कर्णा, खूप छानच दुवा दिल्याबद्दल तुला मनापासून दुवा. नक्कीच वाचायला पाहिजे.
बाकी एक काळ असा होता की दिवाळी अंक वाचता वाचता (लोकसत्ता, ललित, अबकडई पासून पाऽऽर शतायु पर्यंत :) ) जानेवारी उजाडायचा. भारताबाहेर खूप आठवण यायची दिवाळीअंकांची. आता आंतरजालावरील दिवाळीअंकांमुळे ही खंत मात्र दूर होते आहे.
कार्यकर्त्यांशी बहुतांश सहमत; फक्त खंत दूर न होता बव्हंशी कमी होते आहे, असे म्हणेन.
(सहमत)बेसनलाडू
गझल विशेषांक नक्की वाचणार. गझलेला समर्पित अशा या अंकाबद्दल संबंधितांचे हार्दिक अभिनंदन
(अभिनंदक)बेसनलाडू
प्रतिक्रिया
2 Nov 2008 - 8:29 pm | विसोबा खेचर
सदर दिवाळी अंकाच्या टीमचे मन:पूर्वक स्वागत...
अवांतर : "आंतरजालीय वाचनीय" इथे अस दुवे देण्याकरता सोय केलेली आहे. असो..
उद्या मिपाचा जर दिवाळी अंक निघाला तर भटसाहेबांच्या संस्थळावर त्याची अशी ढळढळीत जाहिरात करता येईल किंवा नाही याबद्दल शंका आहे! :)
असो,
आपला,
(दिलदार!) तात्या.
2 Nov 2008 - 8:34 pm | आजानुकर्ण
मिपाचा गझल विशेषांक असल्यास नक्की करता यायला हवी. कारण ते संकेतस्थळ केवळ गझलांसाठीच आहे.
अर्थात हे मत मी एक अपेक्षा म्हणून व्यक्त केले आहे.
आपला,
(अपेक्षित) आजानुकर्ण
2 Nov 2008 - 10:08 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सदर दिवाळी अंकाच्या टीमचे मन:पूर्वक स्वागत...
गझलांचा एक चांगला अंक वाचायला मिळणार यात शंकाच नाही. सदर दिवाळी अंकाच्या टीमचे मनःपुर्वक अभिनंदन !!!
"आंतरजालीय वाचनीय" इथे अस दुवे देण्याकरता सोय केलेली आहे.
अगदी हेच म्हणायचे होते, आंतरजालीय वाचनीय इथे दिवाळी अंकाचे अनेक सदस्य दुवे देत असतांना नवीन धागा सुरु करण्याची गरज नव्हती असे वाटते.
अवांतर : संपादकांना लेखन हलवण्याची सुविधा असती तर आम्ही सदरील लेखन तिथेच हलवले असते
-दिलीप बिरुटे
(रोखठोक संपादक )
2 Nov 2008 - 11:09 pm | विसोबा खेचर
अगदी हेच म्हणायचे होते, आंतरजालीय वाचनीय इथे दिवाळी अंकाचे अनेक सदस्य दुवे देत असतांना नवीन धागा सुरु करण्याची गरज नव्हती असे वाटते. ]
जाऊ देत बिरुटेशेठ! करू देत बापड्यांना जाहिराती! :)
साले, वो भी क्या याद रखेंगे..!
तात्या.
2 Nov 2008 - 8:45 pm | चतुरंग
चाळल्यावरुन वाचनीय अंक दिसतोय!
(खुद के साथ बातां : रंगाच्या हाती गजल कोठाराच्या किल्ल्या? ;) )
चतुरंग
2 Nov 2008 - 8:48 pm | आजानुकर्ण
विडंबन विशेषांक येणार का?
आपला,
(नवरंग) आजानुकर्ण
2 Nov 2008 - 11:05 pm | विसोबा खेचर
ते आमचं आम्ही पाहून घेऊ, तू विचारणारा कोण??
तात्या.
2 Nov 2008 - 11:40 pm | आजानुकर्ण
चतुरंगांना सहज गमतीने विचारलेल्या प्रश्नाला असले उत्तर पाहून आश्चर्य नाही परंतु खेद वाटला.
बाकी चालू द्या.
आपला
(प्रवासी) आजानुकर्ण
2 Nov 2008 - 11:48 pm | विसोबा खेचर
चतुरंगांना सहज गमतीने विचारलेल्या प्रश्नाला असले उत्तर पाहून आश्चर्य नाही परंतु खेद वाटला.
माफ करा.. तिरमिरीत तसं लिहून गेलो.. चुकलंच माझं...
सॉरी...
तात्या.
4 Nov 2008 - 5:46 am | खरा डॉन
तात्या सॉरी म्हणायच कारण न्हाय! आनी तुझा प्रतिसाद अजिबात उडवायचा नाही. आपल्याला तर लै आवडला..
2 Nov 2008 - 8:47 pm | यशोधरा
>>>खुद के साथ बातां : रंगाच्या हाती गजल कोठाराच्या किल्ल्या?
=))
2 Nov 2008 - 9:46 pm | खरा डॉन
झालं आता तिथल्याही गझला इथंच एकएक करुन यायला लागतील आणी त्याचे समर्थन देखिल
2 Nov 2008 - 10:01 pm | रामदास
एकूण मांडणी छान आहे.गझलांबाबत लिहू शकलो नाही.गझल थोडी-थोडी स्कॉचसारखी मूड बनवून घेतो.
गझल या एका विषयाला वहीलेला अंक म्हणून जास्त कौतुक वाटले.
3 Nov 2008 - 12:20 am | आनंदयात्री
वा !
मेजवानीच आहे. धन्यवाद कर्णा.
फक्त गझलेला वाहिलेला हा पहिलाच ऑनलाईन दिवाळी अंक असावा !
इथे माहिती करुन दिल्याबद्दल शतशः धन्यवाद ! नक्की वाचणार !
3 Nov 2008 - 12:48 am | बिपिन कार्यकर्ते
कर्णा, खूप छानच दुवा दिल्याबद्दल तुला मनापासून दुवा. नक्कीच वाचायला पाहिजे.
बाकी एक काळ असा होता की दिवाळी अंक वाचता वाचता (लोकसत्ता, ललित, अबकडई पासून पाऽऽर शतायु पर्यंत :) ) जानेवारी उजाडायचा. भारताबाहेर खूप आठवण यायची दिवाळीअंकांची. आता आंतरजालावरील दिवाळीअंकांमुळे ही खंत मात्र दूर होते आहे.
बिपिन कार्यकर्ते
4 Nov 2008 - 5:09 am | बेसनलाडू
कार्यकर्त्यांशी बहुतांश सहमत; फक्त खंत दूर न होता बव्हंशी कमी होते आहे, असे म्हणेन.
(सहमत)बेसनलाडू
गझल विशेषांक नक्की वाचणार. गझलेला समर्पित अशा या अंकाबद्दल संबंधितांचे हार्दिक अभिनंदन
(अभिनंदक)बेसनलाडू
4 Nov 2008 - 5:47 am | खरा डॉन
हो का? मग तिकडच्या गझला इकडे कधी छापताय?