मनिषा (भाग ३)
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
मनिषा आता तिकडे सासरी नांदत होती. इकडे माझ्यावर एक संकट कोसळलं. मी कामानिमित्त बाहेरगावी गेलो होतो आणि माझ्या बायकोने माझी पुस्तकं, व इतर गोष्टी ठेवलेलं कपाट उघडून पाहिले. त्यात मनिषाने लिहिलेले पत्रं तिला सापडली. तिने ती वाचली. मी घरी आलो तर माझी बायको एक शब्दही बोलेना. रुसून बसली. समजूत काढायला गेलो तर तीने "आधी ती पत्रं जाळून टाका. मला तुम्ही फसवलं आहे, लग्नाआधी प्रेमप्रकरण करायची लाज वाटली नाही का, तुम्ही मला व तिलासुध्दा फसवलं आहे." असं बोलून भांडायला लागली. "अजून पत्रं जपून ठेवलीय म्हणजे तीच तुमच्या मनात आहे" असं म्हणून ती तुटक वागायला लागली. तिच्या माहेरी सुध्दा तिनं सांगितलं. पण माहेरच्या मंडळींनी झालं गेलं विसरून जा असं सांगितलं. पण तरीही माझी पत्नी नेहमी मला फसवलं असं बोलून टोचत राहीली.
मनिषा लग्नानंतर एम. ए. झाली. नंतर तिने बी. एड. ला एडमिशन घेतली. एकदा गाठ पडली असता मी तिला म्हणालो " मला तूझी फार आठवण येते, तूला येते का? तू माझी नेहमीच आठवण काढत असशील , मला तुझ्याशिवाय जगणं फार कठीण वाटत आहे." तर ती म्हणाली " मग आत्महत्या करा. मला संपर्क केला तर माझ्या कडे खूप मार्ग आहेत." आडून आडून पोलिसात तक्रार करीन अशी धमकी होती ती.
मी तर एकदम हादरून गेलो. इतकी बदलली ही? मी आता ठरवलं परत तिचं तोंड सुध्दा बघायचे नाही. मग कळलं की ती पि. एस. आय. (पोलिस उपनिरीक्षक) परिक्षा उत्तीर्ण होऊन विदर्भात जॉईन झाली होती.
एकदा तिचा मोबाईल नंबर मिळाला. मध्ये बरीच वर्षे उलटून गेली होती. अगोदर मोबाईल फोन नव्हते. मला तिचं अभिनंदन करायचे होते. पण तिची रिअॅक्शन कशी राहील याची काळजी वाटत होती. चिडली तर
काय करावं? फोन करायची हिंमत होत नव्हती. एकदाचा फोन केला व " हा शिंदेंचा नंबर आहे का? " असे विचारले. ती बोलली " नाही. रॉंग नंबर आहे." परत काही दिवसांनी फोन केला व शिंदे आहेत का विचारलं तर तिनं आवाज ओळखून " कशाला खोटं बोलता? मी तुम्हाला ओळखलं आहे. काय काम आहे?" असे म्हणाली. मग मी तिचं अभिनंदन केले व इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या. मला जाणवलं की ती माझ्याशी बोलायला खूप उत्सुक आहे. नंतर ती फोन करून पंधरा मिनिटे, अर्धा तास बोलायला लागली. मला कंजूस, काय काय नावं ठेवायला लागली. एक दिवस म्हणाली माझ्या घरी या. मग एक दिवस मी गंमत केली . माझी कार इकडेच ट्रॅफिक मध्ये अडकली होती व मी तिला फोन केला " अगं मी आलोय तुझ्या गावात. पत्ता सांग ना तुझ्या घराचा." ती आनंदाने म्हणाली या इकडं सिटी पोलिस स्टेशनला. मी म्हटलं आलो दहा मिनिटात. नंतर तिचा फोन आला तर मी म्हणालो " अगं गंमत केली. मी इकडे गावालाच आहे. हे ऐकून ती रागावली. नंतर परत फोन करून गप्पा मारायची. तिचा नवरा तिला त्रास देतोय, दोन मुलींना घरी ठेवून कामावर , रात्रपाळीला कधीही जावं लागतं हे सांगायची.
अशीच एकदा ती आमच्या कडे आली. एकटीच आली होती. पण बायकोमुळे मी तिला घरी बोलावले नाही. भावाच्या घरी मुक्कामाला थांबली. पण मी तिला भेटलो नाही. परत एकदा आली तेव्हा मी आणि माझी बायको कारने बाहेर निघालो होतो. घरी परत येईपर्यंत ती निघून गेली होती.
नंतर फोन केला तर " किती छळता हो मला तुम्ही. माझा अपमान केला तुम्ही घरी न बोलवून. " मी म्हटलं "माझी मजबुरी आहे . ही तुझ्याशी भांडली असती तर? तिनं तुझा अपमान केला असता म्हणून नाही बोलावलं"
नंतर म्हणाली मी पण घेईन गाडी. मी म्हटलं घे पण स्विफ्टच घे. ती म्हणाली मग काय तुम्हीच गाडी घेऊ शकता काय?
एक दिवस फोन केला तर म्हणते " लॅपटॉप घेतला आहे" तिची भाषा मला जळवायची होती. मी म्हटलं माझ्याकडे दोन हजार चार पासून कॉंप्युटर, दोन दोन प्रिंटर सगळे काही आहे. तिला राग आला.
नंतर मी दोन वर्षे फोन केला नाही. तिचा नवरा तिला नोकरी सोडून दे म्हणून धमकावत होता व बेशुद्ध पडे पर्यंत मारहाण करत होता. पण ती नोकरी सोडणार नाही असे म्हणत होती. एक दिवस त्याने खूप मारहाण केली की ती मरते की काय. तिनं इतके दिवस माहेरी सांगितले नव्हते. ती मुलींना नवऱ्याकडे सोडून माहेरी पळून आली. तिचे वडील घटस्फोट घेऊ यावर ठाम होते. पण नवऱ्याकडून समझोता करायचा प्रयत्न झाल्यावर कोर्टात त्याच्याकडून बॉण्ड लिहून घेतला तेव्हा परत गेली. नवरा नंतर तिच्या ताटाखालचं मांजर बनला.
एकदीड वर्ष गेल्यानंतर एक दिवस मला ट्विटरवर मनिषा तिचं माहेरचं आडनाव व माझं आडनाव लावलेल्या आयडीकडून " nothing , how are you? " असा मेसेज आला. मग मी पाच पन्नास मेसेजेस " आय लव्ह यू मनिषा" असे लिहून पाठवले. तिनं रिस्पॉन्स दिलाच नाही वर मला ब्लॉक केले.
मग मी नथिंग, हाऊ आर यू असे एस एम एस पाठवले. ती फोन करून कानात बोलल्यासारखा आवाज काढून " मेसेज कशाला करता, मला नवऱ्याला घाबरावं लागतं. फोनवर बोला" असे म्हणाली. पुढे ती मला टाळायला काहीही बोलायला लागली.
मग मी तिला "प्रेम त्याच्यावर करायचे, भवतीनं त्याच्या फिरायचे आणि त्याच्याच लग्नात जेवायचं" असे मेसेज पाठवून द्यायचो. कारण ती माझ्या लग्नाला आली होती. मी तर तिच्या लग्नाला गेलोच नव्हतो. "क्या आपकी शादी बॉण्ड पर टिकी हुयी है" असे मेसेज पाठवले तेव्हा ती म्हणाली डोन्ट ट्राय टू कॉन्टॅक्ट मी. अदरवाईज.....
तिच्यातला पोलिस चांगलाच जागा झाला होता. तिचं प्रमोशन होऊन आता पि आय झाली व एक्स यु व्ही ५०० गाडी घेतली होती.
नवरा पुर्ण थंड पडला होता तिच्यापुढे.
बऱ्याच दिवसांनी मी तिला फोन केला तर ओरडून म्हणाली " मी गाडी चालवतेय, तुम्हाला काय काम ना धंदे." मी फोन कट केला व स्वत:शीच हसलो.
समाप्त.
प्रतिक्रिया
एकूण कथा कळलीच नाही
धन्यवाद ज्योती जी. सफल न
दुसरा भाग वाचलात काय ज्योति
:द
जॉन भाई क्या हुआ हस रहे हो.
बऱ्याच दिवसांनी मी तिला फोन
ओके
हे आत्मकथन आहे का हो ?
धन्यवाद ट्रम्प भाऊ.
नेहमीपेक्षा वेगळा शेवट असलेली
मी हा चित्रपट पाहिलेला नाही.
सॉरी पण टुकार कथा वाटली ...
:D
:D :D :D
धन्यवाद निशापरी जी.
अत्यंत टुकार कथा आहे. दर्जा च
अत्यंत टुकार कथा वाचून आपलं
खऱ्या आयुष्यातली नाती ही अशीच
खूप धन्यवाद एमी जी. समर्पक
हे असं प्रत्यक्षात होऊ शकतं.
धन्यवाद श्वेता जी.
ही प्रेमकथा आहे असं म्हणता
सगळ्या कथा वाचल्या. तुमची
अत्यंत टुकार कथा आहे. दर्जा च
अहो नंतर चा प्रतीसाद मराठी
संपादित
धन्यवाद.
संपादित