✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

सरकारी नोकर

श
श्रीकृष्ण सामंत यांनी
Mon, 10/20/2008 - 21:56  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3498 वाचन

💬 प्रतिसाद (10)

प्रतिक्रिया

नाही आवडले....!!!

योगी९००
Mon, 10/20/2008 - 23:53 नवीन
अधु माणसाला वीस मैल चालवण्यापेक्षा त्याला जरा समज दिली असती तर बरे वाटले असते. अर्थात तो जरी थोडा माज करत असला तरी...समज देणे हेच योग्य वाटते. बा़की सामंतसाहेब तुमचे सगळे लेख (हा सोडला तर) मला आवडतात.. खादाडमाऊ (मुळ सावंतवाडीचा..पण कोल्हापुरात वाढलेला...आणि मुंबईत वास्तव करणारा..)
  • Log in or register to post comments

आभार

श्रीकृष्ण सामंत
Tue, 10/21/2008 - 07:38 नवीन
आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार खरं सांगू का मला ही नाही हे अण्णानी केलेलं आवडलं.मी त्यांना विचारलही.ते म्हणाले त्याना ही तसं करणं आवडलं नाही.ते म्हणाले सुपारी न कुटायची ही एकच घटना झाली नाही.त्याची ती परिस्थिती पाहून त्यानी त्याला बरेच वेळा सांभाळून घेतलं होतं.त्याला नोकरी वरून काढून टाकता आलं असतं.किंवा त्याची बदली करता आली असती. "ह्या माझा काम नाय ,तां माझा काम नाय "असं तो जेव्हा वरचेवर सागू लागला तेव्हा त्याच काय काम आहे ह्याची त्याला नीट समज देण्यासाठी नाइलाजाने करावं लागलं. कारण तेच त्याचं काम होतं पण त्याला ते काम जमणार नाही म्हणूनच त्याला सवलत देत होते. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments

मग बरोमग..

योगी९००
Tue, 10/21/2008 - 20:22 नवीन
"ह्या माझा काम नाय ,तां माझा काम नाय "असं तो जेव्हा वरचेवर सागू लागला तेव्हा त्याच काय काम आहे ह्याची त्याला नीट समज देण्यासाठी नाइलाजाने करावं लागलं. कारण तेच त्याचं काम होतं पण त्याला ते काम जमणार नाही म्हणूनच त्याला सवलत देत होते. असे जर त्याचे वागणे असेल तर तुमच्या अण्णांचेच बरोबर....माज हा उतरवलाच पाहिजे.. अर्धवट महितीआधारे दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल क्षमस्व ..!!! खादाडमाऊ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीकृष्ण सामंत

आणि तसंच झालं

श्रीकृष्ण सामंत
Tue, 10/21/2008 - 21:49 नवीन
आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार. खरं तर ही माझीच चूक आहे.आपल्याला मी अर्धवट माहिती द्दायला नको होती.जे आपल्या पहिल्या प्रतिक्रिये नंतर सांगितलं ते लिहायला हवं होतं. पण नंतर लक्षात आलं कुणी तरी वाचक आपण म्हणाला तसं म्हणण्याचा संभव आहे.तेव्हडीच प्रतिक्रिया कळेल.आणि तसंच झालं. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगी९००

सरकारी काम

प्रकाश घाटपांडे
Tue, 10/21/2008 - 09:57 नवीन
सरकारी काम आम सहा महिने थाम असा वाक्यप्रचार बरच काही सांगुन जातो. समरी पॉवर मध्ये अनेक खाजगी कामे सरकारी होउन जातात. सरकारी खात्यात छुपी बेकारी मोठ्या प्रमाणात आहे. छुपी बेकारी मध्ये जसे लोक काम करताना दिसत असतात पण प्रत्यक्षात त्यांनी ते केले नाही तरी त्याचे विधायक मूल्य फारसे नसते. काही लोकांनी खड्डा खांडणे आणि काही लोकांनी तो बुजवणे या सारखी ती कामे असतात. यातून फक्त बेरोजगारीचा प्रश्न काही अंशी सुटतो.अनेक निरुपयोगी माणसे सरकारी खात्यात सांभाळावी लागतात.मग अशा लोकांना साहेब लोकांच्या घरची कामे दिली जातात. त्याचा मोबदला म्हणुन शासकीय कामात सवलत दिली जाते. अधिकार्‍यांच्या घरी सरकारी कामाचे फोन अटेंड करणे यासाठी ऑर्डर्ली म्हणुन नियुक्ती असते. कागदावर दोन लोकांची नियुक्ती असेल तरी प्रत्यक्षात आठ लोक असु शकतात. सरकारी खात्यात कागद व वास्तव यातील अंतर भरपुर असते. १८० डिग्री आउट ऑफ फेज देखील असु शकते.पुण्यात तत्कालीन मा.पोलीस आयुक्त जयंत उमराणीकर यांचे भाषण एकदा वसंत व्याखान मालेत (२००७) झाले होते. श्री.उमराणीकर हे अत्यंत अभ्यासू व सुसंस्कृत व्यक्तिमत्व आहे.त्यांनी लोकांच्या प्रश्नांना ( खरं तर रोषाला) अत्यंत समर्पक उत्तरे दिली.कायदा आणी सुव्यवस्था सांभाळण्यासाठी मनुष्यबळाची कमतरता आहे हा एक त्यांच्या प्रतिपादनाचा मुद्दा होता.हजारी एक पोलिस असे प्रमाण सर्वसाधारणपणे आहे. हे खरे आहे तरी पण खरा मुद्दा उपलब्ध मनुष्यबळापेक्षा उपयुक्त मनुष्यबळाची कमतरता असा आहे.शंभर कावळे उडवायला शंभर बंदुकांची गरज नसते. सरकारी खात्यात ८०-२० कन्सेप्ट लागु आहे. खर्‍या अर्थाने २० टक्केच लोक काम करत असतात त्यात ८० टक्के लोकांची अकार्यक्षमता लपुन जाते. अनेक कालबाह्य नियम, कालबाह्य मानसिकता,पारंपारिक दृष्टीकोन यातच यंत्रणा अड्कून पडली आहे.दळणवळणात झालेली क्रांती विचारात घेतली तर जीर्णोद्धार नव्हे तर नूतनीकरणाची गरज आहे. इच्छाशक्ती,नियोजन व अधिकार एकत्रित व एकच वेळी काम करेल त्यावेळीच काही सकारत्मक घडेल. शासकीय खात्यांचे व्यवस्थापकीय पातळीवर सर्वांगिण मुल्यमापन केले तर शासकीय यंत्रणा मोडीत निघेल.नागरिकांच्या करातून शासकीय नोकरांचा पगार मिळतो याची जाणीव ना नागरिकांना ना शासकीय नोकरांना. (अशा आचार विचारांमुळे शासकीय नोकरीतुन अकाली स्वेच्छानिवृत्ती घेण्यास प्रवृत्त झालेला) प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments

फार छान

लिखाळ
Tue, 10/21/2008 - 20:32 नवीन
प्रकाशराव, >उपलब्ध मनुष्यबळापेक्षा उपयुक्त मनुष्यबळाची कमतरता< फार छान प्रतिसाद आहे. शंभर कावळे उडवायला शंभर बंदुकांची गरज नसते. फार छान वाक्य.. तुमच्या अनेक प्रतिक्रिया मार्मिक आणि वाचनीय असतात. सामंतकाका, नेहमीप्रमाणेच लेख चांगला... खालच्या प्रतिसादात त्या नोकराचे जे वर्णन आहे ते थोडे लेखात असते तर अजून बरे झाले असते. --लिखाळ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

माझं थोडं चूकलं

श्रीकृष्ण सामंत
Tue, 10/21/2008 - 22:02 नवीन
आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार. खरं तर ही माझीच चूक आहे.आपल्याला मी अर्धवट माहिती द्दायला नको होती.जे आपल्या पहिल्या प्रतिक्रिये नंतर सांगितलं ते लिहायला हवं होतं. पण नंतर लक्षात आलं कुणी तरी वाचक आपण म्हणाला तसं म्हणण्याचा संभव आहे.तेव्हडीच प्रतिक्रिया कळेल.आणि तसंच झालं. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ

उदबोधक माहिती

श्रीकृष्ण सामंत
Tue, 10/21/2008 - 21:58 नवीन
आपली उदबोधक आणि अभ्यासू प्रतिक्रिया वाचून बरं वाटलं.थोडी माहिती पण समजली. आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

प्रतिक्रिया

एकलव्य
Wed, 10/22/2008 - 08:57 नवीन
आवडली. वडिल सरकारी नोकरीतून नुकतेच निवृत्त झाले आणि दोन बंधू सरकारी नोकरीत आहेत. त्यामुळे आणि इतरही अनेक मित्रांच्या पालकांचे अनुभव पाह्ता आपण म्हणते ते पटते. (बिनसरकारी) एकलव्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

अतिशय उत्तम प्रतिसाद....

मनिष
Tue, 10/21/2008 - 10:58 नवीन
श्री.उमराणीकर हे अत्यंत अभ्यासू व सुसंस्कृत व्यक्तिमत्व आहे.त्यांनी लोकांच्या प्रश्नांना ( खरं तर रोषाला) अत्यंत समर्पक उत्तरे दिली.कायदा आणी सुव्यवस्था सांभाळण्यासाठी मनुष्यबळाची कमतरता आहे हा एक त्यांच्या प्रतिपादनाचा मुद्दा होता.हजारी एक पोलिस असे प्रमाण सर्वसाधारणपणे आहे. हे खरे आहे तरी पण खरा मुद्दा उपलब्ध मनुष्यबळापेक्षा उपयुक्त मनुष्यबळाची कमतरता असा आहे.शंभर कावळे उडवायला शंभर बंदुकांची गरज नसते. सरकारी खात्यात ८०-२० कन्सेप्ट लागु आहे. खर्‍या अर्थाने २० टक्केच लोक काम करत असतात त्यात ८० टक्के लोकांची अकार्यक्षमता लपुन जाते. अनेक कालबाह्य नियम, कालबाह्य मानसिकता,पारंपारिक दृष्टीकोन यातच यंत्रणा अड्कून पडली आहे. दळणवळणात झालेली क्रांती विचारात घेतली तर जीर्णोद्धार नव्हे तर नूतनीकरणाची गरज आहे. इच्छाशक्ती,नियोजन व अधिकार एकत्रित व एकच वेळी काम करेल त्यावेळीच काही सकारत्मक घडेल. शासकीय खात्यांचे व्यवस्थापकीय पातळीवर सर्वांगिण मुल्यमापन केले तर शासकीय यंत्रणा मोडीत निघेल.नागरिकांच्या करातून शासकीय नोकरांचा पगार मिळतो याची जाणीव ना नागरिकांना ना शासकीय नोकरांना.
१०१% सहमत!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा