वाट त्याची पाहाता....

ज्योति अळवणी's picture
ज्योति अळवणी in जे न देखे रवी...
12 Dec 2018 - 2:32 pm

सर्वच संतांच्या चरणी नतमस्तक होऊन; एक लहान प्रयत्न केला आहे....

मागे पाहता वळून
वाट गेली हो पुसून
भविष्यापासून
सोडवि कोण आता

मग विचार कशापरी
चालत रहा परोपरि
विश्वचक्र तो फिरवि
तू फ़क्त एक धागा

गुंफ़त राहावे स्वतःला
फुला-पाना-माणसांना
निसर्गाच्या देणगीचा
अवमान कैसा करा

तुझी वेळ खरी येता  
तो करेल उद्धारा
तोवर चरणी माथा
त्याच्या टेकवावा

अभंगसंस्कृतीधर्म