हे जे काही मी रचलं आहे, ते नक्की कुठल्या काव्यप्रकारात बसेल हे माझ्या ल क्षात येत नाहीये.
पण जसं सुचलं, तसं लिहिलं. घ्या सांभाळून दादानु
गझलांची चळ्त रचतोच आहे
छापण्या पुढे व्हा, मी येतोच आहे
कुणी सांगण्या येई, गझल दे करुनी
मागण्याआधी मी देतोच आहे
लिहिण्यास पाने पड्ली, जराही कमी ती
मुलांच्या वह्या मी उसवतोच आहे
भिऊनी पळाले शब्द ओळीमधुनी
गचांडी धरुनी, त्यांना बसवतोच आहे
ओळ्खून गझलाकारास, प्रतिक्रिया जर दिली
'तिलाही' धुवाधार धुतोच आहे
प्रतिक्रिया
31 Oct 2008 - 8:16 pm | दत्ता काळे
"कुणी एक गझलाकार "हे माझं काव्यलेखन चुकून जन मनातलं मध्ये लिहिलं गेलं, त्यासाठी माफ करा. पण हे कसं दुरुस्त करायचं मला माहीत नाही. क्रुपया कोणी दुरुस्त करेल काय?