"माझी आई हाच माझा विश्वास."

श्रीकृष्ण सामंत's picture
श्रीकृष्ण सामंत in जनातलं, मनातलं
20 Oct 2008 - 3:00 am

मुलांच पालन-पोषण करण्यासारखं दुसरं कठीण काम नाही.साध्या भाषेत सांगायचं तर "माझी आई हाच माझा विश्वास."

ह्यावेळेला मी कोकणात गणपति उत्सवासाठी गेलो होतो.माझ्या आजोळी गणपति आणतात.बरेच वेळी पाच दिवसाचा असतो.
कोकण दर्शन ट्रॅव्हल एजन्सी तर्फे मी फार अगोदर तिकीट काढून ठेवलं होतं.दादरच्या ब्रॉडवे सिनीमा समोर ह्या बसचा स्टॉप होता.सकाळीच उठून जावं लागलं.माझ्या शेजारी एक सदगृहस्थ येऊन बसले.बस चालू झाली तसं आम्ही हॅलो,हाय करून बोलायला लागलो.
गणपति उत्सवात कोकणात किती गर्दी करून लोक मजा करायला जातात.सगळे नातेवाईक एकत्र येऊन तो दीड दिवस किंवा ते पाच दिवस कसं गाणं वाजवणं,घरातच छोटे छोटे कार्यक्रम करून आपली करमणूक करून घेतात.त्याच सुमारास निरनीराळ्या फुलांचा मोसम असल्याने गणपतिच्या मुर्तिची आरास करून ती जागा कशी सुशोभित करतात,ह्या सगळ्या माहितीची आम्ही दोघे एकमेकाला देवाणघेवाण करीत होतो.
मी त्यांना गमतीत म्हणालो,
"आम्ही मासे खाऊ लोक गणपति पुढल्या दाराने विसर्जनाला जाता जाता आमचा रामा मागच्या दाराने बाजारातून मासे घेऊन येतो."

नंतर हे गृहस्थ- डॉ.सूर्यकांत पारकर- जरा गंभिर होऊन मला म्हणाले.खरं तर ह्यावेळी मी माझ्या आईच्या वर्षश्राद्धाला जात आहे.गेल्या गणपतिच्या दिवसात ती निर्वतली. आईची आठवण काढून त्यांचे डोळे भरून आले होते.
मी विचारलं,
"काय झालं आपल्या आईला?"
त्यावर ते म्हणाले,
"एका एकी तिला मॅसीव हार्ट ऍटॅक आला.मी स्वतःच डॉक्टर असल्याने लगेचच उपाय करण्याचा प्रयत्न केला. पण सगळं संपलं होतं."
सांगताना फारच भावनावश झाले होते.

मला म्हणाले,
"माझी आई एक घरगृहिणी होती.तिच्या लक्षात आलं की,आयुष्यात सफलता मिळवणारे लोक टी.व्ही. बघण्यात वेळ घालवण्या ऐवजी वाचन करण्यात वेळ घालवतात.तिने आम्हाला सांगितलं की एक दोन कार्यक्रमच आठवड्यातून टी.व्ही.वर पाहायचे.आणि उरलेल्या रिकाम्या वेळात लायब्ररीतून एक दोन पुस्तकं आणून वाचायची आणि काय वाचलं ते संक्षिप्तात लिहून तिला दाखवायचं.ते ती वाचायची आणि तिचे शेरे द्दायची.काही वर्षानी आमच्या लक्षात आलं तिचे ते शेरे ही एक चाल होती. आमची आई जेमतेम तीन ग्रेड्स शिकलेली होती.

मी हायस्कूलमधे असताना वरचा नंबर घ्यायचो.पण हे जास्त वेळ टिकलं नाही.मला छानछोकी कपडे वापरावे असं वाटायचं. बाहेर कट्ट्यावर बसून गप्पा मारयाला आवडायचं.माझा वर्गातला नंबर घसरत खाली गेला.
आई बाहेरची कामं पण करायची.एकदा मी तिला म्हणालो,
"मला टेरीकॉटनचा शर्ट आणि पॅन्ट हवी आहे"
त्यावर ती मला म्हणाली,
"ठिक आहे मी लोकांच्या घरची जी कामं करते त्याचे पैसे मिळाल्यावर ते सगळे तुला देते.घरचा सर्व खर्च संभाळून उरवशिल त्या पैशातून तुला हवं ते घे."

मला ही योजना आवडली.पण खर्च संभाळल्यावर काहिच उरलं नाही.
माझी आई किती व्यवहारी होती ते मला कळलं.घर संभाळून,घरखर्च संभाळून आमच्या समोर रोज जेवणाचं ताट वाढून जरूरी प्रमाणे आम्हाला वापरायला कपडे पण घ्यायची.
माझ्या लक्षात आलं की तात्कालिक तृत्पी मला काही ही समाधान देत नव्हती.सफलता मिळवण्यासाठी बौद्धिक तयारी हवी.
माझा दृढविश्वास होता आणि माझं स्वप्नही होतं की मी डॉक्टर व्हावं.

माझ्या अभ्यासात नीट लक्ष देऊन परत मी माझा वरचा नंबर मिळवायला लागलो.आणि सरतेशेवटी माझं स्वप्न मी साकार केलं आणि डॉक्टर झालो.
कैक वर्षाची माझ्या आईची अविचल देवावरच्या श्रद्धेने मला प्रेरणा दिली.विशेष करून ज्यावेळी अतिशय कठीण शल्यक्रिया करताना मला चिकित्सेची भिती आव्हान देत असे अशा वेळी.

काही वर्षापूर्वी माझ्या लक्षात आलं की मला फार पटकन पसरणारा प्रोस्टेट कॅन्सर झाला आहे.आणि मला कळलं की तो माझ्या मज्जातंतूत पण पसरेल. माझ्या आईची गणपतिवर खूप श्रद्धा होती.ती जरा सुद्धा विचलीत झाली नाही. आणि नंतर कळलं की माझ्या कण्यातला ट्युमर हानीकारक नव्हता.माझी सर्जरी होऊन मी बरा पण झालो.

गणपति दैवतावर आम्हा सर्वांची खूप श्रद्धा आहे.
ह्यावेळेला आम्ही दीडच दिवस गणपति आणणार नाही पेक्षा आई आम्हाला अनंतचतुर्दशी पर्यंत गणपति ठेवायला सांगायची.
माझी कहाणी ही खरं तर माझ्या आईचीच कहाणी आहे.एक स्त्री की जिला औपचारिक शिक्षण अगदी थोडं,तरी पण वडीलकीच्या जागेचा उपयोग करून आम्हा सर्वांच जीवन तिने पालटून टाकलं.साध्या भाषेत सांगायचं तर "माझी आई हाच माझा विश्वास"

मला ही हे ऐकून गहिवर आला.मी त्यांच्या पाठिवर हात फिरवून म्हणालो,
"काळजी करू नका, हे ही दिवस जातील."

श्रीकृष्ण सामंत

कथालेख

प्रतिक्रिया

नि३'s picture

20 Oct 2008 - 4:23 am | नि३

सामंत सर
नेहमीप्रमाणे काळजाला भिडणारा एक जबरदस्त लेख ...
माझ्याबाबतीत सांगायचे झाले तर "माझी आई हाच माझा प्राणवायु"
---नि३.

श्रीकृष्ण सामंत's picture

20 Oct 2008 - 5:26 am | श्रीकृष्ण सामंत

प्रतिक्रिये बद्दल आभार
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

प्राजु's picture

20 Oct 2008 - 8:22 am | प्राजु

आईची खूप आठवण होते आहे.
अनेक प्रसंगात, अगदी खरं सांगायचं तर आजारपणात जास्ती.... आईच हवी असते.
एखादि साधी कविता जरी लिहिली तरी आईला आधी वाचून दाखवायची असते... छोट्या छोट्या प्रसंगामध्ये आनंद मिळवायला आईनेच शिकवलं आहे.
द्य श्वर म्हणजेच आई...

लेख खूप आवडला.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

श्रीकृष्ण सामंत's picture

20 Oct 2008 - 10:20 am | श्रीकृष्ण सामंत

प्राजु ,तुझ्या प्रतिक्रिये बद्दल आभार.
मी पण तुझ्या सारखंच म्हणतो
काशा सारखं जिचं हृदय आहे
श्वरा सारखं जी दयाळू आहे
ती आई.

www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

जैनाचं कार्ट's picture

20 Oct 2008 - 12:00 pm | जैनाचं कार्ट (not verified)

नेहमीप्रमाणे काळजाला भिडणारा एक जबरदस्त लेख ...

हेच म्हणतो !

जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आमचा ब्लॉग

श्रीकृष्ण सामंत's picture

21 Oct 2008 - 7:41 am | श्रीकृष्ण सामंत

आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

घाशीराम कोतवाल १.२'s picture

20 Oct 2008 - 2:33 pm | घाशीराम कोतवाल १.२

आद्य ईश्वर म्हणजेच आई...
आकाशा सारखं जिचं हृदय आहे
ईश्वरा सारखं जी दयाळू आहे
नेहमीप्रमाणे काळजाला भिडणारा एक जबरदस्त लेख ...

म्हणुनच म्हटले आहे ना
स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी
कारण आई हाच खरा ईश्वर
या जगात देव बघायचा आहे तर आपल्या आई कडे बघा
तुम्हाला तिथे देव भेटेल

माझ्यासाठि माझि आई सर्वस्व आहे

मी आता तसा कोतवाल नाही बरं?

श्रीकृष्ण सामंत's picture

21 Oct 2008 - 7:58 am | श्रीकृष्ण सामंत

अगदी खरं आहे आपलं म्हणणं.म्हणून मी माझ्या एका कवितेत म्हणतो,
"पाहीले नसेल मी त्या "देवाला"जरी
त्याला पहाण्याची मला
असे काय जरूरी?
अगे,आई
कमलमुखी तूं सुंदर असतां
रुप "देवाचे "कसे वेगळे?

असता जवळी दुनियेतली दौलत जरी
तुझ्या पुढे आम्हां त्याची काय जरुरी
अगे,आई
कमलमुखी तूं सुंदर असतां
रुप "देवाचे "कसे वेगळे?
आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार

www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

विसोबा खेचर's picture

21 Oct 2008 - 8:27 am | विसोबा खेचर

सामंतकाका,

जिवाला हात घातलात...

आपला,
(मातृभक्त) तात्या.

श्रीकृष्ण सामंत's picture

21 Oct 2008 - 9:34 am | श्रीकृष्ण सामंत

तात्याराव,
आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

चटोरी वैशू's picture

21 Oct 2008 - 10:32 am | चटोरी वैशू

तुमचा लेख वाचला आणि आई आठवली (आठवली काय विसरले नाही अजुन)... २८ जूलै ला ती आम्हाला सोडून गेली .... ती आजारी होती अंथरुणाला खिळून होती पण सगळे ठीक चालू होते... ती गेल्यामुळे सारे घर विस्कटून गेले..... क्षणा क्षणाला तीची कमी जाणवते..... तिचे शिक्षण कमी होते पण आम्हाला खुप उशिरा कळ्ले .... कारण तिचे संस्कार असे होते कि कुणालाही ती प्राध्यापिका / डॉक्टर वाटायची... कधी कधी वाटते की ती अजुन हि आहे..... आपल्यासोबत्....पण सत्य कटू आहे.... तिच्या नसल्याने खूप अडचणीं येत आहेत.... आज माझे लग्न झालेय तरीही वाटते.....का ती अशी सोडून गेली ...आपल्याला परके करुन गेली.... पण आजारी वडिलांकडे व लहान भावाकडे बघून आतल्या आत रडून घेते.....मला तरी नवरा आहे आधाराला.... वडिल एकटेच पडले... भावाचे लग्न होईल ....पण वडीलां ना समजून घेणारी व्य़क्ती हरवली आहे....

घाशीराम कोतवाल १.२'s picture

21 Oct 2008 - 12:44 pm | घाशीराम कोतवाल १.२

आई आठवली (आठवली काय विसरले नाही अजुन)
खरच वैशु तुझि प्रतिक्रिया वाचुन हळव झालो तु म्हण्तेस ते खरच आहे आई ला विसरणे म्हण्जे क्रुतघनता आहे
आईच का वडील सुद्धा
मी आता तसा कोतवाल नाही बरं?