(शेती व्यतिरिक्त अनेक कारक आहे, ज्याच्या परिणाम शेती व शेतकर्यांंवर होतो. यावर प्रकाश टाकण्यासाठी हा उपद्व्याप).
आज दिनांक २५.३.२०१८. दिल्लीत रामलीला मैदानात तथाकथित शेतकर्यांचा हितेशी अण्णा हजारे उपोषणावर बसले आहेत. त्यांची एक हास्यास्पद मागणी ६० वरील शेतकर्याला ५००० रुपये महिना पेन्शन मिळाली पाहिजे. आपल्या देशात अधिकांश शेतकरी अल्पभूधारक आणि पार्ट टाईम शेतकरी आहेत. किमान १० कोटी शेतकरी पेन्शन मागतील. वर्षाचे ६ लाख कोटी कुठून येतील कदाचित अण्णांना हि याचे उत्तर माहित नसेल. दुसरी मांग उत्पादन लागत वर ५० टक्के नफा. कोण ठरविणार आणि कोण विकत घेणार. अण्णा सांगू शकत नाही. त्यांना फक्त चमको नेतागिरी करायची आहे.
आज शेतकरी समस्या म्हणजे, एमएसपी (गहू, धान, डाळी, ऊसाची इत्यादी). वीज माफी, कर्ज माफी. यासाठी धरणे, आंदोलने इत्यादी. कुठल्या हि वस्तूचा भाव 'मांग आणि पूर्ती' चा निर्दयी सिद्धांत ठरवितो. या कठोर सिद्धांताच्या विपरीत जाण्याचा प्रयत्न केला तर भ्रष्टाचार नावाचा दैत्य जन्म घेतो. आपल्या शेतात काय लावायचे हे आज शेतकरी ठरवू शकत नाही. जगात अधिकांश देशांत किमान ३० टक्के शेतमाल प्रसंस्करीत होतो पण आपल्या देशात ७ टक्के हि नाही. शेतकरी शेतातील तैयार माल हि रस्ते,रेल्वे व वीज नसल्याने शीघ्र दूरवर पाठवू शकत नाही. दुसरे काही लावले तर योग्य भाव मिळणार नाही. मजबूरीने शेतकरी अत्यंत कमी पाऊस येणाऱ्या भागात हि जमिनीतून खोलवरून पाणी काढून ऊस, धान आणि गहू इत्यादी लावतो. परिणाम भरलेल्या गोदामांमध्ये गहू, तांदूळ सडतो आणि साखर कारखान्यांना सरकारी अनुदान मिळतात, कर्ज माफी मिळते. मोठे घोटाळे होतात. परिणाम महाराष्ट्रात अनेक साखर सम्राट कोट्याधीश झाले व नेता हि झाले. स्वयंभू शेतकरी नेता हि आमदार आणि खासदार झाले.
शेती असो व उद्योग. रस्ते, रेल्वे आणि वीज या पायाभूत सुविधा दाराशी पोहचल्या पाहिजे. तीव्र्गतीने शेतमाल असो किंवा औद्योगिक माल एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी पोहचला पाहिजे. आज एका ठिकाणी शेतकरी टमाटर, गोबी इत्यादी रस्त्यावर फेकतो किंवा शेतातच नांगर फिरवितो तर दुसरीकडे दिल्ली मुंबईत ग्राहकला तीच वस्तू ५० रुपये किलोच्या कमी भेटत नाही. कारण १००० किमी जायला ट्रकला किमान २-३ दिवस लागतात. रेल्वे वर एवढा ओझे आहे कि मालगाड्या दिवसातून १५० किमी हि चालत नाही. दुसरी कडे अमेरिकेत केलिफोर्नियाहून भाज्यांची गाडी न्युयॉर्क पर्यंत जाते. आपले दुर्भाग्य या स्वतंत्रता प्राप्त झाल्यावर अधिकांश सरकारांनी या बाबतीत जास्त लक्ष दिले नाही.
भूतपूर्व प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी सरकारला सर्वप्रथम पायाभूत सुविधांच्या महत्वााची जाणीव झाली. सर्वप्रथम ग्रामीण रस्ते बनविण्याचे कार्य प्रधानमंत्री ग्रामीण योजनेच्या अखत्यारीत आणलें. आज लाखो किमी ग्रामीण रस्ते या योजने अंतर्गत बनले आहे. देशातील रस्त्यांना जोडण्यासाठी सुवर्ण चतुर्भूज योजनेत कार्य सुरु केले. रस्त्यांचे रुंदी कारण हि सुरु झाले. मालगाड्यांसाठी स्पेशल कारीडोर परीयोजानेवर कार्य सुरु झाले. सरकार बदलली आणि १० वर्ष रस्ते आणि रेल्वेचे विकास कार्य जवळपास थांबले. कदाचित त्या सरकारच्या प्राथमिकता वेगळ्या होत्या. २०१४ नंतर पुन्हा सरकार बदलली. त्यावेळी ४००च्या वर रस्त्यांचे थांबलेले कार्य पुन्हा सुरु झाले. अनेक राज्य सरकारांच्या अधीन रस्ते अर्थात स्टेट हाईवे NH अंतर्गत आणले. रस्ते रुंद करण्याची गती वाढली. पूर्व -पश्चिम, उत्तर-पश्चिम रेल कारीडोर जोमात कार्य सुरु झालेले आहे. किमान २ कारीडोर पुढील २ वर्षांत पूर्णपणे सुरु होतील. हीच सरकार राहिली तर २०२४ पर्यंत चारी कारीडोर पूर्ण होतील हि आशा करता येईल. महाराष्ट्रातील समृद्धी महामार्ग हि पूर्ण होईल व मध्य महाराष्ट्रात रेल्वे हि पोहचेल. अर्थात हे सर्व झाले तर मालगाडी २४ तासांत १००० किमी व ट्रक हि ७०० ते ८०० किमी गतीने धाऊ शकतील.
गावांत वीज पोहचली पाहिजे आणि २४ तास मिळाली पाहिजे. या बाबतीत हि उदासीनता होती. आता सर्व गांवात वीज पोह्चोविण्याचें कार्य शीघ्र गतीने होते आहे. विजेच्या बाबतीत भारताची रेंक जगात ७२ वरून २६ वर आली. अर्थात सरकार या बाबतीत निश्चितच गंभीर आहे. २४ तांस ग्रामीण भागात वीज मिळाली पाहिजे या कडे सरकारने अधिक गंभीरपणे लक्ष देण्याची अजून आवश्यकता आहे. वीज असेल तर ग्रामीण भागात शीतगृहे उभारता येतील. त्या शिवाय खाद्य प्रसंस्करण उद्योग विशेषकरून छोटे व शेतकर्याने स्थापित केलेले उभे राहू शकत नाही. शेतकर्यांचे वीजेचे माफ करण्या एवजी स्वस्तात सोलर सयंत्र ग्रामीण भागात पुरविले पाहिजे. जेणेकरून शेतकरी वीजेच्या बाबतीत परावलंबी राहणार नाही.
या पायाभूत सुविधांचा शेतकर्यांना फायदा कसा होणार.हा प्रश्न येणारच. शेतकरी आपला शेतमाल कमी खर्चांत जास्त दूर पाठवू शकतो. रस्ता वीज असेल तर ग्रामीण भागात हि खाद्य प्रसंस्करण उद्योग लागतील. शेतकरी आधी भाव ठरवेल आणि मग शेतात बियाणे पेरेल. एमएसपीची गरज भासणार नाही. आज रस्त्यांची आणी वीजेची समस्या काही अंशी दूर झाल्याने देशात खरोखर फूडपार्क निर्मित होऊ लागले आहेत. तेजपूर आसाम सारख्या जागी हि एक फूडपार्क सुरु झाला आहे. विदर्भात हि नागपूर येथे देशातील सर्वात मोठा फूडपार्क बहुतेक याच वर्षी सुरु होईल. अनेक देशी-विदेशी मोठ्या कंपन्या व अनेक छोट्या कंपन्या, शेतकरी समूह हि खाद्य प्रसंस्करण उद्योगात उतरत आहे. फ्रेट कारीडोर पूर्ण झाल्यावर या उद्योगाला अधिक गती मिळेल. या शिवाय मोठ्या शहरांच्या ५०० किमी परीधीत राहणारा शेतकरी हि शेतातच भाजी-पाला धुऊन चिरून शहरी ग्राहकांना पाठवू लागतील. यात शेतकरी आणि ग्राहक दोघांचा फायदा होईल.
आपले दुर्भाग्य स्वत:ला शेतकर्यांचे हितैषी समजणारे, राजू शेट्टी सारखे शेतकरी नेता असो, मुंबईत शेतकरी मोर्चा काढणारे असो किंवा अण्णा हजारे यांच्या मुखातून पायाभूत सुविधांबाबत एक हि शब्द निघालेला मी ऐकला नाही. अर्थात यांना शेतकर्यांशी काही हि सरोकार नाही.
प्रतिक्रिया
10 Apr 2018 - 4:27 pm | विशुमित
<<<निव्वळ भावनिक कोनातुन बघणे योग्य नाही. मोबदला मागणे एक गोष्ट आहे. मिळणे आजच्या परिस्थितीत शक्य आहे का?>>>
==>> भावनिक वगैरे कोणी आता राहिले नाही आहे. साधा चावी बनवणारा दोन कानस मारण्यासाठी रु.१०० घेतो शेतकऱ्याला ते का शक्य नाही ?
<<<<मधले अडते दलाल यांना बाजूला कसे सारता येईल, त्यांचे महत्त्व कसे कमी करता येईल हे पाहावे लागेल.>>
==>> शेतकऱ्याला ही साखळी तोंडाने परवडणारे नाही आहे. सगळे अडत्यांच्या माथी मारणे हे सोलुशन नाही आहे.
<<<पायाभूत सुविधा, जोडधंदे, शेती आधारित उद्योग यावर जास्त लक्ष दिले तर शेतकऱ्यांना दीर्घ मुदतीचे फायदे होतील.>>
==>> पायाभूत सुविधा- त्या पैकी एक शीत गृह. आजच्या घडीला याची मतेदारी फक्त गुजराथी मारवाड्यांची आणि काही प्रमाणात बड्या जमीनदारांच्या आहे .
जोड धंदे- दगड व्यवसाय सर्वात भारी जोड धंदा होता पण आजच्या घडीला दुधाला भाव नाही आहे. कुकुटपालन मध्ये खूप जोखीम आहे. त्यासाठी खूप मोकळे पटांगण लागते.
शेळीपालन, वराहपालन, शहामृग पालन आणि तत्सम पालन - चार आण्याची कोंबडी बाराण्याचा मसाला सदरात मोडते.
शेती आधारित उद्योग- ३ वर्ष झाले माझे त्यासाठी प्रयत्न चालू आहेत. अजून १० % पण यश नाही आले. (येईल बहुदा ३-४ वर्ष्यात.)
10 Apr 2018 - 4:29 pm | विशुमित
तोंडाने= तोडणे
दगड व्यवसाय== दुग्ध व्यवसाय
10 Apr 2018 - 7:56 pm | सुबोध खरे
https://blogs.timesofindia.indiatimes.com/Swaminomics/farmer-agitations-...
हा लेख मुद्दाम वाचून पहा. यात बऱ्याच गोष्टींचा उहापोह उत्तम तर्हेने केला आहे.
10 Apr 2018 - 4:02 pm | विशुमित
<<< प्रत्येकजण उदरनिर्वाहाचा मार्ग स्वतच्या क्षमतेनुसार व आवडीनुसार स्वताच निवडत असतो. त्यातील फायद्यातोट्ाचा विचार करुनच.>>>
==>> ज्याला शेती आहे त्याच्यासाठी हा निर्णय घेणे थोडे अवघड आहे. ज्याला वावार हाय त्याला माझे म्हणणे लगेच समजेल.
10 Apr 2018 - 4:40 pm | श्वेता२४
एकिकडे शेतकऱ्यांनी त्याने पिकवलेल्या माला चा रास्त मोबदला मागितला म्हणून काय झाले ? भले तो दयनीय शेतकरी असो किंवा यशस्वी शेतकरी. असे म्हणता व दुसरीकडे मधल्या दलालांची साखळी उच्चाटन करणे, तसेच शेतकऱ्यांना थेट शेतीमाल विकता येईल अशई व्यवस्था करणे.>>
==>> रोगा पेक्षा इलाज महाभयंकर वाटतो.
शेतकऱ्यांचा मधल्या साखळी वरती सुद्धा जास्त आक्षेप नाही आहे. तेच खरे डिस्ट्रीबुट करतात शेत मालाला. त्यांची जोखीम सुद्धा मान्य केली पाहिजे.
भारतीय शेतकऱ्याचे मूळ काम उत्पादन करणे आहे, मार्केटिंग आणि डिस्ट्रिबुटिंग नव्हे. त्याने ते औटसोअर्स करणेच त्यांच्यासाठी इष्ट आहे.
डिस्ट्रिब्युशन चे काम शेतकऱ्याने हाती घेतले की तो शेती सोडून दलाली सुरु करतो. असेही म्हणता.
मुळात शेतकऱ्याचा फायदा हे मधले लोकच जास्त लाटतात त्यामुळे दुहेरी तोटा होतो. एक म्हणजे शेतकऱ्यांना पुरेसा मोबदला मिळत नाही व ग्राहकांनादेखील जास्त पैसे मोजायला लागतात. तुमही दोन्ही बाजूने बोलत आहात व दोन्ही विधाने विसंगत आहेत.
10 Apr 2018 - 4:43 pm | विशुमित
वरती पैसा ताईंना प्रतिसाद दिला आहे.
19 Apr 2018 - 7:10 pm | विवेकपटाईत
प्रतिसादाबाबत सर्वांना धन्यवाद.
१. या वयात मराठी सुधारणे मला जमणार नाही. दिल्लीत हि तरुण पोर मुझे शब्दाच्या जागी मेरेकू शब्द , वाट लगादी इत्यादी शब्द सहज वापरतात.
२. पायाभूत सुविधा चांगल्या असतील तर शेतकर्याला निर्णय घ्यायला अधिक विकल्प राहतील.
३. सरकारला वोट बँक ची चिंता असते. शहरी ग्राहक आणि मिडियाला महागाई फक्त खाण्या पिण्याच्या वस्तू आणि पेट्रोल डीजेल मध्ये दिसते. ६५ पैसे सिनेमाचे तिकीट ४० वर्षांत ६०० रुपयांचे झाले. कुणी आवाज केला का? तूर्त सरकार खाद्य पदार्थांच्या किमती कमी ठेवण्यासाठी काहीही करू शकते.
४. सरकार msp कर्जमाफी वीज माफी यातच शेतकर्यांना झुलवत ठेवते. हेच करत अनेक पुढारी आमदार खासदार होतात.
५. शेतकर्याला स्वत:ची उन्नत स्वत:च करायची आहे आणि विषम परीस्थित हि मार्ग शोधायचा आहे. एवढेच.
बाकी PMOत १८ वर्ष होतो आता नाही.