उत्तरार्ध

Primary tabs

गड्डा झब्बू's picture
गड्डा झब्बू in जनातलं, मनातलं
9 Jul 2019 - 3:03 pm

(प्रेरणा - किरण व संगीता --एक आंतर जातीय प्रेम कहाणी )

किरण राहत असलेला फ्ल्याट त्याची कन्या अनुच्या नावावर होता
गाडी बंगला नोकर चाकर सत्ता सामर्थ्य सारे असलेल्या देवयानीला (सांगिताला) तिकडे राहणे मंजूर नव्हते
नवविवाहित वधूचा अधिकार गाजवत तिने किरणला त्याचे चंबूगबाळे उचलून तिच्या बंगल्यावर राहायला यायचा आदेश दिला
आता बाकी काहीच काम नसल्याने दोघांचा बराचसा वेळ बंगल्यातल्या भल्यामोठ्या बेडरूम मधे जात होता
त्यामुळे संसाराच्या नव्यानवलाईत (आणि सांगिताला) दिवस पटापट गेले.

एका प्रसन्न सकाळी किरणच्या छातीवर डोके टेकत लाडेलाडे ती म्हणाली (कवळी काढल्यावर तिचे साधे बोलणेही लाडेलाडेच वाटायचे)
आज किनई मि खूप खूप खुश आहे मि तुझ्या बाळाची आई होणार आहे
हे ऐकताच आनंदाने बेभान होऊन त्याने एक आरोळी ठोकली आणि तिला मिठीत घेत त्याने चुंबनाचा वर्षाव केला
बेडरूमच्या दरवाज्यावर खटखट झाल्याने तो कैफातून बाहेर आला

दरवाज्याबाहेर भयभीत होऊन उभ्या असलेल्या रामुकाकाला बघून तो चिडलाच होता
पण त्याच्या आरोळीचा आवाज ऐकून साहेबाला काही झाल का या काळजीने त्याने दरवाजा वाजवल्याचे सांगितले
तसा खुश होऊन किरणने त्याला घसघशीत दहा रुपये बक्षीस दिले व तो पुन्हा देवयानीजवळ आला
कधी एकदा हि गोड बातमी अनु अविनाश राहुल आणि रमाला सांगतो असे दोघांना झाले

Laptop काढला आणि त्याने स्वतःच डेव्हलप केलेल ऍप उघडून कॉल लावला
समोर पडद्यावर वरती चार खिडक्यांमध्ये ते चौघे आणि खाली दोन खिडक्यांमध्ये हे दोघे दिसत होते
बरेच आढेवेढे घेत त्या चौघांची उत्सुकता शिगेला पोचल्यावर शेवटी दोघांनी एकसुरात ति बातमी त्यांना सांगितली
सुरवातीचे काही क्षण सुन्न अवस्थेत गेल्यावर त्या चौघांनी एकदम काँगो काँगो असा गदारोळ केला
त्याला प्रतिसाद म्हणून त्यांच्या आवाजावर कडी करत थ्यांक्यू थ्यांक्यू असा या दोघांनी गलका केला

पुन्हा बेडरूमच्या दारावर खटखट झाली यावेळी दाराबाहेर रामुकाकाच्या जोडीला शेवंताबाईपण उभी होती
दोघांचे चिंताग्रस्त चेहरे पाहून किरणला हसू आले आणि त्याने दोघांना दहा दहा रुपये बक्षिशी दिली
सकाळी सकाळी तीस रुपयांचा फटका बसला होता पण आज त्याला फिकीर नव्हती

परत येऊन चौघांशी बोलणे चालू केले
देवयानीला शहरातले नामवंत गायन्याक डॉक्टर खटपटीयांकडे तपासणीसाठी नेण्यावर सर्वांचे एकमत झाले
रिपोर्ट्स आल्यावर पुन्हा कॉल करण्याचे ठरल्यावर त्यांनी संभाषण आवरते घेतले
लगेच किरणने फोन करून डॉक्टर खटपटीयांची साडेबारा वाजताची अपोइंतमेंट घेतली

डॉक्टर खटपटीयांच्या सुपर स्पेश्यालीटी हॉस्पिटल मधे पोचल्यावर किरणने कौंटर वरून फॉर्म आणला
देवयानीने तिची सगळी माहिती भरून दिल्यावर त्याने तो परत कौंटरवर बसलेल्या स्वागतिकेकडे दिला
फॉर्म वर लिहिलेली माहिती वाचून त्या स्वागतिकेला आकडी आल्याने तिथे बरीच धावपळ झाली
डॉक्टर खटपटीया लगबगीने केबिन बाहेर आले आणि स्वागतिकेला तपासून त्वरित तिला आय सी यु मधे दाखल करण्याचा निर्णय घेतला

नंबर आल्यावर किरण आणि देवयानी डॉक्टर खटपटीयांच्या केबिन मधे गेले
प्राथमिक तपासणी केल्यावर डॉक्टरांनी सर्वप्रथम दोघांचे अभिनंदन केले
मग रक्त तपासणी सोनोग्राफी अल्ट्रा अल्फा बीटा गामा अशा अनेक तपासण्या करण्याचा सल्ला दिला
आणि सर्व तपासण्यांचे रिपोर्ट्स गेऊन दोन दिवसांनी परत येण्यास सांगितले

दोन दिवसांनी सगळे रिपोर्ट्स घेऊन दोघे पुन्हा डॉक्टर खटपटीयांकडे गेले
सुरवातीचे रिपोर्ट्स वाचून समाधानी दिसणारे डॉक्टर एक रिपोर्ट पाहून अचानक गंभीर झाले
आता डॉक्टर काय सांगतात हे ऐकण्यासाठी दोघांचे प्राण कानात आले होते

मि आणि मिसेस कुलकर्णी
डॉक्टरांनी धीरगंभीर आवाजात बोलण्यास सुरवात केली
वरवर सगळ काही व्यवस्थित वाटतंय पण एका रिपोर्ट मधे थोडी समस्या दिसत्ये
गामा तपासणीमध्ये गर्भाशयावर पुरळ आल्याचे दिसत आहे शस्त्रक्रिया करावी लागेल

हे ऐकून दोघांच्या पायाखालचे कार्पेटच सरकले
मुलांशी बोलून निर्णय घेऊ असे सांगून निराश मानाने दोघे तिथून निघाले
घरी आल्यावर देवयानीचा मूड ठीक नसल्याने ति थोडावेळ आराम करण्यासाठी बेडरूम मधे गेली
किरण हॉलमधे टीव्ही वर बातम्या बघत बसला असताना
गेल्या तीस वर्षांत पंधरा हजार गायी म्हशींची प्रसूती यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल ख्यातनाम पशुवैद्य डॉक्टर एलकुंचवारांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार
हि बातमी बघून त्याचे डोळे चमकले

सरकारी डेअरीतील मुख्य पशुवैद्य डॉक्टर एलकुंचवार हे गायत्रीचे मित्र होते
गायत्रीच्या मेंदूला आलेल्या पुरळावर केलेली शस्त्रक्रिया अयशस्वी झाल्यावर ति दगावली तेव्हा
तिच्या तेराव्याला स्वतः डॉक्टर एलकुंचवार किरणचे सांत्वन करायला त्याच्या घरी आले होते
तेव्हा त्यांच्याशी झालेली भेट आणि गप्पा किरणला आता लक्ख आठवल्या
गायत्रीच्या मृत्यूचे कारण समजल्यावर त्यांनी हृदय मेंदू आणि गर्भाशायावरील पुरळावरचे रामबाण उपचार पशुवैद्यक शास्त्रात असल्याचे सांगितले होते
किरणने रामुकाकाकडून त्याची माळ्यावर ठेवलेली सूटकेस काढून घेतली आणि त्यातल्या जुन्या डायऱ्या बाहेर काढल्या
एका डायरीत त्याला एलकुंचवारांचा पत्ता आणि टेलिफोन नंबर सापडला

रात्री किरण आणि देवयानीने पुन्हा Laptop वरचे खास ऍप उघडून मुलांना कॉल लावला
डॉक्टर खटपटीयांशी झालेले सगळे बोलणे त्यांनी मुलांना सांगितले
गर्भाशयाला आलेल्या पूरळा बद्दल ऐकून अनु आणि रमा बसल्या खुर्चीवरून खाली पडल्या तर
अविनाश आणि राहुलचा आ वसला गेल्याने त्यांच्या तोंडात अनुक्रमे माशी आणि डास गेला

काही वेळाने सगळे नॉर्मल झाल्यावर परत चर्चेला सुरवात झाली
आणि सेकंड ओपिनियन घेण्याचा ठराव एकमुखी पास झाला
त्यावर किरणने भीत भीत डॉक्टर एलकुंचवारांविषयी सगळ्यांना सांगितले आणि काय आश्चर्य
सेकंड ओपिनियनसाठी त्यांच्याशीच कन्सल्ट करावे यावर सगळ्यांचे एकमत झाले

डायरीतला टेलिफोन नंबर बराच जुना असल्याने त्यावर संपर्क होत नव्हता मग किरणने त्यतल्या गोरेगावच्या पत्त्यावर प्रत्यक्ष जायचे ठरवले
रविवारी डॉक्टर एलकुंचवारांच्या घरासमोर रिक्षा सोडून किरण फाटकातून आत शिरला आणि त्यांच्या कुत्र्याने त्याच्या पायाचा चावा घेतला
कुत्र्याचे भुंकणे आणि किरणचे विव्हळणे ऐकून डॉक्टर सहपरिवार बाहेर आले
तो कोण आणि इथे येण्याचे कारण सांगितल्यावर त्यांनी किरणला घरात नेले आणि त्याला रेबीज विरोधी इंजेक्शन दिले

श्वानदंशाच्या वेदना कमी झाल्यावर किरणने त्यांना देवयानीची केस सांगितली आणि बरोबर आणलेले रिपोर्ट्स दाखवले
रिपोर्ट्स तपासल्यावर डॉक्टरांच्या चेहऱ्यावर मंद हास्य तरळले
अहो अशा मेंदू हृदय गर्भाशयावर पुरळ येणे वगैर बकऱ्या गायी म्हशींमध्ये कॉमन आहे
आमच्या पशुवैद्यक शास्त्रात त्यावर रामबाण उपचार आहेत हे मि मागेच तुम्हाला सांगितले आहे
गायत्रीच्या वेळी सगळ अचानक झाले आणि मला त्याबद्दल काही माहितीही नव्हती नाहीतर आज ति जिवंत असती
हे वाक्य बोलताना डॉक्टरांचा स्वर हळवा झाल्यासारखे किरणला वाटले

असो निश्चिंत राहा मिस्टर कुलकर्णी यापुढे हि केस मि हाताळणार आहे
दोन दिवसात देवयानीला खडखडीत बरी करतो यु डोंट वरी
त्यांचे शब्द ऐकून किरणलाही धीर आला आणि त्याचा चेहरा उजळला

डॉक्टरांनी त्यांच्या ब्यागेत दोन चार लहान मोठ्या सिरींज हातमोजे आणि औषधांच्या च्या बाटल्या भरल्या आणि ते किरण बरोबर त्याच्या घरी आले
शेवंताबाईने आणून दिलेली कॉफी प्यायल्यावर डॉक्टरांनी त्यांचा मोर्चा देवयानीच्या बेडरूमकडे वळवला
थोड्या इकडच्या तिकडच्या गप्पा मारून पेशंटचा विश्वास संपादन करून मग त्यांनी तिला तपासायला घेतले
डाव्या कुशीवर उजव्या कुशीवर झोपवून मग हात आणि गुडघ्यांवर ओणवी उभी करून शरीराच्या निरनिराळ्या भागांवर काही हलके तर काही जोराचे फटके दिले
मानगूट पकडून तिला गदा गदा हलवून झाल्यावर मग ओटीपोटावर दाबून पाहिले व कमरेवर लाकडी हातोडीने ठोकून बघितले

त्यानंतर इंजेक्शनची मात्रा ठरवण्या साठी पुन्हा एकदा गामा तपासणीचा रिपोर्ट बघितला
औषध आणि त्याची मात्रा मनाशी ठरल्यावर एक फुटभर लांबीची सिरींज घेतली
हेक्झाबेंटेन सेट्रोफिलीन असे लिहिलेल्या एका बाटलीतले थोडे द्रवरूप औषध त्यात घेतले
मग ते औषध डिनोसल्फ मेटासिलीन नावाच्या पावडरने भरलेल्या बाटलीत टोचले
बाटली हलवून हलवून आतले मिश्रण एकजीव झाल्यावर पुन्हा त्या फुटभर लांबीच्या सिरींज मधे ते भरून घेतले

देवयानीला पालथी झोपायला सांगून आपल्या सराईत हातांनी सिरींजची सुई डॉक्टरांनी तिच्या कमरेवर डाव्या बाजूला खुपसली
सुई खुपसाताक्षणी देवयानीने हातपाय झाडत असा काही हंबरडा फोडला कि पुन्हा रामुकाका व शेवंताबाई दरवाज्यात हजार झाल्या
पण यावेळी किरणने त्यांना बक्षिशी न देता वसकन त्यांच्या अंगावर ओरडला
बघता काय शुंभासारखे तिकडे उभे राहून इकडे या आणि हिचे हात पाय पकडा

त्या भल्यामोठ्या सिरींज मधले औषध टोचून होईपर्यंत तिघांनी मोठ्या निकराने देवयानीचे हात पाय धरून ठेवले होते
इंजेक्शन देऊन झाल्यावर मात्र ति थोडी शांत झाली तिला झोप लागल्यासारखे वाटत होते
डॉक्टरांनी तिघांच्या मदतीने तिला पुन्हा सरळ करून झोपवले आणि सगळे बेडरूम मधून बाहेर पडले
दोन दिवस ति गुंगीत असेल पण शुद्धीत आल्यावर तिची प्रकृती एकदम ठणठणीत होईल मग पुन्हा तिच्या तपासण्या करू
मधे काही वाटले तर मला कॉल करा असे सांगून आपलं नंबर देऊन डॉक्टर एलकुंचवार निघून गेले

रात्री किरणने मुलांना कॉल करून सगळी माहिती दिली
मुले पण काळजीत पडली होती
आई लवकर बरी होऊदे म्हणून अनुने सोळा सोमवारचे व्रत करायचे ठरवले तर रमाने पांढरे बुधवार करायचा संकल्प सोडला

दोन दिवसांनी देवयानी सम्पूर्ण शुद्धीत आली एकदम फ्रेश वाटत होती
तिला असे प्रसन्न पाहून किरणची काळी खुलली त्याने लगेच
तिला बाहुपाशात घेऊन तिच्यावर चुंबनांचा वर्षाव केला
त्या उन्मादात इंजेक्शन दिलेली जागा दाबली गेल्याने देवयानीने वेदना असह्य होऊन किंकाळी फोडली
पुन्हा दारात रामुकाका आणि शेवंताबाई हजर
काही झाल नाहीये जा आमच्या साठी कॉफी आणि नाष्टा घेऊन या असे सांगून किरणाने त्यांना पिटाळून लावले
डॉक्टर एलकुंचवारांना फोन करून देवयानीच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली त्यांनी आणखीन दोन दिवसांनी परत गामा तपासणी करायला सांगितले

त्यानुसार दोन दिवसांनी पुन्हा सगळ्या तपासण्या करून घेतल्या व रिपोर्ट्स आल्यावर डॉक्टर एलकुंचवारांच्या घरी ते दाखवण्यास नेले
सगळे रिपोर्ट्स नॉर्मल बघून डॉक्टर एलकुंचवार मनोमन खुश झाले आणि म्हणाले
जा आता त्या डॉक्टर खटपटीयांकडे आणि दाखवा सगळे रिपोर्ट्स शस्त्रक्रिया करायला लागेल म्हणत होता लेकाचा
आणि हो डबल अभिनंदन मि आणि मिसेस कुलकर्णी तुमच्याकडे जुळी बाळ जन्माला येणार आहेत
नवीन रिपोर्ट्स तसे स्पष्ट दाखवत आहेत

किरण आणि देवयानीच्या आनंदाला पारावर राहिला नाही
तरी खात्री करावी म्हणून दोघे तसेच डॉक्टर खटपटीयांकडे पोचले
नवीन रिपोर्ट्स बघितल्यावर त्यांचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना
पुन्हा पुन्हा त्यांनी सगळे रिपोर्ट्स पहिले आणि म्हणाले मि आणि मिसेस कुलकर्णी हा चमत्कार आहे माझ्या करिअर मधे मि पहिल्यांदाच अशी केस बघतोय
मिसेस कुलकर्णी यु आर व्हेरी लकी
तुमच्या गर्भाशायावारचे पुरळ नाहीसे झाले आहे आणि
जुळ्या मुलांना जन्म देणार आहात तुम्ही
ऑल द बेस्ट

कधी एकदा घरी जाऊन मुलांना हि बातमी सांगतो आणि देवयानीला बाहुपाशात घेऊन तिच्यावर चुंबनांचा वर्षाव करतो असे किरणला झाले होते

घरी आल्यावर मुलांना कॉल करून दोघांनी त्यांना आनंदाची बातमी दिली
जुळे होणार असल्याचे सांगितल्यावर त्यांनी गेल्या वेळेपेक्षा जास्त गदारोळ केला
आपण पण ओरडलो तर परत रामुकाका आणि शेवंताबाई येतील म्हणून दोघांनी आरडा ओरडा न करता त्यांचे आभार मानले
थोडा गदारोळ कमी झाल्यावर मुलांनी काय आणि कशी काळजी घ्यायची याच्या सूचनांचा भडीमार सुरु केला
आईचे बाळंतपण अमेरिकेला अनु आणि अविनाश कडे करायचे कि लंडनला राहुल आणि रमाकडे करायचे यावर मात्र एकमत होत नव्हते
दोन्ही पार्टी हट्टाला पेटल्या होत्या कोणीच माघार घेत नव्हते
शेवटी किरण आणि देवयानीने त्या चौघांनी आईचे बाळंतपण करायला सातव्या महिन्यात भारतात यावे असा पर्याय सुचवला
दोन्ही पार्टींनी तो मान्य केला आणि वाद मिटला

आत्ता पर्यंत रामुकाका आणि शेवंताबाई पासून लपवलेली बातमी दोघांनी त्यांना दिली
त्यांच्याही आनंदाला पारावार राहिला नाही
शेवंताबाई आता देवयानीची जास्तीच काळजी घेऊ लागल्या
त्या सतत कुणीतरी येणार येणार ग हे गाणे गुणगुणत असायच्या

दिवस महिने जात होते ठरल्याप्रमाणे सातव्या महिन्याच्या थोडे आधी मुले मुली भारतात आली
देवयानीचा बासष्टावा वाढदिवस आणि डोहाळजेवण एकाच दिवशी करायचे ठरले
मुलांची कार्यक्रम हॉल घेऊन धुमधडाक्यात साजरा करायची इच्छा होती पण
आता या वयात आम्हाला दगदग झेपणार नाही असे कारण देऊन किरणने तो घरच्या घरीच उरकावा असे सांगितले

मुला मुलींनी आईचे विडी ओढावीशी वाटण्या पासून उभा कट दिलेली हिरवी मिरची अर्धा ग्लास व्होडका मधे घालून पिण्यापर्यंतचे सगळे डोहाळे पूर्ण केले
नऊ महिने नऊ दिवस भरल्यावर देवयानीला प्रसूती कळा सुरु झाल्या
त्वरित तिला डॉक्टर खटपटीयांच्या हॉस्पिटल मधे नेण्यात आले
नॉर्मल डिलिव्हरी होऊन एक मुलगा आणि मुलगी जन्माला आले

देवयानीला घरी आणल्यावर चार दिवसांनी सगळी मंडळी तिच्या बेडरूम मधे जमली
अनु ने बोलायला सुरवात केली
आई बाबा आता तुमचे वय झाले आहे या नवीन बाळांना सांभाळणे तुम्हाला नीटसे जमेल असे आम्हाला वाटत नाही
त्यामुळे आम्ही चौघांनी असा निर्णय घेतला आहे कि मुलीला मि आणि अविनाश दत्तक घेणार
आणि मुलाला राहुल आणि रमा दत्तक घेणार
आम्ही त्यांचा सांभाळ चांगल्या प्रकारे करू तुम्ही काळजी करू नका
तुहाला दोघांना भारत पिंजून काढायचा आहे विदेशातले अनेक देश पहायचे आहेत
तुमच्या त्या सगळ्या इच्छा तुम्ही पूर्ण करा बाळांची जवाबदारी आता आमची

मुलांचा हा निर्णय ऐकून देवयानी आणि किरणच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले
दोघांनी मुलांच्या निर्णयाला संमती दिली आणि बाळांच्या बारशाची तयारी करायला सांगितले
मुलाचे नाव सिद्धार्थ ठेवले तर मुलीचे प्रिया

एअरपोर्टवर एकाच वेळी तीन जोड्या उड्डाणाची वाट पाहत होत्या
अनु अविनाश आणि छोटी प्रिया अमेरिकेला जायला निघाले होते
राहुल रमा आणि छोटा सिद्धार्थ लंडनला जायला निघाले होते
देवयानी आणि किरण विदेशातला देश पाहायला म्हणून कंबोडियाला जायला निघाले होते
-------------
एक वर्ष लोटले
सगळं कस छान छान चालले होते
एका प्रसन्न सकाळी किरणच्या छातीवर डोके टेकत लाडेलाडे देवयानी म्हणाली
आज किनई मि खूप खूप खुश आहे मि पुन्हा तुझ्या बाळाची आई होणार आहे

किरणला आपल्या सर्वांगावर पुरळ उठल्याचा भास झाला आणि त्याने मोठ्याने किंकाळी फोडली आणि जमिनीवर गडबडा लोळू लागला
बेडरूमच्या दरवाजावर पुन्हा खटखट झाली
देवयानीने दार उघडले बाहेर रामुकाका आणि शेवंताबाई भयभीत चेहऱ्याने उभे होते..............

मुक्तकविडंबनविरंगुळा

प्रतिक्रिया

गड्डा झब्बू's picture

9 Jul 2019 - 3:05 pm | गड्डा झब्बू

गुरुवर्य अकु यांच्या चरणी अर्पण.....

खिलजि's picture

9 Jul 2019 - 3:26 pm | खिलजि

छान लिहिलं आहे पण भरपूर शुद्ध भाषेत आणि समजेल असं आहे .. परत एकदा शिकवणी लावावी लागेल असं वाटतंय

गड्डा झब्बू's picture

9 Jul 2019 - 3:39 pm | गड्डा झब्बू

:-)) एकलव्या सारखा त्यांची प्रतिमा समोर ठेऊन शिकतोय त्यामुळे थोडा वेळ लागेल त्यांच्या जवळपास पोचायला :-))

श्वेता२४'s picture

9 Jul 2019 - 3:40 pm | श्वेता२४

असताना वाचायला घेतली आणि गोड बातमी वाचून हसू आवरेना. घरी जाऊन वाचते.

गड्डा झब्बू's picture

9 Jul 2019 - 3:46 pm | गड्डा झब्बू

:-)) :-)) :-))

यशोधरा's picture

9 Jul 2019 - 3:40 pm | यशोधरा

अकुकाकाच पाहिजेत तेथे,
गड्डा झब्बूंचे काम नाही!!

=))

गड्डा झब्बू's picture

9 Jul 2019 - 3:44 pm | गड्डा झब्बू

खरे आहे, सूर्यासमोर काजव्याची काय बिशाद :-))

अकु काकांचा गंडा बांधला की तुम्हीही सूर्य व्हाल! शुभेच्छा! =))

जाऊदे. अकुकाका गमतीत घेतात म्हणून बरे आहे. :)

गड्डा झब्बू's picture

9 Jul 2019 - 4:19 pm | गड्डा झब्बू

गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु, गुरुर देवो महेश्वर: ..... गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नम:

>>>अकुकाका गमतीत घेतात म्हणून बरे आहे. :)>>>
क्षमाशील आहेत आमचे गुरुदेव आता त्यांचा बांधलेला हा गंडा मि आयुष्यात सोडणार नाही :-))

योगी९००'s picture

9 Jul 2019 - 3:48 pm | योगी९००

मस्त जमलाय उतरार्ध... खूप हसलो...

गड्डा झब्बू's picture

9 Jul 2019 - 4:10 pm | गड्डा झब्बू

गुरुकृपा आणखीन काय :-))

मला बोलायला शब्दच सुचत नाहीत.
नुसता हसतोय.
अलौकिक प्रतिभा लाभली आहे तुम्हाला.

गड्डा झब्बू's picture

9 Jul 2019 - 4:31 pm | गड्डा झब्बू

__/\__

तेजस आठवले's picture

9 Jul 2019 - 4:26 pm | तेजस आठवले

गड्डा झब्बू साहेब,
कित्येक दिवसांनी खळखळून हसलो.धन्यवाद.
ऑफिस मध्ये हसू आवरत नाही. घरी गेल्यावर परत एकदा वाचेन.

गड्डा झब्बू's picture

9 Jul 2019 - 4:34 pm | गड्डा झब्बू

धन्यवाद अकू काकांना हे लिहिण्याची प्रेरणा त्यांच्या कथेतूनच मिळाली

ज्ञानोबाचे पैजार's picture

9 Jul 2019 - 4:32 pm | ज्ञानोबाचे पैजार

जबरा लिहिल आहे यार....
पण काकांची तोड नाही... तुमचा उत्तरार्ध लिहून होईपर्यंत काकांनी अजून दोन कथा पाडल्या सुध्दा
पैजारबुवा,

नाखु's picture

10 Jul 2019 - 7:30 am | नाखु

शेवटी काकाच असतात,त्यांच्या समोर स्वत:च्या सुद्धा पुतण्या निष्प्रभ ठरले हीच राजकी बात तुम्हाला लक्षात नाही.
पण म्हणून पुतण्या ने प्रयत्न केला तर काय हरकत आहे.

कधीतरी पुतण्याचाही काका होईलच की!!!

काकाकुवा वाचकांची पत्रेवाला नाखु

गड्डा झब्बू's picture

9 Jul 2019 - 4:41 pm | गड्डा झब्बू

>>>पण काकांची तोड नाही... तुमचा उत्तरार्ध लिहून होईपर्यंत काकांनी अजून दोन कथा पाडल्या सुध्दा>>>
माझे गुरु अकू काका सिद्धहस्त लेखक आहेत, मि आजच त्यांचा गंडा बांधला आहे :-))

गवि's picture

9 Jul 2019 - 4:44 pm | गवि

हे राम.

सादर प्रणाम.

रामुकाकांनी शेवंताबाईवर चुंबनांचा वर्षाव करण्याचा स्कोप एकदाही नव्हता का?

ज्ञानोबाचे पैजार's picture

9 Jul 2019 - 4:49 pm | ज्ञानोबाचे पैजार

रामुकाकांनी शेवंताबाईवर चुंबनांचा वर्षाव करण्याचा स्कोप एकदाही नव्हता का?

या ऐवजी

रामुकाका आणि शेवंताबाईवर चुंबनांचा वर्षाव करण्याचा स्कोप एकदाही नव्हता का?

असेही चालेल

शिष्योत्तमाने कृपया नोंद घ्यावी..

पैजारबुवा,

गड्डा झब्बू's picture

9 Jul 2019 - 5:41 pm | गड्डा झब्बू

वरील दोन्ही सुचवण्यांची नोंद घेतली आहे :-)) आता विचार करताना लक्षात येतंय कि बंगला चार पाच बेडरूम्सचा करून
रामुकाका + शेवंताबाई
किरण + शेवंताबाई
देवयानी + रामुकाका
अशा नवीन जोड्या पण जमवता आल्या असत्या. तसेच सिद्धार्थ आणि प्रिया मोठे झाल्यावर त्यांनी आपापल्या समलिंगी जोडीदाराशी विवाह केला असे दाखवून गुरुवर्यांच्या मुळातच सशक्त असलेल्या कथेचा उत्तरार्ध आणखीन रोचक करण्यास स्कोप होता :-))

फक्त सर्वांना नायसिल वगैरे लावून पुरळापासून जपायला सांगणे. नायतर मग इंजेक्शनची पीडाच की ती.

गड्डा झब्बू's picture

9 Jul 2019 - 9:24 pm | गड्डा झब्बू

:-)) :-)) :-))

गड्डा झब्बू's picture

9 Jul 2019 - 5:20 pm | गड्डा झब्बू

>>>रामुकाकांनी शेवंताबाईवर चुंबनांचा वर्षाव करण्याचा स्कोप एकदाही नव्हता का?>>>
खरेच कि लक्षात नाही आला हा स्कोप आधी :-))

खिलजि's picture

9 Jul 2019 - 4:50 pm | खिलजि

आईआईगं ,, आज बरेच दिवसांनी हे अशे अभिप्राय वाचून वाचून कंबरेत लचक भरलीय ..

उगा काहितरीच's picture

9 Jul 2019 - 4:53 pm | उगा काहितरीच

बाबौ ! इंजेशन जालीम दिसतय जणू !!!

गड्डा झब्बू's picture

9 Jul 2019 - 5:46 pm | गड्डा झब्बू

व्हय तर! म्हैशीला द्याचे इंजीक्षन हाये ते

जॉनविक्क's picture

9 Jul 2019 - 6:23 pm | जॉनविक्क

एलकुंचलवारांची तपासणी वाचून चुंबनाचा वर्षाव विसरायला झाले :D

गड्डा झब्बू's picture

9 Jul 2019 - 9:25 pm | गड्डा झब्बू

:-)) :-)) :-))

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Jul 2019 - 6:50 pm | डॉ सुहास म्हात्रे

=)) =)) =))

कथाबीज सशक्त आहे. पण, ते फुलविण्यात शिष्य जरा कमी पडला असे वाटते. गुरुवर्यांच्या मुख्य बलस्थानांचा विसर पडल्यास शिष्यपणाचे लायसेंस जप्त केले जाते, हे इथे जरूर नमूद करावेसे वाटते.

बरेच फारच चिंताजनक दोष लेखनात आहेत. यात मुख्यपणे खालील मुद्दे ध्यानात ठेवून शिष्याने आपली इस्टोरी दहा वेळा, अधिकाधिक बलस्थानांच्या समावेष्यासकट लिहून काढावी, असा (न मागीतलेला) सल्ला देण्यात येत आहे.

१. फार शुद्ध लिहिण्याचा सोस शिष्याला आवरलेला नाही, हे फारच चिंताजनक आहे. हा दोष दूर न केल्यास शिष्याचे अजाबात कायपण खरे नाही.

२. सगळे शब्द सलग लिहिले आहेत. अनाकलनिय, अनपेक्षित अशातर्‍हेने शब्दांचे आपल्या सशक्त लेखणीच्या एकाच घावाने दोन तुकडे करणे आणि वाचकाला वाचनसमाधीतून गदगदा हलवत, "आता हे काय?" अशा विवंचनेच्या गर्तेत ढकलून देणे, ही हातोटी काही येरागबाळ्याचे काम नाही, काय समजलात? (याला काही जण, 'वाचताना खडा लागला' असे म्हणतात. पण ते समिक्षकी भाषेत फार गावंढळ होईल... आणि खडा जोरात लागल्यास वाचणारच, गंभीर जखमी व्हायला तो काय डोक्यावर पडणारा दगड किंवा दरड आहे काय? कायतरीच !

३. "तुझे अकार, तुझे उकार, तुझी वेलांटी, तुझी गोलांटी... सगळे गेले... " असेच काहीसे 'तू फुलराणी'त आहे (नसले तरी ते अभिप्रेत आहेच्च, असे समजावे). एवढ्या मोठ्या नामांकीत नाटकांत दिलेला धडा, लेखकाने पूर्णतः आत्मसात केलेला आहे. त्याचा शिष्य बनू पाहणार्‍याने या मुद्द्याकडे फारच दुर्लक्ष केल्याचे समिक्षकांच्या नजरेतून सुटू शकत नाही. 'अगं'च्या ऐवजी 'आग', 'घट्ट'च्या ऐवजी घाट... अश्या लेखकाच्या अनेक सिग्नेचर लकबींकडे दुर्लक्ष केले आहे. पिकासोच्या चित्रातील लकबी ओळखून चित्र त्याचे की बनावट हे ठरवले जाते. म्हणून त्याच्या चित्रांची कॉपी मारणारे खडतर साधना करून त्या लकबी आत्मसात करून घेतात. तसेच लेखनातही असते, हे विसरून कसे चालेल?

'शिष्य ते सामान्य नागरिक' होण्याचा धोका टाळून, 'शिष्यापासून शिष्योत्तम अशी वाटचाल' करावयाची असल्यास, 'तथाकथित' शिष्याने आपल्या साधनेची बारिकीने परिसीमा करावयास हवी... केवळ, 'मीच तुझा शिष्य' अशी स्वघोषीत आरोळी तेथे कामी येणार नाही. काय समजलात?! :)

: "मीच्च तुझा सर्वश्रेष्ठ समिक्षक" अशी आरोळी मारणारा 'मीच्च्समिक्षक'*

******

* : येथे 'मीच्च्समिक्षक' या माझ्या आयडीत (लेखकाच्या पायावर पाय ठेवून**) पहिले आणि दुसरे नाव यांचा संधी करण्याची संधी सोडलेली नाही, इकडे लक्ष गेले असले तरच तुम्ही शिष्य बनण्याची प्रथम पायरी पार केली आहे असे समजा.

** : पायावर (चांगले टोकदार खिळे असलेल्या बुटाचा) पाय ठेवल्यामुळे, लेखकाने जीवाच्या आकांताने मारलेली आरोळी तुमच्या कानांना ऐकू आली असली तरच तुम्ही शिष्य बनण्याची दुसरी पायरी पार केली आहे असे समजा.

इतर पायर्‍यांबद्दल, नंतर कधी तरी.***

*** : बघा, इथे मी... लेखकाच्या बहुकथाप्रसूतिच्या प्रघाताप्रमाणेच... माझ्या पुढच्या प्रतिसादाचे बीज पेरले आहे. हे लक्षात आले तर तुम्ही शिष्य बनण्याची तिसरी पायरी पार केली आहे असे समजा.

इतर पायर्‍यांबद्दल, (आता मात्र खरोखरच) नंतर कधी तरी. ;) :)

गड्डा झब्बू's picture

9 Jul 2019 - 9:29 pm | गड्डा झब्बू

सगळ्या पायऱ्या पार करण्यास मि कटिबद्ध आहे मुनिवर्य :-))

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Jul 2019 - 9:32 pm | डॉ सुहास म्हात्रे

तर मग वत्सा, मुनिवर्यांचा आशिर्वाद तुजमागे आहेच. ;) :)

जालिम लोशन's picture

9 Jul 2019 - 6:55 pm | जालिम लोशन

जेवढा ह्या कथेवर हसलो।।

एका प्रसन्न सकाळी किरणच्या छातीवर डोके टेकत लाडेलाडे ती म्हणाली (कवळी काढल्यावर तिचे साधे बोलणेही लाडेलाडेच वाटायचे)
:))))
भारीच लिहिलं आहे.
:))))
_/\_

मंदार कात्रे's picture

9 Jul 2019 - 8:05 pm | मंदार कात्रे

क ह र

जालिम लोशन - पलाश - मंदार कात्रे साहेब प्रतिसादासाठी आभार.

मास्टरमाईन्ड's picture

9 Jul 2019 - 10:15 pm | मास्टरमाईन्ड
मास्टरमाईन्ड's picture

9 Jul 2019 - 10:16 pm | मास्टरमाईन्ड
मास्टरमाईन्ड's picture

9 Jul 2019 - 10:16 pm | मास्टरमाईन्ड
मास्टरमाईन्ड's picture

9 Jul 2019 - 10:16 pm | मास्टरमाईन्ड
मास्टरमाईन्ड's picture

9 Jul 2019 - 10:17 pm | मास्टरमाईन्ड

हसून हसून मेलो.

पुन्हा दारात रामुकाका आणि शेवंताबाई हजर

किती वेळा ....

मास्टरमाईन्ड's picture

9 Jul 2019 - 10:22 pm | मास्टरमाईन्ड

कृपया माझे ४ अर्धे प्रतिसाद उडवल्यास आपला आभारी राहीन.
कदाचित स्मायली टाकायच्या प्रयत्नात असे पोस्ट झाले असावेत.

जॉनविक्क's picture

9 Jul 2019 - 11:12 pm | जॉनविक्क

मोबल्यावरून स्मायली टाकली कि मिपा हमखास गंडतेच

गड्डा झब्बू's picture

9 Jul 2019 - 11:29 pm | गड्डा झब्बू

मगाशी काहीतरी प्रोब्लेम होता. प्रतिसाद जात नव्हते 504 internal server error असा मेसेज येत होता किंवा ज्यांचे गेले ते अनेक वेळा फक्त शीर्षकासाहित गेले.

श्वेता२४'s picture

9 Jul 2019 - 11:18 pm | श्वेता२४

चपखल उत्तरार्ध. हहपुवा हे वेगळे सांगायला नको. बरं झालं ऑफिस मध्ये नाही वाचलं

गड्डा झब्बू's picture

9 Jul 2019 - 11:31 pm | गड्डा झब्बू

:-)) :-)) :-))

रायनची आई's picture

10 Jul 2019 - 2:31 pm | रायनची आई

हहपुवा, भारी : )

झेन's picture

10 Jul 2019 - 4:10 pm | झेन

माफ करा, प्रयत्न जरी प्रामाणिक असला तरी अक्युमन ची दैवी देणगी तुम्हाला नाही. निस्सीम आणि प्रामाणिक भक्ती शिवाय अशुद्ध लेखनाची सिध्दी प्राप्त होत नसते. कथेच घराणं गुरूदेवांच वाटतं खरं पण नवनवीन शब्द प्रसवून वाचणा-याला प्रचंड मिक्सर मधून फिरवून काढण्याचं कौशल्य नाही. एकच कथा लिहून थांबलात या चुकीला माफी नाही.
विसू: प्रतिसादाला उत्तर दिल्यास पुन्हा अकुगुरूंचा शिष्य म्हणवून घेऊ नये.

अथांग आकाश's picture

11 Jul 2019 - 2:42 pm | अथांग आकाश

ज ब र द स्त !! हसून हसून दमलो!!!
I

अथांग आकाश's picture

11 Jul 2019 - 2:42 pm | अथांग आकाश

ज ब र द स्त !! हसून हसून दमलो!!!
I

प्रतिसादांसाठी सर्वांचे आभार! __/\__