या आधीचे "अन्नदाता सुखी भव" चे भाग
भाग १: http://www.misalpav.com/node/32554
भाग २: http://www.misalpav.com/node/32709
भाग ३: http://misalpav.com/node/32801
भाग ४: http://misalpav.com/node/33012
भाग ५: http://www.misalpav.com/node/33371
भाग ६: http://www.misalpav.com/node/33829 आणि
http://www.misalpav.com/node/41702
भाग ७: http://www.misalpav.com/node/41733 आणि
http://www.misalpav.com/node/41771
भाग ८ : http://www.misalpav.com/node/42121 आणि
http://www.misalpav.com/node/42143
मी रक्तपिपासू लोकांच्या टोळीने वेढला गेलो होतो. माझ्यासारखेच आणखीही हतभागी लोक, कोणी आपल्या कर्माला बोल लावत, कोणी जवळच्यांशी कुजबुजत आपल्यावर घाला कधी येणार या चिंतेत जवळपास रेंगाळत होते. इतक्यांत एकदम एका कोपऱ्यात " सोडू नका, सोडू नका त्याला" असा आरडाओरडा सुरू झाला. कोणीतरी रक्तपिपासूंच्या टोळीपासून चतुराईने सुटका करून घेणार याची जाणीव झाल्याने बऱ्याच जणांना बसल्या ठिकाणाहूनच का होईना, पण मान लांब करून त्या महाभागाचे दर्शन घेण्याची अनावर इच्छा झाली आणि एकदम लांबून भसाड्या आवाजात विचारणा झाली - काय रे, "five star" नको झालं का तुला?
त्याचे असे झाले - डॉक्टरांनी रक्तविश्लेषण करून घेण्याचा सल्ला दिल्यामुळे मी (आणि इतर अशाच कारणांनी तिथे उपस्थित) विश्लेषण करण्याकरता रक्त काढले जाण्याची वाट बघत बसलेला असताना त्याच स्थितीतल्या एका ५-७ वर्षाच्या बाळाने, आधी झालेल्या आणाभाका विसरून आणि "good boy" सारखे वागल्यावर (च) आश्वासित असलेल्या "five star" वर देखील पाणी सोडण्याच्या तयारीने रक्तपिपासूना गुंगारा देण्याचा असफल प्रयत्न केला होता आणि तो त्याच्या रांगड्या पिताश्रींना पसंत न पडल्याने त्यांनी ती घनगर्जना केली होती - आपल्या इथे येण्याआधी ठरवलेल्या "deal "चे काय अशा आशयाची. त्या ५-७ वर्षाच्या बाळाच्या लगेच लक्षात आले असावे की पवित्रा बदलायला हवा आणि मग त्याने हात, पाय, गळा असा सगळ्यांचा एकत्रित वापर करण्याचे थांबवत आणि बहुतेक आईच्या रदबदलीची लाज राखत,"five star" वरचा हक्क जाऊ नये म्हणून किंवा तरणोपाय नाही म्हणून एकदाचे विश्लेषणाकरता रक्त घेऊ दिले असावे, कारण चालू झालेला कालवा एकदाचा शांत झाला.
"five star" सारख्या बालजगतातल्या लाचलुचपतीच्या चलनाची आणखीही एक -निदान भारतात तरी फारशी माहीत नसलेली - बाजू आहे. जसे सगळ्या तऱ्हेच्या चॉकलेटमुळे जगातल्या काही (बहुतांशी श्रीमंत) भागांत बाल्य गोंजारले जाते तसेच इतर काही (बहुतांशी गरीब) भागांत याच चॉकलेटमुळे बऱ्याच मोठ्या प्रमाणांत बाल्य नष्ट होत आहे याची जगभरात फार थोडी जाणीव आहे.
या बालजगतातल्या लाचलुचपतीच्या चलनाला बरेच आकर्षक रूप देऊन ग्राहकांसमोर पेश केले जाते. नुसत्याच काळपट तपकिरी रंगाच्या मुदी ग्राहकाच्या समोर न ठेवता अनेक रंगीबेरंगी आणि कधी चकचकीत, पारदर्शक तर कधी रक्षक अशा वेष्टनांतून वेगवेगळ्या आकारांत चॉकलेट ग्राहकांपर्यंत पोचवले जाते. वेष्टनांच्या पलीकडे पोचल्यावर खाण्याकरता नक्की काय हातात येईल ही अनिश्चितता असूनही चॉकलेट खरेदी करण्याकरता बालगोपाळांचाच नव्हे तर प्रौढांचा देखील बुद्धिभेद करण्याचे काम कधी एखादा खास दिवस (उदा. valentine's day) म्हणून किंवा "कुछ मीठा हो जाये" अशा तऱ्हेच्या जाहिरातबाजीने केले जाते. नाहीतरी मोठयांना जर चॉकलेट खाण्याच्या सबबीच शोधायच्या असतील तर "स्वतः खाल्याखेरीज कुठलं चांगलं हे कसं कळणार? म्हणजे मुलांना देण्याकरता हो" इथं पासून ते "अहो, हिला आवडतं" अशा अनेक अगदी सोप्या सबबींपासून ते "अहो, आमच्या कंपनीत आज xxxx ने वाटली" अशा संदिग्ध (आणि संशयास्पद) सबबींपर्यंत अनेक सबबी सहज मिळू शकतात.
या सोनेरी किंवा चंदेरी आवरणातील चॉकलेटमध्ये असलेल्या कोकोच्या भुकटीमुळे "खाल्यावर छान वाटते" याचे कारण पुन्हा chemical लोचा (मुन्नाभाईनी वापरात आणलेला भारतातील कुठल्याहि भाषेत समजेल असा हा एक अगदी सुयोग्य शब्दसमूह)!! त्याबद्दल थोडे - आपल्या भावना मेंदूतील कुठली केंद्रें उत्तेजित किंवा अनुत्तेजित होतात/रहातात या वर अवलंबून असतात. असे उत्तेजन/अनुत्तेजन नैसर्गिक (वेगवेगळे पदार्थ खाल्याने किंवा प्यायल्याने) किंवाप्रयोगशाळेत बनवलेल्या रसायनांमुळे (काही औषधें घेतल्याने) होते. कोकोच्या भुकटीमध्ये असलेल्या ३००च्या जवळपास नैसर्गिक रसायनांमुळे अनेक तऱ्हेच्या भावना (वेगवेगळ्या प्रमाणात) निर्माण होऊ शकतात - काही एखाद्या मादक पदार्थाच्या सेवनानंतर वाटतात तशा तर कांही "सगळं कसं छान चाललंय" अशा तऱ्हेच्या तर कांही कामेत्तेजक - आणि त्यामुळे वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या तऱ्हेची चॉकलेटं "आवडतात". उदा. चॉकलेट मधल्या कांही रसायनांमुळे phenylethylamine चा स्राव झाल्यामुळे एकदम तरतरीत वाटते, नाडी वेगात चालते आणि "प्रेमांत पडल्यावर जसे वाटते" (म्हणजे कसे हे विषद करणे कठीण) तसे वाटू लागते. चॉकलेटमधल्या anadamide मुळे मेंदूतील (थोडक्या प्रमाणात होणारे) उत्तेजन गांजा ओढल्यावर (जोरदार प्रमाणात) होणाऱ्या उत्तेजनासारखेच असते. चॉकलेटमधल्या tryptophan मुळे serotonin चा स्राव झाल्यानें mood एकदम आनंदी होतो.
मानवजातीला कोकोची ओळख प्रथम मध्य आणि दक्षिण अमेरिकेत, माया आणि इंका यांच्या राज्यात झाली. या भुकटीमध्ये असलेल्या या जादूमुळे असेल, पण १६व्या शतकापर्यंत फक्त माया आणि इंका राजेरजवाडेच या "food for gods"चा उपयोग करायचे. स्पॅनिश लोकांनी मध्य आणि दक्षिण अमेरिकेत आपले वर्चस्व प्रस्थापित केल्यावर त्यांना या भुकटीच्या वापराची पद्धत कळल्यानंतर हळूहळू यूरोपांतल्या उच्च वर्गीयांपासून - कोको महाग असल्याने - सुरवात होत, जसे कोकोचे उत्पादन वाढत गेले तसे कोकोचा वापर वेगवेगळ्या देशांत आणि स्तरांत पसरू लागला.
कांही सोनेरी किंवा चंदेरी आवरणातील चॉकलेट विकणारे मात्र चॉकलेटमध्ये असलेल्या कोकोच्या दर्जापेक्षा कुठे caramel कुठे वेगवेगळ्या काजू, बेदाणे अशा भरीच्या पदार्थांवर (त्यामुळे चॉकलेट जास्त चविष्ट जरूर लागते) अवलंबून, त्यांत घातलेल्या दूध, मलाई इ.इ. ची भलावण करून किंवा "मुल्ला वीतभर आणि दाढी हातभर" या पद्धतीने जाहिरातबाजी आणि आकर्षक आवरणे यावर बाजी मारून नेण्याचा प्रयत्न करतात.
जगभरातल्या नामांकित चॉकलेट बनवणाऱ्या कंपन्यांच्या वार्षिक उलाढालीचा आकडा आहे (अमेरिकन) डॉलर १३,७०० कोटी (ज्यात cocoa powder पासून बनलेल्या गोड वड्यांखेरीज इतरही उत्पादने सामील, जसे फक्त साखरेच्या/फळांच्या स्वादाच्या गोळ्या किंवा candy तसेच Oreo सारखी बिस्किटे ज्यात कोकोच्या भुकटीखेरीज इतरही बरेच चविष्ट पदार्थ मिसळलेले असतात असे पदार्थ ही सामील आहेत) याखेरीज व्यापारी नांवाशिवाय होणारी किरकोळ विक्री आणि त्याकरता होणारा cocoa च्या भुकटीचा होणारा वापर वेगळाच. चॉकलेट बनवणाऱ्या अग्रगण्य कंपन्या खाली दिल्या आहेत (कंसातील आंकडे २०१७ सालातील वार्षिक उलाढाल अमेरिकन डॉलरमध्ये दर्शवतात).
१. अमेरिकेतील Mars incorporated ( १८०० कोटी): या कंपनीच्या जागतिक व्यापारी नांवात M&M, Snickers, Mars bars, Skittles, Milkyway या प्रसिद्ध नावांखेरीज अनेक तऱ्हेची Wrigley's या व्यापारी नावाने विकली जाणारी chewing gums आणि Uncle Ben's या व्यापारी नांवाने विकले जाणारे खाद्य पदार्थ देखील समाविष्ट आहेत
२. युरोपातील Ferrero Group (१२०० कोटी): या कंपनीच्या जागतिक व्यापारी नांवातले सगळ्यात प्रसिद्ध - Ferrero Rocher
३. अमेरिकेतील Mondelez (११५६ कोटी): या कंपनीत कांही वर्षांपूर्वी Cadbury हा इंग्लंड/कॅनडा मधील उद्योग समूह विलीन झाल्याने भारतातील Cadbury उद्योगाचे नांव बदलून Mondelez झाले, पण Cadbury हे व्यापारी नांव भारतात चालूच राहिले
४. जपानमधील Meiji Group (९६५ कोटी): या कंपनीच्या जागतिक व्यापारी नांवातली बरीच "Meiji xxxx " अशा तऱ्हेची किंवा जपानी/चिनी/आशियातल्या भाषांतली (उदा. यान यान) आहेत
५. स्वित्झर्लड मधील Nestle' ही कंपनी (८८२ कोटी): या कंपनीच्या जागतिक व्यापारी उलाढालींत kit kat, milky bar अशा लोकप्रिय चॉकोलेट खेरीज ice creams सारखे cocoa च्या भुकटीचा वापर असणारे इतरही बरेच पदार्थ आहेत
६. अमेरिकेतील Hershey ही कंपनी (७५३ कोटी): जागतिक व्यापारी नांवातले सगळ्यात प्रसिद्ध - Hershey's kisses
वरील मोठ्या प्रमाणावर चॉकोलेट बनवणाऱ्या कंपन्यांच्याखेरीज काही इतर व्यापारी नांवेही जगभरात लोकप्रिय आहेत, जसे बेल्जियम मधील Godiva, Leonidas , Cote d'Or, स्वित्झर्लंडमधील lindt , suchard आणि अमेरिकेतील Ghirardelli. दर्दी लोकांच्या मते बेल्जियममधील चॉकोलेट्स ही जगभरात सर्वोत्कृष्ट असतात. तेथील चॉकोलेट बनवणाऱ्या लोकांनी आपली "कला" इतकी छान जोपासली आणि वाढवली आहे की बेल्जियममधील अनेक छोट्या गांवीसुद्धा वेगवेगळ्या तऱ्हेची उत्तम चॉकोलेट्स बनतात. असेच थोडेसे स्वित्झर्लंडमध्येही होते. पेढे मथुरेचे चांगले का धारवाडचे याबद्दल जसा कधी न संपणारा वाद होऊ शकेल, तसेच जगातली कुठली चॉकोलेट्स सर्वोत्कृष्ट हा वादही अनंत काळ चालू शकेल. शेवटी प्रत्येकाची जीभ आणि खिसा काय मत देईल ते खरे. मागच्या कांही दशकांत बऱ्याच मोठ्या कंपन्यांनी लहान लोकांचे धंदे विकत घेऊन स्वतःचे स्थान जास्त बळकट केले आहे.
चॉकलेट बनवण्याकरता जी cocoa powder लागते ती Cocoa beans दळून केली जाते. Cocoa (technical name TheobromaCacao) च्या झाडांना फणसासारखी झाडाच्या बुंध्यावर साधारण पपईच्या आकारासारखी लहान मोठी लांबुडकी फळे लागतात. ती पिकल्यावर त्यांची बाहेरची साल कडक होते आणि धारदार चाकूने सोलून किंवा लाकडी दंडुक्याने ठोकून आतला मऊ गर बाहेरच्या कडक सालीपासून वेगळा काढला जातो. हा गर साधारणतः सीताफळातल्या गरासारखा (अनेक बिया एकत्र चिकटलेल्या, त्या सगळ्या बियांवर बाहेरून पातळसा गोड लागणारा चिकट गर, असा प्रत्येक फळांत कडक आवरणामध्ये बऱ्याच बिया एकत्र असलेला एकच मोठा गोळा) असतो. हा गोळा आंबवल्यावर (fermentation) उन्हात वाळवला जातो आणि Cocoa beans वेगळे करून आकार (मोठ्या गराच्या गोळ्यातून आंबवल्या/वाळल्यावर सुट्या केलेल्या प्रत्येक बीचा आकार साधारणतः शेंगदाण्यासारखा) आणि प्रतवारीनुसार पोत्यांत भरले जातात. बिया दळणे आणि चाळणे याकरता तसेच मिश्रणाकरता वापरलेल्या प्रक्रियेनुसार भुकटी आणि त्याबरोबर मिसळलेल्या वस्तूंचे (दूध, साखर, मलाई, dry fruits इ.इ.) यांचे मिश्रण मऊ, चिकट, कडक किंवा रवाळ असे वेगवेगळे बनवता येते.
Cocoa च्या झाडांना विषुववृत्तीय हवामान मानवते. जगांत तयार होणाऱ्या वार्षिक ४० लाख टन Cocoa beans पैकी ३० लाख टन आफ्रिकेतल्या झाडांपासून मिळतात तर त्यातील १८ लाख टन आयव्हरी कोस्ट मधून तर ८ लाख टन घानामधून मिळवले जातात. म्हणजेच Cocoa beans च्या जागतिक उत्पादनापैकी ४५% उत्पादन आयव्हरी कोस्ट मधून तर २०% घानामधून मिळवले जाते. या जगभरातल्या Cocoa beans च्या उत्पादनाची किंमत साधारणतः (अमेरिकन) डॉलर ६०० कोटी होईल. भारतांत मुख्यतः तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र आणि केरळमध्ये (समुद्राजवळच्या भागांत) होणाऱ्या Cocoa beans चे उत्पादन जगांतल्या उत्पादनाच्या ०.५ % पेक्षाही कमी आहे आणि त्यामुळे भारतांत Cocoa beans/ Cocoa beans भुकटी मुख्यतः आयात होते.
जगभरातल्या चॉकलेट बनवणाऱ्या कंपन्या cocoa powder किंवा cocoa च्या बिया मिळवण्याकरता एक तर स्वतःचे व्यापारी जाळे (network) प्रस्थापित करून cocoa ची झाडे जोपासणाऱ्या लोकांकडून (शेतकरी, co-operatives, अडते) cocoa च्या बिया विकत घेतात किंवा Barry Callebaut, Cargill, SAF Cacao सारख्या- घाऊक प्रमाणावर cocoa च्या बिया किंवा भुकटी पुरवणाऱ्या, स्वतः चॉकलेट तयार न करणाऱ्या- कंपन्यांकडून विकत घेतात.
भारतांत Cadbury या ब्रिटिश व्यवसायाचे बस्तान इतके जोरदार होते की कुठल्याही चॉकलेटला Cadburyच म्हटले जायचे. आता अमेरिकेतील Mondelez या कंपनीत हा उद्योग समूह विलीन झाल्याने Cadbury हे व्यापारी नांव चालूच राहिले असले तरी भारतात कंपनीचे नांव Mondelez झाले आहे.
Cadbury च्या या भारतांतील हत्तीसारख्या उद्योगासमोर कांही काळ तरी एका मुंगीने टिकाव धरला होता. पुण्यातल्या गं. भा. सीताबाई साठे आणि त्यांचा मोठा मुलगा गजाननराव उर्फ बाबूराव साठे या द्वयीने १९२०-२२ च्या सुमारांस घरगुती उद्योग या स्वरूपांत बिस्किटें बनवण्यास सुरवात केली. हा उद्योग त्या काळच्या "स्वदेशी"च्या जमान्यात चांगला चालू लागल्यानें दुसऱ्या महायुद्धाच्या थोडेसेच आधी बाबूराव साठे उद्योग वाढवण्याकरता युरोपांत यंत्रसामुग्रीच्या शोधात गेले असताना त्यांना काही जुनी चॉकोलेट बनवण्याची यंत्र सामुग्रीही मिळवता आली आणि ती वापरून तसेच योग्य ते प्रयोग करून "साठे बिस्किटें, कोको व चॉकोलेट" यांनी त्याकाळच्या मुख्यतः परदेशी कंपन्यांशी बऱ्यापैकी टक्कर दिली. दुसऱ्या महायुद्धाच्या टंचाईच्या काळांत देखील त्यांना सैन्याला बिस्किटें व चॉकोलेट पुरवण्याची कंत्राटे मिळाल्याने (आणि त्यामुळे कच्चा माल मिळवणे सोपे झाल्याने) उद्योग तगवता आणि वाढवता आला. जरी कराचीला नवीन कारखाना काढण्याच्या नादांत थोडी खोट आली तरी १९४९ साली जेव्हा साठे कुटुंबाचा उद्योग "मर्यादित कंपनी" च्या रूपांत बदलला गेला तेव्हा या उद्योगाचे भांडवल रुपये २० लाख झाले होते (की जी त्या काळांत एक मोठी रक्कम होती). कौटुंबिक कलह आणि तुटपुंजे भांडवल यामुळे सध्या तरी ही कंपनी आसन्नमरण अवस्थेत नांवापुरतीच अस्तित्वांत आहे. चॉकोलेट बनवणाऱ्या इतर भारतीय नावांपैकी Dr Writers आणि CAMPCO नगण्यच असल्याने अमूल हे एकच भारतीय नांव म्हणण्यासारखे शिल्लक आहे (बाजाराचा १०% हिस्सा) आणि Mondelez/Cadbury खेरीज Nestle' सारखी इतर परदेशी नावे जोरात आहेत. Mondelez/Cadbury ला प्रतिस्पर्ध्यांखेरीज चॉकलेटमध्ये आळ्या सापडणे, टॅक्स चुकवण्याची धडपड अशासारख्या खऱ्या खोट्या आरोपांनाही तोंड द्यावे लागले. Nestle' तसेच Mondelez/Cadbury आता भारतातील अनेक ठिकाणी चॉकलेट आणि तत्सम पदार्थ बनवतात आणि त्यांची निर्यातही करतात.
आधी लिहिलेच आहे की Cocoa beans च्या जागतिक उत्पादनापैकी ४५% उत्पादन आयव्हरी कोस्ट मधून तर २०% घानामधून मिळते पण त्याकरता या दोन्ही देशात मिळून सुमारे २३ लाख अल्पवयीन मुले (आयव्हरी कोस्ट: १३ लाख; घाना:१० लाख) शिक्षण सोडून Cocoa च्या शेतीत काम करतात. हे दोन्ही देश आणि आजूबाजूच्या इतरही देशातून, ही अल्पवयीन (१७ वर्षे किंवा त्याखालील वयाची) मुले कधी आई वडिलांच्या संमतीने तर कधी तशीच, गरिबीला कंटाळून पोट भरण्याकरता आपले गांव आणि घरदार सोडून मिळेल ते काम शोधत Cocoa च्या शेतीत काम करू लागतात. या सगळ्याच देशांत उपजीविकेची साधने मिळणे (अल्पवयीन मुलांमुलींनाच नव्हे तर सज्ञानानांही) कठीण असल्याने मिळेल ते काम आणि पडेल तशी जबाबदारी घ्यावी लागते. या मुलांमुलींना कोयत्यासारख्या तीक्ष्ण आणि धारदार लोखंडी पात्यांनी (machete) Cocoa ची फळे फोडून गर काढणे, अशाच पात्यांनी झाडांच्या फांद्या तोडणे, गर किंवा फळे भरलेली अवजड पोती वाहून नेणे, जंतुनाशके फवारणे, टरफले जमा करणे आणि जाळणे अशासारखी त्यांच्या वयाच्या मानाने बरीच धोकादायक आणि कष्टमय कामेही करावी लागतात. त्यामुळे अशा अल्पवयीन मुलामुलींची जरी काही काळ पोटाची काळजी मिटली तरी त्यातल्या बऱ्याच जणांना लोखंडी पात्यांनी (machete) जखमा होणे, अवजड वजने वाहून नेल्यामुळे मान किंवा पाठ दुखावणे, टरफले जाळताना भाजणे, फवारतांना जंतुनाशके नाकातोंडात गेल्यामुळे श्वसनसंस्थेचे रोग होणे अशा अनेक - आयुष्यभर देखील त्रास देणाऱ्या- व्याधींची शिकार व्हावे लागते.
जगभरातल्या cocoa ची झाडे जोपासणाऱ्या लोकांना cocoa powder किंवा cocoa च्या बिया विकत घेणारे व्यापारी जी किंमत देतात ती जेमतेम त्यांचे आणि कुटुंबाचे पोट भरू शकण्यापुरतीच असते आणि म्हणून असे बरेच लोक राहणीमानाच्या दृष्टीने जेमतेम दारिद्र्यरेषेच्या वर असतात. त्यांना त्यामुळे स्वस्तातले मजूर म्हणून स्वतःची मुलेबाळे तर वापरावी लागतातच पण इतरही जो कोणी कामाच्या शोधात त्यांच्या दाराशी पोचतो त्याला पोटावारी राबवता आले तर ते त्यांना हवेच असते. स्वतःचे घरदार सोडून पोटाकरता बाहेर पडलेल्या मुलांमुलींना फारसा पर्याय नसल्याने cocoa च्या मळ्यांत पडेल ते कष्टाचे/धोक्याचे काम करावे लागते. जरा इतर बरे काम मिळाल्यामुळे, अपघातामुळे किंवा आणखी काहीही कारणामुळे जेव्हा त्यांना बाहेर पडण्याची वेळ येते तेव्हा इतर कोणी तरी तितकाच गरजू त्यांची जागा घेण्यास तयार असतोच. कांही वेळा अशीच परिस्थिती वयाने जास्त असलेल्या कामगारांना देखील अनुभवावी लागते. पोटाकरता घराबाहेर पडलेल्या अल्पवयीन मुलांमुलींना आधीच शिक्षणाला रामराम ठोकावा लागतो आणि त्यानंतरच्या आयुष्यातदेखील फारसे पर्याय उपलब्ध नसल्याने गरिबीच्या दलदलीतून कधी बाहेरच पडता येत नाही. बरेच cocoa ची झाडे जोपासणारे देखील फारसे वेगळ्या परिस्थितीत नसतात. आणि हे आवर्त अनेक दशके चालूच आहे. चांचणी म्हणून वार्ताहरांनी जेव्हा आयव्हरी कोस्ट आणि घानामधल्या cocoa ची झाडे जोपासणाऱ्याना वेष्टनातील चॉकलेट दाखवून ते आवडते कां असे विचारले तेव्हा ते त्यांनी आधी कधी पाहिलेही नव्हते हे दिसले,ते चाखलेले असणे किंवा आवडणे तर दूरच!
आयव्हरी कोस्ट आणि घानामधील Cocoa च्या शेतीत काम करणाऱ्या अशा अल्पवयीन मुलांच्या दयनीय परिस्थितीकडे हार्किन आणि एन्गेल या संयुक्त अमेरिकेतील राजकीय नेत्यांचे लक्ष गेल्यावर त्यांनी पुढाकार घेऊन या प्रश्नाशी संबंधित अशा सर्व पक्षांशी विचारविनिमय करून आणि सगळी परिस्थिती लक्षांत घेऊन सर्वानुमते अशा अल्पवयीन मुलांच्या संख्येत घट होण्याकरता एक कार्यक्रम आखला. इ.स. २००० साली आखलेल्या या कार्यक्रमानुसार वेगवेगळ्या पद्धतीने (शेतकऱ्याची उत्पादकता वाढवणे, अल्पवयीन मुलांना काम न देण्याबाबतच्या कायद्यांचे पालन होत असण्याबद्दल पाहणी करून योग्य ती उपाय योजना करत रहाणे, काम करण्याच्या पद्धतीत सुरक्षिततेच्या दृष्टीने बदल करणे इ.इ.) इ.स. २००५ सालापर्यंत Cocoa च्या शेतीत काम करणाऱ्या अल्पवयीन मुलांची संख्या १५ लाखांनी कमी करण्याचे उद्दिष्ट ठरवले गेले.
या कार्यक्रमाचा भाग म्हणून १० मोठ्या चॉकलेट बनवणाऱ्या कंपन्यांनी CocoaAction या नावाखाली एकत्र काम करायचे ठरवले आणि त्याखेरीज इतर मोठ्या कंपन्यांनी आपापल्या कार्यक्षेत्रांत काय करता येईल याचा आपला कार्यक्रम बनवला. अशा कार्यक्रमांना झोकदार नांवे मिळाली (Nestle':
Cocoa Plan; Mondelez: Cocoa Life; Hershey: Twentyfirst Century Plan). आयव्हरी कोस्ट आणि घानामधील सरकारी यंत्रणा, ILO सारख्या जागतिक संस्था असे संबंधित क्षेत्रातील अतिरथी आणि महारथीदेखील या कार्यक्रमांत सामील झाले. या कार्यक्रमांत वार्षिक खर्च (अमेरिकन) डॉलर ५० कोटीपेक्षा जास्त होतो.
"गरिबी हटाओ" बद्दल सल्ला देता देता जसे अनेक (श्रीमंत) सल्लागार कमाई करून जातात पण गरिबीच्या विळख्यातली बिचारी प्रजा जास्तच गरीब होत रहाते तसेच या कार्यक्रमाचे उद्दिष्ट म्हणून ठरवलेली अल्पवयीन मुलांची संख्या १५ लाखांनी कमी करण्याची कालमर्यादा प्रथम इ.स. २००५ पासून इ.स. २००८ सालापर्यंत पुढे ढकलली गेली आणि त्यानंतर अनेक "वास्तववादी कारणांमुळे" पुढे ढकलता ढकलता आता ही कालमर्यादा इ.स. २०२० ठरली आहे. दरम्यानच्या काळांत ही संख्या कमी होण्या ऐवजी वाढतच आहे. अल्पवयीन मुलांना राबवण्याबद्दल कायद्याने कितीही बंधने घातली किंवा प्रबोधन केले तरी जोपर्यंत गरिबीवर विजय मिळवला जात नाही आणि जोपर्यंत घर सोडल्याखेरीज पोट भरणे अनेक अल्पवयीन मुलांना शक्य होत नाहीं तोपर्यंत अल्पवयीन मुलांची संख्या मोठ्या प्रमाणांत कमी होण्याची आशा करणे अवास्तव होईल उलट प्रत्यक्षांत ही संख्या वाढतेच आहे. त्यात भर म्हणून आयव्हरी कोस्ट आणि घानातल्या cocoa ची झाडे जोपासणाऱ्या लोकांना, ते स्वतः जेमतेम दारिद्र्यरेषेच्या वर असल्यामुळे नवी झाडे स्वतः लावणे आणि वाढवणे परवडत नसल्यानें चॉकलेट बनवणाऱ्या कंपन्यांनी चालवलेल्या "रोप वाटिके"तून रोपें मिळवावी लागतात. अशी रोपें घेतल्यामुळें त्यापासून कांही वर्षांनंतर मिळणाऱ्या cocoa च्या बिया विकतांना ज्यांच्याकडून रोपें मिळवली त्यांनाच बिया विकण्याचे बंधन असते का हे अर्थातच संदिग्ध असावे. या अल्पवयीन मुलांच्या "तस्करी"मध्येअनेक "विशेष संबंध" गुंतलेले असल्यामुळेदेखील - उदा. इतर देशातून काम शोधत आयव्हरी कोस्ट आणि घानात शिरू पहाणाऱ्या मुलांना "मदत" म्हणून सरहद्द पार करून नोकरांच्या शोधात असलेल्या cocoa च्या शेतकऱ्यापर्यंत पोचवले जाते - त्यांची संख्या कमी होत नसावी असाही एक अंदाज आहे.
चॉकलेटला मिळणाऱ्या किंमतीतील फक्त ३.२% cocoa च्या शेतकऱ्याला मिळतात असा अंदाज आहे. त्याला त्याच्या cocoa च्या बियांकरता वाजवी किंमत मिळावी याकरता सुरू झालेली FAIR TRADE मोहीम फारसा जोर धरू शकलेली नाही.
मराठी बोलणाऱ्या मुलुखात अनेक दशके "असावा सुंदर चॉकलेटचा बंगला" हे बालगीत बालमनावर राज्य करून आहे - पण खरोखरच आहे कां सुंदर हा चॉकलेटचा बंगला?
अधिक माहितीकरता पहा:
http://fortune.com/big-chocolate-child-labor/
https://www.youtube.com/watch?v=15dJwA-xaVA The Dark Side Of Chocolate (Full Documentary)
https://www.youtube.com/watch?v=KXWFXeIZY9g
https://en.wikipedia.org/wiki/Fair_trade_cocoa
https://www.youtube.com/watch?v=woAG4tp90Dc
https://www.swissinfo.ch/eng/sweet-crop_swiss-chocolate-opens-doors-for-...
http://stopchildlabor.org/?p=4302
https://www.chocolatiers.co.uk/blogs/guides/56415365-indian-cacao
http://fortune.com/2016/01/11/nestle-supreme-court-child-slavery/?iid=sr...
http://blog.oup.com/2015/02/economics-chocolate/
https://www.linkedin.com/pulse/in-depth-look-american-chocolate-industry...
http://www.thesociologicalcinema.com/videos/child-slavery-in-the-chocola...
https://www.nestleprofessional.com/uk/en/SiteArticles/Pages/History_of_C...
http://google.com/newsstand/s/CBIw0_LDrDo
https://books.google.com/books?id=EqIQbwHYn-AC&pg=PA512&lpg=PA512&dq=Row...
http://news.bbc.co.uk/2/hi/uk_news/magazine/8467833.stm
http://www.business-standard.com/article/specials/power-struggle-at-sath...
http://madhavgokhale.blogspot.in/2008/10/aadhich-pune-guljar-tyat-udya-a...
http://www.business-standard.com/article/specials/power-struggle-at-sath...
http://shodhganga.inflibnet.ac.in/bitstream/10603/3226/12/12_chapter%204...
https://dev.epw.in/kn/system/files/pdf/1949_1/17/control_over_spending_a...
http://www.chocolatewrappers.info/Asie/Indie/ins66sathe.jpg
http://shodhganga.inflibnet.ac.in/bitstream/10603/55526/16/16_appendices...
http://photos1.blogger.com/blogger/6403/1156/1600/Sathe.jpg
http://www.chocolatewrappers.info/list.htm
http://www.bloomberg.com/news/features/2016-05-05/nestl-s-sugar-empire-i...
http://archive.fortune.com/2011/04/01/news/companies/nestle_brabeck_medi...
http://www.ibtimes.com/chocolate-shortage-may-lead-disappearance-within-...
https://www.express.co.uk/news/science/899114/chocolate-shortage-cocoa-b...
https://www.candyindustry.com/articles/86878-world-cocoa-foundation-weig...
https://www.barry-callebaut.com/sustainability/ethical-sourcing-business...
https://www.cocoalife.org/in-the-cocoa-origins/a-story-on-addressing-chi...
https://www.cocoalife.org/~/media/CocoaLife/en/download//article/EXEC_SU...
http://www.worldcocoafoundation.org/category/news-media/
http://www.worldcocoafoundation.org/sustainable-solutions-at-the-base-of...
https://www.amanochocolate.com/faqs/why-does-chocolate-make-people-happy/
http://www.expo2015.org/magazine/en/economy/the-biggest-chocolate-produc...
https://www.icco.org/about-cocoa/chocolate-industry.html
https://www.slideshare.net/hoshedar23/indian-chocolate-industry-analysis...
https://books.google.com/books?id=EqIQbwHYn-AC&pg=PA512&lpg=PA512&dq=Row...
http://archive.indianexpress.com/news/chocolate-wrapper-tales/465174/
https://www.indiatoday.in/magazine/economy/story/19880415-as-competition...
https://watermark.silverchair.com/4w08t0s2057.pdf?token=AQECAHi208BE49Oo...
https://dev.epw.in/kn/system/files/pdf/1949_1/17/control_over_spending_a...
https://www.nestle.in/nhw/nutrition-basics/foods/chocolate
http://shodhganga.inflibnet.ac.in/bitstream/10603/3226/12/12_chapter%204...
https://www.slideshare.net/hoshedar23/indian-chocolate-industry-analysis...
http://www.business-standard.com/article/companies/amul-s-epic-ice-cream...
https://www.thenational.ae/business/cadbury-is-a-lone-success-where-indi...
https://www.icco.org/about-us/international-cocoa-agreements/cat_view/30...
https://www.amanochocolate.com/faqs/why-does-chocolate-make-people-happy/
https://cocoatrait.com/blog/
https://www.chocolatiers.co.uk/blogs/guides/56415365-indian-cacao
http://www.expo2015.org/magazine/en/taste/from-libido-to-rashes--the-che...
https://www.nestle.in/nhw/nutrition-basics/foods/chocolate
प्रतिक्रिया
20 May 2018 - 4:31 am | एस
आफ्रिका-लॅटिन अमेरिका इत्यादी भागातील नैसर्गिक साधनसंपत्ती ही तिथल्या लहान मुलांसाठी वरदान आहे की शाप हा प्रश्न कुणाही सुजाण नागरिकाला अस्वस्थ करणारा आहे. ब्लड डायमंडचेही उदाहरण या कोकोच्या झाडांप्रमाणेच म्हणावे लागेल.
लेख थोडा क्लिष्ट भाषेत लिहिल्यासारखा वाटला. परंतु या विषयावर मराठीत लेखन होणे गरजेचे आहे. पुभाप्र.
20 May 2018 - 6:39 am | शेखरमोघे
बर्याच वेळा इन्ग्रजी चुकवताना अणि फार तात्विक लिहिताना भाषा क्लिष्ट होते खरी! त्या करता पुन्हा पुन्हा वाचून जास्त साफसफाई करता आल्यास कदाचित परिस्थिती सुधारेल. लक्षात आणून दिल्याबद्दल आभार.
20 May 2018 - 6:39 am | शेखरमोघे
बर्याच वेळा इन्ग्रजी चुकवताना अणि फार तात्विक लिहिताना भाषा क्लिष्ट होते खरी! त्या करता पुन्हा पुन्हा वाचून जास्त साफसफाई करता आल्यास कदाचित परिस्थिती सुधारेल. लक्षात आणून दिल्याबद्दल आभार.
20 May 2018 - 6:39 am | शेखरमोघे
बर्याच वेळा इन्ग्रजी चुकवताना अणि फार तात्विक लिहिताना भाषा क्लिष्ट होते खरी! त्या करता पुन्हा पुन्हा वाचून जास्त साफसफाई करता आल्यास कदाचित परिस्थिती सुधारेल. लक्षात आणून दिल्याबद्दल आभार.
20 May 2018 - 6:39 am | शेखरमोघे
बर्याच वेळा इन्ग्रजी चुकवताना अणि फार तात्विक लिहिताना भाषा क्लिष्ट होते खरी! त्या करता पुन्हा पुन्हा वाचून जास्त साफसफाई करता आल्यास कदाचित परिस्थिती सुधारेल. लक्षात आणून दिल्याबद्दल आभार.
20 May 2018 - 6:43 am | शेखरमोघे
आणि थोडासा अपुर्या तन्त्रज्ञानाचा ही परिणाम - आता हेच पहा एकदा द्यायचा प्रतिसाद, पण कसा कुणास ठाऊक, अनेक वेळा दिला गेला. : O))
20 May 2018 - 7:43 am | शाली
अरे वा! हे तर फारच रोचक व माहितीपुर्ण आहे. चॉकलेटविषयी ईतके? मस्त.
आता अगोदरचे भाग वाचने आलेच. मी एकही वाचला नाहीए. मस्तच.
20 May 2018 - 11:59 am | कुमार१
पण खरोखरच आहे कां सुंदर हा चॉकलेटचा बंगला?>≥>+ ११
20 May 2018 - 2:08 pm | manguu@mail.com
शेतकरी ग्रास रूट लेव्हलला असल्याने वंचित रहातो
20 May 2018 - 8:43 pm | आनन्दा
कायप्पा वर टाकू का हो? अर्थात तुमच्या नावासकट
लेख आवडला आहेच.
20 May 2018 - 11:10 pm | शेखरमोघे
जरूर टाका. अर्थात नावासकट.