पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संयुक्त अरब अमिरातींतर्फे (युएई) त्या देशाचा, "ऑर्डर ऑफ झायेद" हा सर्वोच्च मुलकी बहुमान, २४ ऑगस्ट २०१९ रोजी, प्रदान करण्यात आला.
मोदींना त्यांच्या कामगिरीबद्दल अनेक आंतरराष्ट्रिय पुरस्कार मिळालेले आहेत. त्यातील काही महत्वाचे असे आहेत :
१. Order of Zayed, २०१९ : संयुक्त अरब अमिरातींचा सर्वोच्च मुलकी पुरस्कार.
२, Order of St Andrew the Apostle, २०१९ : रशियाचा सर्वोच्च व १६९८ सालापासून आस्तित्वात असलेला सर्वात जुना सन्मान.
३. Seoul Peace Prize, २०१८ : दक्षिण कोरिया.
४. UN Champions of the Earth Award, २०१८ : संयुक्त राष्ट्रसंघ (युएन).
५. Grand Collar of the State of Palestine, २०१८ : पॅलेस्टाईन.
६. Amir Amanullah Khan Award : अफगाणिस्तान.
७. King Abdullaziz Sash Award, २०१६ : सौदी अरेबियाचा सर्वोच्च मुलकी पुरस्कार.
८. TIME Person of the Year, २०१६.
इत्यादी.
महत्वाचे म्हणजे वरच्या यादीतील ८ पुरस्कारांपैकी ४ मुस्लीम राष्ट्रांचे आहेत. इतकेच नव्हे तर त्यातील सौदी अरेबिया आणि युएई हे दोन देश इस्लामी देशांचे धुरीण आहेत !
१९६९ साली स्थापन झालेल्या Organisation of Islamic Cooperation या ५७ इस्लामी देशांच्या संघटनेच्या परराष्ट्रमंत्र्यांची काही महिन्यांपूर्वी अबू धाबीत परिषद झाली होती. मुस्लिम लोकसंखेने दुसर्या क्रमांकावर असलेल्या भारताला त्या संघटनेत स्थान मिळू नये यासाठी, त्या संघटनेचा संस्थापक सभासद पाकिस्तान, सुरुवातीपासूनच सक्रिय होता आणि त्यात तो २०१८ पर्यंत यशस्वीही झाला होता. मात्र, फेब्रुवारी २०१९ मध्ये त्या संघटनेने पाकिस्तानचा कडवा विरोध मोडून, किंबहुना, संस्थापक सदस्य असलेल्या पाकिस्तानच्या सभेवर बहिष्कार टाकण्याची टाकण्याच्या धमकीची पर्वा न करता, तत्कालीन भारतिय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना, केवळ आमंत्रितच केले असे नाही तर, मुख्य भाषण (की नोट अॅड्रेस) देणार्या अतिथीचा सन्मान देऊन आमंत्रित केले होते, हे आठवत असेलच.
या वेळीही, काश्मिरसंबंधिची ३७० आणि ३५अ कलमे रद्दबातल केल्यामुळे पाकिस्तान जगभर, युएनमध्ये आणि विशेषतः इस्लामी जगात विषारी आणि विखारी भाषेत आकांडतांडव करत आहे. मात्र, पाकिस्तानच्या या रडगाण्याला ICO आणी चीनसकट कोणत्याही देशाने फारशी भीक घातलेली नाही. मात्र, याच वेळेस, युएईने मोदींना हे पारितोषिक देऊन, पाकिस्तानला सणसणीत चपराक लगावलेली आहे, हे नक्की.
एकीकडे मोदींच्या राज्यकारभाराची आणि आंतरराष्ट्रिय मुत्सेद्दीगिरीची (पाकिस्तान आणि चीन सोडून) जगभर प्रशंसा चाललेली असताना, भारतातले विरोधी पक्ष; विशेषतः कॉन्ग्रेस, कम्युनिस्ट आणि कडवे मुस्लिम नेत्यांना आणि त्यांच्या पाठीराख्यांना; त्यांच्यामध्ये एकही गुण दिसत नाही आणि हिटलर, जातियवादी, मुस्लीमविरोधी, इत्यादी अर्थांची नवनवीन विशेषणे शोधून काढण्याचा त्यांचा व्यवसाय जोरात चाललेला आहे ! आणि भारतात वाढत असलेल्या असहिष्णूतेमुळे अनेक "तथाकथित विचारवंत, कलाकार, इत्यादींना देशात राहणे मुश्किल होत आहे !! "पिकते तिथे विकत नाही" ही म्हण सर्वार्थाने सिद्ध करणारा भारत हा सर्व जगात एकमेव विशेष देश असावा !!! :( सुदैवाने, हे फक्त मोदी विरोधकांच्या बाबतीत खरे आहे, जनतेला मोदींबद्दल काय वाटते आहे ते तिने निवडणूकांत दाखवून दिले आहेच. :)
या अतिरेकी मोदी विरोधाला कंटाळून, काही वरिष्ठ कॉन्ग्रेसी नेते हल्ली जरासा सकारात्मक सूर लावू राहिले आहेत, हा त्यातल्या त्यात एक आशेचा विवेकी (sane) किरण म्हणावा काय ?
प्रतिक्रिया
30 Aug 2019 - 10:34 am | mayu4u
राजमाता, युवराज, राजकन्या आणि जिज्जाजी यान्च्या नावानं काही नाहीये ना? मग? किती मोठा त्याग केलाय!
30 Aug 2019 - 3:46 pm | डॉ सुहास म्हात्रे
त्यांनीही जमीनी व रियल इस्टेट प्रॉपर्टी (संदर्भ : नॅशनल हेरॉल्ड, फार्म हाऊस, जमिनीचे व्यवहार, इ) आपल्या नावावर करण्याचे प्रयत्न केलेले आहेत व त्याबद्दल कायदेशीर कारवाया चालू आहेत. तेव्हा, खात्रीशीर यादी, कोर्टाच्या निर्णयानंतरच मिळेल.
तोपर्यंत, कोर्टाने त्यांना 'बेल'गाडी दिली आहे. :)
30 Aug 2019 - 10:07 pm | डॉ सुहास म्हात्रे
अरे हो, दोन फार महत्वाची, किंबहुना भारताची सर्वोच्च मुलकी पारितोषिके, या याद्यांत अंतर्भूत करायची राहिलीच, क्षमस्व ! ती अशी आहेत...
महत्वाची माहिती : भारत रत्न हे पारितोषिक पंतप्रधानांच्या शिफारसीवरून राष्ट्रपतीं प्रदान करतात.
१. जवाहरलाल नेहरू : १९५५ : भारतरत्न : या पारितोषिकासाठी पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंनी, जवाहरलाल नेहरूं यांच्या नावाची राष्ट्रपतींकडे शिफारस केली.
२. इंदिरा गांधी : १९७१ : भारतरत्न : या पारितोषिकासाठी पंतप्रधान इंदिरा गांधींनी, इंदिरा गांधी यांच्या नावाची राष्ट्रपतींकडे शिफारस केली.
असे केल्यावर मग कशाला उगाच परदेश काही करत आहेत की नाही ते पहायला पाहिजे ?! ;) :)
******
अवांतर : अशी स्वतःला स्वतःच पारितोषिके प्रदान करणे, परदेशात केवळ गद्दाफीसारखे हुच्च नेतेच, करताना दिसतात, तिकडे आपण दुर्लक्ष करूया, कसे ? :)
30 Aug 2019 - 10:43 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आरती फार सोपी असते. ;)
-दिलीप बिरुटे
29 Aug 2019 - 4:11 pm | जालिम लोशन
https://www.nationalheraldindia.com/india/congress-slams-pak-for-using-r...
29 Aug 2019 - 4:18 pm | डॉ सुहास म्हात्रे
या नाईलाजाने झालेल्या उपरतीला, काही दिवसांपूर्वी रागांनी काश्मिरसंबंधी केलेल्या, आणि आता जबरदस्त अंगावर उलटलेल्या, (नेहमीसारख्याच) बेजबाबदार विधानाची, पार्श्वभूमी आहे ! :)
30 Aug 2019 - 10:44 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बोलले ना ते, काश्मिर हा आमचा अंतर्गत मामला आहे म्हणून विषय संपला.
चला, आता देशावर बोलू काही. बेरोजगारी, नोकरकपात, मंदी वगैरे.
-दिलीप बिरुटे
30 Aug 2019 - 1:20 pm | डॉ सुहास म्हात्रे
"आपल्या नेत्याने वारंवार माती खाल्ली आणि खोटी विधाने केली, तरी दर वेळी लोकांना 'ती गोष्ट जुनी झाली, विसरा आता' असे सांगायचे आणि परत नवनवीन नौटंक्या करायला लागायचे", हा वरून आलेला आदेश आता सगळ्यांना चांगला माहीत झाला आहे. तो इथे परत सांगितला नसता तरी चालले असते. ;) =)) =)) =))
30 Aug 2019 - 2:26 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आमचा नेता ? हा हा हा. मा.कोबी विरुद्ध बोलल्या गेले म्हणजे बाकीचे सगळे फूलकोबी समर्थक या भक्तांच्या अजब न्यायापुढे अर्धाअधिक देश परेशान आहे.
बाय द वे, आदरणीय फे.* पंतप्रधान कुणीही न बोलावता पाकिस्तानात गेले होते, याची आठवण असेलच . पठाणकोट हवाईतळावर चौकशीसाठी पाकिस्तानची 'कुख्यात' गुप्तचर संस्था आयएसआयला का बोलावण्यात आलं, याचं उत्तरही भक्तांनी द्यायला हवं.
ता.क. फे.म्हणजे फेमस या अर्थाने लिहिलय कोणीही फेकू असे समजू नये. खुलासा संपला.
-दिलीप बिरुटे
30 Aug 2019 - 3:09 pm | डॉ सुहास म्हात्रे
बाय द वे, आदरणीय फे.* पंतप्रधान कुणीही न बोलावता पाकिस्तानात गेले होते, याची आठवण असेलच . पठाणकोट हवाईतळावर चौकशीसाठी पाकिस्तानची 'कुख्यात' गुप्तचर संस्था आयएसआयला का बोलावण्यात आलं, याचं उत्तरही भक्तांनी द्यायला हवं.
या गोष्टी करून, "मैत्री स्थापित करण्याकरिता, सर्वसाधारण मुत्सेद्देगिरीला सोडून असलेली अनेक अपारंपारिक पावलेही भारत उचलत आहे, पण तरीही पाकिस्तानकडून त्याला हवा तसा प्रतिसाद मिळत नाही" अशी आंतरराष्ट्रिय स्तरावर खात्री पटवली गेली... इस्लामी देशांसह अनेक देशांना पाकिस्तानविरुद्ध आणि आपल्या बाजूला वळवण्यात, या गोष्टींचा मोठा फायदा मिळाला.
इथे तुम्ही प्रत्यक्ष विचारणा केलीत म्हणूनच केवळ, ही वस्तुस्थिती सांगितली आहे. तुमचा टोकाचा मोदीद्वेष माहित असल्यामुळे, हे उत्तर पटेल याची खात्री नाही... नाही पटले तर सरळ सोडून द्या. झोपल्याचे सोंग घेतलेल्याला जागे करण्याचा प्रयत्न व्यर्थ असतो, हे मला पक्के माहित आहे !
आमचा नेता ? हा हा हा. मा.कोबी विरुद्ध बोलल्या गेले म्हणजे बाकीचे सगळे फूलकोबी समर्थक या भक्तांच्या अजब न्यायापुढे अर्धाअधिक देश परेशान आहे.
'तो' तुमचा नेता नसेल तर त्याची तळी उचलायचे काहीच कारण नव्हते... निदान इतकी चिडचिड करायची तरी अजिबात गरज नव्हती :) तसेही, त्याचे बेजबाबदार वागणे असह्य होत असल्यामुळे, हल्ली बरेच जण त्याला सोडून चालले आहेत. त्यात अजून भर पडली तर आश्चर्य वाटायचे काहीच कारण नाही. असो.
"लोकांची परेशानी" लोक निवडणुकांत बरोबर दाखवून देत आहेतच. तेव्हा त्याबद्दल मी काही सांगायची गरज नाही.
मुद्दे संपून, चिडचिड होऊन, तोल डळमळीत झाला की, "कोबी", इत्यादी तुमचे सिग्नेचर शब्द बाहेर येतात, हे माहित असल्याने आणि वितंडवादात अजिबात रस नसल्यामुळे, तुमच्याकडून 'खरे मुद्दे आणि समतोल भाषा' दिसायला लागेपर्यंत, राम राम !
30 Aug 2019 - 3:57 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आपल्या प्रतिसादातील माणिक मोती पाहूनच समजले होते की आपला तो बाब्या आणि दुस-याचं ते कार्ट असतं म्हणून. आता नेत्यांवरची टीका जाऊन आता देशातील प्रश्नांकडे गंभीरतेने पाहिलं पाहिजे याकडे प्रतिसादात स्पष्ट निर्देश होता. पण ज्यांचा फ़ोकस देशातील मुळ प्रश्न सोडून सारखा जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी, स्वप्नी आणि मनी केवळ कॊंग्रेस आणि इतर पक्षच दिसत असल्यामुळे उत्तरार्धातल्या प्रतिसादाक्डे आपण केंद्रीय नेतृत्वाप्रमाणे सविस्तर दुर्लक्ष केलं हे लक्षात आलंच होतं.
"लोकांची परेशानी" लोक निवडणुकांत बरोबर दाखवून देत आहेतच. तेव्हा त्याबद्दल मी काही सांगायची गरज नाही. खरंय.. दर दहा माणसामागे पाच माणसे तीनशे सत्तरचा राडा होण्या अगोदर विरोधात बोलत होते असे असतांनाही इतके लोक कसे निवडून येतात या धक्क्यातून भारतीय जनता अजूनही सावरलेले नाही.
बाकी, वितंडवादात मलाही इंट्रेष्ट नाही, पण योग्य वेळी बोललं पाहिजे नाहीतर जे चाललं आहे, ते अगदी उत्तम, बेष्ट, लै भारी चाललय असा त्याचा अर्थ जाऊ नये म्हणून योग्य वेळी योग्य बोललंच पाहिजे. म्हणुन यावे लागले. आपल्या राम रामचा आदर आहेच. ह्याव अ गुड्डे ....!
-दिलीप बिरुटे
30 Aug 2019 - 4:21 pm | lakhu risbud
बाय द वे, आदरणीय फे.* पंतप्रधान कुणीही न बोलावता पाकिस्तानात गेले होते, याची आठवण असेलच .
सैन्यातील एका मित्राने एक बाब सांगितली होती. (ज्याचा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध दूर दूर पर्यंत नाही, रुंग्णांना एकदम उबळ येऊ नये यासाठी सांगितले )
एखादी अतिमहत्वाची व्यक्ती ,तिच्याबरोबर कोणतेही शिष्टमंडळ दुसऱ्या कोणत्याही देशात जाताना त्या शिष्टमंडळात कोण कोण सहभागी आहेत त्या नावांची यादी आधी दिली जाते. त्या प्रत्येक नावाची पार्श्वभूमी तपासून, ती व्यक्ती आपल्या देशात येऊ देण्याने काही नुकसान होणार नाही याची खबरदारी घेऊनच मग यादीतील नावांना परवानगी दिली जाते. बाहेरून येणारी कोणतीही व्यक्ती जर देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक वाटत असेल तर त्या व्यक्तीला अर्थातच परवानगी नाकारली जाते. भारत- पाकिस्तान या बाबतीत फारच कसून काळजी घेतात. नवाज शरीफच्या पंजाब मधील साखर कारखान्यांमध्ये दुरुस्तीच्या कामाच्या निमित्ताने भारतीयांना तिथे जायची संधी आधी मिळत असे. ज्या द्वारे गुप्तचर संस्थांना त्याची माणसे तिथे घुसवत येत असत. तो मार्ग बंद झालेला होता. पंतप्रधान मोदी जेव्हा अनपेक्षितरित्या लाहोर मध्ये उतरले तेव्हा त्यांच्या ताफ्यातील अधिकाऱ्यांच्या नावांची देवाणघेवाण करायला वेळच मिळाला नाही. मोदी तिथे साधारणतः दोन-अडीच तास असतील. त्यांच्या ताफ्यातील १५-२० लोक जे खाली उतरले ते परत आलेच नाहीत. या लोकांच्या रूपाने गुप्तचर संस्थेने आपले लोक तिथे उतरवले. कदाचित मोदींची या अत्यंत अनपेक्षित भेटी मागे हाच हेतू सध्या करून घेण्याचा प्रयत्न असेल अशी शंका त्याने वर्तवली होती.
बाकी तुमचा वैचारिक बद्धकोष्ठ फारच ठणका मारायला लागलाय. उपचार करत नाही आहात हे दिसतच आहे.
काळजी घ्या स्वतःची. अजून पावणेपाच वर्षे काढायची आहेत.
30 Aug 2019 - 2:14 pm | माहितगार
कडी लाव आतली अन मी नाही त्यातली, ' जाऊ द्या ना ' ? एवढा पुळका आलाय तर जा म्हणावे पाकीस्तानला :) नको कोण म्हणतोय !
30 Aug 2019 - 2:30 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लोक न बोलावता जातात, जा म्हणावे तिकडे इतका पुळका आला असेल तर...
-दिलीप बिरुटे
30 Aug 2019 - 3:01 pm | जालिम लोशन
रहायला. ईकडे तिचा जीव घुसमटतो आहे. तिथली आर्मी एकदम प्रोफेशनल आहे. फक्त आपले काम एके काम बघते बाकी कश्शाकश्शात नाक खुपसत नाही. मानव अधिकाराचे उल्लंघन करत नाही, माजी मुख्यमंत्र्याला हेलिकाॅप्टर गनशीप ने मारत नाही. कुठली डेमोग्राफी बदलत नाही. परराष्ट्र धोरणात लक्ष घालत नाही, पंतप्रधान सिलेक्ट करत नाही, खोटे बोलत नाही, एकदम धर्मनिरपेक्ष आणी लोकशाही तत्वांवर चालते. आपल्या पासंगाला हि पुरणार नाही, त्यामुळे तिने निमंत्रण दिले आहे म्हणे सर्व समाजवादी, प्रगतीशील, सेक्युलर, महासंघी मंडळीना बरोबर येण्याचे.
30 Aug 2019 - 2:51 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आता पुरस्काराबद्द्ल जवळ जवळ मिपाकरांकडून कौतुक करुन झाल्यामुळे आता कौतुक सोहळ्याचा धागा आदरणीय मारुतीच्या शेपटीसारखा विनाकारण लांबवू नये, असे वाटते. काही पैलवान (आयडी नाही) आखाड्यात लंगोट गुंडाळून सारखं दंड थोपटत असल्याचा फील अलिकडे येत आहे. तेव्हा जरा विश्रांती घेऊ या असे वाटते.
बाकी, संयुक्त अरब अमिरातींचा सर्वोच्च मुलकी पुरस्कारामुळे देशभरात आदरणीय ते काय त्यांचं नाव त्यांनी आता देशातील प्रश्न सोडवायला हरकत नाही असे वाटते. बेकारी, महागाई, कर्मचारी कपात, डबघाईला आलेल्या अर्थव्यवस्थेकडे आता ही व्यवस्था लक्ष देईल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो.
आत्ताच एका बातमीने आमच्याकडील रस्त्यांचं कसं होईल असा प्रश्न पडला आहे, गेली दोन वर्ष चांगला असलेला रस्ता खोदून ठेवला आहे. आता पुन्हा मरणदायक वेदना झेलने आहे.
“रस्ते बांधणे थांबवा, संपत्ती विका” मोदी सरकारचा NHAIला आदेश https://egnews.in/marathi-news/stop-building-roads-sell-assets-modi-nhai/
-दिलीप बिरुटे
30 Aug 2019 - 3:32 pm | चौकस२१२
एक साधा प्रश्न ,,
सध्याच्या सरकार बद्दल आदर आणि त्यांनी चांगलंय केलेल्या ( किंवा चांगल्या हेतूने केलेल्या परंतु अमलबजवानीत त्रुटी असलेलया) गोष्टींबद्दल चांगलं बोलला कि ती व्यक्ती लागेचच "अंध भक्त" " संघी" वैगरे संबोधली जाते! का?
देशासाठी काहीतरी करणारे सरकार आणि थोडातरी कणखर पण दाखवणर्या सरकारचे समर्थन करायला आपल्याला काही संघाचे किंवा मोदींचे आंधळे भक्त असावे लागत नाही
जसे आपण मनापासून म्हणू शकतो कि ७१ साली इंदिरागांधींनी एक कणखर आणि देशाच्या भल्या साठी बांगलादेशला समर्थन केले यासाठी काँग्रेस भक्तच असावे लागत नाही !
आपण टोकच का गाठतो ?
निदान शिकलेल्या माणसांनी तरी एवढी समज दाखवावी?
दुसरे असे कि आज भाजपाला मते देणारे हे काही धर्मांध हिंदू आहेत असे समजण्याचे कारण नाही? त्यांनी मतदान / पाठिंबा या कारणासाठी दिला असू शकतो कि ते फक्त बदलासाठी आणि एकाधिकार काँग्रेस ची सत्ता सुदृढ लोकशाहीत एवढी वर्षे नको म्हणून?
तू भक्त आणि मी नाही हेच का?सतत
30 Aug 2019 - 4:17 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सध्याच्या सरकार बद्दल आदर आणि त्यांनी चांगलंय केलेल्या ( किंवा चांगल्या हेतूने केलेल्या परंतु अमलबजवानीत त्रुटी असलेलया) गोष्टींबद्दल चांगलं बोलला कि ती व्यक्ती लागेचच "अंध भक्त" " संघी" वैगरे संबोधली जाते! का?
भक्त, अंधभक्त, संघी, वगैरे डायरेक्ट बोलू नये, ते चूक आहे.
देशासाठी काहीतरी करणारे सरकार आणि थोडातरी कणखर पण दाखवणर्या सरकारचे समर्थन करायला आपल्याला काही संघाचे किंवा मोदींचे आंधळे भक्त असावे लागत नाही
खरंय...! म्हणूनच अनेक लोकांनी तिनशे सत्तरच्या अनेक वर्षांच्या पेंडिंग विषयाचं भक्तांबरोबर अनेक अभक्तांनी सुद्धा समर्थन केलं.
निदान शिकलेल्या माणसांनी तरी एवढी समज दाखवावी ?
आपण जर येथील दोन तीन डॉक्टरांबद्दल बोलत असाल तर ते व्यक्तीगत खुप चांगले आहेत. पण भाजप आणि सरकार, त्यांचे विषय आले की ते थोडेसे बिथरतात असे वाटते. म्हणजे माझं निरिक्षण चूकही असू शकेल. पण थोडीफार समज दाखवायला पाहिजे असे नक्की वाटते. ;)
दुसरे असे कि आज भाजपाला मते देणारे हे काही धर्मांध हिंदू आहेत असे समजण्याचे कारण नाही ?
अगदी मान्य.
त्यांनी मतदान / पाठिंबा या कारणासाठी दिला असू शकतो कि ते फक्त बदलासाठी आणि एकाधिकार काँग्रेस ची सत्ता सुदृढ लोकशाहीत एवढी वर्षे नको म्हणून?
अगदी बरोबर.
तू भक्त आणि मी नाही हेच का?सतत
तेच म्हणतो मी भक्तांना, असे भक्त आणि अभक्त असे पोटप्रकार पाडू नका. ऐकत नाही हो लोक.
अवांतर : आभार मानल्यावर जनरली मी धाग्यावर येत नाही पण तुमचा प्रतिसाद आवडला. जेवण होऊन हात धुतल्यानंतर एखादा मेनू शिल्लक राहीला तर टेष्ट करायला हरकत नसते म्हणून हा प्रतिसाद. :)
-दिलीप बिरुटे