आमची मुंबई

सातारकर's picture
सातारकर in जनातलं, मनातलं
5 Nov 2008 - 3:44 pm

Wikipedia वरती, अनेक ठीकाणी मुंबई (Mumbai) ऐवजी Bombay असा शब्द वापरलेला आहे.

कोणी माहीती देता का.. या सदरात मी स्वातंत्र्यवीरांवरील माहीतीची वानवा आहे हे सांगितलेच आहे, तिथेच हेदेखील लिहीले आहे. फक्त तिथे ह्याविषयी सविस्तर लिहायच राहून गेल म्हणून ईथे परत लिहीत आहे.

जर मिपावरील प्रत्येकानी थोडे जरी बदलले तरी सगळ्या Wikipedia वरील बदलाला वेळ लागणार नाही.

हे करण्यासाठी Wikipedia वर आपल्याला पुढील गोष्टी कराव्या लागतील.

१. Wikipedia वर खाते तयार करा (ह्याची सक्ती नाही, ह्याशिवायदेखील काम होत. पण त्या वेळेला आपल्या संगणकाच्या IP ची तिथे नोंद होते)

२. ज्या पानावर आपल्याला Bombay हा शब्द असेल त्या पानावरच्या सर्वात वरती असलेल्या चार (article, discussion, edit this page आणि history) पर्यायांपैकी edit this page हा पर्याय निवडावा.

३. या ठीकाणी गेल्यावर आपण Bombay चं Mumbai करु शकता.

४. सगळ्या ठीकाणी बदलल्यावर त्या चौकोनाच्या खाली असलेल्या Save Page च्या पर्यायावर टीचकी द्या.

सगळयांना कल्पना असेलच तरीही फक्त नमूद करतो की अजूनही, मुंबई विद्यापीठ आणि मुंबई ऊच्च न्यायालय यांच्या ईंग्रजी नावात अजूनही Bombay च आहे त्यामुळे ती तशीच राहू द्यावीत.

हे ठिकाणइतिहासशिफारस

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

5 Nov 2008 - 3:48 pm | विसोबा खेचर

अत्यंत स्वागतार्ह कल्पना...

मी माझ्याकडून जमेल तसा नक्कीच बदल करीन...

(मुंबईकर) तात्या.

अभिरत भिरभि-या's picture

5 Nov 2008 - 3:58 pm | अभिरत भिरभि-या

चला बम्बेची बंभेरी ऊडवुया.
शिवाय एकदा बदल केल्यावर पुन्हा बाँबे होणार नाही हे ही बघायला लागेल.

कारण बाँबेच बरोबर आहे हे सांगणारे पोर्तुगिज वसाहतकार या देशत अजूनही आहेत.
http://www.geocities.com/prakashjm45/goa/bombay.html

कोणत्या कोणत्या पानावर बदल करायचे आहेत ते ह्या पानावरच टाकता येईल का ?
म्हणजे ही वाचनखुण साठवून वेळ मिळेल तस्तसा बदल करता येईल.

इनोबा म्हणे's picture

5 Nov 2008 - 5:13 pm | इनोबा म्हणे

या भिकारचोट पोर्तूगिजाची त्याच्या ब्लॉगवर जाऊन हाणा रे!

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर