भारताच्या चंद्रयानाच्या उड्डाणाला आता केवळ बावन्न तास राहीले असून सोमवारी पहाटे काउंट डाऊन सुरू होणार आहे! चंद्रमोहीमेच्या घटनेसंदर्भात भारतीय शास्त्रज्ञ आणि त्यांच्या सहकारी इतर देशातील शास्त्रज्ञांना मनःपूर्वक शुभेच्छा!
From Screen Captures
भारताच्या चंद्रयानाच्या उड्डाणाला आता केवळ बावन्न तास राहीले असून सोमवारी पहाटे काउंट डाऊन सुरू होणार आहे! चंद्रमोहीमेच्या घटनेसंदर्भात भारतीय शास्त्रज्ञ आणि त्यांच्या सहकारी इतर देशातील शास्त्रज्ञांना मनःपूर्वक शुभेच्छा!
From Screen Captures
प्रतिक्रिया
20 Oct 2008 - 8:22 am | प्राजु
आजच इप्रसारण वर देण्यासाठी ही बातमी रेकॉर्ड केली मी.
माझ्याही शुभेच्छा! :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
20 Oct 2008 - 8:22 am | सहज
मनःपूर्वक शुभेच्छा!
20 Oct 2008 - 8:42 am | विसोबा खेचर
चित्र लै भारी आहे! आमच्याही शुभेच्छा...
तात्या.
--
तुझ्या घटांच्या उतरंडीला
नसे अंत, ना पार
विठ्ठला तू वेडा कुंभार..
20 Oct 2008 - 8:49 am | अनिरुध्द
चांद्रयान मोहीम यशस्वी होवो. शुभेच्छा.
20 Oct 2008 - 9:27 am | ऋषिकेश
ज्यावेळी हे यान चांद्र भुमीवर उतरेल त्यावेळी प्रत्येक भारतीयाला वाटणारा अभिमान अवर्णनीय असेल :)
चांद्रविजयमोहिमेला शुभेच्छा!
-('मिसळ'लेला) ऋषिकेश
20 Oct 2008 - 10:52 am | सखाराम_गटणे™
माझ्या माहीती प्रमाणे हे यान चंद्रावर उतरणार नाही.
माझ्याही शुभेच्छा
22 Oct 2008 - 1:02 am | मानस
काही ठराविक कालावधीसाठी "ल्युनार ऑर्बिट" चंद्रापासुन सुमारे १०० कीलोमिटर वर फिरत राहील, मग शेवटचा टप्पा ..... चंद्रावर उतरेल.
22 Oct 2008 - 1:23 am | मानस
गटणे
तुमचं बरोबर आहे, चांद्रयान १ उतरणार नाही.............. १०० किमी वर कक्षेत फिरत रहाणार आहे, दोन वर्षांसाठी ...
चांद्रयान २ उतरणार आहे .... २०१० साली.............
20 Oct 2008 - 10:39 am | आनंद
हे चांद्र यान चंद्रा वरती किती दिवस असणार आहे. ते परत प्रुथ्वी वर येणार आहे का ? कोणाला माहीत असल्यास दुवा द्यावा.
22 Oct 2008 - 1:09 am | मानस
चांद्रयान १ माहितीचा दुवा
22 Oct 2008 - 1:24 am | मानस
आणखी एक दुवा
20 Oct 2008 - 10:50 am | चतुरंग
सर्व भारतीयांची मान ताठ होईल आणि आपल्या वैज्ञानिकांच्या, अभियंत्यांच्या आणि तंत्रज्ञांच्या असामान्य कष्टांचे चीज होईल अशी आपण सर्वजण प्रार्थना करुयात!
चांद्रयान मोहिमेला अनेक शुभेच्छा!!
(ह्याचे थेट प्रक्षेपण दाखविण्याची काही सोय आहे का? कोणाला माहीत असल्यास दुवा द्यावा.)
चतुरंग
20 Oct 2008 - 10:52 am | विकास
इस्त्रोने दिलेल्या माहीती प्रमाणे ऑक्टोबर २२ ला ५:५० - ६:५० सकाळ भाप्रवे जालावरून थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.
22 Oct 2008 - 5:31 am | स्वप्निल..
http://www.ibnlive.com/videos/video_streaming.php?type=ibnlokmat
बघता येईल....
स्वप्निल
20 Oct 2008 - 2:38 pm | मदनबाण
चांद्रयान मोहिमेला माझ्ह्याही अनेक शुभेच्छा!!!!
मदनबाण.....
"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda
20 Oct 2008 - 2:46 pm | अवलिया
चांद्रयान मोहिमेला अनेक शुभेच्छा!!!!
21 Oct 2008 - 5:48 pm | अरुण मनोहर
मोहीमेला खूप खूप शुभेच्छा. उद्या थेट प्रक्षेपण पहायला खूप आवडेल.
भारताची अशीच उत्तरोत्तर प्रगती होवो.
22 Oct 2008 - 12:38 am | धनंजय
साफल्यासाठी शुभकामना.
(चीन आता चंद्रावर माणूस पाठवू इच्छितो. चंद्रप्रवास म्हणजे तसा जरा मोठ्या देशांसाठी "स्टेटस सिंबॉल" झालेला आहे. अर्थात भारताला स्टेटस सिंबॉल मिळाल्यास आनंदच आहे.)
22 Oct 2008 - 5:29 am | स्वप्निल..
भारताच्या चंद्रयान मोहीमेला खूप खूप शुभेच्छा.
थेट प्रक्षेपण इथे बघता येइल : http://www.ibnlive.com/videos/video_streaming.php?type=ibnlokmat
स्वप्निल
22 Oct 2008 - 7:07 am | खरा डॉन
पैशाची उधलपटी आहे ही. सध्या भारतात कितितरि प्रश्न आहेत. अशा वेळेला मलातरी ही पैशाचि नासाडि वाटते. ह्यातुन देशाच काय भल होनार आहे ते विकास सांगेलका?
22 Oct 2008 - 8:23 am | विकास
पैशाची उधलपटी आहे ही. सध्या भारतात कितितरि प्रश्न आहेत. अशा वेळेला मलातरी ही पैशाचि नासाडि वाटते. ह्यातुन देशाच काय भल होनार आहे ते विकास सांगेलका?
ही मला पैशाची उधळपट्टी वाटत नाही. हं कदाचीत क्रिकेटच्या सामन्यांवर जितका खर्च होतो, ते बघण्यात जितका तमाम जनता वेळ घालवते, त्याचा सर्वाचा हिशेब केला - तो ही स्वतंत्र भारताच्या इतिहासाचा आणि त्यात गेलेले पैसे आणि चंद्रयानावर गेलेले पैसे याची तुलना केली तर क्रिकेट मधे जास्त पैसे घालवले असतील... हे केवळ एक उदाहरण म्हणून लिहीत आहे... क्रिकेट अथवा अजून काहीच्या मी विरोधात नाही.
आता दुसरे उदाहरण बघा - चंद्रयान प्रोजेक्टचा एकूण खर्च रू.३८६ कोटी. कॉमनवेल्थ गेम्स (पुणे आणि दिल्ली) - $रू. ४६३ कोटी (मला खात्री आहे तो आकडा २०१० ला दोन्ही पूर्ण संपेपर्यंत वाढणारच आहे!). म्हणजे आपले इतके प्रश्न असताना इतके कोट्यावधी खेळात का उडवायचे बरे?
अर्थात हा प्रश्न मला योग्य वाटत नाही. देशाचे प्रश्न "एका वेळेस एक" असे सुटत नसतात तर सर्वत्र लक्ष द्यावे लागते. आता जमिनीवर कमी लक्ष दिले जाते हे मान्य. पण त्याचे कारण चंद्रावर जास्त लक्ष आहे हे नक्कीच नाही. आजपर्यंत आपण १९९९ सालपासून (जेंव्हा चंद्रयान प्रोजेक्ट ठरला तेंव्हापासून) - अनेक संकटे येऊन गेली, पैसा खर्च झाला तरी असे म्हणल्याचे ऐकले नाही की (उदाहरणार्थ) अरे आपण त्सुनामीला अथवा भूज भुकंपाला मदत करू शकणार कारण चंद्रयानाला पैसे दिले आहेत...
किंबहूना मला वाटते कुठल्यातरी गरीबी हटावो योजनेत हे पैसे गेले असते तर कुणाची गरीबी हटली असती कोण जाणे! किमान हे पैसे नक्की वापरले गेल्याचे दिसत आहे (अगदी त्यातही भ्रष्टाचार धरला असे गृहीत धरले तरी)!
आता चंद्रयानासारख्या प्रोजेक्टचा उपयोग काय?
22 Oct 2008 - 9:56 pm | सर्किट (not verified)
विकासशी सहमत आहे.
ह्या मोहिमेमुळे भारत अंतरीक्ष व्यवसायातील आउट सोर्सिंगचा (एकूण बाजार रु. १० हजार कोटी) मुख्य पुरवठादार होईल.
-- सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)
22 Oct 2008 - 7:10 am | खरा डॉन
सध्या होत असलेली ख्रिश्चन धर्मातरे आधी बंद करा मग जा चंद्रावर
22 Oct 2008 - 7:52 am | विकास
सध्या होत असलेली ख्रिश्चन धर्मातरे आधी बंद करा मग जा चंद्रावर
असं कसं म्हणता? ;)
टाइम्स ऑफ इंडीया वाचा. किमान त्यांचा चंद्रयानाच्या यशस्वी उड्डाणासंदर्भातील एका प्रमुख बातमीचा मथळा तरी वाचा...
India's space journey started from a village church
22 Oct 2008 - 7:50 am | विकास
चंद्रयानासंदर्भातील खालील व्हिडीओ माहीतीपूर्ण वाटला..
http://www.youtube.com/watch?v=ipBOotJDJ1k
हे चंद्रयान जरी चंद्रावर उतरणार नसले तरी ते एक प्रोब चंद्रावर टाकणार आहे ज्यावर आणि ज्याच्यामुळे चंद्रभुमीवर तिरंगा फडकेल!
22 Oct 2008 - 8:43 am | एकलव्य
चांगल्या माहितीबद्दल मनापासून आभार!