आज अंक्याची mains असल्याने सकाळी साडेआठलाच हडपसरला गेलो होतो.त्याला केंद्रावर सोडून लगेचच परत यायला निघालो.
PMTटँडवर वेळ सकाळची असूनसुद्धा गर्दी होतीच.कोथरुड डेपोची बस पकडायला मी गेलो तर माझ्या आधी १०- १५ मंडळी बसच्या पुढच्या दारातून आत घुसण्याचा प्रयत्न करत होती. बसायला जागा मिळणार नाही असच वाटत होत पण हार मानिन तो मी कसला?? त्याच गर्डीमधून धक्के देत, मोबाईल आणि पकिटकडे लक्ष्य देत मी बसमध्ये शिरलो.नक्कीच काहीतरी achieve केल्याची फिलिंग होती....!!!
बसमध्ये पहिली windo seat मिळाली होती. शेजारची सीट अजूनही रिकामी होती.. समोरून येणाऱ्या ४-५ मुलींपैकी एक तरी शेजारी बसेल आणि हा गर्दीचा प्रवास मस्त होईल असं वाटलं.पण सांगू का माझा माझ्या लक वर पूर्ण विश्वास आहे..गेल्या आठ एक वर्षात केलेल्या दहाएक हजार किलोमीटर च्या प्रवासात साठ सत्तर वर्षांच्या म्हाताऱ्या माणसानंशिवाय कुणाच्या शेजारी बसायच नशीब लाभलं नाही...!!
आजही तेच झालं एक साधारण सत्तरीतले आजोबा ज्यांचा चेहरा म्हातारपनामुळे थकला आहे ते माझ्या शेजारी येऊन बसले.मी नेहमीप्रमाणेच ' असो चालायचंच..' म्हणून कधी एकदा माझा स्टॉप येतोय याची वाट पाहू लागलो.
पाचच मिनिटात आजोबांनी उठून एका लग्न झालेल्या स्त्रीला जागा देऊन स्वतः उभे राहिले. मी त्या आजोबांना जागा न देता तसाच बसून राहिलो.पण काही वेळाने मनाची नाही पण जनाची लाज वाटून मी त्या आजोबांना माझ्या जागेवर बसा म्हणालो.
आजोबांच्या आणि त्या बाईच्या संभाषणावरुन अस कळलं की ते तिचे वडील आहेत आणि ती गर्भवती असल्याने तिला बाळंतपणासाठी माहेरी नेत असावेत.मला बापाचा आपल्या मुलीबद्दलचा एक हळवा कोपरा दिसला.
अर्धा तास तरी उभे रहायच असल्याने मी PMTच्या खिडकीला पाठ टेकवून उभा राहिलो होतो.आपल्याच तंद्रीत BYN च्या भागातली melodious गझल गुणगुणत खिडकीतून बाहेर बघत होतो.किती अप्रतिम गझल होती ती..!!
"यू तो बंझर सा था मेरा आशियां,
महाफिले आपके आनेसे सजी...
वक्त बेवक्त है मेरे हालात ये,
आपका हुस्न ' जश्न ए सैलाब' जी...."
पाच दहा मिनिटे होत नाहीत तोपर्यंत ते आजोबा पुन्हा उठले आणि एकाला जागा दिली.तो माणूस आजोबंपेक्षा खूप लहान वाटत होता. मग मात्र वाटलं मी उगाचच जागा दिली.हे म्हातारं कुणासाठीपण जागा सोडतय...!!
त्या अजोबाबद्दल मनात राग राग करत असताना ज्याला जागा दिली त्याच्या हाताकडे लक्ष्य गेलं.त्या व्यक्तीच्या कोपराच्या पुढच्या हाताची नीट वाढ झाली नव्हती.त्या अर्धवट वाढ झालेल्या हाताने ती एक बॅग सांभाळत बसमधे चढला होता....
त्या अजोबांबद्दलच्या रागाची जागा आता respect ने घेतली होती. मी आजोबांकडे पाहिलं तर ते हसले आणि म्हणाले की माझ्यापेक्षा त्या जागेची जरुरत त्या व्यक्तीला आहे .माझीच मला लाज वाटली.माझ्यासारखी घोड्यासारखी वाढलेली तरुण मंडळी सीटवर असे बसतात की कोणाचा बाप जरी आला तरी जागेवरून उठणार नाही..!! अश्या माजुरड्या वृत्तीने प्रवास करत असताना हा सत्तरीच्या तरुण वेगळीच शिकवण देऊन देला....!!! Thanks आजोबा..
Follow me-
myviews09007.blogspot.com
Chittmanthan.ooo
प्रतिक्रिया
29 Mar 2019 - 5:28 pm | सिरुसेरि
छान अनुभव . सुरुवातीला windo seat च्या जागी चुकुन video seat असे वाचले .
29 Mar 2019 - 5:41 pm | चौथा कोनाडा
भारी अनुभव टिपलाय. सुरवातीला टपोरी वाटणारं पण नंतर विचार करायला लावणारं सुरेख लेखन !
29 Mar 2019 - 7:57 pm | मदनबाण
हेच म्हणतो...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- The Tashkent Files | Official Trailer |
29 Mar 2019 - 7:45 pm | ज्योति अळवणी
सुंदर आणि मन:स्पर्शी
29 Mar 2019 - 7:45 pm | ज्योति अळवणी
सुंदर आणि मन:स्पर्शी
29 Mar 2019 - 7:45 pm | ज्योति अळवणी
सुंदर आणि मन:स्पर्शी
30 Mar 2019 - 2:04 am | दादा कोंडके
हे असंख्यवेळा पुस्तकातून, विनोदातून वाचलेलं आणि ऐकलेलं आहे. नुकत्याच वयात आलेल्या सोळा-सतरा वर्षाच्या मूलाला असं काहीवेळासाठी वाटणं समजू शकतो. पण तीशीच्या माणसांना असं वाटत असेल तर ही वखवख किळसवाणी आहे.
हे अती दवणीय झालंय. असलं काही लोकं बोलतात का? जर कुणी म्हणालच तर त्याला, 'ए म्हातार्या वाटलं तर माझी पण जागा देतो पण बोअर करू नको बे' असं ऐकावं लागेल. :D
30 Mar 2019 - 8:28 am | chittmanthan.OOO
भावा पहिली गोष्ट मी तिशीचा नाही माझ वय २२ आहे त्यामुळे २०-२२ चा मुलाला अस वाटण चूक नाही त्यामुळे सगळ्या गोष्टी समजून घेतल्याशिवाय टिप्पणी करू नये आणि दुसरी गोष्ट हा अनुभव माझ्या बाबतीत घडला आहे आणि त्याला तू म्हणतोय अस उत्तर देणं म्हणजे खरा उद्धटपणा....!!!!
30 Mar 2019 - 1:42 pm | गामा पैलवान
chittmanthan.OOO,
कथा थोडी दवणीय अंगाने जातेय. पण तरीही कथेतून मिळणारा बोध आवडला.
बाकी एक विचार मनांत आला. तुम्ही आज २२ वर्षांचे आहात. आणि गेले आठेक वर्षांत दहाएक हजार किमी प्रवास केलाय. म्हणजे वर्षाला सरासरी १२५० किमी पडतात. वर्षाचे २०० दिवस कामाचे धरले तर दरदिवशी सरासरी प्रवास ६ ते ७ किमीचा होतो. हा काही फार मोठा आकडा नाही. प्रश्न असाय की वय वर्षं चौदा ते बावीस असं कुठलं काम आहे की त्यासाठी नियमितपणे इतके दिवस प्रवास करावा लागतो? शाळा? कॉलेज? क्लास?
मला पुण्याची व तिथल्या गर्दीची काहीच माहिती नाही.
आ.न.,
-गा.पै.
30 Mar 2019 - 1:00 pm | चौथा कोनाडा
वखवख आणि दवणीय हे शब्द अस्थानी वाटले.
30 Mar 2019 - 7:24 pm | मराठी कथालेखक
मला तरी यात किळसवाणं काहीच वाटत नाही... मुळात ही 'वखवख' नसून साधी इच्छा असते. प्रवासात कुणाची सोबत मिळणारच आहे तर छानशी सोबत का मिळू नये असा तो विचार असतो. यात पुढे काही करण्याचा (मुलीला मुद्दाम स्पर्श वगैरे) उद्देश नसतो.
एखाद्या हॉटेलची स्वागतिका सुहास्यवदना युवती का असते ? तिथे कुणी पन्नाशीच्या गृहस्थांना का बसवत नाही याचा विचार करा ..
31 Mar 2019 - 9:30 pm | चौथा कोनाडा
मी याच अनुषंगानं माझं मत मांडलं होतं.
1 Apr 2019 - 10:19 am | एमी
> एखाद्या हॉटेलची स्वागतिका सुहास्यवदना युवती का असते ? तिथे कुणी पन्नाशीच्या गृहस्थांना का बसवत नाही याचा विचार करा .. > सुहास्यवदना युवती जिथे स्वागतिका असते अशा हॉटेलमधे येणारा ग्राहक किती पैसे खर्च करतो? आणि पीएमटीमधला प्रवासी तिकीटावर किती पैसे खर्च करतो? कायपन अपेक्षा असतात ब्वा लोकांच्या :D :D
1 Apr 2019 - 3:01 pm | मराठी कथालेखक
फक्त अपेक्षा असतात.. पुर्ण झाल्याच पाहिजे असं थोडंच आहे.
30 Mar 2019 - 9:31 am | पाषाणभेद
का रडवतां रे असं.
30 Mar 2019 - 7:19 pm | मराठी कथालेखक
आपल्या लेखनाचा प्रयत्न चांगला आहे.. लिहीत रहा.
तुमच्या वयानुसार तुमच्या बोलण्यात इंग्लिश शब्द बरेचदा येत असतील हे मी समजू शकतो तरी पुढील लेखनात ते टाळण्याचा प्रयत्न करा.
मुख्य म्हणजे वाचत रहा.. वाचनानेच लेखनशैली प्रगल्भ होईल..
बाकी असा विचार करु नका.
एकतर वृद्ध व अपंग यांना बसमध्ये राखीव जागा असते. शिवाय धडधाकट असला तरी माणूस त्यावेळी कोणत्या परिस्थितीत असतो ते आपणास माहित नाही (कधी कुणी आजारी असू शकतो, प्रचंड थकलेला असू शकतो) त्यामुळे कुणास माजुरडे मानणं तितकंसं योग्य ठरणार नाही. असो.
30 Mar 2019 - 10:41 pm | शब्दानुज
पहिल्याच लेखात लगेच धावून जाण्यात मिपाकरांना कसली हौस असती देव जाणे. दुष्ट कुठले !
बाकी लेखकास - इथे असल्या गोष्टी होतच राहतात. टीका झाली तरी फारसे वाईट वाटून घेऊन नका. आणि वयाचे टेंशन घेऊ नका. मी पण २३ चाच आहे. १९ चा असताना आलो होतो मिसळपाव वर. माझ्यावरही अस्सेच धावून आले होते. ते केवळ गंमत म्हणून घ्या. पटलेले सल्ले आजमावून पहा. चांगल्या लेखनाचे इथे कौतूकही होते हेही ध्यानी ठेवा.
वाचत लिहा , लिहित रहा पुढील लेखनास शुभेच्छा !
31 Mar 2019 - 2:07 am | दादा कोंडके
पण पहिल्याच जिल्बीला गोग्गोड म्हणत्यात पण कै प्वाईंटाचा मुद्दा नै.
-(खूप जास्त वय झाल्यामुळे टेंशन आलेला) दादा
31 Mar 2019 - 12:42 am | chittmanthan.OOO
स्पष्टपणे सांगितलेल्या प्रत्येक सल्ल्याच स्वागत.... धन्यवाद
31 Mar 2019 - 11:38 am | एमी
> बसमध्ये पहिली windo seat मिळाली होती. शेजारची सीट अजूनही रिकामी होती.. > दोन्ही रांगेतल्या पहिल्या (एक कि दोन) सिट ज्येष्ठ नागरिक, अपंग साठी आरक्षित असतात ना?
26 Jan 2024 - 11:46 pm | रामचंद्र
बाजूला तशी सूचना लिहिलेली असली तरी तिचे पालन होताना दिसत नाही.
31 Mar 2019 - 11:49 am | यशोधरा
इथले इतर लेखनही वाचा आणि प्रतिसादही द्या. केवळ स्वतःच्या लेखनाचा रतीब लावू नये, ही कळकळीची आणि विनम्र विनंती. धन्यवाद.
31 Mar 2019 - 9:28 pm | चौथा कोनाडा
+१ सहमत
1 Apr 2019 - 11:15 am | श्वेता२४
:)
2 Apr 2019 - 1:22 pm | चौथा कोनाडा
टीकात्मक प्रतिसादांकडे दुर्लक्ष करा.
लेखन तर उत्तम आहे, शैली ही ओघवती आहे.
पण सदस्य नाम रोमन अक्षरात असल्यामुळं खटकतंय.
पण तुमचं नाव chittmanthan.OOO हे बदलून अस्सल देवनागरीत चित्तमंथन.ooo असं करा बुवा !
2 Apr 2019 - 10:31 pm | गवि
उत्तम लिहिताय. येऊ द्या आणखी लेखन.
टीका फारशी मनावर घेऊ नका. झालाच तर त्यातून फायदाच होईल.
25 Jan 2024 - 9:12 pm | chittmanthan.OOO
25 Jan 2024 - 9:12 pm | chittmanthan.OOO
25 Jan 2024 - 9:12 pm | chittmanthan.OOO
25 Jan 2024 - 10:55 pm | सौन्दर्य
एक प्रश्न -
"कोथरुड डेपोची बस पकडायला मी गेलो तर माझ्या आधी १०- १५ मंडळी बसच्या पुढच्या दारातून आत घुसण्याचा प्रयत्न करत होती. बसमध्ये पहिली windo seat मिळाली होती. शेजारची सीट अजूनही रिकामी होती.."
पुढील दरवाजाने इतकी मंडळी आत असताना तुम्हाला ती पहिली विंडो सीट ती देखील बाजूची सीट रिकामी, कशी काय मिळाली ? तुम्ही मागील दाराने प्रवेश केला असेल असे गृहीत धरतो.
शुद्ध लेखनाकडे थोडे अधिक लक्ष दिल्यास वाचन आनंदाचे होईल.