॥श्री॥
गँ गण ण ण ण,गँ गण ण ण ण
गँ गण ण ण ण, गँ गणपतये
देवांमाजी, अग्रदेव तू,
त्रिवार वंदन स्विकार अमुचे॥धृ॥
हे शिव-शक्तिच्या संगमा
हे बुद्धि-युक्तिच्या अग्रजा
त्या श्रुती-स्मृतिंचा पाठक अन तू
वेदांची रे मंत्रणा !
विद्या-कला
ठायी तुझ्या
तू सर्वेश्वर तुज वंदना ॥१॥
तू श्रेष्ठ लिपीक तुजला गती
हे देवांच्या सेनापती
रविचंद्रधिनायक विश्वही तुजला
सुर्याने ओवाळती
सिद्धेश्वरा,
विघ्नेश्वरा,
हे करूणाकर , तुज मोरया ॥२॥
पदी मंजुळ घुंगुर नादतो
कटिबंध भुजंगही शोभतो
हे सुंडतुंड, गजगंड तिलंकीत
मूषक वाहन वाहतो
लंबोदरा,
मनमोहना,
तू दृष्टि राख, हीच कामना ॥३॥
गीत - कौस्तुभ
गाणे इथे ऐकत येइल
https://youtu.be/FBP3KzPa6jM
आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपतीला हा माझा सुरेल निरोप. गणपतीचे हे गाणे मी सहा वर्षापूर्वि ’असे स्फुरावे गीत’ह्या माझ्या अल्बम मधे रिलीज केलं होतं. विशेष सांगायचे म्हणजे ह्या गाण्यात ’माझ्या नवर्याची बायको’फेम ’शनया’ म्हणजेच रसिका सुनील कोरस मधे गायली आहे. तेंव्हा ती कॉलेज मधे शिकत होती आणि झी मराठी सारेगम मधे कोरस मधे गात असे. विशेष सांगायचे म्हणजे ह्या गाण्यात ’माझ्या नवर्याची बायको’फेम ’शनया’ म्हणजेच रसिका सुनील कोरस मधे गायली आहे. तेंव्हा ती कॉलेज मधे शिकत होती आणि झी मराठी सारेगम मधे कोरस मधे गात असे. गाण्याच्या शेवटी काही फोटो आहेत पहा ओळखता येत्ये का :).
ह्या गाण्याचे शब्द आणि संगीत माझे असून, अक्षय कावळे आणि रोहन मोकल ने म्युझीक अरेंजमेंट केली आहे. गाणं ऐका आणि आवडल्यास नक्कि लाईक करा. धन्यवाद.
प्रतिक्रिया
26 Sep 2018 - 1:06 pm | गणेशा
भारी एकदम..
कौस्तुभ.. आपण ठाण्याला भेटलेलो आहोत कवितेचे कार्यक्रमात असे आठवते.. वर्षे अंदाजे २००८-०९