पुस्तक परिचय : इस्रायलची मोसाद

सटकाजी's picture
सटकाजी in जनातलं, मनातलं
4 Apr 2018 - 4:36 pm

नाव : इस्रायलची मोसाद
लेखक : पंकज कालुवाला
प्रकाशक : परम मित्र पब्लिकेशन

'गुप्तचर यंत्रणा' , एखाद्या साम्राज्याचा किंवा देशाचा अविभाज्य घटक. या विषयाबाबत जनमानसांत प्रचंड कुतूहल असले तरी नावाप्रमाणे गुप्तपणे कार्यरत असलेल्या 'गुप्तचर विभागावर' तुलनेने लिखाण कमी झाले आहे. बऱ्याच काळापासून 'ज्यू' समाज कायम चर्चेत राहत आला आहे. दुसऱ्या महायुद्धात हिटलरने केलेला 'ज्यू' हत्याकांडानंतर सावरलेल्या लोकांनी 'इस्राईल' देशाची स्थापना केली.
__________________________________

'इस्राईल' जगाच्या नकाशावर पाहिल्यास चटकन लक्षात येईल की, बलाढ्य अरबी शत्रूराष्ट्रांच्या , दहशदवाद्यांच्या गराड्यात इस्राईल छाती ठोकून उभं आहे.इस्राईलला हे शक्य झाले ते त्यांच्याकडे असलेल्या 'मोसाद' सारख्या प्रभावी गुप्तचर यंत्रणेमुळे. आणि हाच विषय हाती घेऊन 'पंकज कालुवाला' यांनी अभ्यासक वृत्तीने 'मोसादचा' आढावा घेतला आहे. मुठभर देशाची चिमुटभर संघटना हे 'मोसाद' चे खरे स्वरूप. मात्र जगभरात केलेल्या गुप्त कारवाया प्रचंड विलक्षण आहेत.
__________________________________

इस्रायलची मोसाद

पुस्तकाची सुरवात होते 'ज्यू' लोकांच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीने. 'ज्यू' संस्थापक 'अब्राहम' पासून दुसऱ्या महायुद्धानंतर झालेल्या इस्राईलच्या आणि मोसादच्या स्थापनेपर्यंतचा प्रवास अत्यंत वाचनीय आहे.परंतु पुस्तकाला मूळ सुरवात होते 'मोसादच्या कारवायांपासून (Operations), जो या पुस्तकाचा मूळ गाभा आहे. पुढे तब्बल २६ ऑपरेशन्सचा प्रवास वाचताना वाचक नक्कीच थक्क होतील अशी पंकज यांची लेखनशैली. ऑपरेशन थीफ, ऑपरेशन इंजिनियर , ऑपरेशन टायगर क्लब, ऑपरेशन ओपेरा अशा प्रचंड थ्रीलर प्रवासात मोसादबद्दल प्रचंड आदर मनात तयार होतो.
__________________________________

पुस्तकातील एका ऑपरेशनचा मुद्दाम उल्लेख करावासा वाटतो तो म्हणजे 'ब्लैक सप्टेंबर विरुद्ध मोसाद' , १९७२ साली ऑलंपिक खेळांचे आयोजन जर्मनीतील 'म्युनिक' शहरात करण्यात आले होते. यात इस्राईल खेळाडूंचादेखील सहभाग होता. इस्राईलला कट्टर शत्रू मानणाऱ्या पेलेस्टाइन दहशदवादी संघटना 'ब्लैक सप्टेंबर' ने २२ इस्राईल खेळाडूंवर आक्रमण करून त्यांना ओलीस ठेवले , काहींना ठार मारले.संपूर्ण देश या घटनेने हळहळला. परंतु काही दिवसातच मोसादने या घटनेच्या सूत्रधारांची यादी केली. तब्बल १० वर्षात या संघटनेशी संबधित एकेकाला यमसदनी धाडले आणि संपूर्ण जगात मोसादबद्दलचा आदरपूर्वक दबदबा प्रचंड वाढला.

काही पुस्तकं अशी असतात की, वाचायला हातात घेतल्यावर पूर्ण होईपर्यंत ठेवावीशी वाटत नाहीत. अशाच काही पुस्तकांपैकी एक 'इस्राईलची मोसाद' नक्कीच संग्रही असावे.

( मिपा वर माझा हा पहिलाच प्रयत्न , चूकभूल द्यावी घ्यावी )
-सटकाजी

इतिहाससाहित्यिकलेख

प्रतिक्रिया

पुस्तकपरिचय लिहिण्याचा चांगला प्रयत्न आहे. थोडा अजून सविस्तर हवा होता. तसेच या विषयावर ढिगाने उपलब्ध असलेल्या इंग्रजी पुस्तकांच्या तुलनेत या मराठी पुस्तकाचे वाचनमूल्य वेगळे आहे की नाही आणि लेखकाने स्वतः मोसादचा अभ्यास करण्यासाठी काय प्रयत्न केले वगैरेचे विवेचन यायला हवे होते.

पुंबा's picture

4 Apr 2018 - 7:25 pm | पुंबा

++११
चार पुस्तके वाचली आणि पाचवे लिहिले असे स्वरूप नसेल तर वाचायला आवडेल. परिक्षण त्रोटक असले तरी एखाद्या अगदीच विषयाशी अनभिज्ञ असणार्‍यास कुतुहल वाटेल अशी शक्यता निर्माण होण्यासारखे वाटले.
चरफडः मोस्सादचा नवा भाग घेऊन बोकाशेठ कधी येणार काय माहित..

असेच म्हणतो.......
बोकाशेठ, अहो बोकाशेठ... वाचताय ना?
"मोसाद" चे पुढ्चे भाग येउद्या कि हो लवकर्!!

स्पार्टाकस's picture

4 Apr 2018 - 8:23 pm | स्पार्टाकस

हे पुस्तक माझ्या संग्रही आहे.
पंकज कालुवालाचंच राजकीय हत्या हे पुस्तकंही खूप सुंदर आहे.

जेम्स वांड's picture

4 Apr 2018 - 10:02 pm | जेम्स वांड

मोसाद, असो!

नीलकांत's picture

5 Apr 2018 - 12:16 am | नीलकांत

पुस्तक परिक्षण आवडले. थोडे अधिक विस्तारात असते तर मजा आली असती. आपले मिपाकर बोका ए आझम यांनी मोसादवर एक लेखमाला केली आहे. ती तुम्ही येथे वाचू शकता.

तुम्ही उल्लेख केला त्या ऑपरेशनवर म्युनिक नावाचा एक जबरा सिनेमा येऊन गेला. जमल्यास नक्की बघा. मोसादचा उल्लेख आणि ऑपरेशन अ‍ॅन्टोबीचा उल्लेख नसेल असं कसं होईल? इदी अमीनच्या घश्यातून त्यांनी त्यांचं विमान परत नेलंय. तेही केवळ एक कमांडो घालवून. मोसाद वाचणे म्हणजे थरार असतो नुसता.

हे पहिलं लेखन आहे म्हणताय तर पुढील लेखनासाठी शुभेच्छा. मिपाच्या भाषेत पुलेशु.

पगला गजोधर's picture

5 Apr 2018 - 9:39 am | पगला गजोधर

मिपावरील पहिलं लेखन आहे त्यामुळे पुढील लेखनासाठी शुभेच्छा.
–.....
अवांतर: "हिटलरसुद्धा भावतो व मोसादसुद्धा आवडते", अश्या कन्फ्युजड विचारसरणीतील वाचक, आपल्या लेखांवर कदाचित थोडया वेगळ्या प्रतिक्रिया देतील, तरी तुम्ही केवळ भाषांतर पेक्षा, विविध विचार प्रवाह दृष्टीतून आणखी सखोल जाता येइल तर पहा.

स्वलेकर's picture

24 Apr 2018 - 12:56 pm | स्वलेकर

सद्ध्या हे पुस्तक वाचत आहे. पुस्तकाचि सुरुवात छान आहे. पण नंतर ऑपरेशनचे डटेल फार त्रोटक आहेत. त्यापेक्षा बोका ए आझम ची लेखमाला छान आहे.

जेम्स वांड's picture

6 May 2018 - 9:03 pm | जेम्स वांड

फक्त जितकं बोललं जातं तितकं नाहीये , इतपत मी सांगू शकतो, मोसाद यंव मोसाद त्यांव वगैरे लिहिलेली पुस्तके, आधारग्रंथ वगैरेंपैकी कित्येक तर मोसाद स्वतःच छापून आणते, अर्थात ते गैर नाहीये, किंबहुना इंटेलिजन्स ऑपरेशन्स मधल्या अतिशय उन्नत अन स्पेशालाईज स्कील असणाऱ्या 'सायकॉलॉजिकल वॉरफेयर' मधलं ते एक उत्तम टूल होय, आपल्या क्षमता वाढवून सांगणं, मुद्दाम एक हात लाकूड चार हात ढलपी बातम्या पसरवणे वगैरे नित्याचे अन गरजेचे खेळ असतात, अन इतकी विक्रीयोग्य बोंबाबोंब करता येणे हे पण मोसादच्या यशाच्या गुपितांपैकी एक आहे, भारतीय एजन्सी नेमक्या तिथेच कमी पडतात! बाकी ऑपरेशनल मॅटर मध्ये वगैरे फार काही फरक आहे असे काही नाहीये.

भारतीय गुप्तचर यंत्रणा जाणीवपूर्वक स्वतःला अंडरस्टेटेड ठेवतात. त्यामुळे स्वकीय आणि काही प्रमाणात परकीय जनमानस त्यांना तुच्छ समजत असले तर तो त्यांचा फायदाच असतो. प्रत्यक्षात गुप्तचर जगतात भारतीय गुप्तचरसंस्थांना अतिशय मान आहे.

जेम्स वांड's picture

7 May 2018 - 8:57 am | जेम्स वांड

अतिशय बरोबर बोललात!

गुप्तचर जगतात, केवळ १६ दिवस युद्धाचा परिपाक म्हणून एक अख्खा नवा देश जन्माला घालण्याची किमया अन भयानक कार्य जगात सीआयए अन मोसाद सारख्या बाप लोकांना जमले नसेल तिथे रॉ ने स्थापनेच्या चौथ्या वर्षातच पूर्व पाकिस्तान-बांगलादेश फोडला, वेळेवर आणलेले रॉ चे रिपोर्ट पक्षी पूर्व पाकिस्तानातील नद्या नाले पूल जंगले ह्यांचे सद्यांत नकाशे, मुक्तीबाहिनीला प्रसंगी जीव धोक्यात घालून दिलेली ट्रेनिंग, पुरवलेली शस्त्र असे खूप काही काही झाले होते पडद्यामागे, ह्या 'असेमीट्रीकल युद्धात' न जाणे किती रॉ अधिकाऱ्यांनी कष्टाची परिसीमा गाठली असेल हे आपण फक्त कल्पनाच करू शकतो.

सिक्कीम विलिनीकरण ही पण एक यशोगाथा