Amazing .. money transfer

मराठी कथालेखक's picture
मराठी कथालेखक in जनातलं, मनातलं
2 Jul 2019 - 7:02 pm

आजकाल टीव्हीवर येणार्‍या अनेक जाहिरातींतून उत्पादन/सेवेच्या जाहिरातीसोबतच स्त्री-पुरुष समानतेला हलकेच स्पर्श केलेला असतो.
मुली मुलांपेक्षा कमी नाहीत , कर्तृत्वात मागे नाहीत हे अधोरेखित करण्याची जणू स्पर्धा असते.
अमेझॉन मनी ट्रान्सफरच्या जाहिरातीत मात्र एक मुलगी आपल्या मित्राला अर्थिक मदत करताना दिसते. स्मार्ट वॉचकरिता जमवलेले पैसे ती मित्राला विमानाच्या तिकिटाकरिता देते असं दाखवलंय.
छान वाटली ही जाहिरात.. तुम्ही पाहिलीय का ?

मुक्तकप्रकटनविचार

प्रतिक्रिया

जॉनविक्क's picture

2 Jul 2019 - 8:00 pm | जॉनविक्क

धर्मराजमुटके's picture

3 Jul 2019 - 9:21 pm | धर्मराजमुटके

केहना क्या चाहते हो भई ?

दाखवली आहे अन आजकाल खूप मुली सहज इकडे तिकडे पैसे ट्रान्सफर करतात त्यात काही विशेष वाटलं नाही. म्हणजे अगदी अमूलच्या मेरो गाम काथा पारे वगैरेने जितकं फील झालं होतं तितकं नक्कीच नाही झालं.

मराठी कथालेखक's picture

4 Jul 2019 - 7:58 pm | मराठी कथालेखक

बहूतेक मी मला काय म्हणायचं आहे ते नेमक्या शब्दात मांडलं नाही असं दिसंतंय..
मला ती मुलगी पैसे ट्रान्सफर करते त्याचं विशेष नाही वाटलं तर ती आपल्या साठवलेल्या पैशातुन एका मित्राला मदत करते याचं अप्रुप वाटलं. एखादी मुलगी एखाद्या मुलाला (ते ही मित्र .. भाऊ वा प्रियकर नाही) मदत करते ही मोठी गोष्ट वाटली.

उपेक्षित's picture

4 Jul 2019 - 12:51 pm | उपेक्षित

सध्या विश्वकप च्या वेळी बिसलरी ची जाहिरात दाखवतात उंटांची त्या एक नंबर आहेत.

फक्त त्यांची फ्रेंडशिप चांगली आहे असा वाटलं .. बाकी स्त्री-पुरुष असमानतेची मुळे एवढ्या खोलवर आहेत कि आपल्याला ह्या जाहिरातीचं कौतुक वाटतं..

मराठी कथालेखक's picture

4 Jul 2019 - 8:01 pm | मराठी कथालेखक

बाकी स्त्री-पुरुष असमानतेची मुळे एवढ्या खोलवर आहेत कि आपल्याला ह्या जाहिरातीचं कौतुक वाटतं..

बरोबर .. एखाद्या मित्राला मदत .. तेही खासकरुन अर्थिक मदत करणारी मुलगी दुर्मिळच .. त्यामुळेच जाहिरातीचं कौतुक ..

१) विमानाचे तिकिट स्मार्ट वॉचपेक्षा स्वस्त आहे .

चेतन सुभाष गुगळे's picture

7 Jul 2019 - 4:43 pm | चेतन सुभाष गुगळे

भारतीय रेल्वे खात्याने अ‍ॅमेझॉनवर मानहानीचा दावा दाखल करायला हवा आणि तोही तगड्या रकमेचा.