पहाट

दत्ता काळे's picture
दत्ता काळे in जे न देखे रवी...
27 Oct 2008 - 12:48 pm

दीप निवले रात्रीचे
पहाटही अशी फुले
केसातील मोगरयाचा
गंध अजून, अजून खुले

शब्द नव्हे ओठांवर
नाजुकसे चांदणे
टिपले जरी, परी ऊमले
ओठांच्या स्पर्शाने

लाजलीस जेव्हा तू
वेड मला लागले
श्वासातील गंधभान
स्पर्शातच जागले

पहाटेला भेटण्यास
रात्र परत आली
उगवली पुन्हा फिरूनी
क्षितीजावर चांदणी

प्रेमकाव्यकविताप्रतिभा

प्रतिक्रिया

मनीषा's picture

27 Oct 2008 - 11:02 pm | मनीषा

सुंदर कविता ...

प्राजु's picture

27 Oct 2008 - 11:45 pm | प्राजु

शब्द नव्हे ओठांवर
नाजुकसे चांदणे
टिपले जरी, परी ऊमले
ओठांच्या स्पर्शाने

खासच..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

बेसनलाडू's picture

28 Oct 2008 - 2:05 am | बेसनलाडू

कविता फार आवडली. 'केव्हा तरी पहाटे' आणि 'मलमली तारुण्य माझे' या भटांच्या कवितेतील काही निवडक ओळी/द्विपदींचा (त्यांच्या अनुभूतीचा) कुठेकुठे भास झाला.
(स्मरणशील)बेसनलाडू

दत्ता काळे's picture

28 Oct 2008 - 11:46 am | दत्ता काळे

मनीषा, प्राजु, बेला

कवितेला दाद दिलीत धन्यवाद

रामदास's picture

28 Oct 2008 - 12:37 pm | रामदास

वाचून बेला म्हणतात त्या कविता आठवल्या.

विसोबा खेचर's picture

28 Oct 2008 - 12:53 pm | विसोबा खेचर

आयला! साली जाम सेक्सी कविता आहे! लै भारी..! :)

तात्या.

दत्ता काळे's picture

28 Oct 2008 - 1:13 pm | दत्ता काळे

रामदासजी , तात्याराव
आपली प्रतिक्रिया मनाला शाबासकीचं सुख देते आणि
कविता लिहिल्यानंतर असं वाटलं होतं कि " हे जरा जास्तचं रोम्यांटीक आहे कां ?
पण जसं कागदावर उतरलं, तस्सच मांडलं.
धन्यवाद

मदनबाण's picture

29 Oct 2008 - 8:51 am | मदनबाण

लाजलीस जेव्हा तू
वेड मला लागले
श्वासातील गंधभान
स्पर्शातच जागले

व्वा..

मदनबाण.....
"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda

वेताळ's picture

29 Oct 2008 - 10:26 am | वेताळ

लाजलीस जेव्हा तू
वेड मला लागले
श्वासातील गंधभान
स्पर्शातच जागले

वा खुपच बेधुंद
वेताळ

राघव's picture

29 Oct 2008 - 3:21 pm | राघव

..केसातील मोगरयाचा
गंध अजून, अजून खुले

क्या बात है :) मस्त आहे!

मुमुक्षु

प्रमोद देव's picture

31 Oct 2008 - 6:44 pm | प्रमोद देव

म्हणून त्याला चालही लावलेय. ऐकायचेय? मग ऐका तर!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

31 Oct 2008 - 7:23 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चांगली चाल लावली आहे.

-दिलीप बिरुटे

विसोबा खेचर's picture

1 Nov 2008 - 12:08 pm | विसोबा खेचर

तुमच्या उत्साहाचं नक्कीच कौतुक वाटतं, परंतु देवकाका,

अहो कविता, तिचा स्वभाव लक्षात घ्या. बेधुंद, शृंगारिक कविता आहे ही. तुम्ही तिला इतकी दु:खी-कष्टी चाल लावयाचं प्रयोजन समजलं नाही..

पहाट फुलली म्हटलं आहे, ओठावरचे नाजुकश्या चांदण्याची बात केली आहे, श्वासतील गंधभान स्पर्शात जागल्याचं वर्णन आहे, शिवाय,

पहाटेला भेटण्यास
रात्र परत आली
उगवली पुन्हा फिरूनी
क्षितीजावर चांदणी

ही सकारात्मकताही आहे.

असं असताना इतकी दु:खी कष्टी आणि रडकी चाल लावयाचं कारण खरंच कळलं नाही. केवळ काही सूर सुचले म्हणून नव्हे, तर काव्याचा अर्थ समजावून घेऊन चाल लावली पाहिजे हा माझा मुद्दा लक्षात घ्या..

असो, वैयक्तिक मत. राग नसावा...

माझं मत पटल्यास उत्तम, अन्यथा सोडून द्या..

आपला,
(गाण्यातला) तात्या.

प्रमोद देव's picture

2 Nov 2008 - 11:05 am | प्रमोद देव

अरे तात्या तुझ्यासारख्या दर्दी संगीतज्ञाने केलेल्या सुचना मला नक्कीच मोलाच्या वाटतात.
ह्यापुढे नक्की लक्षात ठेवीन.

शितल's picture

31 Oct 2008 - 7:39 pm | शितल

शब्द नव्हे ओठांवर
नाजुकसे चांदणे
टिपले जरी, परी ऊमले
ओठांच्या स्पर्शाने

हे तर खासच. :)

दत्ता काळे's picture

1 Nov 2008 - 11:54 am | दत्ता काळे

चाल फार छान लावली आहे, धन्यवाद देवसाहेब !