मनिषा (भाग ३)

Primary tabs

तमराज किल्विष's picture
तमराज किल्विष in जनातलं, मनातलं
2 Sep 2019 - 10:20 am

मनिषा आता तिकडे सासरी नांदत होती. इकडे माझ्यावर एक संकट कोसळलं. मी कामानिमित्त बाहेरगावी गेलो होतो आणि माझ्या बायकोने माझी पुस्तकं, व इतर गोष्टी ठेवलेलं कपाट उघडून पाहिले. त्यात मनिषाने लिहिलेले पत्रं तिला सापडली. तिने ती वाचली. मी घरी आलो तर माझी बायको एक शब्दही बोलेना. रुसून बसली. समजूत काढायला गेलो तर तीने "आधी ती पत्रं जाळून टाका. मला तुम्ही फसवलं आहे, लग्नाआधी प्रेमप्रकरण करायची लाज वाटली नाही का, तुम्ही मला व तिलासुध्दा फसवलं आहे." असं बोलून भांडायला लागली. "अजून पत्रं जपून ठेवलीय म्हणजे तीच तुमच्या मनात आहे" असं म्हणून ती तुटक वागायला लागली. तिच्या माहेरी सुध्दा तिनं सांगितलं. पण माहेरच्या मंडळींनी झालं गेलं विसरून जा असं सांगितलं. पण तरीही माझी पत्नी नेहमी मला फसवलं असं बोलून टोचत राहीली.
मनिषा लग्नानंतर एम. ए. झाली. नंतर तिने बी. एड. ला एडमिशन घेतली. एकदा गाठ पडली असता मी तिला म्हणालो " मला तूझी फार आठवण येते, तूला येते का? तू माझी नेहमीच आठवण काढत असशील , मला तुझ्याशिवाय जगणं फार कठीण वाटत आहे." तर ती म्हणाली " मग आत्महत्या करा. मला संपर्क केला तर माझ्या कडे खूप मार्ग आहेत." आडून आडून पोलिसात तक्रार करीन अशी धमकी होती ती.
मी तर एकदम हादरून गेलो. इतकी बदलली ही? मी आता ठरवलं परत तिचं तोंड सुध्दा बघायचे नाही. मग कळलं की ती पि. एस. आय. (पोलिस उपनिरीक्षक) परिक्षा उत्तीर्ण होऊन विदर्भात जॉईन झाली होती.
एकदा तिचा मोबाईल नंबर मिळाला. मध्ये बरीच वर्षे उलटून गेली होती. अगोदर मोबाईल फोन नव्हते. मला तिचं अभिनंदन करायचे होते. पण तिची रिअॅक्शन कशी राहील याची काळजी वाटत होती. चिडली तर
काय करावं? फोन करायची हिंमत होत नव्हती. एकदाचा फोन केला व " हा शिंदेंचा नंबर आहे का? " असे विचारले. ती बोलली " नाही. रॉंग नंबर आहे." परत काही दिवसांनी फोन केला व शिंदे आहेत का विचारलं तर तिनं आवाज ओळखून " कशाला खोटं बोलता? मी तुम्हाला ओळखलं आहे. काय काम आहे?" असे म्हणाली. मग मी तिचं अभिनंदन केले व इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या. मला जाणवलं की ती माझ्याशी बोलायला खूप उत्सुक आहे. नंतर ती फोन करून पंधरा मिनिटे, अर्धा तास बोलायला लागली. मला कंजूस, काय काय नावं ठेवायला लागली. एक दिवस म्हणाली माझ्या घरी या. मग एक दिवस मी गंमत केली . माझी कार इकडेच ट्रॅफिक मध्ये अडकली होती व मी तिला फोन केला " अगं मी आलोय तुझ्या गावात. पत्ता सांग ना तुझ्या घराचा." ती आनंदाने म्हणाली या इकडं सिटी पोलिस स्टेशनला. मी म्हटलं आलो दहा मिनिटात. नंतर तिचा फोन आला तर मी म्हणालो " अगं गंमत केली. मी इकडे गावालाच आहे. हे ऐकून ती रागावली. नंतर परत फोन करून गप्पा मारायची. तिचा नवरा तिला त्रास देतोय, दोन मुलींना घरी ठेवून कामावर , रात्रपाळीला कधीही जावं लागतं हे सांगायची.
अशीच एकदा ती आमच्या कडे आली. एकटीच आली होती. पण बायकोमुळे मी तिला घरी बोलावले नाही. भावाच्या घरी मुक्कामाला थांबली. पण मी तिला भेटलो नाही. परत एकदा आली तेव्हा मी आणि माझी बायको कारने बाहेर निघालो होतो. घरी परत येईपर्यंत ती निघून गेली होती.
नंतर फोन केला तर " किती छळता हो मला तुम्ही. माझा अपमान केला तुम्ही घरी न बोलवून. " मी म्हटलं "माझी मजबुरी आहे . ही तुझ्याशी भांडली असती तर? तिनं तुझा अपमान केला असता म्हणून नाही बोलावलं"
नंतर म्हणाली मी पण घेईन गाडी. मी म्हटलं घे पण स्विफ्टच घे. ती म्हणाली मग काय तुम्हीच गाडी घेऊ शकता काय?
एक दिवस फोन केला तर म्हणते " लॅपटॉप घेतला आहे" तिची भाषा मला जळवायची होती. मी म्हटलं माझ्याकडे दोन हजार चार पासून कॉंप्युटर, दोन दोन प्रिंटर सगळे काही आहे. तिला राग आला.
नंतर मी दोन वर्षे फोन केला नाही. तिचा नवरा तिला नोकरी सोडून दे म्हणून धमकावत होता व बेशुद्ध पडे पर्यंत मारहाण करत होता. पण ती नोकरी सोडणार नाही असे म्हणत होती. एक दिवस त्याने खूप मारहाण केली की ती मरते की काय. तिनं इतके दिवस माहेरी सांगितले नव्हते. ती मुलींना नवऱ्याकडे सोडून माहेरी पळून आली. तिचे वडील घटस्फोट घेऊ यावर ठाम होते. पण नवऱ्याकडून समझोता करायचा प्रयत्न झाल्यावर कोर्टात त्याच्याकडून बॉण्ड लिहून घेतला तेव्हा परत गेली. नवरा नंतर तिच्या ताटाखालचं मांजर बनला.
एकदीड वर्ष गेल्यानंतर एक दिवस मला ट्विटरवर मनिषा तिचं माहेरचं आडनाव व माझं आडनाव लावलेल्या आयडीकडून " nothing , how are you? " असा मेसेज आला. मग मी पाच पन्नास मेसेजेस " आय लव्ह यू मनिषा" असे लिहून पाठवले. तिनं रिस्पॉन्स दिलाच नाही वर मला ब्लॉक केले.
मग मी नथिंग, हाऊ आर यू असे एस एम एस पाठवले. ती फोन करून कानात बोलल्यासारखा आवाज काढून " मेसेज कशाला करता, मला नवऱ्याला घाबरावं लागतं. फोनवर बोला" असे म्हणाली. पुढे ती मला टाळायला काहीही बोलायला लागली.
मग मी तिला "प्रेम त्याच्यावर करायचे, भवतीनं त्याच्या फिरायचे आणि त्याच्याच लग्नात जेवायचं" असे मेसेज पाठवून द्यायचो. कारण ती माझ्या लग्नाला आली होती. मी तर तिच्या लग्नाला गेलोच नव्हतो. "क्या आपकी शादी बॉण्ड पर टिकी हुयी है" असे मेसेज पाठवले तेव्हा ती म्हणाली डोन्ट ट्राय टू कॉन्टॅक्ट मी. अदरवाईज.....
तिच्यातला पोलिस चांगलाच जागा झाला होता. तिचं प्रमोशन होऊन आता पि आय झाली व एक्स यु व्ही ५०० गाडी घेतली होती.
नवरा पुर्ण थंड पडला होता तिच्यापुढे.
बऱ्याच दिवसांनी मी तिला फोन केला तर ओरडून म्हणाली " मी गाडी चालवतेय, तुम्हाला काय काम ना धंदे." मी फोन कट केला व स्वत:शीच हसलो.
समाप्त.

कथाप्रकटन

प्रतिक्रिया

ज्योति अळवणी's picture

2 Sep 2019 - 1:55 pm | ज्योति अळवणी

एकूण कथा कळलीच नाही

तमराज किल्विष's picture

2 Sep 2019 - 2:35 pm | तमराज किल्विष

धन्यवाद ज्योती जी. सफल न झालेल्या प्रेमाची गोष्ट आहे ही. आपलं मन कधीच मोकळं न करणारी प्रेयसी व प्रियकराचा अहं दुखावल्यानं झालेला गुंता व प्रेमाचा शेवट तिरस्कारात झाल्याची कथा आहे ही.

तमराज किल्विष's picture

2 Sep 2019 - 2:37 pm | तमराज किल्विष

दुसरा भाग वाचलात काय ज्योति जी.

जॉनविक्क's picture

2 Sep 2019 - 3:31 pm | जॉनविक्क

: D

तमराज किल्विष's picture

2 Sep 2019 - 4:55 pm | तमराज किल्विष

जॉन भाई क्या हुआ हस रहे हो.

जॉनविक्क's picture

2 Sep 2019 - 6:09 pm | जॉनविक्क

बऱ्याच दिवसांनी मी तिला फोन केला तर ओरडून म्हणाली " मी गाडी चालवतेय, तुम्हाला काय काम ना धंदे." मी फोन कट केला व स्वत:शीच हसलो.
समाप्त.

म्हणून हसू आलं. आणि सोबतच सूर्यवनशम पण आठवत होता .

तमराज किल्विष's picture

2 Sep 2019 - 7:34 pm | तमराज किल्विष

ओके

ट्रम्प's picture

2 Sep 2019 - 4:07 pm | ट्रम्प

हे आत्मकथन आहे का हो ?
पण छान लिहलंय !!!!

तमराज किल्विष's picture

2 Sep 2019 - 4:54 pm | तमराज किल्विष

धन्यवाद ट्रम्प भाऊ.

नेहमीपेक्षा वेगळा शेवट असलेली कथा . "तेरे नाम " आठवला .

तमराज किल्विष's picture

2 Sep 2019 - 7:33 pm | तमराज किल्विष

मी हा चित्रपट पाहिलेला नाही.

सॉरी पण टुकार कथा वाटली ... हिला प्रेमकथा समजणं अपेक्षित आहे का वाचकांनी ? फालतू इगो पोटी जिच्यावर प्रेम आहे असं म्हणवतो तिचा विषय सोडून दुसरं लग्न करणं इथेच त्या प्रेमाची खोली दिसली ... मुलीच्या बाजूनेही मॅच्युअर वागणं झालेलं दिसत नाही . वयात आलेली मुलं समवयीन मुलांचं पाहून आता आपल्यालाही कोणीतरी प्रियकर / प्रेयसी शोधायची वेळ आली म्हणून शोधणी चालू करतात आणि कोणाकडे तरी लव्हशिप मागतात / देतात .. तितक्या बालिश आणि उथळ लेव्हलची रिलेशनशिप वाटली .

निदान इथपर्यंत कथा विश्वसनीय तरी आहे .. हे असं कितीतरी लोकांसोबत होणं सहज शक्य आहे .

पुढची कथा विवाहित स्त्रीने आधीच्या प्रियकराच्या पुढे पुढे करणे , एकूणच दोघांमध्ये दाखवलेली संभाषणं सगळंच हास्यास्पद आणि अतिशय अविश्वसनीय आहे .... आणि संसारी गृहस्थाने दुसऱ्या मुलंबाळं असलेल्या संसारी स्त्रीशी आवाज बदलून फोनवर बोलणं , आय लव्ह यू असे मेसेज पाठवणं ..

हे सगळं वाचून उत्तम प्रेमकथा म्हणून कौतुक तर लांबच राहू द्या , दोन्ही पात्रांंबद्दल अजिबात रिस्पेक्ट किंवा सहानुभूती राहत नाही .. इतकं इमॅच्युअर वर्तन तर आजकालची कॉलेजातली पोरं पोरीही करत नाहीत ... पुढे ती पोलीस ऑफिसर होणं , जळवण्यासाठी फोन करणं वगैरे भाग तर आणखीच हास्यास्पद झाला आहे ...

जॉनविक्क's picture

3 Sep 2019 - 12:45 am | जॉनविक्क

तमराज किल्विष's picture

3 Sep 2019 - 6:40 am | तमराज किल्विष

:D :D :D

तमराज किल्विष's picture

2 Sep 2019 - 8:53 pm | तमराज किल्विष

धन्यवाद निशापरी जी.

अत्यंत टुकार कथा आहे. दर्जा च नाही. कथा नायकाने लग्नाची घाई का केली? मनिषा कधीही पुढे पुढे करते, कधी बोलत ही नाही... कसलीच संगती लागत नाही..
बरं प्रेम कथा म्हणावे तर उत्कट प्रेमाचे वर्णन नाही, फक्त उथळ आकर्षण दिसत आहे.

तमराज किल्विष's picture

3 Sep 2019 - 6:39 am | तमराज किल्विष

अत्यंत टुकार कथा वाचून आपलं अमुल्य साहित्यिक मत मांडल्याबद्दल आभार. जसं घडलं तसं लिहिलं आहे. तुम्हाला रिलेट झाले हे बघून बरं वाटलं. :-))

खऱ्या आयुष्यातली नाती ही अशीच अर्धवट राहिलेली, क्लोजर न मिळालेली, एक पाऊल पुढे-दोन पावलं मागे अशी असतात.
यशराज चित्रपट, मंद बायकांनी/साठी लिहलेल्या कथा कादंबरीतली प्रेम तिथेच दिसतं, खरं आयुष्य वेगळ असत.

तमराज किल्विष's picture

3 Sep 2019 - 9:44 am | तमराज किल्विष

खूप धन्यवाद एमी जी. समर्पक शब्दांत आपण सत्य सांगितले आहे. परत एकदा धन्यवाद!

श्वेता२४'s picture

3 Sep 2019 - 4:01 pm | श्वेता२४

माझ्या पाहण्यात अशा दोन केसेस आहेत. योग्य वेळी प्रेम स्पष्टपणे व्यक्त न होणे, प्रेम निभवण्याची क्षमता नसणे आणि त्यामुळेच दोन्ही बाजूंनी प्रेमाची परीणीती लग्नात होण्याचा आग्रह न धरणे , दुसऱ्याच कोणाबरोबर लग्न करणे आणि पहिल्या जोडिदाराला न विसरणे. थोडाफार फरक फरक असेल. पण बऱ्याच गोष्टी रिलेट झाल्या. अशा नात्यांना धड शेवट नसतो आणि तेच या कथेत घडलेले दिसते. कथा म्हणून जरी नाही आवडली तरी जे लिहीलेय ते ओघवते व प्रामाणिक वाटले.

तमराज किल्विष's picture

3 Sep 2019 - 5:29 pm | तमराज किल्विष

धन्यवाद श्वेता जी.

मराठी कथालेखक's picture

3 Sep 2019 - 6:10 pm | मराठी कथालेखक

ही प्रेमकथा आहे असं म्हणता येणार नाही...पण आजूबाजूला पाहण्यात आलेलं एखादं सत्य कथन केलं असेल असं वाटतंय.. हरकत नाही.. कथा म्हणून मांडणी आकर्षक नाहीये पण एखाद्या व्यक्तीला असे सत्यकथन कागदावर (वा ब्लॉगवर ) उतरवण्याचा मोह नक्कीच होवू शकतो.. पण मांडणी अधिक चांगली करता आली असती इतकंच मी म्हणेन
थोडा जाहिरातबाजीचा दोष पत्करुन माझ्या एका धागा मालिकेचा दुवा देतो आहे : मालिका (यातील सगळं कथन वास्तव आहे -नावे बदलून ) आणि मालिकेत न जोडलेला आणखी एक धागा (ह्या धाग्यातलं कथन मात्र पुर्णपणे काल्पनिक आहे).

सुचिता१'s picture

4 Sep 2019 - 12:19 am | सुचिता१

सगळ्या कथा वाचल्या. तुमची शैली खूप ओघवती आहे. कथेत ला सच्चेपणा मनाला भिडला. धाग्या च्या लिंक साठी मनःपूर्वक धन्यवाद!!!

तमराज किल्विष's picture

4 Sep 2019 - 5:49 am | तमराज किल्विष

अत्यंत टुकार कथा आहे. दर्जा च
2 Sep 2019 - 11:15 pm | सुचिता१
अत्यंत टुकार कथा आहे. दर्जा च नाही. कथा नायकाने लग्नाची घाई का केली? मनिषा कधीही पुढे पुढे करते, कधी बोलत ही नाही... कसलीच संगती लागत नाही..
बरं प्रेम कथा म्हणावे तर उत्कट प्रेमाचे वर्णन नाही, फक्त उथळ आकर्षण दिसत आहे.
>> आधी असा प्रतिसाद! नि आता असे म्हणता. हसावं की रडावं.

सुचिता१'s picture

4 Sep 2019 - 7:33 am | सुचिता१

अहो नंतर चा प्रतीसाद मराठी कथालेखकांच्या प्रतिसादाला, आहे.

तुम्ही टीका मनाला लाउन घेऊ नका. हतोत्साहित करण्याचा उद्देश नव्हता.
तुम्हाला (तमराज केल्विन) पण पुलेशु!!

तमराज किल्विष's picture

4 Sep 2019 - 9:27 am | तमराज किल्विष

संपादित

कृपया व्यक्तिगत शेरेबाजी टाळावी. वारंवार व्यक्तिगत शेरेबाजी दिसून आल्यास कारवाई होऊ शकते.

-व्यवस्थापक

सुचिता१'s picture

4 Sep 2019 - 12:07 pm | सुचिता१

धन्यवाद.
माझ्या तर्फे चर्चा बंद.

तमराज किल्विष's picture

4 Sep 2019 - 9:30 am | तमराज किल्विष

संपादित

कृपया व्यक्तिगत शेरेबाजी टाळावी. वारंवार व्यक्तिगत शेरेबाजी दिसून आल्यास कारवाई होऊ शकते.

-व्यवस्थापक