सरकारी नोकर

श्रीकृष्ण सामंत's picture
श्रीकृष्ण सामंत in जनातलं, मनातलं
20 Oct 2008 - 9:56 pm

अण्णा सुपरींटेन्डन्ट ऑफ एक्साईझ ह्या प्रमोशनवर मुंबईला जाण्यापुर्वी,अख्या रतनागिरीचे हेड होते.पुर्वी सरकारी नोकरांच्या घरी शिपाई नोकर घरकामाला रहायचे. त्याना घरात आईला मदत करण्या पलिकडे मला आणि माझ्या धाकट्या भावाला
संभाळायचं काम पण करावं लागायचं.ब्रिटीश लोकानी ती पद्धत घालून दिली होती.
आमचे आजोबा आमच्याकडे रहायचे.

एकदा काय झालं,एका शिपायाची बदली झाल्यावर त्याच्या जागी दुसरा शिपाई आला होता.तो जरा पायाने अधू होता.म्हणून अण्णांनी त्याल घरचीच हलकी हलकी कामं करायला घरीच ठेवला होता. तो जरा कायदेबाज होता. नेहमीच्या सवंयी प्रमाणे
आजोबानी त्यांची सुपारी कुटून ठेवायाला त्याला सांगितलं.तोंडात दांत नसल्याने आजोबा कुटून ठेवलेली सुपारी खात असत.
त्या शिपायाने सांगितलं,
"आजोबानू,मी सरकारी नोकर आसयं,माझां सुपारी कुटूचां काम नाय,"

संध्याकाळी अण्णा घरी आल्यावर आजोबानी त्यांना तो शिपाई काय म्हणाला ते सांगितलं.
त्यावर अण्णा आजोबाना म्हणाले,
"उद्या पासून तुम्ही त्याला तुमचं काही काम सांगू नका."
दुसर्‍या दिवशी तो शिपाई घरी आल्यावर अण्णानी त्याला एक जड फाईलचं बोचकं दहा मैलावर असलेल्या त्यांच्याच एका ब्रॅन्च ऑफिसला देऊन तिकडच्या माणसाची पोहचल्याची पावती आणून आजोबाकडे द्यायला सांगितलं.त्यावेळी पायी जाण्याशिवाय दुसरं साधने नव्हतं.

दुसर्‍या दिवशी आण्णा दोन दिवसाच्या फिरतीवर -टूरवर- गेले.दुसर्‍या दिवशी त्या शिपायाने संध्याकाळी पावती आणून आजोबांच्या स्वाधीन केली.आणि त्याना म्हणाला,
"आजोबानूं,जरा उशीर झालो माकां,पाय पण वाईंच दुखतंत.मी तुमची सुपारी कुटून देवूं काय?"

दोन दिवसानी अण्णा घरी आल्यावर त्यांनी आजोबाना विचारलं,
"शिपायाने पावती दिली काय?"
त्यावर आजोबा म्हणाले,
"हो दिली आणि वर तो मला म्हणाला",
"सायबानी माकां सरकारी नोकरी म्हणजे काय तां पण समजावलां"
हे ऐकून आजोबा आणि अण्णा खो,खो हंसले.
त्यानंतर तो शिपाई न चुकता आजोबांची सुपारी कुटून देत असे.

श्रीकृष्ण सामंत

कथालेख

प्रतिक्रिया

योगी९००'s picture

20 Oct 2008 - 11:53 pm | योगी९००

अधु माणसाला वीस मैल चालवण्यापेक्षा त्याला जरा समज दिली असती तर बरे वाटले असते.

अर्थात तो जरी थोडा माज करत असला तरी...समज देणे हेच योग्य वाटते.

बा़की सामंतसाहेब तुमचे सगळे लेख (हा सोडला तर) मला आवडतात..

खादाडमाऊ
(मुळ सावंतवाडीचा..पण कोल्हापुरात वाढलेला...आणि मुंबईत वास्तव करणारा..)

श्रीकृष्ण सामंत's picture

21 Oct 2008 - 7:38 am | श्रीकृष्ण सामंत

आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार
खरं सांगू का मला ही नाही हे अण्णानी केलेलं आवडलं.मी त्यांना विचारलही.ते म्हणाले त्याना ही तसं करणं आवडलं नाही.ते म्हणाले सुपारी न कुटायची ही एकच घटना झाली नाही.त्याची ती परिस्थिती पाहून त्यानी त्याला बरेच वेळा सांभाळून घेतलं होतं.त्याला नोकरी वरून काढून टाकता आलं असतं.किंवा त्याची बदली करता आली असती.
"ह्या माझा काम नाय ,तां माझा काम नाय "असं तो जेव्हा वरचेवर सागू लागला तेव्हा त्याच काय काम आहे ह्याची त्याला नीट समज देण्यासाठी नाइलाजाने करावं लागलं. कारण तेच त्याचं काम होतं पण त्याला ते काम जमणार नाही म्हणूनच त्याला सवलत देत होते.

www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

योगी९००'s picture

21 Oct 2008 - 8:22 pm | योगी९००

"ह्या माझा काम नाय ,तां माझा काम नाय "असं तो जेव्हा वरचेवर सागू लागला तेव्हा त्याच काय काम आहे ह्याची त्याला नीट समज देण्यासाठी नाइलाजाने करावं लागलं. कारण तेच त्याचं काम होतं पण त्याला ते काम जमणार नाही म्हणूनच त्याला सवलत देत होते.

असे जर त्याचे वागणे असेल तर तुमच्या अण्णांचेच बरोबर....माज हा उतरवलाच पाहिजे..

अर्धवट महितीआधारे दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल क्षमस्व ..!!!

खादाडमाऊ

श्रीकृष्ण सामंत's picture

21 Oct 2008 - 9:49 pm | श्रीकृष्ण सामंत

आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार.
खरं तर ही माझीच चूक आहे.आपल्याला मी अर्धवट माहिती द्दायला नको होती.जे आपल्या पहिल्या प्रतिक्रिये नंतर सांगितलं ते लिहायला हवं होतं.
पण नंतर लक्षात आलं कुणी तरी वाचक आपण म्हणाला तसं म्हणण्याचा संभव आहे.तेव्हडीच प्रतिक्रिया कळेल.आणि तसंच झालं.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

प्रकाश घाटपांडे's picture

21 Oct 2008 - 9:57 am | प्रकाश घाटपांडे

सरकारी काम आम सहा महिने थाम असा वाक्यप्रचार बरच काही सांगुन जातो. समरी पॉवर मध्ये अनेक खाजगी कामे सरकारी होउन जातात. सरकारी खात्यात छुपी बेकारी मोठ्या प्रमाणात आहे. छुपी बेकारी मध्ये जसे लोक काम करताना दिसत असतात पण प्रत्यक्षात त्यांनी ते केले नाही तरी त्याचे विधायक मूल्य फारसे नसते. काही लोकांनी खड्डा खांडणे आणि काही लोकांनी तो बुजवणे या सारखी ती कामे असतात. यातून फक्त बेरोजगारीचा प्रश्न काही अंशी सुटतो.अनेक निरुपयोगी माणसे सरकारी खात्यात सांभाळावी लागतात.मग अशा लोकांना साहेब लोकांच्या घरची कामे दिली जातात. त्याचा मोबदला म्हणुन शासकीय कामात सवलत दिली जाते. अधिकार्‍यांच्या घरी सरकारी कामाचे फोन अटेंड करणे यासाठी ऑर्डर्ली म्हणुन नियुक्ती असते. कागदावर दोन लोकांची नियुक्ती असेल तरी प्रत्यक्षात आठ लोक असु शकतात. सरकारी खात्यात कागद व वास्तव यातील अंतर भरपुर असते. १८० डिग्री आउट ऑफ फेज देखील असु शकते.पुण्यात तत्कालीन मा.पोलीस आयुक्त जयंत उमराणीकर यांचे भाषण एकदा वसंत व्याखान मालेत (२००७) झाले होते.
श्री.उमराणीकर हे अत्यंत अभ्यासू व सुसंस्कृत व्यक्तिमत्व आहे.त्यांनी लोकांच्या प्रश्नांना ( खरं तर रोषाला) अत्यंत समर्पक उत्तरे दिली.कायदा आणी सुव्यवस्था सांभाळण्यासाठी मनुष्यबळाची कमतरता आहे हा एक त्यांच्या प्रतिपादनाचा मुद्दा होता.हजारी एक पोलिस असे प्रमाण सर्वसाधारणपणे आहे. हे खरे आहे तरी पण खरा मुद्दा उपलब्ध मनुष्यबळापेक्षा उपयुक्त मनुष्यबळाची कमतरता असा आहे.शंभर कावळे उडवायला शंभर बंदुकांची गरज नसते. सरकारी खात्यात ८०-२० कन्सेप्ट लागु आहे. खर्‍या अर्थाने २० टक्केच लोक काम करत असतात त्यात ८० टक्के लोकांची अकार्यक्षमता लपुन जाते.
अनेक कालबाह्य नियम, कालबाह्य मानसिकता,पारंपारिक दृष्टीकोन यातच यंत्रणा अड्कून पडली आहे.दळणवळणात झालेली क्रांती विचारात घेतली तर जीर्णोद्धार नव्हे तर नूतनीकरणाची गरज आहे. इच्छाशक्ती,नियोजन व अधिकार एकत्रित व एकच वेळी काम करेल त्यावेळीच काही सकारत्मक घडेल. शासकीय खात्यांचे व्यवस्थापकीय पातळीवर सर्वांगिण मुल्यमापन केले तर शासकीय यंत्रणा मोडीत निघेल.नागरिकांच्या करातून शासकीय नोकरांचा पगार मिळतो याची जाणीव ना नागरिकांना ना शासकीय नोकरांना.

(अशा आचार विचारांमुळे शासकीय नोकरीतुन अकाली स्वेच्छानिवृत्ती घेण्यास प्रवृत्त झालेला)
प्रकाश घाटपांडे

लिखाळ's picture

21 Oct 2008 - 8:32 pm | लिखाळ

प्रकाशराव,
>उपलब्ध मनुष्यबळापेक्षा उपयुक्त मनुष्यबळाची कमतरता<
फार छान प्रतिसाद आहे.
शंभर कावळे उडवायला शंभर बंदुकांची गरज नसते.
फार छान वाक्य..
तुमच्या अनेक प्रतिक्रिया मार्मिक आणि वाचनीय असतात.

सामंतकाका,
नेहमीप्रमाणेच लेख चांगला... खालच्या प्रतिसादात त्या नोकराचे जे वर्णन आहे ते थोडे लेखात असते तर अजून बरे झाले असते.
--लिखाळ.

श्रीकृष्ण सामंत's picture

21 Oct 2008 - 10:02 pm | श्रीकृष्ण सामंत

आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार.
खरं तर ही माझीच चूक आहे.आपल्याला मी अर्धवट माहिती द्दायला नको होती.जे आपल्या पहिल्या प्रतिक्रिये नंतर सांगितलं ते लिहायला हवं होतं.
पण नंतर लक्षात आलं कुणी तरी वाचक आपण म्हणाला तसं म्हणण्याचा संभव आहे.तेव्हडीच प्रतिक्रिया कळेल.आणि तसंच झालं.

www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

श्रीकृष्ण सामंत's picture

21 Oct 2008 - 9:58 pm | श्रीकृष्ण सामंत

आपली उदबोधक आणि अभ्यासू प्रतिक्रिया वाचून बरं वाटलं.थोडी माहिती पण समजली.
आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

एकलव्य's picture

22 Oct 2008 - 8:57 am | एकलव्य

आवडली. वडिल सरकारी नोकरीतून नुकतेच निवृत्त झाले आणि दोन बंधू सरकारी नोकरीत आहेत. त्यामुळे आणि इतरही अनेक मित्रांच्या पालकांचे अनुभव पाह्ता आपण म्हणते ते पटते.

(बिनसरकारी) एकलव्य

मनिष's picture

21 Oct 2008 - 10:58 am | मनिष

श्री.उमराणीकर हे अत्यंत अभ्यासू व सुसंस्कृत व्यक्तिमत्व आहे.त्यांनी लोकांच्या प्रश्नांना ( खरं तर रोषाला) अत्यंत समर्पक उत्तरे दिली.कायदा आणी सुव्यवस्था सांभाळण्यासाठी मनुष्यबळाची कमतरता आहे हा एक त्यांच्या प्रतिपादनाचा मुद्दा होता.हजारी एक पोलिस असे प्रमाण सर्वसाधारणपणे आहे. हे खरे आहे तरी पण खरा मुद्दा उपलब्ध मनुष्यबळापेक्षा उपयुक्त मनुष्यबळाची कमतरता असा आहे.शंभर कावळे उडवायला शंभर बंदुकांची गरज नसते. सरकारी खात्यात ८०-२० कन्सेप्ट लागु आहे. खर्‍या अर्थाने २० टक्केच लोक काम करत असतात त्यात ८० टक्के लोकांची अकार्यक्षमता लपुन जाते.
अनेक कालबाह्य नियम, कालबाह्य मानसिकता,पारंपारिक दृष्टीकोन यातच यंत्रणा अड्कून पडली आहे. दळणवळणात झालेली क्रांती विचारात घेतली तर जीर्णोद्धार नव्हे तर नूतनीकरणाची गरज आहे. इच्छाशक्ती,नियोजन व अधिकार एकत्रित व एकच वेळी काम करेल त्यावेळीच काही सकारत्मक घडेल. शासकीय खात्यांचे व्यवस्थापकीय पातळीवर सर्वांगिण मुल्यमापन केले तर शासकीय यंत्रणा मोडीत निघेल.नागरिकांच्या करातून शासकीय नोकरांचा पगार मिळतो याची जाणीव ना नागरिकांना ना शासकीय नोकरांना.

१०१% सहमत!