गारवा - विडंबन

OBAMA80's picture
OBAMA80 in जे न देखे रवी...
2 Mar 2018 - 6:59 am

माझ्या प्रोफेशनल आयुष्याची सुरूवात ज्या डोंबिवलीमध्ये राहून झाली तेथून सकाळची जलद लोकल पकडणे हे एक मोठ दिव्यच. त्या दिव्य अनुभवावरूनच खालील विडंबनाची कल्पना सुचली. मूळ कवी सौमित्र व गायक मिलींद इंगळे यांची माफी मागून सादर करतो....गारवा चे विडंबन.


मूळ कविता -

गद्य भाग-
ऊन जरा जास्त आहे दर वर्षी वाटतं
भर उन्हात पाउस घेउन...... आभाळ मनात दाटतं

तरी पावलं चालत रहातात ......मन चालत नाही
घामाशिवाय शरीरामध्ये ......कोणीच बोलत नाही
तितक्यात कुठून एक ढग सुर्यासमोर येतो …/2/
उन्हामधला काही भाग पंखान खाली घेतो
वारा उनाड मुलासारखा सैरा वैरा पळत राहतो
पाना फुला झाडावरती छ्परावरती चढून पाहतो

दुपार टळुन संध्याकाळ्चा सुरु होतो पुन्हा खेळ
उन्हामागुन चालत येते गार गार कातर वेळ
चक्क डोळ्यांसमोर ऋतु कुस बदलून घेतो
पावसाआधी ढगान मधे कुठून गारवा येतो......

पद्य भाग-
गारवा...ह्न...ह्न...ह्न...ह्न...गारवा
वाऱ्यावर भिरभिर भिर पारवा नवा नवा
प्रिये.....नभातही चांदवा नवा नवा
गारवा.....
गवतात गाणे झुलते कधीचे /2/
हिरवे किनारे हिरव्या नदीचे /2/
पाण्यावर सर सर सर काजवा नवा नवा
प्रिये.....मनातही काजवा नवा नवा
गारवा.....
आकाश सारे माळून तारे /2/
आता रुपेरी झालेत वारे /2/
अंगभर थर थर थर नाचवा नवा नवा
प्रिये.....तुझा जसा गोडवा नवा नवा
गारवा.....

*******
विडंबन
*******

गद्य भाग विडंबन
गर्दी जरा जास्त आहे दररोज वाटतं
भरगर्दीत धक्के खाऊन... चालण नकोस वाटतं

तरी माणस चालत राहतात....गर्दी संपत नाही
धक्क्यांशिवाय एकमेकांशी ......कोणीच बोलत नाही
तितक्यात कुठून एक लोकल प्लॅटफॉर्मवर येते...../2/
गर्दीमधला काही भाग डब्यांमध्ये भरून घेते
माणसे वेड्यासारखी सैरावरा धावत सुटतात
दार खिडक्या अन टपावरती चढू पाहतात

भोंगा देऊन लोकलचा सुरू होतो पुन्हा प्रवास
लोकल मागून लोकल जाती पण निष्फळ माझे प्रयास
चक्क डोळ्यांसमोर एक जाडा धावत्या गाडीत घुसून जातो
ऑफिससाठी लोकांमध्ये कुठून एवढा जोर येतो......

पद्य भाग विडंबन -
पाठवा...ह्न...ह्न...ह्न...ह्न...पाठवा
डोक्यावर भिरभिर भिर पंखा हवा हवा
“मरे” .......लोकलही पाठवा नव्या नव्या
पाठवा.....

गाडीत आधी लटकती कधीचे /2/
कर्जत नेरळ कसारा कल्याणचे /2/
टपावर सर सर सर चढती....पटा पटा
“मरे” ......लोकलही पाठवा नव्या नव्या
पाठवा.....

स्टेशन सारे भरून गेले /2/
आता जिन्यांवर थांबलेत भले /2/
अंगभर सर सर सर रोजचा....काटा काटा
“मरे” ......लोकलही पाठवा नव्या नव्या
पाठवा.....

हास्यकविताविडंबन

प्रतिक्रिया

चांदणे संदीप's picture

2 Mar 2018 - 3:19 pm | चांदणे संदीप

गद्य भाग तर उत्कृष्टच... पण "नव्या नव्या" काय लयीत म्हणता येईना राव! :(

Sandy

एस's picture

2 Mar 2018 - 5:59 pm | एस

भारी! =))

@ चांदणे संदीप:- आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. जे लयीत बसत होते तेच घातले. तरीपण तुम्हीच सुचवा की काही.

@ एस:- आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.