बोका-ए-आझमला भावपूर्ण श्रध्दांजली

गॅरी ट्रुमन's picture
गॅरी ट्रुमन in जनातलं, मनातलं
29 Nov 2018 - 8:56 pm

बोका गेला. अरे ४२ हे काय जायचे वय होते का?त्याला झालेल्या आजाराविषयी ६-७ महिन्यांपासूनच कल्पना होती आणि त्यातून तो बरा होणे फारच कठिण आहे हे पण माहित होते. तरीही मानवी वेडं मन शेवटपर्यंत हार मानायला तयार होत नाही. अगदी कालपर्यंत वाटत होते की काहीतरी चमत्कार होईल आणि एक दिवस व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर त्याचे मेसेज बघायला मिळतील. पण आज ती वाईट बातमी समजली आणि मन दु:खाने भरून आले.

boka

मिपावर सदस्य अनेकविध नावे घेतात पण काही नावे अशी असतात की लगेच लक्ष वेधून घेतात. ऑनलाईन सदस्यांमध्ये तसेच एक नाव एकेदिवशी दिसले "बोका-ए-आझम". कुतुहल चाळवले गेल्यामुळे त्याचे सदस्यपान बघितले. पण त्यातून फार काही समजले नाही. पण २०१४ च्या विधानसभा निवडणुकांवरील चर्चांमधील एका प्रतिसादानंतर त्याचा मला व्य.नि आला. मग फोनवर बोलणे झाले. हळूहळू बोका म्हणजे काय चीज आहे हे समजून यायला लागले. त्याचे आणि माझे आवडीचे विषय सारखेच असल्यामुळे हळूहळू जवळीक कशी वाढत गेली हे कळलेच नाही.

मागे मी मिपावर कधीतरी लिहिले होते की मला स्वातंत्र्योत्तर भारताच्या राजकीय इतिहासावर एक लेखमाला लिहायची आहे. अर्थात मी मुलखाचा आळशी माणूस असल्याने याविषयी मी काहीही पावले उचलली नाहीत. एक दिवस मला त्याचा फोन आला की त्याला पण त्या लेखमालेत सहभागी व्हायला आवडेल.त्या निमित्ताने दोन-तीन वेळा फोनवर बोलणे झाले. संदर्भासाठी पुस्तके कोणती वाचायची, कोणती मासिके चांगली वगैरे बोलणे झाले. आपण नीलकांतला सांगून एक संयुक्त आय.डी या लेखमालेसाठी म्हणूनच घेऊ हे पण तो म्हणाला. पण मीच त्याला म्हटले की अरे लेखमालेतला एकही लेख अजून तयार नाही. एवढ्यात संयुक्त आय.डी कशाला?नेहमीप्रमाणे मी चालढकल केली. पुढच्या महिन्यात काम सुरू करू, पुढच्या आठवड्यात काम सुरू करू असे म्हणत म्हणत एक वर्ष तरी उलटले असेल. :(

रिचर्ड थेलरना मागच्या वर्षीचे नोबेल पारितोषिक मिळाल्याचे कळले का हा मेसेज मी त्याला लगेच केला होता. बहुतेक फोन नंबर बदलल्यामुळे त्याला तो मेसेज मिळाला नसावा. या वर्षी २ आणि ३ एप्रिलला पुण्यात गोखले इन्स्टिट्यूटमध्ये बिहेव्हिअरल इकॉनॉमिक्सवर वर्कशॉप झाले. या वर्कशॉपविषयी मला १५ मार्चच्या आसपास कळले.
त्या वर्कशॉपला रिचर्ड थेलर यांचे विद्यार्थी प्रा. दिलीप सोमण येणार होते. त्यामुळे तिथे मी न जायचा प्रश्नच नव्हता. मी लगेचच जायचे नक्की केले आणि पैसे पण भरले. त्या वर्कशॉपला बोक्याने पण यावे असे मला फार वाटत होते. तसे मी त्याला कळवले पण. त्यावर त्याचे काहीच उत्तर नाही. बरं वर्कशॉपला येणे शक्य झाले नाही तरी मी २ एप्रिलला पुण्यात असेन तेव्हा निदान भेटू तरी असा मेसेजही त्याला टाकला. त्यालाही त्याचे थोडे त्रोटकच उत्तर आले. त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी मी बाहेरगावी होतो. तिथून त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मेसेज केला. त्यालाही नुसते _/\_ एवढेच उत्तर त्याचे आले. २ एप्रिलला वर्कशॉपसाठी पुण्यात असताना त्याच्याकडून कसलाच संपर्क झाला नाही. बोका असे काही करत आहे म्हणजे नक्कीच काहीतरी बिघडले आहे हे समजलेच. सर्वकाही आलबेल असते तर तो किती उत्साहाने भेटायला आला असता. त्यानंतर महिन्याभराने म्हणजे २ मे रोजी ध्यानीमनी नसताना ऑफिसजवळ तो मला भेटला. त्यावेळी त्याने त्याला झालेल्या आजाराविषयी सांगितले. आणि त्या बोलण्यातून कळले की तो एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच त्याच्या आजारासाठीच्या चाचण्या करायला गेला होता. :( :( खरं सांगायचं तर त्यानंतर काय बोलावे हे खरोखरच सुचेना. तरी मी त्याला उसने अवसान आणून धीर द्यायचा खोटा प्रयत्न करत होतो.

तो दर दोन आठवड्यांनंतरच्या शनीवारी चेंबूरला हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी येतो हे कळले. पुढची तारीख १९ मे होती. त्याला म्हटले की मी तिथे तुला भेटायला येईन. त्याप्रमाणे त्याला भेटायला गेलो होतो. त्याचे उपचार म्हणजे कुठल्या बंद खोलीत होणार नव्हते तर सलाईनद्वारे होणार होते त्यामुळे त्याच्या खोलीतही जाता आले. आमच्या नेहमीप्रमाणे गप्पा झाल्या. असा काही आजार त्याला झाला आहे हे कोणाला खरेच वाटले नसते त्याला बघून.

हळूहळू त्याचा आजार वाढत गेला. रोग शरीरात बराच जास्त पसरला असल्यामुळे चेंबूरच्या हॉस्पिटलमधला तो उपचार करून काहीही फायदा होणार नाही असे डॉक्टरांचे मत झाले असे एकदा मेसेजवर त्याने कळवले. तेव्हाच कल्पना आली की वाईट बातमी कधीतरी येणार. :( :( मग त्याच्याशी संपर्क व्हायचे प्रमाणही कमी झाले. दसर्‍याच्या शुभेच्छा, दिवाळीच्या शुभेच्छा असे मेसेज इतपतच संपर्क राहिला. खरं सांगायचं तर त्याच्याशी काय बोलावे हे खरोखरच मला समजत नव्हते. दिवाळीच्या शुभेच्छांचा त्याला पाठवलेला मेसेज त्याने बघितला पण नव्हता. तेव्हा त्याची प्रकृती अजून ढासळली असेल ही कल्पना आली. आणि शेवटी आज ती कटू बातमी आलीच.

बोका, तुला मी खूप मिस करणार आहे. तुझ्यासारखे चतुरस्त्र माहिती असलेले आणि तितकेच विनयशील लोक फार नसतात. तुझी उणीव नक्कीच भासणार आहे. फार तर चार वर्षांपासूनची थोडीची ओळख, १०-१२ फोन आणि मेसेज इतकाच काय तो आपला संपर्क झाला. ३-४ वेळाच भेटलो असू. तरीही खूप वर्षांपासून तुला ओळखत आहे असे वाटायचे. एक गोष्ट सांगतो. मी तुझ्यासारखा कष्टाळू नाही. त्यामुळे त्या लेखमालेचे काम माझ्याकडून कधी आणि किती होईल हे मला माहित नाही. पण समजा शक्य झाले तर जितके लेख होतील तितके तुला भेटायला यायच्या आधी एखाद्या ब्लॉगवर जरूर लिहेन. वचन वगैरे देत नाही. फार स्वार्थी आहे मी. माझा जीव त्या वचनासाठी टांगणीला नाही लावायचा मला आणि तसे करायची टापच नाही माझ्यात.... :( :( :( :( :(

हे ठिकाणप्रकटनविचार

प्रतिक्रिया

गब्रिएल's picture

29 Nov 2018 - 9:04 pm | गब्रिएल

खूप दु:खदायक बातमी !

प्रत्यक्ष ओळख नसली तरी बोका-ए-आझम यांचा त्यांच्या मिपावरच्या लेखनातून झालेला परिचय, त्यांच्याबद्दलचा आदर वाटवणाराच होता.

ईश्वर मृतात्म्यास शांती प्रदान करो. :(

डॉ सुहास म्हात्रे's picture

29 Nov 2018 - 9:06 pm | डॉ सुहास म्हात्रे

बोका-ए-आझम यांना भावपूर्ण श्रध्दांजली

वरुण मोहिते's picture

29 Nov 2018 - 9:13 pm | वरुण मोहिते

हे बोलू शकत नाही इतका धक्का आहे हा. ..

डँबिस००७'s picture

29 Nov 2018 - 9:15 pm | डँबिस००७

भावपूर्ण श्रद्धांजली !

माहितगार's picture

29 Nov 2018 - 9:19 pm | माहितगार

बोका-ए-आझम यांना भावपूर्ण श्रध्दांजली

त्यांनी लिहीलेले मोसादचे सगळे भाग मी आधाशा सारखे वाचत असे. देव मृतात्म्यास शांती देवो.

खूप दु:खदायक बातमी !

प्रचेतस's picture

29 Nov 2018 - 9:34 pm | प्रचेतस

भावपूर्ण आदरांजली.

फुटूवाला's picture

29 Nov 2018 - 9:37 pm | फुटूवाला

बाकीचे गृप सोडलेलं पण पाहिलं तेव्हा त्यांच्या व्हाट्सॲप ला मेसेज करावं की नाही या विचारात नंबरवर गेलो. तिथे पाहतो तर त्यांचा स्टेटस Miles to go before I sleep!
अक्षरश: चर्र झालं हो काळजात..

उपयोजक's picture

29 Nov 2018 - 9:44 pm | उपयोजक

खुप लवकर गेले!
ईश्वर मृतात्म्यास शांती देवो!

राजेंद्र मेहेंदळे's picture

29 Nov 2018 - 9:50 pm | राजेंद्र मेहेंदळे

बोका ए आझम यांना श्रद्धांजली

अमरप्रेम's picture

29 Nov 2018 - 9:54 pm | अमरप्रेम

भावपूर्ण श्रद्धांजली.

ओह ओह ओह. फारच वाईट बातमी. मी मोसाद वाचल्यापासून त्यांच्या लिखाणाची फॅन होते. देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो !!!

दुर्गविहारी's picture

29 Nov 2018 - 10:29 pm | दुर्गविहारी

आजचा दिवस फारच वाईट गेला. या बातमीने दिवसभर उदास होतो. असो. त्यांना भेटायचे ठरले होते ते राहून गेले.
बोकासेठना भावपूर्ण श्रद्धांजली.

अजया's picture

29 Nov 2018 - 10:37 pm | अजया

एका मित्राने बोट पकडून दुसर्याला खेळायला घेऊन यावे तसा आला माझ्यासोबत ओंकार मिपावर. आणि माझ्यापेक्षा जास्त रमला इथे. मिपासाठी केलेल्या लेखनमालांचा काळ आणि त्यासोबत त्याला मिळालेले मिपाकर मित्र हा त्याच्यासाठी आनंदाचा आणि अभिमानाचा विषय होता.
आत्ता परवासुध्दा खास ओंकारस्टाइल मिपा आणि मिपाकरांचे अपडेट देऊन त्याने मला चकित केलेलं.
आपले मित्र जातात तेव्हा आपल्यातला त्यांच्यासाठी असणारा भाग त्यांच्याबरोबर घेऊन जातात आणि पोकळ आठवणी राहतात मागे ...
गॅरी,तुम्ही वेळोवेळी त्याची चौकशी करायचात ते त्याला फोनवर सांगत असे. आत्ता सात आठ महिन्यांपर्यंत तो तुमच्या एकत्र प्रोजेक्टबद्दल बोलत असायचा. त्यासाठी दोघे मिळून आयडी कसा घेता येईल वगैरे आम्ही बोललो होतो.
जमलं तर खरंच पूर्ण करा तो प्रोजेक्ट ..

स्पार्टाकस's picture

29 Nov 2018 - 10:54 pm | स्पार्टाकस

त्या दिवशीच्या गप्पा कधीही न विसरण्यासारख्या!

स्पार्टाकस's picture

29 Nov 2018 - 10:53 pm | स्पार्टाकस

ओंकार जाणार हे माहित होतं....
तशी मानसिक तयारीही झालेली होती....
त्याला शेवटचे भेटलो तेव्हा तो म्हणालाही, पुढल्या वेळेस येशील तेव्हा मी नसेन कदाचित....
तरीही तो गेला हे पचवणं जड जातं आहे....

अंतु बर्वा's picture

29 Nov 2018 - 11:17 pm | अंतु बर्वा

अर्रर्र, फारच वाईट बातमी. भावपूर्ण श्रद्धांजली....

फार वाईट बातमी. माझा एक आवडता आयडी.

बोका-ए-आझम यांना भावपूर्ण श्रध्दांजली

भिंगरी's picture

30 Nov 2018 - 12:22 am | भिंगरी

भावपूर्ण श्रद्धांजली!

बोक्याला भावपूर्ण आदरांजली... :(

हरवलेला's picture

30 Nov 2018 - 1:50 am | हरवलेला

:(

समर्पक's picture

30 Nov 2018 - 3:31 am | समर्पक

बोका-ए-आझम यांना भावपूर्ण श्रध्दांजली _/\_

चित्रगुप्त's picture

30 Nov 2018 - 5:26 am | चित्रगुप्त

अरेरे ... फारच तरूण वयात गेले बोकासेठ. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

मुक्त विहारि's picture

30 Nov 2018 - 7:46 am | मुक्त विहारि

भावपूर्ण श्रध्दांजली.

अनिरुद्ध.वैद्य's picture

30 Nov 2018 - 7:57 am | अनिरुद्ध.वैद्य

भावपुर्ण श्रध्दांजली __/|\__

जव्हेरगंज's picture

30 Nov 2018 - 8:31 am | जव्हेरगंज

दु:खद बातमी

भावपूर्ण श्रद्धांजली

_/\_

प्रमोद देर्देकर's picture

30 Nov 2018 - 8:40 am | प्रमोद देर्देकर

भावपुर्ण श्रध्दांजली __/|\__

४२ हे काही जाण्याचे वय नक्कीच नाही. नक्की काय आजार झाला होता कळु शकेल काय?

योगी९००'s picture

30 Nov 2018 - 9:30 am | योगी९००

बोका ए आझम यांचे मोसाद व इतर लेखन खूप आवडायचे. तसे मी केवळ वाचक म्हणून त्यांना ओळखत होते. तरीही ही बातमी वाचून धक्का बसला.

ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि त्यांच्या कुटूंबीयांना यातून सावरण्यास बळ देवो.

विनिता००२'s picture

30 Nov 2018 - 9:43 am | विनिता००२

मोसाद परत परत वाचलेली :(

फार लवकर गेलात बोकाजी __/\__

नाखु's picture

30 Nov 2018 - 10:23 am | नाखु

.....

विपा's picture

30 Nov 2018 - 10:27 am | विपा

बोका ए आझम यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
जुलै 2016 च्या वाशी महा कट्ट्याला यांची भेट घेण्याचे भाग्य लाभले होते.

विपा's picture

30 Nov 2018 - 10:27 am | विपा

बोका ए आझम यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
जुलै 2016 च्या वाशी महा कट्ट्याला यांची भेट घेण्याचे भाग्य लाभले होते.

राजाभाउ's picture

30 Nov 2018 - 10:39 am | राजाभाउ

बोका-ए-आझम यांना भावपूर्ण श्रध्दांजली

कविता१९७८'s picture

30 Nov 2018 - 10:45 am | कविता१९७८

बोका —ए—आझम.. प्रचंड हुशार व्यक्तीमत्व अन् तितकाच विनयशील. मोसादचे सर्व भाग मी ही अधाशासारखे वाचुन काढलेत, १४ वा भाग तर अगदी रात्री अडीच वाजता वाचलाय. दोन वर्षांपुर्वी गणपती निमित्त अजयाकडे रसायनीला भेट झाली होती. एकत्र जेवलोही सर्व. थोड्या महिन्यांनी त्याच्या आजाराची बातमी मिळाली. परवाच अजया म्हणाली की तु पुण्यात आलीस की बोक्याला तळेगावला भेटायला जाउ आणि दुसर्‍याच दिवशी म्हणजे काल तो गेल्याची बातमी आली. दु:खद प्रसंग पण तो मोसादच्या लेखमालिकेमुळे कायम अजरामर राहील.

भावपुर्ण श्रद्घांजली...

अमोल काम्बले's picture

30 Nov 2018 - 10:46 am | अमोल काम्बले

बोका-ए-आझम यांना भावपूर्ण श्रध्दांजली

गुल्लू दादा's picture

30 Nov 2018 - 10:51 am | गुल्लू दादा

मला एकदा भेटायची इच्छा होती त्यांना. भावपूर्ण श्रद्धांजली.

अर्धवटराव's picture

30 Nov 2018 - 10:54 am | अर्धवटराव

:(

श्वेता२४'s picture

30 Nov 2018 - 10:59 am | श्वेता२४

द स्केअरक्रो मुळे त्यांची फॅन झाले होते. मोसाद ही कथामाला तर भन्नाटच होती. इथे नव्यानेच सदस्य झाले होते त्यावेळी 22 एप्रिल ला त्यांना जरा घाबरतच व्यनि केला होता . त्यावर त्यांनी मला प्रतिसादही दिला आणि काही शंकानिरसन केले. आज ही बातमी वाचून मन विषण्ण झाले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

मार्गी's picture

30 Nov 2018 - 11:12 am | मार्गी

अतिशय दुःखद.... हळहळ वाटतेय. त्यांचा प्रत्येक लेख युनिक व पुनः पुनः वाचला जात होता. मला मिपावर सुरुवातीला प्रोत्साहन देणाऱ्यांत तेही एक होते. एकदा फोनवर बोलणं झालं होतं व अनेक व्य नि. काही काळापासून ते इथे दिसत नाहीएत हे जाणवत होतं. पण ते असं असेल असं वाटलंच नाही.... वाईट झालंय. त्यांच्यासाठी प्रार्थना करूया. ॐ ॐ ॐ

संजय पाटिल's picture

30 Nov 2018 - 11:16 am | संजय पाटिल

बोका-ए-आझम यांना भावपूर्ण श्रध्दांजली _/\_

बंट्या's picture

30 Nov 2018 - 11:21 am | बंट्या

भावपूर्ण श्रद्धांजली ...

मिपावरील त्यांची मोसाद हि लेखमाला फार आवडली होती. :(

दीपक११७७'s picture

30 Nov 2018 - 11:28 am | दीपक११७७

बोका शेठचे लेख मला खुप आवडतात
३-४ वेळा whatsapp वर साध्या चॅट केल्या होत्या,
A Great Man बोका-ए-आझम!
भावपूर्ण श्रद्धांजली !
Will Miss you

रागो's picture

30 Nov 2018 - 11:49 am | रागो

बोका-ए-आझम यांना भावपूर्ण श्रध्दांजली

आई गेल्यापपासून अश्रू जवळजवळ सुकलेले होते . पण हा गॅरीसाहेबांचा लेख वाचून पुन्हा जमा झाले डोळ्यात .. "बंद खोलीतील उपचार" हा शब्द ऐकून पुन्हा एकदा काळीजात चर्रर्र झालं .. बोका साहेब तुमच्या लढ्याला सलाम .. शंभू महादेव तुम्हाला त्याच्या चरणी जागा मिळवून देवो आणि तुमच्या ज्या काही उर्वरित चिंता असतील त्या दूर करण्यासाठी आपल्या आत्मीय कुटुंबियांना बळ देवो .. बा महादेवा ,, हे खरंच थांबावं रे कुठेतरी , असं राहून राहून वाटतं . कुणाला पटो अथवा ना पटो , पण मला कुठेतरी तुझा राग येतो . अरे जीवन मरण असेल रे सत्य , पण एक वय असतं जाण्याचं .. बोका साहेबांचं वय वाचून धक्का बसला .. तू जर खरा असशील तर हे असं चटका लावून जाणारं मरण कुणाच्याही पदरात पडून देऊ नकोस रे .. अरे इथे , तुला जशी मुलंबाळं आहेत तशी दुसर्यांनाही असतात रे .. तू एव्हढा कसा निर्दयी असशील तेच तर कळत नाही.. कुठले भोग कसे भोगायचे , हे जर खरंच तू ठरवत असशील तर त्या अचानक जाणाऱ्या व्यक्तीला पुढे प्रपंच वाढवायची ताकदच देऊ नकोस .. मला खरंच तुझा राग आलाय आज .. काल मी वाचलं हे सारं , मंचावर , पण मी त्या व्यक्तीला वयाने ओळखत नव्हतो, आज या लेखात वय वाचून धक्का बसला ..
देवा त्यांच्या कुटुंबावर आघात झालाय , त्यांना आधी बळ दे या सर्व गोष्टींमधून बाहेर पडायला नंतर निवांत समाधी लावून बैस त्या हिमालयावर ..

नया है वह's picture

30 Nov 2018 - 12:58 pm | नया है वह

बोका-ए-आझम यांना भावपूर्ण श्रध्दांजली

बोका-ए-आझम ह्यांना भावपूर्ण श्रध्दांजली...ईश्वर त्यांच्या मृतात्म्यास सद्गती देओ आणि त्यांच्या आप्तजनांस दु:खातून सावरण्यास बळ देओ.

_/\_

सचिन७३८'s picture

30 Nov 2018 - 3:07 pm | सचिन७३८

पहिल्यांदा बोकाशेठची 'मोसाद' वाचली तेव्हा अनेकांना या मालिकेबद्दल सांगितले होते, त्याची आठवण झाली. त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण लेखनशैलीला आपण सर्वजण कायमचे मुकलो. एक सिद्धहस्त लेखक आपल्यातून निघून गेल्याचे शल्य आहेच, शिवाय अभ्यासू लेखकाची उणीव यापुढे भासणार याचीही खंत आहे. बोकाशेठ आता आपल्यात नाहीत व त्यांची लेखणी एकदाची थांबली हे सत्य पचवणे कठीण आहे आणि अजूनही खूप वाईट वाटत आहे.

'मोसाद'कार बोका-ए-आझमना चिरशांती मिळो, ही ईश्वराकडे प्रार्थना!

नावातकायआहे's picture

30 Nov 2018 - 3:43 pm | नावातकायआहे

_/\_

सिरुसेरि's picture

30 Nov 2018 - 3:45 pm | सिरुसेरि

बोका-ए-आझम ह्यांना भावपूर्ण श्रध्दांजली . पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा .

लाल टोपी's picture

30 Nov 2018 - 4:18 pm | लाल टोपी

मिपा वरील अभ्यासपूर्ण लिखाण करणारे बोकाभाऊ गेल्याचे खरेच वाटत नाही, भावपूर्ण श्रद्धांजली

वेदांत's picture

30 Nov 2018 - 4:31 pm | वेदांत

बोका-ए-आझम यांना भावपूर्ण श्रध्दांजली.

बोका शेठ ह्यांना भावपूर्ण श्रद्धांजली . काही लोक ना भेटता वा न बोलता देखील आपले वाटतात , बोका शेठ त्यामधलेच . ईश्वर त्यांच्या कुटुंबियांना व मित्रमंडळींना हा धक्का पचवण्याची शक्ती देवो .

मूकवाचक's picture

30 Nov 2018 - 5:47 pm | मूकवाचक

मिपावरून एका अभ्यासू, शैलीदार आणि सिद्धहस्त लेखकाचा असा अकाली अस्त होणे अत्यंत क्लेशदायक आहे. बोका-ए-आझम यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

अभिजीत अवलिया's picture

30 Nov 2018 - 8:21 pm | अभिजीत अवलिया

फारच धक्कादायक बातमी.
बोकाशेटना भावपूर्ण श्रध्दांजली.

गामा पैलवान's picture

30 Nov 2018 - 9:12 pm | गामा पैलवान

गॅरी ट्रुमन,

तुमचं दु:खं समजतंय. ही हानी चटकन भरून येणारी नाही.

माझा बोकोबांशी परिचय नव्हता. त्यांच्यासमवेत जी काही थोडीफार चर्चा झाली ती त्यांच्या लेखांच्या अनुषंगाने. त्याव्यतिरिक्त गप्पा मारायला व चर्चा करायला आवडलं असतं. विशेषत: तुम्ही व ते ज्या लेखमालेची सहनिर्मिती कारण होतात, तिच्यासंबंधी चर्चा फारंच उद्बोधक व रोचक झाली असती. नाईलाजाने 'झाली असती' असा वाक्प्रयोग करायला लागतोय. ईश्वरेच्छा बलीयसी.

ती लेखमाला बोकोबांना एक श्रद्धांजली होऊ शकते.

आपला नम्र,
-गामा पैलवान

दादा कोंडके's picture

30 Nov 2018 - 11:27 pm | दादा कोंडके

भावपुर्ण श्रद्धांजली! _/\_

निशाचर's picture

1 Dec 2018 - 4:27 am | निशाचर

बोका-ए-आझम यांना भावपूर्ण आदरांजली

अमित खोजे's picture

1 Dec 2018 - 6:16 am | अमित खोजे

बोक्यांशी माझा तसा अगदी जवळचा परिचय नव्हता परंतु त्यांच्या लिखाणाने मी वेडा झालो होतो. आज प्रथमच फोटो पहिला. त्यांचे वय फक्त ४२ होते हे पाहून खूपच वाईट वाटले. त्यांच्या कथा कायम स्मरणात रहातील.

त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

सुधीर कांदळकर's picture

1 Dec 2018 - 6:54 am | सुधीर कांदळकर

श्रद्धांजली. मिपावर एवढ्या मोठ्या संख्येने त्यांच्याविषयी लेख प्रसिद्ध झाले यावरूनच त्यांचा लोकसंग्रह कळतो. स्पार्टाकस यांच्या लेखातून त्यांचे व्यक्तिविशेष कळले. इतर लेखातील त्यांच्या आठवणीतून त्यांच्याविषयी आणखी माहिती कळली आणि मोसादपासून मनांत निर्माण झालेला त्यांबद्द्लचा आदर दुणावला.

एक दिवस गुगल वर मोसाद बद्दल लिखाण सर्च केले असता मिसळपाव आणि बोकशेठ यांची ओळख झाली .
कुठल्याही आर्थिक फायद्याची अपेक्षा न करता सकस लिखाण करणारी माणसे कसे काय या स्वार्थी जगात असू शकतात ? हे कोड बोकशेठ चें लिखाण वाचून मला पडल आहे .
त्यांना विनम्र श्रद्धांजली , त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कशी भरून निघणार हे त्या विधात्यालाच ठाऊक .

मालविका's picture

1 Dec 2018 - 10:09 am | मालविका

भावपूर्ण श्रध्दांजली!

भावपूर्ण श्रद्धांजली

भावपूर्ण श्रद्धांजली

आवडाबाई's picture

1 Dec 2018 - 2:39 pm | आवडाबाई

बोका-ए-आझम यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

(त्यांचे समग्र लिखाण कसे शोधावे? लिंक लेखात देता येईल काय? काही दिवस मिपाच्या मुख्य पानावरही ही लिंक ठेवता येईल .)

तुषार काळभोर's picture

1 Dec 2018 - 10:51 pm | तुषार काळभोर
टर्मीनेटर's picture

1 Dec 2018 - 11:06 pm | टर्मीनेटर

कायम स्मरणात राहणाऱ्या लेखकास यथायोग्य श्रद्धांजली _/\_

आवडाबाई's picture

3 Dec 2018 - 3:42 pm | आवडाबाई

धन्यवाद पैलवान

त्यांचे कितीतरी लेख वाचले गेलेच नाहित हे लक्षात आले. वाचायला सुरूवात केली आहे.

पुन्हा एकदा श्रद्धांजली .

स्वलेकर's picture

1 Dec 2018 - 10:42 pm | स्वलेकर

बोका-ए-आझम यांना भावपूर्ण श्रध्दांजली

ट्रेड मार्क's picture

2 Dec 2018 - 6:35 am | ट्रेड मार्क

एवढ्या कमी वयात जाणं खरंच धक्कादायक आहे. काय बोलणार!

कापूसकोन्ड्या's picture

2 Dec 2018 - 1:45 pm | कापूसकोन्ड्या

बोका-ए-आझम यांना भावपूर्ण श्रध्दांजली
य.कु गेला तेव्हा असाच चटका लागला होता.

पिशी अबोली's picture

2 Dec 2018 - 7:55 pm | पिशी अबोली

धक्कादायक आहे हे!

बोकाशेठना श्रद्धांजली...

ओंकार माझा शाळू सोबती. जीवश्च कंठश्च मित्र. फार मनस्वी व्यक्ती होता. थोडासा अव्यवहारी पण अतिशय हुशार आणि अभ्यासू. त्याचं जाणं हा मोठा धक्का आहे.

स अर्जुन's picture

4 Dec 2018 - 11:41 am | स अर्जुन

बोका-ए-आझम यांना भावपूर्ण श्रध्दांजली_ _/\_

झपाटलेला फिलॉसॉफर's picture

7 Dec 2018 - 10:21 pm | झपाटलेला फिलॉसॉफर

बोका गेला,
आपण सगळेच जाणार आहोत हे स्मरण ठेवून त्यांना श्रद्धांजली!
कॅन्सर भिकारचोट च असतोय.

जगप्रवासी's picture

11 Dec 2018 - 3:28 pm | जगप्रवासी

नूलकर काकांसोबत शिवडीला फ्लेमिंगो बघायला गेलो असताना बोकोबांशी फक्त ५ मिनिटे बोललो. पण त्या ५ मिनिटांत पण या माणसाने त्याच्या दिलखुलास व्यक्तिमत्वाने घर केले, नंतर अधे मध्ये व्हाट्सअँप वर बोलणं होत होते. मिपावरच्या माझ्या आवडत्या लेखकाला भेटून जाम भारी वाटलं होत.

आणि त्यादिवशी नूलकर काकांचा मेसेज आला "बोका गेला". मनात पहिला पहिला प्रश्न आला "हे कसं शक्य आहे" देवाला चांगल्या माणसाचं काय वावडं आहे, जे तो त्यांना इतक्या लवकर बोलावून घेतो. डोकं सुन्न झालं वाचून, बायकोने हलवून विचारलं तेव्हा कुठे कळलं की ती कितीतरी वेळ हाका मारत होती. बोकाशेठ फसवलंत मला, आपण परत फ्लेमिंगो बघायला जाणार होतो.

समीरसूर's picture

13 Dec 2018 - 3:51 pm | समीरसूर

बोका-ए-आझम यांच्याशी वैयक्तिकरीत्या कधी संपर्क नाही झाला पण त्यांचे लेखन नेहमीच आवडत आले आहे. एक दिलखुलास व्यक्तिमत्व खूपच लवकर आपल्याला सोडून गेले...त्यांना मनापासून श्रद्धांजली!