अवघे धरू सुपंथ...

दिनेश५७'s picture
दिनेश५७ in जनातलं, मनातलं
26 Nov 2018 - 11:11 am

काल मला माझ्या मित्राचा हा मेसेज आला. कोणत्याही आजाराने त्रस्त असलेल्या मुलांची मनोवस्था काय असेल याची कल्पना करणे शक्य नाही, पण तिच्या काळजीने पालकांची अवस्था काय होते, याची मात्र या मेसेजवरून कल्पना येऊ शकते. एका विचित्र आजाराने या मित्राची मुलगी गेल्या काही महिन्यांपासून आजारी आहे. तिच्यावर उपचार करून तिला लवकरात लवकर या आजारातून बाहेर करण्यासाठी कितीही कष्ट घेण्याची या मित्राची तयारी आहे. जगाच्या पाठीवर कुठेही या आजारावरील उपचार करण्यासाठी तिला घेऊन जाण्याचीही त्याची तयारी आहे, असे त्याने मला सांगितले, आणि मला या धाग्याची आठवण झाली. जगाच्या पाठीवर सर्वत्र उमटलेल्या या मराठी पाऊलखुणांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला, तर तिच्यावरील उपचाराची वाट सापडू शकेल, अशी आशा मनात उमटली...
त्यासाठीच त्या मित्राचा मेसेज जसाच्या तसा इथे देत आहे. कुणीतरी, कुठेतरी या क्षेत्रातील थेट किंवा अप्रत्यक्ष माहीतगार या माध्यमातून काही मदत करू शकला, तर जगभरात पसरलेले हे समाजमाध्यमाचे जाळे विधायक कार्यासाठी हात देणारे आहे, हे पुन्हा एकदा स्पष्ट होईल.
आपणापैकी कुणास याविषयीच्या उपचाराची वा तज्ज्ञांची, किंवा रुग्णालयाची माहिती असेल, तर जरूर कळवा... ती माहिती या रुग्णास नक्कीच उपयोगी ठरू शकेल, व अवघे धरू सुपंथ हा विचारही सार्थ होईल...

‘माझी मुलगी मानसिक विकाराने गेले पावणे दोन वर्षे आजारी आहे. OCD with paranoid psychosis असे डॉक्टरांनी तिच्या रोगाचे विश्लेषण केले आहे. दररोज २० टॅब्लेट सुरु होत्या. गेल्या महिन्याभरापासून दररोज सात टॅबलेट सुरु आहेत… आठवडाभर खूप छान मूडमध्ये असते आणि नंतर गेले काही दिवस एकदम ड्रीप्रेशनमध्ये येते. अॅग्रेसिव्ह होते... ‘मरायचे आहे’ असे सांगते. रडत राहते. चाकू घेऊन हातावर मारून घेते. पण काही वेळानंतर स्वत: सांगते, ‘बाबा मी तुझ्यासाठी जगणार. मला किती त्रास होतोय तुला माहिती नाही!’…
डॉक्टरना हे सांगितल्यानंतर ते म्हणतात, ‘ती स्ट्रेस घेऊ शकत नाही. त्यावेळी तिचा ओसीडी वाढतोय!’…
कौन्सिलिंगचाही फायदा होत नाही. पुन्हा तेच घडतेय.
परीक्षा असू दे अथवा नाही... तिचा ओसीडी कमी होतच नाही. शॉक ट्रीटमेंट (ईसीटी ११ वेळा), आरटीएमएस (२४वेळा) हे उपचारही करुन झाले आहेत.
इंटरनेटवरील माहितीनुसार, ओसीडी बरा होत नाही असे नमूद आहे. परंतु तो नियंत्रणात राहून चांगलं दैनंदिन आयुष्य जगता येऊ शकतं असाही उल्लेख आहे. पण मानसीबाबत ते झालेलं नाही. उपचार चुकत तर नाही ना? तिचे निदान नीट झाले आहे का?...’
... माझ्या या मित्राला मदत हवी आहे.

औषधोपचारप्रकटनसद्भावना

प्रतिक्रिया

मराठी कथालेखक's picture

26 Nov 2018 - 5:51 pm | मराठी कथालेखक

तुमच्या मित्राला मदत करण्याचा तुमचा उद्देश नक्कीच खूप चांगला आहे.
मला या विषयातली माहिती नाही.
पण लवकर मदत मिळवण्याकरिता सुचवू इच्छितो की
धागा 'काथ्याकूट' मध्ये काढा आणि धाग्याचे शीर्षक साधे सरळ "मदत हवी :OCD with paranoid psychosis" किंवा "मानसिक आजारावरील उपचाराकरिता सल्ला /मदत हवी" असे काही थेट असू द्या. यामुळे जाणकारांकडून धागा वाचला जाण्याची शक्यता नक्कीच वाढेल.

खिलजि's picture

26 Nov 2018 - 6:11 pm | खिलजि

अगदी अगदी .. ते मका शेट म्हणतात त्याप्रमाणे आपण थेट मदतीचा हात मागावा ..

मी स्वतः काही डॉक्टरांना ओळखतो .. त्यांना तुम्ही सांगितलेली केस सांगून पाहतो काही मार्ग मिळतो आहे का .. काही टप्प्यात असेल तर नक्कीच व्यनि करेन . तूर्तास ज्यांची मी यासंदर्भात वाट पाहतोय ते बार्सिलोनाला गेले आहेत आणि ते १ डिसेम्बरला परत येतील .. पण हो किंवा नाही ते कळवेन नक्की .. धीर सोडू नका आणि त्या गरीब बापुड्या बाबाला सतत धीर देत राहा ..

मला वाटत उपचाराव्यतिरिक्त खालील काही गोष्टी आवर्जून कराव्यात . त्याने फरक पडू शकतो

१) घरी नित्यनेमाने शंखनाद सकाळसंध्याकाळ करणे किंवा रुग्णास ती योग्य स्थितीत असल्यास करण्यास सांगणे .. शंखनादाचे तोटे नसले तरी फायदे प्रचंड आहेत आणि ते वैज्ञानिक दृष्टिकोनातून अजूनही सिद्ध व्हायचे आहेत ..रुग्णास शंखनाद करता येत नसेल तर तो तिला करण्यास शिकवावा . हे सर्व त्या बाबाना अवघड असेल तरी एक इलाजच भाग म्हणून करावे . मी जेव्हापण शाखा वाजवतो , तेव्हा मेंदूवर एक हलकासा दाब तयार होतो आणि नंतर मात्र दिवसभर शांत आणि प्रसन्न वाटते .. हे माझे वैयक्तिक निरीक्षण आहे .

२) घरात गायत्री मंत्राचे उपकरण सतत चालू ठेवावे .. जेणेकरून निदान वातावरण प्रसन्न राहण्यास मदत होईल ..

नाखु's picture

26 Nov 2018 - 6:42 pm | नाखु

मित्रांस योग्य मार्गदर्शन मिळो व रुग्णांस लवकर प्रकृती सुधार होवो हिच सदिच्छा.

खिलजी यांचा सल्ला योग्यच आहे पण या धाग्यावरही आस्तिक नास्तिक, श्रद्धा वगैरे वगैरे किस पाडला जाउ नये म्हणून सर्व पुरोगामी सुधारकांना आगाऊ शुभेच्छा.

सश्रद्ध पालक नाखु पांढरपेशा मिपाकर

नावातकायआहे's picture

2 Dec 2018 - 8:05 am | नावातकायआहे

+१

" पण या धाग्यावरही आस्तिक नास्तिक, श्रद्धा वगैरे वगैरे किस पाडला जाउ नये म्हणून सर्व पुरोगामी सुधारकांना आगाऊ शुभेच्छा."

ह्यच्याशी १०१% बाडिस...

श्वेता२४'s picture

26 Nov 2018 - 8:21 pm | श्वेता२४

धाग्याचा शीर्षक आणि अटळ मजकूर यांचा ताळमेळ नसल्याने मराठी कथालेखकांनी सुवलेला उपाय करून बघा. मी स्वतःच त्यामुळे वाचला न्हवता. बाकी यातील तद्न्य नसल्याने काही मदत करू शकत नाही. पण तुमच्या या प्रामाणिक प्रयत्नांना यश मिळो. शुभेच्छा

मोदक's picture

2 Dec 2018 - 4:26 pm | मोदक

डॉ नटराज द्रवीड.
natrajdravid@yahoo.co.in
गुरूवार ते शनिवार सातार्‍यात क्लिनिक असते आणि रविवारी कोल्हापूर. यांच्याशी संपर्क साधून बघा.

माझ्याकडे फोन नंबर आहे पण शक्यतो इमेल वरून संपर्क साधा असे सुचवेन.