अनुष्टुभ छंद - विस्तारीत अष्टाक्षर बांधणी

बेसनलाडू's picture
बेसनलाडू in जे न देखे रवी...
11 Nov 2008 - 8:26 am

धोंडोपंतांच्या छंदशास्त्रावरील स्तुत्य उपक्रमात माझ्या वतीने ही छोटीशी समिधा समस्त मिसळपावकरी आणि कविवर्य धोंडोपंत यांना सादर अर्पण.

देवद्वार, पादाकुलक, अनुष्टुभ, गायत्री, जगती, बृहत असे अनेक छंद आज परिचयाचे आहेत. अनेक श्लोक, स्तोत्रे, वेदांमधील ऋचा, काव्ये, सर्वपरिचित सुभाषिते इ. छंदबद्ध असतातच; फक्त ती गाताना आपल्याला ती अमुक एका छंदात आहेत, याची जाणीव तेव्हढी होत नाही. मात्र छंदशास्त्राच्या माध्यमातून जेव्हा आपण छंदांची लक्षणे अभ्यासू लागतो नि परिचित उदाहरणे वाचून ती या लक्षणांशी किती जवळीक साधतात, हे पाहू लागतो, तेव्हा हे विविध छंद अधिक जवळचे वाटू लागतात. या भागात अनुष्टुभ छंदाची थोडक्यात ओळख करून घेऊ.

मागील भागात पाहिलेला पादाकुलक (अष्टाक्षरी) छंद हा अनुष्टुभाची पहिली पायरी. म्हणजेच अनुष्टुभाच्या चरणांमधील प्रत्येक ओळीत आठ अक्षरे हवीतच. त्याबरोबरच अनुष्टुभ छंद पुढील लक्षणांनी अधिक घट्ट विणला गेला आहे -
१. प्रत्येक ओळीतले पाचवे अक्षर लघु (र्‍हस्व) हवे.
२. प्रत्येक ओळीतील सहावे अक्षर गुरू (दीर्घ) हवे.
३. सातवे अक्षर दुसर्‍या आणि चौथ्या ओळीत लघु (र्‍हस्व) नि बाकीच्या ओळींत (पहिल्या नि तिसर्‍या) गुरू (दीर्घ) हवे.

अर्थात मराठीपेक्षा संस्कृतात हा छंद अधिक बांधीव आहे; मराठीत अनेकदा तो काहीसा सैल विणीत दिसतो. असो. या छंदाचे समर्पक लक्षण पुढील श्लोकातून सांगितले आहे -

श्लोके षष्ठं गुरुज्ञेयम्। सहावे अक्षर गुरू
सर्वत्र लघुपञ्चमम्। पाचवे अक्षर सर्वत्र लघु
द्विश्चतुष्पादयोः ह्रस्वम्।
सप्तमं दीर्घमन्ययोः
। दुसर्‍या नि चौथ्या ओळीत सातवे अक्षर र्‍हस्व नि अन्यत्र (पहिल्या व तिसर्‍या ओळीत) दीर्घ

अनुष्टुभाची सर्वपरिचित उदाहरणे म्हणजे सार्थ श्रीरामरक्षा आणि मारुती स्तोत्र.

चरितम् रघुनाथस्य
शतकोटिप्रविस्तरम्
एकैकमक्षरम् पूसाम्
महापातकनाशनम्

स्मरणशक्तीवर आणखी थोडा जोर दिल्यास रामरक्षेच्या सुरुवातीलाच हा अनुष्टुभ छंद आहे, हे सांगितल्याचे आठवेल. आठवा पाहू - '.. अनुष्टुभ छंदः सीता शक्ति: श्रीमद् हनुमानकीलकम् ...' :)

मात्र संपूर्ण रामरक्षा अनुष्टुभात आहे का, याबद्दल मी स्वतः साशंक आहे; कारण रामरक्षेतील काही श्लोक शुद्ध शार्दूलविक्रीडितात आहेत. जसे -

रामान्नास्ति परायणम् परतरम् रामस्य दासोस्म्यहम्
रामेणाभिहिता निशाचरचमू भो राम मामुद्धर

याबाबत कुणास अधिक माहिती असल्यास जरूर द्यावी व चर्चा करावी.

या छंदात पद्यलेखनासाठी अनेक शुभेच्छा. त्यायोगाने चर्चा झडत राहीलच व माहितीचे आदानप्रदानही होत राहील.
शुभमस्तु!

कवितासंदर्भमाहिती

प्रतिक्रिया

आजानुकर्ण's picture

11 Nov 2008 - 8:59 am | आजानुकर्ण

श्री. बेसनलाडू,

या कार्यक्रमास आमच्या शुभेच्छा.

मात्र रामरक्षेतील वरील ओळींमध्ये १ चूक झाली आहे असे वाटते.

एकैकमक्षरम् पूसाम् मधील शब्द पूसाम् असा नसून तो पुंसां किंवा पुंसाम् असा आहे.

असो.

आपला
(रामभक्त हनुमान) आजानुकर्ण

प्रमोद देव's picture

11 Nov 2008 - 9:07 am | प्रमोद देव

चरितम् रघुनाथस्य
शतकोटिप्रविस्तरम्
एकैकमक्षरम् पूसाम्
महापातकनाशनम्

म्हणजेच अनुष्टुभाच्या चरणांमधील प्रत्येक ओळीत आठ अक्षरे हवीतच.
:?

आता आहेत ना आठ अक्षरे? :)
अम् = अं = एक दीर्घ अक्षर, लोचनम् = लोचनं
(अनुस्वारविरहित)बेसनलाडू

प्रमोद देव's picture

11 Nov 2008 - 10:39 am | प्रमोद देव

शंका निरसन झाले! :)
धन्यवाद बेला!

आजानुकर्ण's picture

11 Nov 2008 - 9:07 am | आजानुकर्ण

दुड्डाचार्य नव्हे दुढ्ढाचार्य. (कन्नड 'दोड्ड' आणि संस्कृत आचार्य यापासून हा शब्द तयार झाला आहे. मात्र संधी होताना ड चा ढ झाला.)
देखिल नव्हे देखील.
पाहुन नव्हे पाहून.

आपला
(अस्सल डॉन) आजानुकर्ण

खरा डॉन's picture

11 Nov 2008 - 9:07 am | खरा डॉन

मागे त्या चारोळ्यांनी आणला होता तसा वात येऊ देउ नका म्हणजे झाल. बाकी छंद कविता वगैरे चालू दे पण अतिरेक नको.
--
धोंडोपंत मी माझे मत नोंदवले आहे ते का उडवलेत?

खरे डॉनराव, प्रत्येकच ठिकाणी वादविवाद करण्याचा आणि भांडायचा तुमचा मूड दिसतो आहे! सगळीकडे फक्त विषयांतर करणारे, हुकूम गाजवणारे, उठसूठ संपादक मंडळाला जाब विचारणारे प्रतिसाद दिसत आहेत.कृपया शांत रहा...! इतर चारचौघांसारखे इथे या, काय वाचायचं ते वाचा, गरज वाटल्यास विषयानुरुप प्रतिसाद द्या, परंतु उठसूठ प्रत्येकाला धारेवर धरण्याची सवय सोडून द्या..! प्रत्येकच वेळेस इथे केवळ वादा-भांडणाचे वातावरण कसे राहील हे पाहू नका..

(डॉन मंडळींचा डॉन..!) तात्या.

आजानुकर्ण's picture

11 Nov 2008 - 9:08 am | आजानुकर्ण

थोडे शांत राहा.

आपला
(सल्लागार) आजानुकर्ण

खरा डॉन's picture

11 Nov 2008 - 9:09 am | खरा डॉन

हे तु कोण मला सांगणारा?

आजानुकर्ण's picture

11 Nov 2008 - 9:10 am | आजानुकर्ण

तु नव्हे तू

(मी) आजानुकर्ण

खरा डॉन's picture

11 Nov 2008 - 9:11 am | खरा डॉन

ह्यातच सगळ आल

ऋषिकेश's picture

11 Nov 2008 - 9:27 am | ऋषिकेश

बापरे! हा छंद अंमळ कठीण वाटला
आमच्यासारख्या पहिल्यांचंदा छंदबद्ध लिहू पाहणार्‍यांसाठी मराठी उदाहरणे द्याल का?

-(सुसंस्कृत मराठी) ऋषिकेश

घाटावरचे भट's picture

11 Nov 2008 - 9:32 am | घाटावरचे भट

असेच म्हणतो. शिवाय छंद सोदाहरण स्पष्ट केल्यास अधिक उत्तम होईल. कृपया विचार व्हावा.
संस्कृत -> मराठी संबंध जोडणे थोडे अवघड जाते. मराठी उदाहरणे असल्यास जास्त चांगले.

-भटोबा

धष्टपुष्ट's picture

24 Nov 2018 - 2:08 pm | धष्टपुष्ट

मला स्वतःला या छंदाची चाल लक्षात ठेवली की हा छंद एकदम सोपा वाटतो (राम रक्षा किंवा गीतेतल्या कुठल्याही श्लोकाच्या तुमच्या आवडत्या चालीवर खालील श्लोक म्हणा)

ल ल ला / ला ल ला / ला ला
ला ला ला ला / ल ला ल ला
ल ला ला / ला ल ला / लाला
ला ल ला / ल ल ला / ल ला

फारच बाष्कळ आणि निरर्थक उदाहरणार्थ
बघुनी लालसा झेंडा
रेडा कापे चळाचळा
करोनी लालसा त्याची
रक्त वाहे भळाभळा

अथवा 5/6/7 व्यतिरिक्त काही लघुगुरू अक्षरे बदलून

बघोनी लालसा झेंडा
रेडा कापे चळाचळा
करोनी लालसा त्याची
रक्ताने भरिला मळा

अमोल केळकर's picture

11 Nov 2008 - 9:31 am | अमोल केळकर

माहिती बद्दल धन्यवाद
एक सुचवायचे आहे. राग मानू नये.
पंतांनी देवद्वार छंद जसा सोपी उदाहरणे देऊन समजावून सांगितला तसे आपण ही या छंदातील काही मराठी गझल, गाणी, श्लोक याची उदाहरणे द्यावीत ही विनंती. त्यामुळे समजून घेण्यास सोपे जाईल.
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

मुक्तसुनीत's picture

11 Nov 2008 - 9:32 am | मुक्तसुनीत

गीताई माऊली माझी तिचा मी बाळ नेणता
पडतां झडतां घेई उचलोनी कडेवरि !

सहज's picture

11 Nov 2008 - 9:33 am | सहज

मागील भागात पाहिलेला पादाकुलक (अष्टाक्षरी) छंद हा अनुष्टुभाची पहिली पायरी. म्हणजेच अनुष्टुभाच्या चरणांमधील प्रत्येक ओळीत आठ अक्षरे हवीतच. त्याबरोबरच अनुष्टुभ छंद पुढील लक्षणांनी अधिक घट्ट विणला गेला आहे -
१. प्रत्येक ओळीतले पाचवे अक्षर लघु (र्‍हस्व) हवे.
२. प्रत्येक ओळीतील सहावे अक्षर गुरू (दीर्घ) हवे.
३. सातवे अक्षर दुसर्‍या आणि चौथ्या ओळीत लघु (र्‍हस्व) नि बाकीच्या ओळींत (पहिल्या नि तिसर्‍या) गुरू (दीर्घ) हवे.

झालं. बेला संपवलीस आमची शाळा. :-)

पंतांनी अजुन सोपे शिकवले तर ठीक नाहीतर आपण मुक्त नवकाव्य ह्या एकाच प्रकारात कविता[??] बांधू :-)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

11 Nov 2008 - 10:32 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बेला,
चांगला उपक्रम...
पण हा छंद लैच अवघड वाटतो
लघु गुरु मोजायला र्‍हस्व-दीर्घ समजले पाहिजे आणि नेमके तिथेच आमची गोची होते :)

-दिलीप बिरुटे
(मुक्तछंदी )

बेसनलाडू's picture

11 Nov 2008 - 10:40 am | बेसनलाडू

साधारणपणे र्‍हस्व अक्षर = लघु (नु, प, इ, पि, ल, हु इत्यादी) आणि दीर्घ अक्षर = गुरू (आ, का, पो, लो, शै, शे, ची, नी, पं, खू, पू इत्यादी)
हे र्‍हस्व दीर्घपण उच्चारावरून आले आहे.
महत्त्वाचा अपवाद असा की जोडाक्षराच्या आधीचे अक्षर लघु असले तरी ते गुरू मोजतात. जसे र्‍हस्व, अकस्मात - यांत स्व, स्मा या जोडाक्षरांच्या आधीचे र्‍ह, क हे वास्तविक लघु असए तरी गुरू मोजतात. उच्चारणानुसार विचार केला तरी अकस्मात हा शब्द उच्चारताना क वर जोर दिला जातो, त्याचा उच्चार नेहमीच्या लघु क पेक्षा किंचित लांबतो. तेव्हा या ठिकाणी क गुरू मोजावा :)
मात्रावृत्तांमध्ये लघु अक्षरासाठी एक नि गुरूसाठी दोन मात्रा मोजतात. म्हणजे अकस्मात या शब्दांत एकूण मात्रा = १ (अ) + २ (क गुरू मोजायचा असल्याने) + २ (स्मा) + १ (त) = ६. तसेच या वृत्तांमध्ये दोन लघुंचा एक गुरू याप्रमाणे दोन क्रमिक लघ्वाक्षरांच्या मिळून दोन मात्रा मोजतात.
(शिक्षक)बेसनलाडू

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

11 Nov 2008 - 10:47 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कधी-कधी लघु अक्षर असले तरी ते गुरु मोजतात याची मला लै गम्मत वाटते. :)
एखादा शब्द उच्चारतांना तो उच्चारतात कसा त्यावरुन त्याचे मात्रा ठरवणे वगैरे लै जड वाटते.
असो, मार्गदर्शनाबद्दल आभारी !!!

दिलीप बिरुटे
(बेलाचा विद्यार्थी )

कपिल काळे's picture

11 Nov 2008 - 9:41 am | कपिल काळे

<<मात्र संपूर्ण रामरक्षा अनुष्टुभात आहे का, याबद्दल मी स्वतः साशंक आहे; कारण रामरक्षेतील काही श्लोक शुद्ध शार्दूलविक्रीडितात आहेत.>>

वृत्त आणि छंद ह्यातील फरक काय?

मी रामरक्षा एकदा अनुष्टुभात आहे का, ह्या दॄष्टीने तपासली होती म्हंजे लघु गुरु नियम माहित नव्हता. फक्त अक्षरे मोजली. तेव्हा काही श्लोक नजरेस पडले.
तेव्हा वृत्त आणि छंद ह्यातील फरक काय? कोण सांगेल?

http://kalekapil.blogspot.com/

छंदाची लक्षणे सांगणार्‍या श्लोकाचे एक मराठीकृत स्वरूप पहा -

अनुष्टुभ् छंद तो ज्याला
एक नेम नसे गणी
अक्षरे चरणी आठ
देवा तार मला त्वरे

तसेच -

वक्रतुण्ड महाकाय
सूर्यकोटी समप्रभ
निर्विघ्नम् कुरु मे देव
सर्वकार्येषु सर्वदा

(उदाहरणार्थ)बेसनलाडू

विसोबा खेचर's picture

11 Nov 2008 - 10:36 am | विसोबा खेचर

१. प्रत्येक ओळीतले पाचवे अक्षर लघु (र्‍हस्व) हवे.
२. प्रत्येक ओळीतील सहावे अक्षर गुरू (दीर्घ) हवे.
३. सातवे अक्षर दुसर्‍या आणि चौथ्या ओळीत लघु (र्‍हस्व) नि बाकीच्या ओळींत (पहिल्या नि तिसर्‍या) गुरू (दीर्घ) हवे.

अरे देवा, हा मामला मुश्किल आहे आणि आमच्या आवाक्याभाएरचा आहे! :)

तात्या.

अनुष्टुपछंद काव्य
नसे आपुल्या कामाचे
करताना चुकायचो!
मनी सावट भितीचे!

:)

ऋषिकेश's picture

11 Nov 2008 - 10:39 am | ऋषिकेश

अनुष्टुभ् छंद तो ज्याला
एक नेम नसे गणी
अक्षरे चरणी आठ
देवा तार मला त्वरे

अनुष्टुभात यमक जुळले नाहि तरी चालते का?

का हि रचना अशी होती?

अनुष्टुभ् छंद तो ज्याला
एक नेम नसे गणी
अक्षरे चरणी आठ
देवा तार मला झणी

-('मिसळ'लेला) ऋषिकेश

बेसनलाडू's picture

11 Nov 2008 - 10:52 am | बेसनलाडू

पाताल भूतल व्योम
चारिणश्छद्मचारिणः
नद्रष्टुमपिशक्तास्ते
रक्षितम् रामनामभि:
म्हटलेच आहे ना वर - ..छंद तो ज्याला, एक नेम नसे गणी ;) :D
याचा अर्थ यमक नसते/नसावे असे नाही; पण जुळणीचा नियम नाही. रामरक्षादींमध्ये यमक न जुळण्याची उदाहरणे आहेतच; एक वर दिलेलेच आहे. यमक असले तर पादांती असावे, असे ऐकले आहे. याबाबत अधिक माहितीचे उत्खनन सवडीने करेन म्हणतो; अन्यथा शंकासमाधानासाठी पंत आहेतच :)
(माफक)बेसनलाडू