तुम्ही संवेदनशील आणि भिडस्त आहात?
तुम्हीं शांत स्वभावाचे आणि मितभाषी आहात?
सालस आणि आज्ञाधारक आहात?
आणि त्यासाठी तुमचे कौतुक होत आहे?
तर मग आजच सावध व्हा!
ते कौतुक यासाठी आहे की तुम्ही तसेच सद्गुणाचे पुतळे राहावे म्हणजे जग तुमचे शोषण करू शकेल!
तुमच्या अंगात ठाण मांडून बसलेला हा सद्गुणाचा पुतळा निर्धाराच्या घट्ट दोरखंडाने बांधा, एका भक्कम लोखंडी पेटीत टाका, पेटीला भलेमोठे इच्छाशक्तीचे लोखंडी कुलूप लावून ती पेटी हेलिकॉप्टरमधून मिसाईलला बांधून समुद्राच्या मध्यभागी खोल तळाशी भिडेल इतक्या जोरात फेकून द्या आणि चाबी वितळवून टाका. आणि मग समुद्राच्या खवळलेल्या लाटांची प्रेरणा घेऊन बिनधास्तपणा, स्पष्टवक्तेपणा, बेफिकिरी, डावपेच आणि निगरगट्टपणाचा यांचा अंगीकार करा.
आजचे घोर कलियुग सद्गुणांच्या पुतळ्यांसाठी बनलेले नाही आणि ते मध्यम मार्ग सुद्धा स्वीकारू देत नाही.
एक तर तुम्ही कुणाचे शोषण करा, नाहीतर मग स्वत: तरी शोषित व्हा.
कुणाचा तरी बळी घ्या, नाहीतर तुमचा बळी जाईल.
कुणालातरी दबावात ठेवा नाहीतर तुम्हाला कुणीतरी दबावात ठेवेल.
कुणालातरी खाली खेचा, नाहीतर दुसरा कुणीतरी तुम्हाला खाली खेचून पाडेल.
योग्य वेळ आली की समोरच्याला खडे बोल सुनावून मोकळे व्हा नाहीतर तुम्हाला गृहीत धरले जाईल, तुमचे मौन ही तुमची मूक संमती मानली जाईल. स्पष्ट बोला नाहीतर कष्ट झेला. प्रत्येक "अरे" ला "कारे" करा!
पाणी गळ्यापर्यंत येण्याची वाट बघू नका नाहीतर ते पुढे नाकातोंडात जाऊन श्वास घेणे मुश्कील करेल.
प्रतिक्रिया
22 May 2017 - 5:31 pm | अत्रुप्त आत्मा
आत्मविवंचीत जिल्बी! ;) उर्फ स्वयम् प्रतिमासंरक्षक निसो काढा! =))
पांडू .... ये रे ये! :D
22 May 2017 - 5:32 pm | निमिष सोनार
वात बघतो!
22 May 2017 - 5:32 pm | एस
आता फक्त मोजि राहिलेत.
22 May 2017 - 5:39 pm | अत्रुप्त आत्मा
@आता फक्त मोजि राहिलेत.
››› :D
अगंदी ह्येच आलं मनात! :D
22 May 2017 - 5:37 pm | अभ्या..
अगदी खरे आहे वाक्यनवाक्य बघा निमिषभाव.
लै खराब झालीय दुनया. :(
.
माझे सगळे मित्र म्हणतात मला. "तू आहेस तर होप्स आहेत काही, नायतर काय खरे नाही"
मलाही खरे वाटते कधी कधी.
22 May 2017 - 6:10 pm | खेडूत
खरंय वाक्य न वाक्य..
सालं हे कलियुग नक्की कधी सुरू झालं काय म्हाईत! लै गोंधळ होतो बघा.
22 May 2017 - 6:36 pm | mayu4u
म्हणजे आधी पेटी मिसाईल ला बांधायची, की हेलिकॉपटर मध्ये ठेवायची?
22 May 2017 - 7:42 pm | चांदणे संदीप
जबदरस्त!! याच्यापेक्षा चुकीचा शब्द नाही सुचला.
Sandy
22 May 2017 - 8:26 pm | चित्रगुप्त
तुम्ही कुणाचे शोषण करा ....कुणाचा तरी बळी घ्या.....कुणालातरी दबावात ठेवा .....कुणालातरी खाली खेचा....
................. उच्च रक्तदाब, रक्तशर्करा, कोलेस्टरॉल, र्हदयविकार, मधुमेह, मूळव्याध... वगैरेंचा 'शर्तिया रामबाण इलाज' करणारांची ही जाहिरात आहे की काय ?
22 May 2017 - 10:02 pm | सतिश गावडे
तुम्ही एखाद्या "स्टेप बाय स्टेप टू असदफ" प्रकारच्या एखाद्या वेबसाईटवर पोटलेखक म्हणून संधी मिळते का पहा. नाव कमावलेलं. :)
23 May 2017 - 6:55 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
=))
22 May 2017 - 11:52 pm | माम्लेदारचा पन्खा
सफाई कामगारांनो,आपण सगळे गटारात गुदमरून जीव देऊया . . . . . !
23 May 2017 - 12:02 am | मोदक
तुम्ही संवेदनशील आणि भिडस्त आहात?
तुम्हीं शांत स्वभावाचे आणि मितभाषी आहात?
सालस आणि आज्ञाधारक आहात?
आणि त्यासाठी तुमचे कौतुक होत आहे?
तर मग आजच सावध व्हा!
हे वाचून अॅमवे किंवा टेलीब्रँड्सची झैरात आहे असे वाटले.
23 May 2017 - 6:54 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
किंवा एक घंटा पहेले छाप वाटला. =))
23 May 2017 - 6:53 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
काही प्रश्णं आहेत ओ नी.सो.जी.
०१. जर का सद्गुणांचा पुतळा लोखंडी असेल तर तो सोन्याच्या पेटीत ठेउन बुडवला तर चालेल का?
०२. समुद्राच्या किंवा रादर पाण्याखाली पेटी बुडवायची असेल तर मिसाईल ऐवजी अंडरवॉटर टोर्पिडोज चालतील का?
०३. जर का मिसाईल वापरायचीचं ठरवली तर ती साधी असावीत का आय.सी.बी.एम.? समजा मिसाईल आहेत माझ्याकडे तरीही हेलिकॉप्टर वापरावे लागेल का?
०४. पेटी समुद्राच्या पाण्याने गंजु नये म्हणुन काय काळजी घेता येईल. कुठलं तेल लावता येईल?
०५. चाबी इलेक्ट्रिक फर्नेशीत वितळवायची का साधी कोळसा भट्टी चालेल? त्यापेक्षा पेटीला वेल्डिंग करता येईल का? म्हणजे एकदम भक्कम काम झालं.
०६. हे सगळं केल्यानंतर साधारण किती दिवसांनी फरक दिसायला लाग्तो?
०७. १ ते १० च्या पट्टीवर तुम्ही चांगुलपणामधे स्वतःला किती गुण द्याठ?
मज पामरास ही उत्तरे मिळतील तर तुमचा आजण्म रुनी राहिन गुरुद्येवा. _/\_!!!
अजुनही काही प्रश्णं आहेतचं. ते ह्यांची उत्तरं मिळाल्यावर पडतील. ते तुमच्या सल्ल्याला अनुसरुन निगरगट्टं बनुन विचारेनचं.
23 May 2017 - 3:17 pm | निमिष सोनार
आहा आहा हा
23 May 2017 - 9:46 am | पैसा
है शाब्बास! एक लेख लिहून थांबू नका. अख्खं पुस्तक येऊ द्या.
23 May 2017 - 11:40 am | अमर विश्वास
एक तर तुम्ही कुणाचे शोषण करा,
कुणाचा तरी बळी घ्या,
कुणालातरी दबावात ठेवा
कुणालातरी खाली खेचा,
बात कुछ हजम नहीं हुई ........
23 May 2017 - 12:37 pm | सूड
तुम्ही यातलं काय काय केलंत?
23 May 2017 - 5:06 pm | अमर विश्वास
"अरे" ला "कारे" बरेचदा ,,,
बाकीच्या गोष्टी अजिबात नाही
23 May 2017 - 5:57 pm | अद्द्या
अगदी अगदी .. अगदी अस्साच आहे मी ... म्हणजे मला हि वाटत होताच कि लोक फायदा घेतात माझ्या चांगल्या स्वभावाचा.. कद्धी म्हणजे कद्धी कोणाला त्रास द्यायचा विचार हि करू शकत नाही मी.. अगदी गरीब बिचारा साधा भोळा सालस आणि निरागस असा आहे मी . पण त्याच चांगल्या असण्यामुळे मी हे कोणाला सांगू हि शकत नव्हतो.. या धाग्यामुळे मला हे बोलता तरी येतंय . .वाचवलं तुम्ही मला :'(
धन्यवाद नसो :(
23 May 2017 - 7:18 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
अच्छा तु 'सालस' का? ह्म्म्म्म. =))
23 May 2017 - 6:33 pm | गवि
"व्हाय धिस कोलावेरी कोलावेरी कोलावेरी डी..."
डोक्यावर बर्फ ठेवा...