(ज्यांना ही कविता टोचायला, सॉरी, पोचायला हवी त्यांना नक्की पोचेल अशी खात्री आहे. इतरांनी मात्र ती विशुद्ध साहित्यिक दृष्टीने वाचावी ही नंब्र इनंती!)
बिज्जी लेखिकेला
असे घाई भारी
मिटिंगा लई
सुप्रभाती, दुपारी
बिज्जी लेखिका ती
भुसनळी पेटलेली
कुणी त्रास देता
ठासते आग 'खाली'
स्वयंपाकही तो
पाचवीं पूजलेला
शिव्या मोजिते
पाहता ती घड्याळा
तिची नाटिका जी
प्रेक्षकां झालि प्यारी
सदोदीत टाळ्या
फुल्ल तिकिटांचि बारी
प्रयोगास येती
मोठमोठे असामी
पाहता लेखिकेला
'मुग्ध' होती प्रणामी
फोनावर फोन
'मागणी' घालणारे
(टीप: प्रयोगाची मागणी. कृपया नसते तर्क नकोत)
'समोरासमोर
बोलणी' मागणारे
अशी लेखिका
गावची "ष्टार" झाली
अम्हा कोण पुसतो,
अम्हा कोण वाली?
अगे लेखिके गो
जरा टाक दृष्टी
मेशेजांनी भरली
तुझी फोन-सृष्टी
विलंबास करती
उत्तरे ती अताशा
प्रतीक्षा न संपे
बुडू जाय आशा
पुसावे तिला "का?"
तर रागास येई
"मला कार्य सत्रा"
हे सुनवून जाई
अम्हा टाकुनी
दूरशा भूतकाळी
उडे लेखिका
तीन लोकी, त्रिकाळी
प्रतिक्रिया
30 Apr 2019 - 8:31 am | कंजूस
ढेर सारी कवकविताए।
9 May 2019 - 2:29 pm | चलत मुसाफिर
कुणाला काहीच न कळल्यामुळे हायसे वाटले! नाहीतर कंबक्ती ओढवली असती. :-)
24 Jun 2019 - 7:37 pm | इरामयी
हे नक्की कोणाबद्दल आहे? कळेल का?
2 Sep 2019 - 7:02 pm | चलत मुसाफिर
सांगू शकत नाही.
25 Jun 2019 - 10:21 am | जालिम लोशन
ऊर्फ जोत से जोत जगाते चलो. ऊर्फ मनोविकृत कथा.
25 Jun 2019 - 12:56 pm | जॉनविक्क
2 Sep 2019 - 7:38 pm | तमराज किल्विष
त्यात काय विशेष? मिपावरचं मिसरूड न फुटलेलं पोरगं पण वळखील कोणाला उद्देशून लिहिले आहे ते.
3 Sep 2019 - 4:43 pm | चलत मुसाफिर
ओळखा की