate who indulges in corruption and malpractices is a greater cost for the country. It is only the desire to continue in power and the greed for money that take prominence over values.".

एवढं द्राविडी प्राणायाम करण्या पेक्षा .
आजी माजी भ्रष्ट नेत्यांना घरी बसावा सर्व पक्ष सुधारतील .
काँग्रेस पासून bjp पर्यंत सर्व सरकारच्या काळात गैर व्यवहार झाले तरी त्याचं त्याच नेत्यांना मत देवून जनतेनी आपली पत कमी करून घेतली आहे .
नोटा नी काही साध्य होणार नाही

सुबोध खरे's picture

21 Oct 2019 - 10:56 am | सुबोध खरे

आजी माजी भ्रष्ट नेत्यांना घरी बसावा सर्व पक्ष सुधारतील

तोंड पाटीलकी ठीक आहे

हे कसं करायचं ते स्पष्ट सांगा?

सुबोध खरे's picture

21 Oct 2019 - 10:56 am | सुबोध खरे

आजी माजी भ्रष्ट नेत्यांना घरी बसावा सर्व पक्ष सुधारतील

तोंड पाटीलकी ठीक आहे

हे कसं करायचं ते स्पष्ट सांगा?

उपेक्षित's picture

22 Oct 2019 - 8:25 pm | उपेक्षित

तोंड पाटीलकी ठीक आहे>>>>>>>> लयी दिवसांनी हा शब्द पहिला :)

प्रस्थपित नेत्यानं मत देवू नका.
आपल्याला चांगली लोक निवडायची आहेत .
पक्ष बघून मतदान करायची सवय सोडावी लागेल.
चांगली लोक निवडली गेली की biproduct म्हणून पक्षांची सुद्धा साफसफाई होईल .
पण आपला कल पक्ष बघून मत देण्याचा असतो त्या मुळे भ्रष्ट नेते पक्षाच्या नावा वर निवडून येतात.
.
मी आज मत देवून आलो पण पक्ष बघून नाही .
Survat स्वतः पासूनच करायला पाहिजे ना

स्वधर्म's picture

23 Oct 2019 - 1:07 pm | स्वधर्म

मत दिलेला एकही उमेदवार निवडून आलेला नाही आणि याचा मला आभिमान आहे. बरेच लोक मत दिलेला उमेदवार निवडून आला नाही, तर आपले मत वाया गेले असे मानतात. पण हे चुकीचे आकलन आहे. विरोधी मत दिल्याचा एक जबरदस्त फायदा असा, की जिंकणार्यावर आपल्याला मोठे (पाशवी) बहुमत मिळाले नाही, त्यामुळे काम केले नाही, तर पुढच्या निवडणूकीत पडेन, असा वचक राहतो. लोकशाहीत कोणालाही पाशवी बहुमत मिळणे लोकशाहीच्या हिताचे नाही, सक्षम विरोधी पक्ष असलाच पाहिजे, असे माझे मत आहे.

काही वेळा पक्षाला मत दिले आहे, पण बहुतेक वेळा उमेदवारालाच मत दिले. कोणताही पक्ष ही रिअल गोष्ट नाही, अाणि त्यांच्या तत्वप्रणालीत फारसा फरक नाहीच. चांगली माणसे पुढे जाणे महत्वाचे. नोटा जरूर असावा, त्याला मत दिले नाही तर, उद्या पक्ष तो काढून टाकतील अन सर्वांना नाकारण्याचा पर्याय रहाणार नाही. नोटाला अनेकदा मत दिले आहे.