मिपावर लेखन करण्यासाठी काही पर्याय दिलेले आहेत. मला प्रश्न विचारायचे असल्याने मी, प्रश्नोत्तरे हा पर्याय निवडला असता खालील प्रमाणे मेसेज येतो.
You are not authorized to access this page.
हा मेसेज फक्त मलाच दिसतो की इतरही मिपा सदस्यांना येतो?
का ठरावीक सदस्यांसाठीच ही सुविधा आहे?
गेल्या वर्षी डिसेंबर अखेरीस फुड फोटोग्राफीसाठी मीपा स्पर्धा आयोजकांनी प्रवेशिका मागितल्या होत्या. चार महिने होऊन गेले अद्याप फूड फोटोग्राफी स्पर्धेचे फोटो प्रदर्शित केले गेले नाही. स्पर्धा आयोजकांना स्पर्धेच्या धाग्यावर अधून मधून ह्याबद्दल विचारणा केली ,तरी अद्याप खुलासा केला गेला नाही.
मी अद्याप कधीही फूड फोटोग्राफी केलेली नाही, परंतू ह्यातील दिग्गजांची फूड फोटोग्राफी बघण्यास उत्सुक होतो. एकदाचे स्पर्धा आयोजकांनी खुलासा करावा, उगाच आशेवर ठेवू नका, ही नम्र विनंती.
प्रतिक्रिया
9 May 2018 - 3:41 pm | एस
१. होय.
२. छायाचित्रण स्पर्धा क्र. १८ च्या प्रवेशिकांबाबत असंख्य तांत्रिक अडचणी आल्या. त्या वेळेत दूर करू शकलो नाही याबद्दल सासंतर्फे खेद व्यक्त करतो. ज्या सदस्यांनी पाठवलेल्या प्रतिमा दिसत नाहीत किंवा ऍक्सेस करता येत नाहीत अशांना पुनरेकवार प्रवेशिका साहित्य संपादक यांना व्यनिने पाठवाव्यात आणि प्रतिमा सर्वांना दिसतील (पब्लिक ऍक्सेस दिलेला असेल) याची खातरी करून व्यनिमध्ये एम्बेड करून पाठवावी अशी विनंती. (आपण नेहमी प्रतिसादात किंवा धाग्यात प्रतिमा एम्बेड करतो तशा पद्धतीने). तसे व्यनि सर्वांना लवकरच पाठवू. आता मतदान घेण्यात अर्थ नाही; पण सर्व प्रवेशिका सदस्यांच्या नावाने एकत्र प्रकाशित करू असे विचाराधीन आहे.
9 May 2018 - 4:02 pm | मार्मिक गोडसे
सध्या ज्या सदस्यांच्या प्रतिमा दिसत आहेत,त्या प्रकाशित करा. ज्यांच्या प्रतिमा दिसत नाही, ते प्रतिसादात प्रकाशित करतील. असेही मतदान होणार नसल्याने त्यात अडचण येणार नाही.