माननीय सलीलजी कुलकर्णी व संदीपजी खरे यांची माफी मागून, माझ्या एका अत्यंत आवडीच्या त्यांच्याच गाण्यावर माझे विडंबन सादर करत आहे.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
गीतकार : संदीप खरे, गायक : सलील कुळकर्णी
दूरदेशी गेला बाबा, गेली कामावर आई
नीज दाटली डोळ्यांत परी घरी कुणी नाही
कसा चिमणासा जीव, कसाबसा रमवला
चार भिंतीत धावून दिसभरं दमवला
आता पुरे, झोप सोन्या कुणी म्हणतच नाही
नीज दाटली डोळ्यांत तरी घरी कुणी नाही
कशासाठी कोण जाणे देती शाळेमध्ये सुट्टी
कोणी बोलायाला नाही, कशी व्हावी कट्टी-बट्टी
खेळ ठेवले मांडून परि खेळगडी नाही
नीज दाटली डोळ्यांत तरी घरी कुणी नाही
दिसे खिडकीमधून जग सारे, दिशा दाही
दार उघडून परि तिथे धावायचे नाही
फार वाटे जावे परि मुठीमध्ये बोट नाही
नीज दाटली डोळ्यांत तरी घरी कुणी नाही
************************
विडंबन
टुरवर गेला नवरा, नाही आली शांताबाई
केर झालेत घरात परी काढायला कुणी नाही....
माझा कोमलसा जीव, कसाबसा रमवला
फेबु-व्हॉटसप पाहून दिस मी संपवीला
आता पुरे, logout होना कुणी म्हणतच नाही
कामे साठली घरात परी करायला कुणी नाही....
कशासाठी कोण जाणे बाया या घेती सुट्टी
न सांगता सवरता कशा मारतात बुट्टी
कपडे भिजले बादलीत परी कामवाली नाही
भांडी पडली मोरीत परी घासायला कुणी नाही....
दिसे खिडकीमधून मॉल, सेल काहीबाही
तेथे जाऊन परि काही घ्यावयाचे नाही
फार वाटे जावे परी कार्डात बॅलन्सच नाही
बीले पडली थकीत परी भरायला कुणी नाही....
प्रतिक्रिया
20 May 2018 - 12:08 pm | शाली
खास!
20 May 2018 - 12:58 pm | manguu@mail.com
छान
20 May 2018 - 2:53 pm | टवाळ कार्टा
खिक्क
20 May 2018 - 5:25 pm | कंजूस
अशी कशी केलीस दैना
राजबिंडा लेक तो माझा
बैल केलास त्याचा
अशी कशी केलीस दैना
20 May 2018 - 6:59 pm | अभ्या..
शेवटची ओळ "भिकारी केला, आधी होता राजा" अशी करा.
21 May 2018 - 10:43 am | श्वेता२४
मला वाटतं याला कविता सदरात हलवावं. मी लेख वाचायचा म्हणून उघडला. छान जमलंय विडंबन
21 May 2018 - 3:01 pm | सस्नेह
=))