सर्व मिपाकरांना फ्रेंडशिप दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
**अतूट मैत्री **
मैत्री असावी फुलासारखी,
निशब्दपणे उमलणारी..
मैत्री असावी दवासारखी,
मोत्यासारखी चमचमणारी..
मैत्री असावी सूर्यासारखी,
प्रकाशमय करणारी..
मैत्री असावी चंद्रासारखी,
शीतलता देणारी..
मैत्री असावी धाग्यासारखी,
वस्त्र साकारणारी..
मैत्री असावी सुईसारखी,
नात्यांना गुंफणारी..
मैत्री असावी मेणासारखी,
मित्रांसांठी वितळणारी..
मैत्री असावी दगडासारखी,
अतूट राहणारी..
-निलम बुचडे.
आणखी कविता वाचायच्या असतील तर माझ्या पेजला भेट द्या. Happy friendship day..
https://www.facebook.com/mypoemsbynilambuchade/
वरील कविता साहित्यिक रसास्वादासाठी नसून केवळ फ्रेंडशिप दिनानिमित्त आहे, याची कृपया नोंद घ्यावी.
प्रतिक्रिया
15 Aug 2017 - 3:35 pm | धर्मराजमुटके
कविता वाचली. काही प्रतिसाद देणार इतक्यात तळटीप वाचली. म्हणून फक्त 'वाचल्याची पोच' देत आहे.