चावडीवर बसून बसून
टपोरी टाळकी वैतागली
इतक्यात बंड्याच्या डोक्यात
नामी कल्पना आली
नेहेमी का म्हणून हिणवून घ्यायचे स्वतःला
एकदा तरी दाखवून द्यायचे
आपण कोण आहोत ? ते साऱ्या गावाला
इतरांची बंड्यासंग मूरकुंडी हलली
नाव रोशन करण्यासाठी
रामलीला सुरु झाली
इतिहास ठावं नव्हता
थोडी का होईना पण
पुस्तक चाळून चाळून
डोक्याची आई बहीण एक झाली
बंड्या हट्टाने राम झाला
नान्या लक्ष्मण तर बाब्या हनुमान झाला
कादर धिप्पाड रावण अन कवट्याची सीता झाली
एकदाची तालीम सुरु झाली
वडाच्या पाराखाली रामलीला बनली
ऐन जत्रेत प्रयोगास सुरुवात झाली
कलाकार तोबरे भरून तयार
रामाची मंचावर येन्ट्री झाली
पडद्याआड सीतेची धुसफूस चालू होती
हनुमंताची उधारी बरीच बाकी होती
राम व्हता साक्षीदार
रावण बाजूस गप्प उभा
ड्रेस घालून नक्षीदार
सीता रागाने हनुमंताला
"तुझ्या आईची छूत्री " म्हणाली
सोडून ओठांचा चंबू
हणम्याने पण शिव्यांची बरसात केली
पडद्यामागचं पुढं आलं
होतं नव्हतं तेवढं सगळं गेलं
सीतेचे वाग्बाण , रामाच्या मर्कटलीला
हणम्याच्या आयची छूत्री अन रावण लक्ष्मणाचं धूम्रपान
मंचावर बघून साऱ्यांचं हरपलं भान
गाव हसून हसून लोटपोट झालं
बंड्यासकट सर्वांचं तोंड काळ झालं
चावडी अशीच वाट बघत असते आता
कुणबी फिरकत न्हाई तिकडं ,
कितीतरी महिने झालं
{{ सिद्धेश्वर विलास पाटणकर }}