तातडीची मदत हवी आहे - लेह येथे चारचाकीच्या अननोन इश्यू संदर्भात..

मोदक's picture
मोदक in जनातलं, मनातलं
4 Sep 2017 - 2:48 am

नमस्कार मंडळी,

मिपाकर अभिजीत अवलिया २४ ऑगस्ट पासून स्वतःच्या चारचाकीने पुणे-लेह-पुणे दौर्‍यावर आहेत. (गाडी - फोर्ड फिगो - डिझेल)

काल दिनांक ३ सप्टेंबरला सकाळी लेह ते खार्दुंगला या रूटवरती साऊथ पुलू नंतर तीन किमी अंतरावर गाडीचा Malfunction Indicator (MAL) पिवळा झाला. तेथून ते परत फिरले आणि थोडे अंतर लेहच्या दिशेने उतरले. मोबाईलची रेंज मिळाल्यानंतर फोर्डच्या टेक्नीकल कॉल सेंटरला फोन केला. त्यांनी सांगितले की हा इंडीकेटर पिवळा झाला तर कांही अडचण नाही मात्र इंडिकेटर लाल झाला तर प्रॉब्लेम असतो. (नक्की काय प्रॉब्लेम असतो ते कळालेले नाही)

नंतर पुन्हा त्या रूटवरती गाडी चढवली असता जास्ती उंचीवर गेल्यानंतर तो इंडीकेटर पिवळा होत आहे व गाडीचे अ‍ॅक्सेलरेशन कमी होत आहे.

तेथे थोडीफार चौकशी करून ते लेहला परत फिरले आहेत आणि दिनांक ४ सप्टेंबरला पँगाँग लेक येथे जाऊन पुन्हा ५ तारखेला लेह-साऊथ पुलू-नॉर्थ पुलू-खार्दुंगला आणि नुंब्रा व्हॅली असा रूट करणार आहेत.

लेहमध्ये मेकॅनिक आणि इतरांचे प्रचंड वेगवेगळे सल्ले मिळत आहेत. "बिन्धास्त जावा हो कै होत नाही" येथे पासून ते "रेटून चालवा" "क्लच प्लेट गेली आहे" इथंपर्यंत.

या संदर्भात मिपाकरांची तातडीची मदत हवी आहे.

१) तेथे गेलेल्या कोणाला असा कांही प्रॉब्लेम आला होता का..? त्यावेळी काय केले..?
२) बाहेरील देशात बर्फ / हाय अल्टीट्युडला गाड्यांना असा प्रॉब्लेम येतो का..? त्यावेळी काय करतात..?
३) "लो ऑक्सिजन इंटेक" हा प्रॉब्लेम असल्यास चारचाकीचा ऑक्सिजन इंटेक वाढवता येतो का..? (कारण अ‍ॅक्सलरेशन कमी कमी होत आहे)

* तुमच्या मित्रमंडळींमध्ये किंवा आणखी कोणाला कांही माहिती असल्यास कृपया कळवा.
** अभिजीत यांच्याशी कोणाला बोलून नक्की प्रॉब्लेम समजून घ्यायचा असल्यास मला व्यनी करा - मी त्यांचा तिथला नंबर व्यनीने पाठवेन.
*** लेह आणि त्यातही पँगाँगला फोन लागणे हे एक दिव्य असले तरी ४ सप्टेंबरला संध्याकाळी आमचे बोलणे होईल तेंव्हा या धाग्यावरील उपयोगी प्रतिसाद मी त्यांना कळवू शकेन.

प्रतिसादांच्या प्रतिक्षेत.

प्रवासचौकशीमदत

प्रतिक्रिया

मी_आहे_ना's picture

4 Sep 2017 - 6:36 am | मी_आहे_ना

(फिगो २ व्हील ड्राईव्ह ग्रुहित धरून) जास्त उंचीवर (लेह म्हणजे साधारण ११०००फूट) वाहनाची कार्यक्षमता २५-३०% कमी झाली असणार. अजूनही काही लोकांना आलेले अनुभव ithe आणि ithehi पाहता येतिल. अर्थात, त्यांची सद्य-स्थिति (म्हणजे सहकुटुंब ट्रिप आहे किंवा जोखिम पत्करण्याची तयारी कितपत आहे) हे बघून निर्णय घ्यावा लगेल. काही तात्पुरते उपाय म्हणजे इंडिकेटर ग्लो झाला की थोडा वेळ थांबत थांबत जाणे, अधे मधे फिल्टर क्लीन करणे इ. करत मार्गक्रमण करता येइल (पण हे सर्व 'इटरेशन' म्हणून - पुन्हा जोखीम आहेच)

मी_आहे_ना's picture

4 Sep 2017 - 6:50 am | मी_आहे_ना

'खारदुंगला' पास ला अजून एकाला (ह्यॅचबॅक गाडीच) आलेला anubhav - त्यातला हा सारांश -

At Khardungla the Engine Malfunction indicator did get 'ON'. Checked the Engine Oil level, coolant level, brake oil level, steering oil and the bottom of my car to check for any leakages near the Mobil chamber. Everything was perfect. Then I went through the car’s manual and it was mentioned that even if the Engine Malfunction light gets on, one can drive but will get less power output from the Engine. So keeping my fingers crossed I drove on. After reaching Diskit the Malfunction indicator automatically got 'off'. Then I understood that due to high altitude and thin air the indicator had got 'on'.

It is very important to keep the air filter clean so that the engine gets whatever oxygen is available.
During my trip I checked and cleaned the air filter every alternate day.

कंजूस's picture

4 Sep 2017 - 10:53 am | कंजूस

केमिस्ट्री आहे ती.
हवा ( त्यातला ओक्सिजन ) कमी झाल्याने फक्त काही टक्के कमी इंधन जळेल, बाकीचं न जळता बाहेर फेकलं जाईल. अर्थात इंधन वाया जाण्याबरोबरच एंजिनची शक्ती ( Torque) कमी मिळेल. सपाट रस्त्यावर नाही परंतू चढ/उतारावर धोका उद्भवेल.

प्रीत-मोहर's picture

4 Sep 2017 - 11:04 am | प्रीत-मोहर

मला काही जास्ती कळत नाही गाड्यांमधलं,पण आमच्या गाडीचं एकदा कूलंट संपलं होत तर तेव्हा असेच इंडिकेट करत होती कार. जस्ट सर्विसिंग केल्याने कुलंट संपेल हे ध्यानातही नव्हतं आलं. पण सर्विसिंगवाल्याने कुलंट टाकलंच नव्हतं गाडीत हे कारण होतं.

धन्यवाद मी_आहे_ना, कंजुसकाका आणि प्रीमो. मी तुमचे इन्पुट्स अभिजीतला कळवतो आहेच. बघू काय होते ते.

कुटुंब सोबत असल्याने सेफ मार्ग म्हणून खार्दुंगलाचा रूट एखाद्या लोकल गाडीने कर असेही सुचवेन आज.

पप्पुपेजर's picture

4 Sep 2017 - 12:38 pm | पप्पुपेजर

It’s generally due to high altitude problems nothing else. This is very common with lots of cars, Ask him to not to burn clutch too much as generally power will reduce drastically at high altitudes.

मोदक's picture

4 Sep 2017 - 12:44 pm | मोदक

हो चालेल, सांगतो.

धन्यवाद मंडळी. वरील सर्व प्रतिसाद अभिजीत यांच्यासोबत शेअर केले आहेत.

त्यांनी आज लोकल गाडीने खार्दुंगला व हंडर असा रूट केला आहे

निरनिराळ्या घाटांचा चढ मोजून एका धाग्यात साठवला पाहिजे. अॅप्स आहेत.
घाटाची खालची,वरची उंची आणि किती किमी अंतराचा रस्ता याची नोंद करावी.
१/१२ म्हणजे १००० मिटर्स उंची गाठायला १२०० मिटर्सचा रस्ता .
१/२१ पेक्षा अगोदरचा अधिक अवघड असेल.

प्रतिसादांबद्दल धन्यवाद मंडळी..

आजच अभिजीत यांनी लेह आणि परिसरातली भ्रमंती आवरून मनाली कडे कूच केले आहे. आता उपशी ते केलाँग आणि पुढे रोहतांग असे दोनच आव्हानात्मक टप्पे आहेत.

अजूनही तो MAL दिवा लागतोय का?

मोदक's picture

7 Sep 2017 - 12:37 am | मोदक

नाही.

आता फक्त टांगलांगला आणि एक दोन हाय माऊंटन पासेस आहेत पण तेथे रस्ता चांगला असल्याने फार प्रॉब्लेम येणार नाही.

अभिजीत अवलिया's picture

8 Sep 2017 - 2:28 pm | अभिजीत अवलिया

लडाख परिसरात नेट चालत नसल्याने मोदक यांना धागा काढण्यास सांगितले. त्यांचे आणि माहिती देणार्या सर्वांचे खूप आभार.