पाषाणभेद in जे न देखे रवी... 10 May 2019 - 8:06 am माझे मन पाही विठ्ठल मुर्ती सावळां विठ्ठल उभा पंढरीसी ||१|| नाही मज वेळ जाण्या राऊळा नच पूजा केली कधी काळां ||२|| रमलो संसारी विना विचार भाव भक्तीचा केवळ उपचार ||३|| नमस्कार केला दोन्ही कर जोडूनी पाषाण भेटला उराउरी दुरूनी ||४|| ०९/०५/२०१९ अभंगविठोबाविठ्ठलशांतरसकविता