अलौकिक

द्विज's picture
द्विज in जे न देखे रवी...
22 Oct 2008 - 5:10 pm

अलौकिक मैत्री

आलोच होतो मी नाविण्याची इथे अनुमति घेउन
अज्ञानाचे अलन्कार ह्रुदयावर लेवुन

एक तुच मला इथे आपलीशी वाटली
सारीच सद्भावना माझी तुझ्यापाशी दाटली

नसेल पाहिले मी तुला कधी सात जन्मातही
पण ह्रुदयातला गाभा ओळखण्यास्तव नजर लागत नाही

आपुलकीशिवाय जीव तान्हाच असतो मुळी
स्वभावाशिवाय तुझ्या जीव फुलत नाही

मैत्री दिग॑तराचे ओजस्वी तार छेडो आपली
त्याशिवाय जगाचे पान सुद्धा हलत नाही

कवितामुक्तकसद्भावना

प्रतिक्रिया

प्रभाकर पेठकर's picture

22 Oct 2008 - 6:25 pm | प्रभाकर पेठकर

कळली नाही.

जांभया टाळण्याचा जालीम उपाय.....झोपा

प्राजु's picture

22 Oct 2008 - 7:36 pm | प्राजु

:)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

प्रभाकर पेठकर's picture

23 Oct 2008 - 3:53 pm | प्रभाकर पेठकर

माझ्या प्रतिसादास समजून न घेता आणि म्या पामरास कविता समजविण्याचे कष्ट न घेता, १००% वाचकांना आपली काव्यप्रतिभा समजलीच पाहिजे असा आग्रह धरण्यापेक्षा, व्यक्तिगत निरोपातून खालील ताशेरे मारण्याचे 'शौर्य' दाखविण्यापेक्षा, आपल्या संवेदनशील कवीमनाचे प्रतिबिंब आपल्या प्रतिसादांमधून दिसेल आणि आपल्या सुंदर हृदयाचे मनोहारी चित्र वाचकांसमोर येईल असा प्रयत्न करावा. हीच आपल्या चरणी नम्र विनंती.

मला आलेला तुमचा व्यक्तिगत निरोपः-

झोपून झोपुन आयुष्य झडले तुझे
का रे सुष्टा॑स त्रास देतो
अर्थ कळावयास ह्रुदय लागते
पाषाणास कळायचा नाही तो
------------द्विज (प्रणव खेर्डेकर )

द्विज म्हणजे ब्राह्मण (आपण लिहीता तसा ब्राम्हण नाही.) तो क्षमाशील असतो.
'खरा ब्राह्मण नाथची झाला जो महारा घरी जेवला' अशी एक एकनाथ महाराजांच्या संदर्भातील उक्ती आहे. ते ब्राह्मण होते. ते एकदा नदीवरून स्नान करून येत असता एक महार त्यांच्या अंगावर थुंकला. त्याचा राग मनांत न धरता ते पुन्हा नदीवर गेले आणि पुन्हा स्नान करून आले. वाटेत त्या महाराने पुन्हा तेच कृत्य केले. पुन्हा एकनाथ महाराज स्नान करून आले. असे खूप वेळा झाले. शेवटी तो महार खजील झाला. त्याने क्षमा मागितली. आणि नाथांना त्याच्या कृत्याचा राग कसा आला नाही, असे विचारले असता नाथ म्हणाले, 'अरे! त्यात राग कसला. उलट तुझ्या मुळे मला इतक्या वेळा गोदास्नानाचे पुण्य लाभले.'
तेच एकनाथ महाराज गोदेत सुर्याला अर्घ्य देण्यासाठी ओंजळीत पाणी घेत असताना त्या पाण्यासमवेत एक विंचू ओंजळीत आला. त्या विचवाने नाथांना दंश केला. नाथांनी त्याला कुठलीही शिक्षा न देता पुन्हा पाण्यात सोडून दिले. पण पुन्हा ओंजळीत पाणी घेताना पुन्हा तोच विंचू ओंजळीत आला आणि नाथांना पुन्हा चावला. दंश जहरी होता पण नाथांनी पुन्हा शांत पणे विंचवाला पाण्यात सोडून दिले. जेंव्हा त्यांची सुर्योपासना संपली आणि ते काठावर आले तेंव्हा तिथल्या एका माणसाने नाथांना विचारले,' आपण त्या विंचवाला मारले का नाही. ' तेंव्हा ते म्हणाले. ' दंश करणे हा त्याचा धर्म आहे आणि क्षमा करणे हा माझा धर्म आहे.तो जर त्याचा धर्म सोडत नसेल तर मी माझा धर्म का सोडू?'

तात्पर्य 'द्विजा'चा धर्म क्षमा करणे. 'द्विज' उपाधी लावायची असेल तर तसे धर्माचरण असावे.

जास्त काय लिहू. आपण कवी आहात. 'जे न देखे रवी, ते देखे कवी' जिथे सुर्य किरणे पोहोचू शकत नाहीत, मिट्ट काळोख असतो तिथलेही कवीला सर्वकाही लख्ख दिसते. माझ्या काळोख्या पाषाण हृदयातल्या भावना तुम्हाला नक्कीच दिसू शकतील अशी मला भाबडी आशा आहे.

जैनाचं कार्ट's picture

23 Oct 2008 - 4:00 pm | जैनाचं कार्ट (not verified)

सुंदर प्रतिसाद !
टाळ्या !

जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आमचा ब्लॉग

श्रावण मोडक's picture

23 Oct 2008 - 4:34 pm | श्रावण मोडक

हे द्विजही नाहीत आणि कवीही नाहीत. यांच्या इतरही कविता वाचल्या मी. सगळा भंपकपणा आहे. हा खरे तर भावनिक कोंडीतून झालेला मानसीक अतिसार आहे. त्याचे मूल्य ते तेवढेच.
पण एक आहे, व्यक्तिगत संदेशातून उगा काहीबाही लिहिण्याच्या या उद्योगाला तुम्ही इथे खुले केलेत हे बरे केलेत. पण यांच्यापुढे एकनाथ, म्हणजे... जाऊ द्या.

विसोबा खेचर's picture

24 Oct 2008 - 12:20 am | विसोबा खेचर

हा खरे तर भावनिक कोंडीतून झालेला मानसीक अतिसार आहे. त्याचे मूल्य ते तेवढेच.

वा! "भावनिक कोंडीतून झालेला मानसिक अतिसार" ही फ्रेज फारच आवडली बुवा! :)

बाकी, कविता मलाही शाटमारी कळली नाही पण बरी वाटली! :)

तात्या.

बिपिन कार्यकर्ते's picture

23 Oct 2008 - 4:40 pm | बिपिन कार्यकर्ते

कविता काय ओ का ठो कळली नाही आणि फार डोक्याला त्रास पण करून घेतला नाही.... पण प्रतिसाद उच्च.

बिपिन कार्यकर्ते

बिपिन कार्यकर्ते's picture

23 Oct 2008 - 4:40 pm | बिपिन कार्यकर्ते

...
बिपिन कार्यकर्ते

राघव's picture

29 Oct 2008 - 3:50 pm | राघव

पेठकर काका,
एकदम प्यारा प्रतिसाद. अत्युच्च!
बाकी, कवितेबद्दल मी पामर काय बोलणार?
पहिल्या २ ओळी वाचल्यावर सरळ शेवटच्या २ ओळी वाचावयास गेलो बॉ. अन् जेव्हा काहीही समजले नाही तेव्हा समजून घेण्याचा प्रयत्न सोडून दिला. म्हटले सध्या कवीची मुळात इच्छाच अशी असावी कि आपली कविता (सामान्य) लोकांस समजू नये! :D
मुमुक्षु

अनिल हटेला's picture

23 Oct 2008 - 4:21 pm | अनिल हटेला

पेठकर साहेब !!!

एकदम क्लास प्रतीसाद !!!

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

अभिरत भिरभि-या's picture

23 Oct 2008 - 4:32 pm | अभिरत भिरभि-या

भिरभिर्‍या

अभिरत भिरभि-या's picture

23 Oct 2008 - 4:37 pm | अभिरत भिरभि-या

मला आता ४ ओळींची झापकु (झापणारी हायकु) येणार आता ..
कोणी केली तर फार मझा येईल .. साला आपल्यावर कोणी कविताच केली नाय [(

द्विजशेठ,
आमच्यावर सुद्धा एक झापकु पाडाच ( सारी लिवा) >:D<

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

23 Oct 2008 - 4:40 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

मला आता ४ ओळींची झापकु (झापणारी हायकु) येणार आता ..
हायकू असेल तर ती तीन ओळींचीच येणार! पण हे नाव भारी आहे, झापकू!

अवांतरः पेठकर काकांशी संपूर्ण सहमत!

अभिरत भिरभि-या's picture

23 Oct 2008 - 4:54 pm | अभिरत भिरभि-या

७_१२ चा उतारा न घेता आंग्लिस्तानास गेलीस ज्ञानार्जन करायला |
३_१३ वाजवेल तुझा हा फ्रिज जर लागलीस कवितेच्या प्रांतात शिरायला ||

ह्.घ्या. सां. न लगे
महापंडित फ्रिज भिरभिरे

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

23 Oct 2008 - 5:00 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

माझंही एक झाप्कू!

७_१२ चा उतारा नाही लागत ज्ञानार्जनासाठी
३_१३ मात्र वाजतात फ्रिजला छळल्यापोटी

ह.घ्या हे सांगायची गरज आहे का?

अवांतरः बाकी अभिरतभौ, तुम्हीही विडंबनकार झालात तर!

अदिती

हा माझा दोष आहे बहुतेक. प्रणव साहेब आपण कविते बरोबर स्पष्टीकरण दिले तरी चालेल.
वेताळ

विनायक प्रभू's picture

23 Oct 2008 - 8:05 pm | विनायक प्रभू

http://vipravani.wordpress.com/
काळजी करा नको रे वेताळा. कविता यव्ढी भारी हाय की य्वरीबडी इज अलॉ टू किक

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

23 Oct 2008 - 8:08 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

काळजी करा नको रे वेताळा. कविता यव्ढी भारी हाय की य्वरीबडी इज अलॉ टू किक
म्हंजे तुम्हाला कळ्ळी का नाही?

अदिती

बिपिन कार्यकर्ते's picture

23 Oct 2008 - 8:13 pm | बिपिन कार्यकर्ते

मला आत्ता आत्ता जराशी कळायला लागली आहे ही कविता.... ही कविता नाही तर समस्त मैत्रीविषाणूंचं ('अपन म्ज्याशि मेत्रि करल' छाप) मनोगत आहे... ;)

पटत नाही? ओळी परत बघा.

एक तुच मला इथे आपलीशी वाटली
सारीच सद्भावना माझी तुझ्यापाशी दाटली

आणि

नसेल पाहिले मी तुला कधी सात जन्मातही
पण ह्रुदयातला गाभा ओळखण्यास्तव नजर लागत नाही

बिपिन कार्यकर्ते

विनायक प्रभू's picture

23 Oct 2008 - 8:16 pm | विनायक प्रभू

http://vipravani.wordpress.com/
रुदय कल्ला. त्यो गाभा कुट अस्तुया ते सांगा.

बिपिन कार्यकर्ते's picture

23 Oct 2008 - 8:18 pm | बिपिन कार्यकर्ते

जल्लां, मास्तर तुला गाभा म्हायत नाय? तु तर आक्क्या लोकान्ला य नि करतंय. आनि म्हन्तय की गाभा म्हायत न्हाय, बोल.

बिपिन कार्यकर्ते

बिपिन कार्यकर्ते's picture

23 Oct 2008 - 8:19 pm | बिपिन कार्यकर्ते

जल्लां, मास्तर तुला गाभा म्हायत नाय? तु तर आक्क्या लोकान्ला य नि करतंय. आनि म्हन्तय की गाभा म्हायत न्हाय, बोल.

बिपिन कार्यकर्ते

विनायक प्रभू's picture

23 Oct 2008 - 8:23 pm | विनायक प्रभू

http://vipravani.wordpress.com/अवो आमच्या भासेत गाभा म्हंजे वेगलाच काय तरी अस्तो.

विनायक प्रभू's picture

23 Oct 2008 - 8:11 pm | विनायक प्रभू

http://vipravani.wordpress.com/ मला तर काय बाय कल्ली नाय. कलेल तेचा सत्कार करेल मी.

अवलिया's picture

23 Oct 2008 - 8:26 pm | अवलिया

आलोच होतो मी अज्ञानाचे अलन्कार ह्रुदयावर लेवुन मैत्री माझी
इथे अनुमति घेउन जगाचे पान सुद्धा हलत नाही
जीव तान्हाच असतो मुळी त्याशिवाय ह्रुदयातला गाभा फुलत नाही
एक तुच मला इथे आपलीशी वाटली तुझ्या स्वभावाशिवाय
तुझ्यापाशी दाटली सारीच
ओळखण्यास्तव नाविण्याची नजर लागत नाही
आपुलकीशिवाय नसेल पाहिले मी तुला कधी सात जन्मातही
ओजस्वी दिग॑तराचे पण तार छेडो आपली सद्भावना

बहुतेक कवी महाशयांचा कट पेस्ट चा घोटाळा झाला आहे. मी शब्द जरा इकडेतिकडे फिरवुन बसवले आहेत
जरा बघा नाहीतर तुम्ही पण फिरवा थोडे इकडे तिकडे

अभिरत भिरभि-या's picture

23 Oct 2008 - 8:31 pm | अभिरत भिरभि-या

हे बी कळाले नाही. समजाऊन सांगा नाहीतर एक झापकु तुमच्यावर पण सोडण्यात येईल :)

अवलिया's picture

23 Oct 2008 - 8:34 pm | अवलिया

विप्रंना व्य नि करा.
त्यांना समजले आहे असा त्यांचा दावा आहे.

विनायक प्रभू's picture

23 Oct 2008 - 8:29 pm | विनायक प्रभू

http://vipravani.wordpress.com/
आयला नाना तुम्ही कट्पेस्ट आर्टीस्ट केव्हापासुन. पण आता चांगली कळली.

शेखस्पिअर's picture

23 Oct 2008 - 8:41 pm | शेखस्पिअर

..."ग्रेस"फुल कविता आहे..

वाटाड्या...'s picture

24 Oct 2008 - 3:27 am | वाटाड्या...

आयला ह्या कवींच्या...

काही (च्या) काही लिहीतात....चांगली करून टाकली पाहीजे एकदा...:)

ह. घ्या....सुज्ञास सांगणे न लगे....

अभिजीत's picture

24 Oct 2008 - 4:54 am | अभिजीत

हा तर काव्यात्मक बोळा वाटतोय.
कसलं ते प्लॅटोनिक का काय म्हणतात ते हाय का हे?

अवांतर - "नाविण्याची" मधे मराठीतली श्पेलिंग मिश्टेक हाये का "ना-विण्याची" हाय? ;)
सुद्द्-लेखन लै म्याटर करतं बरका हिकडं

ह. घ्या.

- अभिजीत

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

24 Oct 2008 - 11:29 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

अवांतर - "नाविण्याची" मधे मराठीतली श्पेलिंग मिश्टेक हाये का "ना-विण्याची" हाय?
=))

सुद्द्-लेखन लै म्याटर करतं बरका हिकडं
अंमळ म्याटर करता का हो भौ?

वेताळ's picture

24 Oct 2008 - 9:35 am | वेताळ

आलोच होतो मी नाविण्याची इथे अनुमति घेउन
अज्ञानाचे अलन्कार ह्रुदयावर लेवुन

इथे हृदयावर एवजी मनावर वापरले असते तर बरे झाले असते.
नसेल पाहिले मी तुला कधी सात जन्मातही
पण ह्रुदयातला गाभा ओळखण्यास्तव नजर लागत नाही


इथे ही मनातला गाभा हा सब्द समर्पक बसतो
अवांतरः इथे ही परत हृदय आले आहे.सतत हृदय शब्द वापरल्याने हृदय विकाराच त्रास संभवतो
वेताळ