तुझ्या माझ्यासवे....
तुझ्या माझ्यासवे कधी गायचा पाऊसही
तुला बोलावता पोहोचायचा पाऊसही
पडेना पापणी पाहून ओलेती तुला
कसा होता नि नव्हता व्हायचा पाऊसही
तुला मी थांब म्हणताना तुला अडवायला
कसा वेळीच तेव्हा यायचा पाऊसही
मला पाहून ओला विरघळे रुसवा तुझा
कश्या युक्त्या मला शिकवायचा पाऊसही
कशी भर पावसातही आग माझी व्हायची
तुला जेव्हा असा बिलगायचा पाऊसही
आता शब्दांवरीया फक्त उरलेल्या खुणा
कधी स्मरणे अशी ठेवायचा पाऊसही
***********************
विडंबन
तुझ्या माझ्यामागे कसा यायचा भाऊ तुझाही
तुला बोलावता पोहोचायचा भाऊ तुझाही
होईना पाच मिनीटे भेटूनी तुला
कसा कोठूनी अलगद टपकायचा भाऊ तुझाही
तुला मी थांब म्हणताना तुला शोधायला
कसा वेळीच तेव्हा उगवायचा भाऊ तुझाही
मला पाहून कसा तीळपापड व्हायचा त्याचा
कश्या युक्त्या लढवायला लावायचा भाऊ तुझाही
कशी शांत बागेत चिडचिड माझी व्हायची
तुला जेव्हा असा घेऊन जायचा भाऊ तुझाही
आता (माझ्या) अंगावरी फक्त मारल्याच्या खुणा
कधी स्मरणात नाही ठेवायचा मला भाऊ तुझाही
प्रतिक्रिया
2 Dec 2018 - 7:29 pm | वन
चांगले केलंय.
पु ले शु