परब्रम्ह उभे ठाकले समोर साक्षात
कैसे मी मग सावरावे आता देहभान
दाटलेला कंठ,डोळा पाणी आर्त
हरपली केव्हाच अवघी भूक तहान
मागणे भौतिक सुखे हे मूर्खलक्षण
अशाश्वत गोष्टींचे काय करु कळेना
तूच निर्मीलेल्या जगी कंठतो जीवन
तरीही का तुझा परीसस्पर्श होईना
सद्य परिस्थिती देवा तुझिया समोरी
काय तुला मी वेगळे असे आळवावे
दाता आहेस तू, एवढेच द्यावे मला
तुझ्या चरणाची मी फक्त धूळ व्हावे !
प्रतिक्रिया
3 Jul 2017 - 10:22 am | प्राची अश्विनी
खूप सुंदर!
3 Jul 2017 - 10:24 am | प्राची अश्विनी
खूप सुंदर!
3 Jul 2017 - 2:20 pm | पद्मावति
सुरेख रचना!
3 Jul 2017 - 2:41 pm | कंजूस
खरीखुरी आळवणी!
3 Jul 2017 - 3:43 pm | नि३सोलपुरकर
" तूच निर्मीलेल्या जगी कंठतो जीवन
तरीही का तुझा परीसस्पर्श होईना ".... सुंदर
3 Jul 2017 - 3:50 pm | सानझरी
+१.. फारच सुंदर..
3 Jul 2017 - 4:36 pm | यशोधरा
देखणी रचना. खूप आवडली.
3 Jul 2017 - 6:31 pm | अत्रुप्त आत्मा
छान हो छान.
3 Jul 2017 - 6:34 pm | पुंबा
आहा!! काय सुंदर!! फार छान..
4 Jul 2017 - 11:28 pm | पिशी अबोली
सुरेख!!
पावसाच्या स्वामी स्वरूपानंदांची एक सुंदर रचना आहे-'उदारा जगदाधारा' ने सुरू होणारी. लहानपणी म्हणत असू, ते आठवलं एकदम हे वाचून..
5 Jul 2017 - 4:47 am | aanandinee
अप्रतिम !! भक्तीचा सुगंध कवितेत दरवळतो आहे