जागतिक मराठी भाषा गौरव दिन २०१८: अनुक्रमणिका

पैसा's picture
पैसा in जनातलं, मनातलं
28 Feb 2018 - 11:02 am

1
.
.
१)मराठी दिन २०१८ - आधुनिक तत्त्वांवर लिहिलेल्या मराठीच्या पहिल्या कोशाची जन्मकथा : अरविंद कोल्हटकर
.
आजची मराठी भाषा आणि सुशिक्षितांचे लेखी मराठी हे दोन्ही सांप्रतच्या स्वरूपाला येईपर्यंत अनेक वळणातून गेलेले आहे. कृ.पां. कुलकर्णी ह्यांनी म्हटल्याप्रमाणे राज्यव्यवस्थेत बदल हे भाषेतील बदलाचे प्रमुख कारण असते आणि त्यानुसार प्रारंभापासून आजपर्यंत यादवकालीन, बहामनीकालीन, शिवकालीन, पेशवेकालीन आणि आंग्लकालीन अशी मराठीची वेगवेगळी रूपे आपणास दिसतात. (मराठी भाषा - उद्गम व विकास, पृ. १७७). निश्चितपणे मराठी म्हणता येईल अशी भाषा ११-१२व्या शतकांपासून अनेक ठिकाणी शिलालेखांतून आणि नंतर ज्ञानेश्वरीसारख्या ग्रंथांमधून भेटू लागते.
.
---------------------------
२) मराठी दिन २०१८: माले का मालूम भाऊ? (झाडीबोली) : स्वामी संकेतानंद
.
'कोनं बगरवलन बे
माह्या सपनाईचा कचरा?
डुंगा करूनस्यानी ठेवलो होतो
जाराले सोपा जाते.
कोनं बगरवलन बे?'

माले का मालूम भाऊ!
.
----------------------------
३) मराठी दिन २०१८: समोरच्या कोनाड्यात उभी हिंदमाता.... (उखाणे) : नूतन
.
कथा, कादंबऱ्या, काव्य, प्रवासवर्णन, आत्मचरित्र, लघुनिबंध, नाटकं, लोकसाहित्य, समीक्षा इत्यादी विविध प्रकारांचा साजशृंगार चढवून आपली मराठी भाषा सजली आहे, नटली आहे. पण बहुधा फक्त महाराष्ट्रात आणि मराठी संस्कृतीतच आढळणाऱ्या एका प्रथेत सादर होणारा साहित्य प्रकार म्हणजे - शुभप्रसंगी उखाण्यात नाव घेणं. साहित्य प्रकार म्हणून जरी याची विशेष गणना होत नसली, तरीही मराठी भाषेच्या साजशॄंगारातील हा एक छोटासा पण सुबक दागिना.
.
----------------------------
४) मराठी दिन २०१८: टापा (मावळी): भीडस्त
.
सांगायचं म्हनश्यान तं गोश्टि जव्हा आम्हि सम्दि नयतर्नी व्हतो कनि ना त्या टायमाला तव्हाच्या ह्येत. रोज सवसान्चं भाकर खाउन्सनी आम्हि सम्दि गाबडी त्या बाळुनानाच्या बिरडिण्गीमो-हं जमुनसनी टापा झोडित बसायचो. तव्हर आम्च्या आइबापानि काय आम्हा खयसान्ना हाडळि आनुन धिल्या नव्ह्त्या. मंग आम्हाला काय राच्च्याला टायिमच टायिम घावायचा. राच्च्या येकदोन वाजेपोहत टापा चालु र्ह्यायच्या. कुढं याचंच माप काढ , कुढं त्याचीच रेवडि उडव. म्या कॉन्हची जिरावली, मपलि कोन्ह्या जिरावली ह्येच सान्गायच आन आयकायचं काम. निर्हा धिंगुड्शा आसाय्चा. पॉट पार कळा हानित र्हायचं हासुहासू.
.
----------------------------
५) मराठी दिन २०१८: अहिराणी भाषेचा गोडवा: डॉ. सुधीर राजाराम देवरे
.
लोकसाहित्य हे ज्या त्या बोलीभाषेतच सापडते. अहिराणीत लोकसाहित्याचे खूप मोठे भांडार आहे. काही प्रमाणात त्याचे संकलन आज उपलब्ध असले तरी मुळातून अद्याप सर्वत्र वेचले गेलेले नाही.
कोडी, आण्हे, उखाणे, नाव घेणे, म्हणी, वाक्प्रचार, सुभाषिते, गपगफाडां, लोककथा, नीतिकथा, लग्नाची गाणी, ओव्या, जात्यावरच्या ओव्या, लोकगीते, भारूड, झोक्यावरची गाणी, आखाजीची गाणी, बारातल्या शिव्या, सणांची गाणी, खंडोबाची गाणी, तळी भरण्याची गाणी, गौराईची गाणी, गुलाबाईची गाणी, कानबाईची गाणी, आरत्या, थाळीवरची गाणी, डोंगर्‍या देवाची गाणी, टापर्‍या गव्हार्‍याची गाणी, आदिवासी गीतं, भोवाड्याची गाणी, लळीत, गण, गवळण, लावणी, पोवाडा, तमाशा लावणी, खंजिरीवरची गाणी, कापनीची गाणी, शेतातली गाणी, देवीची गाणी, आढीजागरणाची गाणी, भिलाऊ गाणी अशा प्रकारच्या असंख्य विभागात अहिराणी लोकसाहित्य विखुरलेले आहे.

.
------------------------------
६) मराठी दिन २०१८: चला मालनाक! (मालवणी): सुधीर कांदळकर
.
सुस्वागतम. आपल्या मालनाक आपले स्वागत आसां. हुमयसून राष्ट्रीय महामार्ग १७ ने मालनाक येऊचा झालां की पयलो पळस्पा फाट्याक उजवीकडे बळूचा. मगे वडखळ नाक्याऽऽर डाव्यां वळाण घेतलां की आपलो कोकणचो रस्तो लागतां; होच आपलो राष्ट्रीय महामार्ग १७. महाड, खेडचो भरणो नाको, चिपळूण, संगमेश्वर, हातखंबा, लांजा, राजापूर, तळेरे, नांदगांव, कणकवली करान आपण कसालाक इलों की उजवो फाटो सरळ मालनाक.
.
------------------------------
७) मराठी दिन २०१८: मुलखावेगळी ‘पैज’ (ॲन्टन चेकोव यांची अनुवादित कथा - प्रमाण मराठी)
.
रात्र टळून चालली होती. तो म्हातारा बँकर आपल्या वाचनालयाच्या खोलीत या टोकापासून त्या टोकापर्यंत येरझारा घालत होता, पंधरा वर्षांपूर्वी अशाच एका रात्री त्याने दिलेल्या पार्टीच्या आठवणी मनात जाग्या करीत होता. त्या पार्टीला आलेल्यांत विद्वान मंडळी कमी नव्हती. विविध विषयांवर चर्चा रंगली होती. त्यातही विशेषतः ‘फाशीची शिक्षा असावी की नसावी’ याबाबत भरपूर चर्चा झाली.
.
-------------------------------
८) मराठी दिन २०१८: इरसाल म्हणी (मालवणी) : चुकलामाकला
.
मालवणी माणूस खट म्हणूनच ओळखला जातो. तशीच त्याची भाषा. सरळ शब्दात बोलले तर मालवणचा खरोखरच कॅलिफोर्निया होईल की काय अशी त्याला भिती वाटत असावी. तर आज सादर करतोय अस्सल मालवणी इरसाल म्हणींचा खजिना. कुठेकुठे थोड्या वाह्यात वाटतील पण प्रगल्भ मिपाकर समजुतीने घेतील ही खात्री आहे.
.
--------------------------------
९) मराठी दिन २०१८: मणी गोष्ट..............(अहिराणी) : विजुभाऊ
.
एक गाव मां एक राजा रास. त्याले एक पत्नी आणि पोरे रातस.
राजा एकदम साधा माणूस रास. त्यान गावं बी खूश रास. राजा ना पोरे आण प्रजा ना पोरे एकच शाळा मा जातस.

.
--------------------------------
१०) मराठी दिन २०१८: सरप धसला कुपात (वर्‍हाडी) : मित्रहो
.
खारी म्हणजे गावाले लागून रायते ते वावर, या खारीत ढोरायच्या बरोबरीन माणसायचा बी लय तरास रायते. सकारपासून ते रातरीवरी टमेरल घेउन, जाउन जाउन गाववाले खारीची पार हागणदारी करुन टाकते. रामाच्या खारीच बी तेच झालत. कोणतरी वरडत येउन सांगाव ‘ये रामा खारीत गाय धसली पाय’, रामा हातचा चहाचा कप तसाच ठेवून, धोतराचा काष्टा हातात धरुन ढोर हाकलाले खारीक़ड धावला रे धावला का त्याचा पाय बदकन पोवट्यावर पडे.
.
--------------------------------
११) मराठी दिन २०१८: फारसी मराठी अनुबंध : मनो
.
आजच्या काळात इतिहासाचे अध्ययन करायचे असेल तर मोडी वाचन यावे लागते, हे तर सगळ्यांनाच माहित असते. पण लक्षावधी कागदपत्रे आज फारसीतून वाचनाच्या अभावामुळे तशीच पडली आहेत, हे थोड्यानाच ठाऊक आहे. एकेकाळी राजभाषा असलेल्या फारसीतून मराठीत अनेक शब्द शिरले, आज ते कुणाला फारसी वाटणारही नाहीत.
.
--------------------------------
१२) मराठी दिन २०१८: समाचार-पत्रांत जॉर्ज भिकारीचं कहाणी ! (दक्षिणी मराठी) : दक्षिणी मराठी
.
आमचं ल्योंक आणि सूनाचं बरोर थोडं महिने राह्याकरतां आम्ही अमेरिकाला गेलोतों. तिकडं अधिकपक्षं दनांसीं न्यूस्-पेप्पर् घ्याचं दंडक नाहीं. समाचार अग्गीनं मोबैल-फोनांतं वाचूनचं कळींगतीलं. माझं ल्योंक पणीं तसंचं. पण, स्मार्ट-फोन् मण्जे मला होईना! पाष्टे फिल्टर्-काफी पिताना न्यूस्-पेप्पर् हातांत असामं असं दंडक होऊँगलं.
.
--------------------------------
१३) मराठी दिन २०१८: मराठी भाषा सप्ताह आणि बंद पडलेला मेंदू!! : सूड
.
इथे मिपावर मराठी भाषादिनानिमित्त लिहायचं निघालं आणि कधी नव्हे तो माझ्या मेंदूने बंद पुकारला. का विचारावं तर कारणं सतराशे साठ आहेत. पण याआधी असं कधी झालेलं आठवत नाही. आता पण लिहायला बसलोय खरा पण शेवट कसा होणाराय माहित नाही. त्यात इथे पुण्यात राहणं म्हणजे सगळीकडे एकतर साजूक तुपातलं शुद्ध पुणेरी मराठी किंवा मावळी बोली! .
.
--------------------------------
१४) मराठी दिन २०१८: धुयानी होयी नी धुयवड (अहिराणी) : आर्या१२३
.
लोकेसहो!
धुयवड खेयनात ना! आम्हन्या धुयामां बी होयीना येगळाच रंग चढस.
मन्हा बाबा सांगे..त्यासन्हा टाईमले धुयवडनी मोठी धमाल व्हये.

.
--------------------------------
.
1

वाङ्मयभाषाआस्वादप्रतिभा

प्रतिक्रिया

पद्मावति's picture

1 Mar 2018 - 3:29 am | पद्मावति

सुंदर आणि नेटका उपक्रम.

प्राची अश्विनी's picture

1 Mar 2018 - 10:12 am | प्राची अश्विनी

+११११

प्रचेतस's picture

1 Mar 2018 - 10:22 am | प्रचेतस

+२२२२

डॉ सुहास म्हात्रे's picture

1 Mar 2018 - 10:14 am | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर आणि स्पृहणिय उपक्रम !

जेम्स वांड's picture

4 Mar 2018 - 10:16 am | जेम्स वांड

भारी लेखमाला जमून आली आहे, मुख्य म्हणजे प्रकाशनाचा वेग, लेखांची उतरंड इत्यादी विचारपूर्वक केल्याचे जाणवते उदाहरणार्थ, भाषा म्हणले की आधी शब्दकोष आला, मग तदानुषंघिक इतिहास आला, मग म्हणी, उखाणे हे अविभाज्य सांस्कृतिक घटक आले मग बोली भाषांतील सौंदर्य आलं, सगळं कसं शिस्तबद्ध वाटलं, संस्थळ संचालकांना आभार आणि उपक्रम राबवणाऱ्या संपादक मंडळास विशेष आभार.

प्रशांत बच्छाव's picture

5 Mar 2018 - 3:03 pm | प्रशांत बच्छाव

एक विनंती करू इच्चीतो, मिपा चे मोबाइल अँप आहे का? असेल तर सुचवा, नसेल तर मोबाइल अँप ची खूप गरज आहे.

आदूबाळ's picture

6 Mar 2018 - 4:42 pm | आदूबाळ

आभार! मस्त झाली लेखमाला. सवडीने वाचतो एकेक.