डिस्क्लेमर :
१. खालील लेखातील मते ही माझ्या हिंदी सिमातील तुटपुंज्या ज्ञावर आधारीत आहेत.हा वैचारीक लेख नसल्याने (तसे आमचे कुठलेही लेख जास्त विचार करण्यासारखे नसतात, हा भाग वेगळा) खूप विचार करणार्या व्यक्तींनी ह्या लेखाकडे कानाडोळा केलात तरी चालेल.
२. दुसरी गोष्ट म्हणजे मला वाद्यांमधले अजिबात काही समजत नाही.
पिपाण्या : म्हनजे फुंकायची वाद्ये ह्यात बासरी पासून सनई पर्यंत सगळी वाद्ये.
खाजवायची वाद्ये : सतार, तंबोरा. व्हायोलिन.
बडवायची वाद्ये : तबला-डग्गा, ढोल, नगारा इत्यादी. (नगारे पिटायला आणि ढोल वाजवण्यात आम्ही फार पुढे.आवाज न करता ह्या दोन्ही गोष्टी आम्म्ही वेळोवेळी करतोच करतो.)
आळशी लोकांची वाद्ये : बसल्या जागी किंवा बसून कंटाळा आला असेल तर उभे राहून किंवा चालता-चालता, बोटे फिरवत वाजवायची वाद्ये. ती म्हणजे ऑर्गन, हार्मोनियम आणि माझा आवडता पियानो.
============
तशी हार्मोनियम असलेली बरीच गाणी मिळतील पण ऑर्गनचा वापर असलेले एकच गाणे मला माहित आहे आणि ते म्हणजे "तू प्यार का सागर है' https://www.youtube.com/watch?v=e2D-kjOMNF0
पियानो माझा फार आवडता. कारण एकच आणि ते म्हणजे हिंदी सिनेमा.
कोणे एके काळी मी हिंदी सिनेमा बघत असे. काही काही सिनेमे लागोपाठ म्हणजे एक शो संपला की लगेच दुसरा (सत्ते पे सत्ता आणि १९४२ अ लव्ह स्टोरी, हे त्यापैकीच.) तर काही सिनेमांचा रतीब घालायचो म्हणजे आवडला तर रोज बघायचो (अॅन इव्हिनिंग इन पॅरीस, तुमसा नहीं देखा, सी.आय.डी., तिसरी मंझील, डॉन, त्रिशूल, अमर-अकबर अँथनी, जंजीर,शोले इत्यादी.) त्याकाळी व्हिडिओ घरात नसल्याने आणि आंतरजाल तर फारच दूरच असल्याने, दुसरा कुठलाच मार्ग न्हवता. गेले ते दिन. आजकाल मात्र अशी श्रवणीय गाण्यांची भरमार असलेले सिनेमे येत नाही.गाणी देखणीय पण असतात हे विजय आनंद नंतर जाणवलेला दुसरा दिग्दर्शक म्हणजे राज कपूर. विजय आनंद कधी खिडक्या-दरवाजे मोजायला लावायचा तर कधी नायक-नायिकांचे ड्रेसेस....अर्थात बघणीय गाण्यांबद्दल पुढे कधी तरी.
पण हिंदी सिनेमा म्हटला की गाणी हवीतच अर्थात नियमाला अपवाद म्हणून इत्तिफाक, कलयूग, नाम (हा सिनेमा काही बघीतलेला नाही. कुमार गौरव, संजय दत्त हे कलाकार आणि महेश भट्ट दिग्दर्शक, असे त्रिकूट असेल तर आम्हाला असे सिनेमे बघवत नाहीत. आम्ही आपले अमिताभ, सलीम जावेद आणि कुठलाही दिग्दर्शक असेल तरी चालणार्या पिढीतले.खानावळीत आम्ही जेवायला जात नाही.अर्थात ज्यांना घरचे जेवण आवडत नसेल त्यांना खानावळ आवडणारच आणि मग पोट बिघडले की मग लागलेच मृत्यूपंथाला.असो, ... डॉन (जूना) सारखा विडंबनात्मक सिनेमा पण आम्ही डो़यावर घेऊन परत परत बघीतलेला आहे. ("डॉन" ही एक विडंबनात्मक कलाकृती होती.सिनेमा सृ ष्टीत अशी उदाहरणे बरीच मिळतील.)
जेम्स बाँड पासून प्रेरणा घेवून आपल्या इथे पण काही हेर टाइपसिनेमे निघाले. फर्झ किंवा सुरक्षा (जूना, मिथूनवाला) पण जेम्स कधी उगाच नाचत बसला नाही पण आपले गन मास्टर जी नाईन मात्र "मौसम है गाने का" किंवा "मस्त बहारोंका मैन आशिक" वर हालचाल जास्त करत होते. अर्थात जेम्सच्या सिनेमात पण वाद्ये आहेत पण ती वाजवाणारी कलाकार मात्र त्याची नायिका तरी असते (उदा "द लिंव्हिंग डे लालाईट्स मधील "कारा मिलोव्ही" (Maryam d'Abo) असेच एक खाजवणारे वाद्य वाजवायचा प्रयत्न करते. अर्थात ती बाँड गर्ल असल्याने ते वाद्य वाजवतांना पण आपल्या बाँड गर्ल इनेजला धक्का लागणार नाही ह्याची काळजी पण घेतच असते.शंकेखोरांनी सिनेमाचा शेवटचा शॉट बघावा.) किंवा मग मूनरेकर मधला ड्रॅक्स पियानो वाजवतो.मुळात एका हातात कुठलेही शस्त्र आणि बाजूला एखादी रुपयौवना असेल तर आमच्या बाँडला वाद्ये वाजवायची गरज नाही.अगदी फावला वेळ असेल तर तो पत्ते आणि ते पण पोकरच खेळतो.
हां तर सांगायचा मूद्दा असा की, पुर्वी हिंदी सिनेमातील गाण्यांत वाद्यांचा भडिमार असायचा. नायक अथवा नायिकेला जर वाद्य वाजवता येत नसेल किंवा नाच येत नसेल तर तो फाऊल मानला जायचा. अमिताभ सारख्या अभिनेत्याला देखील ह्या सिनेमासृष्टीत नाचायला लागले आहे तिथे विनोद खन्ना, धर्मेंद्र, ह्यांची तर बातच नको. (शंकेखोरांनी एकदा कुर्बानी, शोले नजरेखालून घालावा. कुर्बानीतील गाणी मात्र बघणीय होती.)
आता वाद्ये म्हटली हार्मोनियम, तबला-डग्गा किंवा तंबोरा ह्यांच्या मागे मुद्दाम कोण जात नाही. विशेषतः "हार्मोनियम" हे नवकलाकारांचे वाद्य (शंकेखोरांनी सी.आय.डी. तले "लेके पहिला पहिला प्यार, https://www.youtube.com/watch?v=vVmShhhiPPI हे गाणे किंवा जंजीर सिनेमातील "दीवाने है दीवानोंका ना घर चाहिये" https://www.youtube.com/watch?v=vVmShhhiPPI , हे गाणे बघावे.) तसे हार्मोनियम असलेले सिनेमे चालतात पण नायकाने हार्मोनियमला हात लावायचा नसतो. (पडोसन आणि बुढ्ढा मिल गया ह्यात मुख्य कलाकाराने हार्मोनियमला हात लावलेला नाही, अर्थात तरी पण हे सिनेमे चालले...पडोसन मध्ये तर मेहमूद आणि किशोर कुमार ह्यांनी फक्त हार्मोनियमच उचललेले नाही तर त्याच बरोबर सिनेमा पण उचलला.तसे चितचोर ह्या सिनेमात पण नायकाने हार्मोनियमला हात लावला आहे पण जास्त वाजवलेले नाही. तू जो मेरे सूर में सूर हे गाणे बघा.... https://www.youtube.com/watch?v=H3o1ZyDNxM4)
अमिताभला पण हे हार्मोनियम काही लाभले नाही.उदा. हे मंझिल ह्या सिनेमातील गाणे , "रिमझिम गिरे सावन " -----https://www.youtube.com/watch?v=JSN5dE_xFSE
तसे संपूर्ण गाण्यात अमिताभने कधीच संपूर्ण गाणे भर कुठलेच वाद्य हातात धरले नाही. उदा. 'जिंदगी हसने गाने के लिये है, पल दो पल" हे "जमीर" सिनेमातील गाणे.
https://www.youtube.com/watch?v=rUC2wVTrMAU
पण पुढे मात्र त्याच सिनेमात २ गाण्यात अमिताभने संपूर्ण गाण्यात गिटार हातात धरली, त्याची परिणीती सिनेमा पडण्यात झाली. नाहीतर अमिताभ-विनोद खन्ना, शम्मी कपूर हीच स्टार कास्ट असून पण "परवरीश" चाललाच की. अर्थात अमिताभ ह्या चुकीने लगेच शहाणा झाला आणि पुढे मात्र त्याने वाद्य संपूर्ण गाणे भर हातात धरले नाही. बादवे जमीर १९७५ सालचा तर परवरीश १९७७ सालचा. (अमिताभ बच्चन चूकीतने फार लवकर शहाणा होतो, ह्याचे हे अज्जून एक उदाहरण.) बादवे, तंबोर्याला आडवे करण्यात अमिताभ मात्र एकदम तरबेज.तंबोरा उभाच पाहिजे असे नाही, पण तंबोरा अमिताभला सूट होत नाहे, सिनेमा पडतो, असे माझे निरिक्षण. गरजूंनी शोढ घ्यावा. कारण तसेही ह्या लेखात शब्दांपेक्षा, लिंकाच जास्त झाल्यात.
तसे कलाकार कधी खाजवायची वाद्ये पण हाती घेत असत. देव आनंदच्या हातात पिस्तूल (फार अलगद पणे हा कलाकार पिस्तूल हाताळायचा.मग तो वॉरंट असो किंवा नौ दो ग्यारह. एखादे नाजूक फूल पकडावे इतक्या नाजूकपणे तो पिस्तूले हाताळायचा.) आणि इतर कलाकारांच्या हातात ही खाजवणारी वाद्ये सारखीच (अपवाद ऋषी कपूरचे कर्झ सिनेमातील "दर्दे दिल दर्दे जिगर https://www.youtube.com/watch?v=hYNi_T848Y0 ...... बादवे ऋषी कपूर वाद्यांना बर्यापैकी हाताळायचा, मग त्या पिपाण्या असोत किंवा खाजवणारी किंवा हात हलवणारी.) शंकेखोरांनी https://www.youtube.com/watch?v=5xKGZCY3j84 हे गाणे बघावे, तारीकच्या खाजवण्यापेक्षा ऋषी कपूर पिपाणी जरा तालासुरात फुंकतोय.)
कुणी कुठले वाद्य वाजवावे ह्याला हिंदी सिनेमात फार मह्त्व आहे आणि कूणी कुठले शस्त्र वापरावे ह्याला पण..... सूरा-चाकू तर कुठलाही हिरो वापरेल अगदी तशीच वेळ आली तर ऋषी कपूर, देव आनंद देखील......पण देव आनंदने मशीन गन घेतली की सिनेमा डब्यात गेलाच म्हणून समजावा. अपवाद "हम दोनो." हा सिनेमा निव्वळ गाण्यांच्यामुळे आणि २-२ देव आनंदमुळे चालला. कुणीही उठावे आणि सैन्यात जावे आणि कुणीही उठावे आणि पोलीसात जावे आणि अगदी काहीच नाही जमले तर किमान पॉकेटमार किंवा एका समाजसेवा करणार्या गुंडाच्या टोळीचे नायक व्हावे, इतक्या माफक भुमिका असणारेच सिनेमे आमच्या काळात जास्त. हम-दोनो सिनेमात पण देव आनंद केवळ एक जाहीरात बघून सैन्यात जातो. जावू दे, देव आनंदच्या स्टाईल आणि कोंबड्या पाई आम्ही "अव्वल नंबर" पण १० वेळा बघू आणि "स्वामी दादा" २० वेळा. "सुहाग" नामक सिनेमात तर अमिताभ केवळ दहावी पास असुन पण पोलीसात जातो आणि ते पण डायरेक्ट सब इंन्स्पेक्टर म्हणून..फार मस्त काळ होता तो. अर्धे तिकिट आणि संपूर्ण मेंदू डोअरकीपरच्या ताब्यात द्यायचा आणि सिनेमा बघायचा.आजकाल पण अशीच परंपरा आहे म्हणतात.
आमच्या त्या काळात एक बरे होते.नायकाप्रमाणे कथा आणि वाद्ये असत.भरमसाठ नायक असतील तर ऋषी कपूरच्या हातातच वाद्ये द्यायची, कथे प्रमाणे तशी वेळ आलीच तर तात्पुरते कुणीतरी वाद्ये घ्यायचा पण मारामारी सुरु झाली की लगेच सगळी वाद्ये ऋषी कपूरकडे...एक जिवंत उदाहरण म्हनजे "अमर अकबर अँथनी" हा सिनेमा अद्याप तरी जिवंत आहे. मन नाराज असेल तर हा सिनेमा बघा.अमर अकबर पासूनची प्रथा ऋषीने "दीवाना" ह्या सिनेमा पर्यंत चालू ठेवली "सोचेंगे तुम्हे प्यार " https://www.youtube.com/watch?v=17LL_iqlHE8 ह्या गाण्यापर्यंत वादक-गायक नट म्हणून ऋषीचे स्थान अबाधित होते.ह्या गाण्याचे एक वैशिष्ट्य म्हणजे, ऋषी जे काही अंग हलवतो त्याला डान्स म्हणायचे आणि बेंबी डान्सची पण प्रथा चालू झाली.
पण त्याही आधी देव आनंद किंवा दिलिप कुमार किंवा राज कपूर (हा फार मोठ्ठा माणूस, इति मंदाकिनी.) उगाच तंबोरे किंवा हार्मोनियम वाजवत बसले नाहीत. राज कपूरने पिपाण्या वाजवल्या पण तबला डग्गा नाही वाजवला. जे राजच्या बाबतीत तेच दिलीप आणि देवच्या बाबतीत. (मी हळूहळू ह्यांचा उल्लेख एकेरी करायला लागलोय, हे सुज्ञांच्या लक्षांत आलेच असेल.)
तर नमनाला इतकी वाद्ये खर्ची घातली आता मूळ मूद्द्याकडे येतो.
तर झाले असे की आमच्या खयाली पुलावातील आमची स्वतःची एक जीवनशैली आहे.स्वतःचा एक १०-१२ खोल्यांचा टुमदार बंगला असावा.त्यात एक लायब्ररी असावी.एक ५० फूट बाय ८० फुटाचा दिवाणखाना असावा.त्याच्या एका कोपर्यात छोटासा मिनि बार असावा आणि दर रोज रात्री मिपाकरांसोबत कट्टा असावा आणि जोडीला एखादे वाद्य. आता बाकी सगळे जमेल हो पण नक्की वाद्य कुठले? हा प्रश्र्न पडला आणि मी जून्या हिंदी सिनेमातील गाणी बघायला सुरुवात केली, त्यात एक वाद्य मात्र असे मिळाले की जे ह्या दिवाणखान्यात एकदम पर्फेक्ट बसेल आणि ते म्हणजे पियानो.
मुळात पियानो हे कुणी ऐरा-गैरा विकत घेऊ शकत नाही. कारण त्याचा अफाट पसारा. मला एक छोटेखानी पियानो हवा होता. त्याची किंमतच ५ लाख सांगीतली.आता हा असा महागडा पियानो कुठल्याही कलाकाराच्या हातात देतांना हिंदी सिनेमे निर्माते पण फार विचार करणारच ना? आता सेट वर पियानो पण आहे आणि भारत भूषण पण आहे किंवा प्रदीप कुमार पण आहे तर वापरा पियानो, असे होत नाही.
शिवाय पियानोची आणखी एक खासीयत म्हणजे ह्याला कुठलाही राग किंवा राग-राग, चिडचिड किंवा उदासवाणे वातावरण चालत नाही.गाणी चालतात, श्रवणीय पण होतात पण पण पण ग्रेस फुल होत नाहीत उदा.
चलो एक बार फिरसे अजनबी बन जाये हम दोनो https://www.youtube.com/watch?v=wzbO1mjFPOM हे गाणे बघा. गाणे अतिव सुंदर आहे पण ह्या गाण्याला पियानोची ग्रेस मिळत नाही. (इथे हार्मोनियम पण चालला असता, त्या जॉय मूखर्जीने पण "हार्मोनियम" वाजवायचा प्रयत्न केला आहेच की... https://www.youtube.com/watch?v=7Zs5yhU81p4) पण इथे बहूदा सेट वर आधीच पियानो असावा.
एखाद्या उदास गाण्यात पियानो वापरला की काय होते? त्याचे अज्जून काही उदाहरणे म्हणजे, "शरारत" ह्या सिनेमातील " दिल ने प्यार किया है, एक बेफवा से" https://www.youtube.com/watch?v=TNPAUd5t-a4 हे गाणे.
किंवा
मेरे हूजूर ह्या सिनेमातील "जो गुजर रही है मुझपर" https://www.youtube.com/watch?v=doNp-mC1ky8
किंवा
"राम और शाम" ह्या सिनेमातील "आज की रात मेरे दिल की सलामी ले ले" https://www.youtube.com/watch?v=eUZkTcjGhIM हे गाणे. आधीच दिलीप कुमार त्यातून हे उदासवाणे गाणे मग जोडीला हार्मोनियम का नको? उगाच त्या पियानोला वापरले. पण इथे मात्र हार्मोनियमचा शाप आडवा आला.
किंवा
"अनाडी" ह्या सिनेमातील 'तेरा जाना दिल के अरमानोंका लूट जाना" https://www.youtube.com/watch?v=URfoTtyxOdU
किंवा
"विश्र्वास" ह्या सिनेमातील "चांदी की दीवार ना तोडी" https://www.youtube.com/watch?v=dbv7C59SgX4
किंवा
"अब्रू" ह्या सिनेमातील "जिन्हे हम भूलना चाहे, वो अक्सर याद आते है" https://www.youtube.com/watch?v=OO4HEoV_5EI
किंवा
"दिल ने पुकारा" ह्या सिनेमातील "वक्त करता जो वफा" https://www.youtube.com/watch?v=p4iet7b9XH0
किंवा
"उपकार' ह्या सिनेमातील "दीवानों से ये मत पूछो" https://www.youtube.com/watch?v=mz-GJ38wis0
आता ह्या पैकी बरीच गाणी "मुकेश"च्या आवाजात आहेत.
================
आता सेट वर पियानो आहेच आणि देव आनंद पण आहे मग एखादे गाणे पियानोभोवती का नको? हे हिंदी सिनेमावाले काय वाट्टेल ते करतील. झाडा भोवती नायक-नायिकांना पळवतील, किंवा लोटांगणे घालायला लावतील पण उगाच तबला-डग्ग्या भोवती किंवा मध्ये पिपाणी उभी करून नायक-नायिकांना त्या पिपाणी भोवती प्रदक्षिणा घालायला लावणार नाहीत. पण पियानो भोवती ते पण झाले आहे. गँबलर ह्या सिनेमातील , "दिल आज शायर है गम आज नग्मा है" हे गाणे. https://www.youtube.com/watch?v=vTQ_qbsz7Dw .... अर्थात हा एक अर्धवट प्रयोग असल्याने त्या पियानोभोवती पण प्रदक्षिणा पूर्ण झालेली नाही. ह्या गाण्याची अजून एक गंमत म्हणजे देवने ते सगळे गाणे बराच वेळ बसून म्हटले आहे. हे सगळे गाणे म्हणजे एक धाग्याचा विषय आहे.गाणे कसे नसावे? ह्याचे फार उत्तम उदाहरण.ना वाद्यांचा उपयोग.ना कलाकारांच्या चेहर्यावरील हावभाव, देवला दाढी-मिशी शोभत नाही, हे सर्वसामान्य प्रेक्षकांना समजते.(हम दोनो वेगळा.तिथे मिशीची गरज होती.नाहीतर वेगळा देव कसा ओळखायचा? आमचा मेंदू तर डोअरकीपरकडे आहे...विचारशक्ती नाही पण दृष्टी तर आहेच ना?)
आता देवने केलेच आहे तर मी का नको म्हणून राजने पण पिपाण्या वाजवता वाजवता "संगम" मध्ये पियानो वाजवला. अर्थात वैजयंती तशी पण त्याला भाव देत नाही. ह्याने आपले संपूर्ण चित्रपटभर कुठे पिपाण्या वाजव किंवा ते स्कॉटिश वाद्य वाजव हेच केले.अगदी तिच्याशी लग्न ही केले, पण तिने मात्र "मैं क्या करू राम, मुझे बूढ्ढा मिल गया" असे गात त्याची संभावना केली.ह्या नंतर मात्र राजने स्गळीच गाणी देखणी केली. मग तो "सत्यं शिवं सुदरं" असो किंवा "बॉबी" किंवा "राम तेरी गंगा मैली" असो.
खरे तर, "दोस्त दोस्त ना रहा" हे गाणे फार श्रवणीय पण इथेही उगाच पियानो आणून राजने त्या गाणे फक्त ऐकण्या इतपतच मर्यादित ठेवले. हवे असेल तर बघा.
https://www.youtube.com/watch?v=6MIHGllM8zI
पियानोचा असा फियास्को फार कमी गाण्यात आहे. बरे फक्त पार्टी असेल तरच हे वाद्य हवे असे काही नाही. संध्याकाळच्या कातरवेळी पण हे वाद्य फार मस्त करामत करते. "धीरे धीरे मचल" https://www.youtube.com/watch?v=-g21hlpTLis हे गाणे बघा. संगीत, गीत आणि सूर ह्यांचा सुंदर मिलाफ. पियानो ह्या अशा गाण्यातच खूलतो.
पण उगाच धसमुसळे करून ह्या वाद्याला जास्त वापरता येत नाही. शम्मी सारख्या धसमुसळ्या नयकाने पण "आज कल तेरे मेरे प्यार के चर्चे हर जबान पर" "https://www.youtube.com/watch?v=KIvLi9JT8tE" ह्या गाण्यात, पियानोला सरळ बाजूला सारले आहे. (ह्या गाण्याचे अज्जुन एक वैशिष्ट्य म्हणजे "बेबी मूमताज"चे "बेंबी मुमताज" मध्ये झालेले रुपांतर. शंकेखोरांनी ह्या गाण्याच्या आधीची मुमताजची गाणी आणि नंतरची गाणी बघावीत.
पण पुढे त्याचह सिनेमात "दिले के झरोके में तुझको बिठाकर" https://www.youtube.com/watch?v=7GS5QXBHsfU ह्या गाण्यात मात्र त्याने पियानोचे बंधन झुगारून दिले. शेवटी जेंव्हा त्याचा आवाज टिपेला जातो त्यावेळी पियानो पण योग्य ती साथ देत नाही.
पार्टीच्या माहोलचा पुरेपूर वापर पियानोच्या साथीने केलेला कलाकार म्हणजे, देव आनंद.
मग ते गाणे "कोई सोनेका दिल वाला, कोई चांदी के दिल वाला" https://www.youtube.com/watch?v=RyvbgIYqGDg असो किंवा "ख्वाब हो युम या कोई हकीकत" https://www.youtube.com/watch?v=Jw4wLVnFJ-E किंवा मग तीन देवीया ह्या सिनेमातील नुसताच डान्स असो https://www.youtube.com/watch?v=KUo5q0zGgl4 (अर्थात ह्या डान्स मध्ये तर देवने पियानो बडवलाच जास्त.)
आणि पार्टीत पियानो फक्त नायक किंवा नायिकेनेच वाजवला पाहिजे असे नाही, उदा, "किस्मत' सिनेमातील "आओ हूजूर तुमको" https://www.youtube.com/watch?v=x11QNC9aA70 हे गाणे.
पियानोचा विषय आणि दिल तो है दिल, https://www.youtube.com/watch?v=qrVSlq15iOI हे "मुकद्दर का सिकंदर " गाणे नाही, असे कसे होईल. कुणीही साथीला नसतांना किंवा समोर अथवा बाजूला नसतांना पण एकट्यासाठी पण वाजवता येतो.
दिल तो है दिल, https://www.youtube.com/watch?v=qrVSlq15iOI
ह्या एका सिनेमात दोन वेळा पियानोची गाणी आहेत. वर उल्लेख केलेले एक आणि दुसरे म्हणजे , ओ साथीरे तेरे बिना क्या जीना.
https://www.youtube.com/watch?v=F91kiWVwSqM
पियानो बेस्ड गाणी शोधतांना मिळालेले अजून काही गाणी म्हणजे.... " लव इन टोकोयो" मधले "मुझे तुम मिल गये हमदम" https://www.youtube.com/watch?v=GjievAzScsk हे गाणे.
पथर के सनम "https://www.youtube.com/watch?v=Ij20-IEUTjg"
हम प्यार में जलने वालें को "https://www.youtube.com/watch?v=IXQY5otyhJ8
सब कुछ लुटा के होश में आये तो क्या किया..... "https://www.youtube.com/watch?v=M06qGuUH0fo"
ऐ दिल मुझे बता दे "https://www.youtube.com/watch?v=cDKAOHUeZ88"
"अलबेला" ह्या सिनेमातील "भोली सुरत दिल के खोटे, नाम बडें और दर्शन छोटे" https://www.youtube.com/watch?v=H2uVRRFbJOU
वाद्यांचा विषय आणि ऋषी नाही असे होणारच नाही. त्याने बडे दिलवाले ह्या सिनेमात पण पियानो वाजवायची हौस पूर्ण करून घेतली आहे https://www.youtube.com/watch?v=tmvPQehEzz4
राजेश खन्नाने पण पियानो वाजवून बघीतलेला आहे. प्यार दिवाना होता है, मस्ताना होता है. https://www.youtube.com/watch?v=lslZptXok8o
ह्या जाने माने कलाकारात धर्मेंद्र तरी मागे कसा असेल.ज्या कुणी धर्मेंद्रच्या हातात पियानो दिला तो खरेच हुषार.धर्मेंद्रच्या हातात २च वाद्ये शोभतात एक पियानो आणि दुसरा म्हणजे माऊथ ऑर्गन.
धर्मेंद्र आणि पियानो, "देवर सिनेमा" ---- आया है मुझे फिर याद वो जालीम " https://www.youtube.com/watch?v=BiCkqhmxtbQ"
धर्मेंद्रने अजून एका गाण्यात पण पियानोला स्पर्श केला आहे, सिनेमा 'आदमी और इन्सान" गाणे "जिंदगी इत्तेफाक है" https://www.youtube.com/watch?v=yZT9c4C6tAg
तसा आमच्या अमिताभने पण पियानो वाजवला आहे.पण आधीच्या अनुभवातून धडा घेवून, इथे तो सुरुवातीला फक्त पियानोला हात लावतो. आपण नाही का "मं मं" म्हणत अगदी तसेच.ह्याला पुरावा अहे आणि ते म्हणजे "कम्से वादे" ह्या चित्रपटातील "आती रहेगी बहारे" https://www.youtube.com/watch?v=CD2KC79uaes हे गाणे. अर्थात अमिताभने ह्या गाण्यात पियानोला फक्त हातच लावल्याने चित्रपट चाललाच. ("कस्मे-वादे" पेक्षा "जमीर" जास्त उत्तम होता.रणधीर कपूरपेक्षा विनोद खूपच उत्तम पण केवळ अमिताभच्या हातात संपूर्ण गाणे भर वाद्य आले आणि सिनेमा जास्त काही चालला नाही.इथे अमिताभच्या चित्रपटाच्या चालण्याची फूटपट्टी वेगळी आहे. भारतभूषण, प्रदीपकुमार ह्यांच्या १० लाखाच्या सिनेमाने १२ लाख मिळाले तरी सिनेमा चालला आणि अमिताभच्या १ कोटीच्या सिनेमाने किमान १० कोटी मिळवले तरच तो सिनेमा चालला.अशी फूटपट्टी वापरणे भाग आहे.सिनेमात प्रत्येकाच्या फूटपट्या वेगळ्या असतात.असे माझे मत.)
पियोना बेस्ड काही गाणी
"जिंदगी और मौत" ह्या सिनेमातील "दिल लगाकर हम ये समझे जिंदगी क्या चीझ़ है" https://www.youtube.com/watch?v=M7E7qg2sHOM
"एक साल" सिनेमातील "सब कुछ लुटा के होश में आये तो क्या किया" https://www.youtube.com/watch?v=M06qGuUH0fo
अनमोल घडी ह्या सिनेमात "जवां है मोहब्बत" https://www.youtube.com/watch?v=wtHPdzq5w7M
पण एखाद्या सिनेमात फार तर २ गाण्यांपुरतेच पियानो वापरल्या जाते पण "अंदाज" ह्या सिनेमात मात्र तब्बल ५ गाणी पियानोच्या साथीने आहेत.
१. तू कहें अगर https://www.youtube.com/watch?v=o2Z2OC9oMWM
२. झूम झूम के आज https://www.youtube.com/watch?v=G5Ei5MCmJF8
३. तूटे ना दिल तूटे ना https://www.youtube.com/watch?v=sY31VhGbrM0
४. डरना मोहब्बत कर ले https://www.youtube.com/watch?v=sJLGHNgsC8Q
५. मेरी लाडली रे मेरी लाडली बनी है https://www.youtube.com/watch?v=98kyvAr8J0A
============
आता जर सगळ्या पार्ट्यांना जर पियानो चालत असेल तर मग वाढदिवसाला पण पियानो हवाच
सुजाता सिनेमात "तुम जिओ हजारो साल. साल के दिन हो पचास हजार" https://www.youtube.com/watch?v=2krvkcn_tF8
पण ही सगळी गाणी बघून माझा पियानो विकत घ्यायचा निर्णय हळूहळू नक्की होत गेला पण मग एक गाणे मिळाले की ज्यात वादक (आमचा जितू) अगदी पारंगत पणे पियानो वाजवत आहे, आणि ते गाणे म्हणजे.
"बार बार दिन ये आये" https://www.youtube.com/watch?v=Jn9_6yINCy4
प्रतिक्रिया
24 Jun 2017 - 4:29 pm | संजय पाटिल
अर्र... आता लेख वाचू, का गाणी बघू? काय एका एका गाण्यांची आठवण काढुन दिलीत राव....
24 Jun 2017 - 4:58 pm | अभ्या..
आह्ह्ह्ह्ह्हा मुविकाका, भारीच इषय घेतलासा जनू.
पण कसंय ना की, पडद्यावर दाखावायाचे वाद्य वेगळे असते अन तिकडे मुझिशिअन वेगळेच वापरत असतो बघा. म्हणजे ते "मै कोई एसा गीत गाऊ, के आरजू जताऊ, अगर तुम कहो" म्हणताना शारुख ट्रम्पेटच्या बांगेवर बिगुल फुंकतो तसेच.
मला तर गाणे वाजतानाचे ऑर्केस्ट्रेशन व्हिज्युअलाईज करायलाच लै आवडते. भले पडद्यावर कोणी का ठोकळा/ठोकळी कसे का अंग हलवेना.
आता "जिस्म"चे आवारापन बंजारापन घ्या. ती बिप्स अन जॉन्या काय का करेना. डोळे मिटा अन डोळ्यासमोर ऑर्केस्ट्रेशन इमॅजिन करा.
अशा लाईनीनं पांढर्या काळ्या ड्रेसातले व्हायोलीनचे गज उंचावणारे बसलेत. त्याच लाईनीत अंगापेक्षा मोठा चेलो असलेले दोघे जण आहेत. (थोडासा युवराज मधला कत्रिनाचा रेफरन्स घेतला तरी चालेल) क्लॅरिनेटवाल्यांत दोघे ट्रम्पेटवाले अन जिवापाड सॅक्सोफोन सांभाळणारा एकजण आहे. रोलँडच्या कीबोर्डावर बीटस पडायला लागण्याआधी विंडचाईम चिवचिवताहेत. कीबोर्डची लय पकडून रणजित बारोटचे ड्रम्स भरीव आवाजात हृदयासारखे धडधडताहेत. हायला काय ते सिंक्रोनायझेशन. काय ते कॉम्पोझीशन, काय ते ऑर्केस्ट्रेशन. जसजसे गाणे चढत जाते ही ऑर्केस्ट्रेशनची नशा सवार व्हायला लागते मेंदूवर.
कोक स्टुडीओ नायतर एमटीव्ही अनप्लग्ड बघायला त्यामुळेच आवडते. :)
25 Jun 2017 - 2:20 pm | चित्रगुप्त
वावावावावावावावा
अत्यंत भारी, अभ्यासपूर्ण आणि आनंददायक लेख. ही सर्व गाणी सावकाशीने ऐकणार आहेच. परंतु....
या गाण्यांमधे 'शगुन' (१९६४) मधले "तुम अपना रंजोगम अपनी परेशानी मुझे दे दो" हे अगदी खास असे गाणे द्यायचे राहून गेले राव.
https://youtu.be/5xEAbo1VORI
आणि पियानोचा विषय निघालाच आहे, तर मोझार्टच्या दोन पियानो रचना:
https://youtu.be/FZNt3ESnf8Q
https://www.youtube.com/watch?v=lKdVqD75dm4
वरील 'अल्ला तुर्का'(तुर्किश मार्च) ही वाजवायला अत्यंत अवघड रचना एक लहानशी मुलगी वाजवते आहे बघा:
https://www.youtube.com/watch?v=QxXurYqO8X0
या लेखाबद्दल अनेकानेक आभार.
25 Jun 2017 - 4:53 pm | डॉ सुहास म्हात्रे
काय नाही नाही म्हणत व्यासंगाचा एक मोठा पट खुला केलात तुम्ही, मुवि !!! एकदम छुपे रुस्तम निघालात ! *clapping*
असंख्य जुन्या गाण्याची सय आणून दिलीत, यासाठी तुम्ही पुण्यात याल तेव्हा एक पार्टी लागू झाली आहे !
आता अनेक तास वेळ काढून ती सगळी गाणी ऐकणे आले ! :)
25 Jun 2017 - 11:04 pm | दशानन
वाह!
जेव्हा लेख आला तेव्हाच वाचला होता दुपारी, पण आता निवांत वेळ हाती होता, पुन्हा वाचला, सोबत गाणी देखील...
जबरदस्त!! मज्जा आली!
खरं तर एक एक गाणे घेऊन तुम्ही त्यावर लेख लिहू शकाल.. :)
26 Jun 2017 - 11:02 am | मुक्त विहारि
@ स.पा. ====> धन्यवाद.
@ अभ्या.. ===> धन्यवाद.
@ चित्रगुप्त ===> लिंक्स बद्दल धन्यवाद. मोझार्ट आणि बीथोविन हे खरेतर गंधर्वच. दोघांनी बनवलेल्या सिंफनी अतिशय श्रवणिय. खास तुमच्या साठी ही एक बीथोवीनच्या ५व्या सिंफनीची लिंक https://www.youtube.com/watch?v=QiaH1mpODrk "मोझार्ट आणि बीथोवीन ते आबा (Abba)" हा असा पियानोचा खूप मोठा विषय आहे. सध्या गाणी गोळा करणे चालले आहे. (Abba) ची ७-८ गाणी पियानो बेस्ड आहेत. Abbaचे मला आवडलेले एक गाणे म्हणजे "मामा मिया" https://www.youtube.com/watch?v=unfzfe8f9NI
@ डॉ. सुहास म्हात्रे ===> पुण्याला येवून कट्टा करण्यापेक्षा "अंगकोर वट" ला एक १५-२० दिवस मुक्काम ठोकू.सगळी आर्थिक गणिते जर योग्य तर्हेने जुळली तर येत्या ६-७ वर्षांत अंगकोर वट नक्कीच करता येईल.
@ दशानन ====> हिंदी सिनेमा सृष्टीने संगीताच्या बाबतीत फार भरीव कामगिरी , चांगल्या आणि वाईट, ह्या दोन्ही अर्थाने केलेली आहे.अर्थात आमची माहिती "महान" पर्यंतच. कारण "महान" हा सर्वार्थाने "महान" होता. कथा-संगीत-दिग्दर्शन आणि ३ही अमिताभला पार वाया घालवले आहे. बाकी तुम्ही म्हणता ते पण खरेच "एका एका गाण्यावर लेख होवू शकतो." पण तितकी बौद्धिक प्रतिभा माझ्या पाशी नाही.
26 Jun 2017 - 4:18 pm | दशानन
अगदी अगदी!!!
26 Jun 2017 - 3:39 pm | पद्मावति
सुंदर लेख.
काय नाही नाही म्हणत व्यासंगाचा एक मोठा पट खुला केलात तुम्ही, मुवि !!!
+१27 Jun 2017 - 9:58 am | धर्मराजमुटके
हिंदी चित्रपटांचे माहित नाही पण बहुतेकांचे आवडते वाद्य 'तुणतुणे' असावे.
27 Jun 2017 - 6:33 pm | मुक्त विहारि
+ १
27 Jun 2017 - 7:03 pm | अभ्या..
नाही नाही, आवडते वाद्य बोर्या असावे. असा मस्त वाजवतात की त्याचे नाव ते.
27 Jun 2017 - 10:21 am | अनुप ढेरे
साउंड्स ऑफ द नेशन नावाचा कार्यक्रम अमित त्रिवेदी करतो. भारताच्या वेगवेगळ्या भागातल्या ट्युन्स ज्या त्रिवेदिने स्वतः बनवल्या आहेत त्या यात आहेत. यात लाईव्ह गायक आणि वाद्य असतात. वेगवेगळ्या वाद्यांसाठी ऐकायला भारी वाटतो हा कार्यक्रम. रुबाबने जी सुरुवात होते ती कमाल आहे. चांगले हेडफोन्स वापरुन ऐकावा हा व्हिडो.
27 Jun 2017 - 7:35 pm | तुषार काळभोर
मेरी जंग... (वन मॅन आर्मीवाला नाय... अनिल कपूर अन् अमरीश पूरीवाला)
28 Jun 2017 - 12:15 pm | मुक्त विहारि
मला फक्त एकच गाणे माहीत आहे आणि ते म्हणजे
सूर तेच छेडिता ====> https://www.youtube.com/watch?v=__8eyXyXkOo
28 Jun 2017 - 1:34 pm | अज्ञानि
बहारे फिर भी आयेगी मधे धर्मेंद्र चे आप के हसीन रुख पे आज नया नूर है गाणे पियानो वर आहे.
28 Jun 2017 - 1:34 pm | अज्ञानि
बहारे फिर भी आयेगी मधे धर्मेंद्र चे आप के हसीन रुख पे आज नया नूर है गाणे पियानो वर आहे.
28 Jun 2017 - 5:44 pm | गामा पैलवान
अवांतर : मी वाद्यच्या जागी खाद्य वाचलं. उत्तर अर्थात गाजरका हलवा वा बैंगनका भरता.
-गा.पै.
28 Jun 2017 - 6:41 pm | मुक्त विहारि
मूली का पराठा
1 Jul 2017 - 11:23 pm | मुक्त विहारि
आपके हसीन रूख पे आज नया नूर है https://www.youtube.com/watch?v=qMYAHw8e8u8
4 Jul 2017 - 2:18 pm | मनिमौ
लय भारी एकसे एक गाण्यांचा खजिना काढलात की बाहेर. शेवटचे गाणे माझे अत्यंत आवडते आहे.