शोंना आणि दीडशहाना

Primary tabs

खिलजि's picture
खिलजि in जनातलं, मनातलं
20 Mar 2019 - 7:54 pm

तो : शोना, मी फक्त आपल्या भावी आयुष्यासाठीच मी कष्ट घेतोय गं .

ती : काय करतोयस ? असं का बोलतोयस ? तुझ्या तोंडात काही आहे का ?

तो : नाही गं असं का बोलते आहेस ? फक्त अभ्यास करतोय मी .

ती : खरंच कि काय खोटारडा कुठला ?

तो : शोने, तुझ्यासाठी अजून काय काय करायचं ते सांग ?

ती : माझ्याशी खोटं बोललं तर मला खूप चीड येते. खरं सांग.

तो : ते आमच्या रक्तात नाही .

ती : तुझ्या रक्तात काय काय आहे ते बघते नंतर .

तो : रक्तात तुला फक्त प्रेम सापडेल आणि हातात पुस्तकं.

ती : इथे मागे बघ मी इथे तुझ्या मागेच आहे.

त्याच्या तोंडात सिगरेट आणि गुटखा दोन्ही असेच होते.

इतिहासकथाप्रकटन

प्रतिक्रिया

शब्दानुज's picture

20 Mar 2019 - 9:20 pm | शब्दानुज

ह्या ह्या

एकाचवेळी गुटका आणि तंबाखु ?

दुर्गविहारी's picture

21 Mar 2019 - 12:45 pm | दुर्गविहारी

भारी ! शोनाला रोना आले असेल. ;-)